The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या एका फसवणुकीमुळे मानवी उत्क्रांतीचा इतिहास अनेक दशके भरकटला होता

by द पोस्टमन टीम
9 January 2026
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


जर तुम्हाला म्हटलं की, हातात मोबाईल घेतलेल्या अवस्थेत सगळ्यात पुरातन व्यक्तीचे अवशेष सापडले आहेत. तर, तुम्ही क्षणाचाही विलंब न करता याचं खंडन कराल. मात्र, शतकभरापूर्वी अशीच एक विचित्र बातमी तब्बल ४१ वर्षे सत्य म्हणून जिवंत राहिली. २१ नोव्हेंबर १९५३ पर्यंत ती बातमी सर्वांनी सत्य मानली होती. विसाव्या शतकातील सर्वात मोठी वैज्ञानिक फसवणूक असलेल्या ‘पिल्टडाउन मॅन’चा खोटेपणा अखेर जगासमोर आला होता. ‘पिल्टडाऊन मॅन’ नावाचा हा प्रकार नेमका होता तरी काय?

फेब्रुवारी १९१२ मध्ये, चार्ल्स डॉसन नावाच्या एका हौशी ब्रिटीश पुरातत्त्ववेत्त्यानं लंडनच्या ‘नॅचरल हिस्ट्री म्युझियम’ला ​​पत्र लिहिलं. ससेक्स प्रांतातील पिल्टडाउन येथे खोदलेल्या जीवाश्मात वानर आणि मानव यांच्यातील उत्क्रांतीचे धागेदोरे सापडले आहेत, असा त्यानं दावा केला. त्याचं हे पत्र म्हणजेचं इतिहासातील सर्वात यशस्वी आणि परिणामकारक फसवणुकीची नांदी होती.

‘पिल्टडाउन मॅन’ हा एक मानवी ‘जीवाश्मां’चा संग्रह होता. त्यात दातांच्या कवळीसह जबडा, डोक्याची कवटी आणि हाडांच्या काही तुकड्यांचा समावेश होता. हे अवशेष प्लाओसाइन युगातील म्हणजेच सुमारे ५३.३३ लाख वर्षांपूर्वीचे होते.

या जीवाश्मांचा रंग गडद लालसर तपकिरी होता. इतर हाडं एप वानरासारखी होती, तर कवटी मानवासारखी होती. दातांचे सुळे एप किंवा मानवाचे असण्याची शक्यता होती. एकूणच या सर्व जीवाश्मांना एकत्ररित्या पाहिल्यास, असं लक्षात येत होतं की, मानