The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

२२०० किलोमीटरचे अंतर कापत इस्त्राईली विमानांनी इराकचा आण्विक कार्यक्रम उध्वस्त केला होता

by Tushar Damgude
23 June 2020
in इतिहास, ब्लॉग, विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
iraq the postman
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 

===

फ्रान्स आणि इजरायलची मैत्री तशी जुनीच. इस्रायल विरुद्ध अकरा अरब राष्ट्रांचे सहा दिवस युद्ध चालले तोपर्यंत ती मैत्री अबाधित होती, परंतु अरब राष्ट्रांविरुद्ध वापरणार नाही अशी हमी देऊन फ्रान्सकडुन विकत घेतलेली शस्त्रास्र इस्रायलने त्या युद्धात सढळ हाताने वापरली आणि या मैत्रीला ग्रहण लागलं कारण तेलसंपन्न अरबांना दुखावणं फ्रान्सला शक्य नव्हते.

फ्रान्सने इस्रायल बरोबर मिराज-३ विमानं आणि मिसाईल बोटी देण्याचा करार संपुष्टात आणला. इस्रायल भडकला, यहुद्यांनी मिराज-३ ची ब्लु प्रिंट आणि फ्रेंच बंदरात असलेल्या मिसाईल बोटी पळवुन नेल्या आणि आपले इप्सित साध्य केले. फ्रान्सचा तिळपापड झाला आणि त्यांनी यहुद्यांना धडा शिकवायचे ठरवले.

१९७१ च्या काळात पेट्रोलियमचे दर भडकलेले होते, त्याकाळात फ्रान्स अणु आणि पेट्रोलियम वर उर्जेसाठी अवलंबून होता, फ्रेंच शिष्टमंडळ तेलासंदर्भात बोलणी करण्यासाठी तेलसंपन्न इराक मध्ये पोहचले, सद्दाम तेव्हा सत्तेत नव्हता परंतु त्याचा राजकीय दबदबा मात्र होता. इराकने स्वस्त तेलपुरवठ्याच्या देण्याच्या बदल्यात अणुभट्टी इराकला द्यावी असा प्रस्ताव ठेवला. फ्रान्सला तर हर्षोल्लास झाला कारण स्वस्त तेल आणि शिवाय इस्रायलच्या नाकावर टिच्चुन इराकला अणुभट्टी द्यायची असा दुहेरी फायदा.



फ्रान्सने अमेरिका, ब्रिटन, रशियाचा विरोध धुडकावून लावला आणि ७० मेगावॅट क्षमतेची अणुभट्टी आणि १२ किलो युरेनियमचा पुरवठा इराकला देण्याचा करार केला. एवढ्या युरेनियमपासुन तीन-चार अणुबॉंब बनतात. इस्रायलने आंतरराष्ट्रीय पातळीवर दाद मागितली परंतु त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. अण्वस्त्रधारी इराक इस्रायलचे अस्तित्व संपुष्टात आणु शकतो हे इस्रायलला माहिती होतं त्यामुळे त्यांनी स्वतःच मार्ग काढण्याचे ठरवले.

इस्रायलने आपले हेरांचे जाळे फ्रान्स मध्ये पसरवले. स्नीम नावाच्या कंपनीला अणुभट्टीचे कंत्राट मिळाले आहे आणि अणुभट्टी व सुट्या भागांची बांधणी पुर्ण झाल्याचे हेरांनी कळवले. अणुभट्टी प्रकल्पात अत्यंत मोजक्या लोकांना याबद्दल पुर्ण माहिती असते परंतु कर्मचार्यांच्या हालचाली, पत्रव्यवहार, टेलिफोन संभाषण यावर नजर ठेवून तुकड्यातुकड्यांनी त्यांनी सर्व माहिती गोळा केली.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

तुलोन बंदरातील गोदामात सदर अणुभट्टी असल्याचे मोसादला कळाल्यावर १९७९च्या एप्रिल मध्ये पॅरीस वरुन तीन मोसादचे गुप्तहेर तुलोन येथे आले तिथे त्यांना अजुन चार स्फोटकतज्ञ येऊन मिळाले.

अत्यंत कडेकोट बंदोबस्त असलेल्या गोदामातुन अणुभट्टीचे जमतील तेवढे भाग पळवायचे आणि बाकीचे नष्ट करून टाकायचे अशी सर्वसाधारण योजना होती.

भिंती ओलांडुन गुप्तहेरांनी अलार्म बंद पाडले, पहारेकऱ्यांना थंड केले, योग्य त्या ठिकाणी स्फोटकं लावुन ते तिथून रफुचक्कर झाले ते पुन्हा फ्रान्स मध्ये न दिसण्यासाठी. पहाटेच्या वेळी फ्रान्स बॉंम्बस्फोटांनी हादरून गेलं आणि इराकचं स्वप्न काही काळ पुढे ढकललं गेलं.

१९८० मध्ये मोसादने दुसरा धक्का दिला. फ्रेंच सरकारच्या निमंत्रणावरून गेलेल्या इराकी अणुशास्त्रज्ञ अल-मेशाद यांची हत्या पॅरीस मध्ये करण्यात आली. फ्रान्सने ही बातमी लपवली परंतु इस्रायलने जगासमोर आणुन आपणच त्यामागे असल्याचे दाखवुन दिले. आता मात्र फ्रान्स भडकला आणि युद्धपातळीवर अणुभट्टी बांधुन इराकला कडेकोट बंदोबस्तात पोहचवुनच शांत बसला.

सदर घटनेमुळे इस्रायली पंतप्रधान शांती, बंधुता, समजुतदारपणा वगैरे पोकळ गप्पा मारत बसले नाहीत त्यांनी योग्य ती पाऊले उचलण्याचे आदेश दिले. इस्रायलला आता शेजारी कट्टर दुश्मन असलेल्या सिरीया, जॉर्डन, सौदीअरेबीयाच्या पलीकडे असलेल्या इराकवर हल्ला करायचा होता. इस्रायल मधुन सरळ रेषेत इराकला पोहचायचे तर साधारणपणे लाखभर चौरस किलोमीटरचा जॉर्डन पार करावा लागत होता परंतु त्यात शेजारी देश इराकला सावध करण्याचा धोका होता त्यामुळे जॉर्डनला वळसा घालून इराकला जाणे सोयीस्कर होते. परंतु एकुण अंतर होत होते २२०० किलोमीटर आणि इस्रायल कडे तेव्हा असणारी फॅंटम विमानं तितक्या क्षमतेची नव्हती त्यामुळे हे एकप्रकारे आत्मघातकीच मिशन होते.

सराव सुरु झाला, तिकडे इराण इराक युद्ध सुरु झाले यातच एक दीड वर्ष गेली आणि तोवर अत्याधुनिक अमेरिकन F16 विमानं इस्रायल कडे दाखल झाली. इस्रायली तज्ञांनी अणुभट्टीचे कवच फोडण्यासाठी एक टन वजनाचा बॉंम्ब ४५ अंशाच्या कोनात आपटायला हवा तर दुसरा बॉंम्ब त्या भगदाडातुन आत टाकुन अणुभट्टीची यंत्रणा नष्ट करण्यासाठी टाकावा असा निष्कर्ष काढला त्यानुसार सराव सुरू झाला.

सहा F16 विमानं यासाठी तयार करण्यात आली. यामध्ये काही तांत्रिक अडचणी उभ्या राहिल्या पण ते सगळं सविस्तर लिहिण्याची आवश्यकता वाटत नाही. ७ जून १९८१ ला इस्रायली विमानांनी हल्यासाठी मार्गक्रमण सुरू केले, सौदीअरेबीया मागे टाकुन विमानं इराक हद्दीत कमी उंचीवरून वेडीवाकडी उडत ओसिराक मध्ये शिरली. त्यांना आता समोरच अणुभट्टीचा घुमट दिसु लागला. प्रतिक्षा संपलेली होती.

विमानांनी आठ हजार फुटांची उंची घेतली मग सुर मारत घुमटावर निशाणा धरुन एक टनाचा पहिला बॉंम्ब मुक्त झाला मग दुसरा मग तिसरा आणि एकुण बारा बॉंम्ब टाकुन F16 आपलं कर्तव्य बजावुन इजरायलच्या दिशेनं उडु लागली.

अण्वस्त्रधारी होण्याचं इराकचं स्वप्न धुळीला मिळाले परंतु आज त्या घटनेचं आणि धाडसाचं महत्व मला वाटतं. माथेफिरू लोकांच्या हाती अण्वस्त्रासारखी शस्त्र असणे ही कल्पनाच भयंकर आहे.

मोसादने अशीच योजना भारताच्या साथीने पाकिस्तानी अणुप्रकल्पाबाबत आखली होती परंतु नेभळट आणि कचखाऊ भारतीय मनोवृत्तीमुळे आपल्या देशावर कायम टांगती तलवार आहे. आता काश्मीर असो किंवा मुंबई हल्ला असो सगळे प्रश्न टेबलावर आणि प्रॉक्सी वॉरनेच सोडवायचे कारण आपला शेजारी नंगा आहे आणि नंगेसे खुदा भी डरता है.

===

लेखक: तुषार दामगुडे

===

या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. ThePostman.co.in संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही. | आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: Arab CountriesFrench-Israel RelationsIsrael
ShareTweet
Previous Post

इस्पीकचा राजा – बदामची राणी : पत्त्यांच्या खेळात हे राजा, राणी, गुलाम कुठून आले?

Next Post

पाकिस्तानच्या पहिल्या कायदेमंत्र्यांना ‘हिंदू’ असल्यामुळे पाकिस्तान सोडून भारतात यावं लागलं होतं

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
Next Post

पाकिस्तानच्या पहिल्या कायदेमंत्र्यांना 'हिंदू' असल्यामुळे पाकिस्तान सोडून भारतात यावं लागलं होतं

चिकूच्या प्रक्रिया उद्योगातून हा मराठी शेतकरी वर्षाकाठी 1 कोटींचा नफा कमावतोय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.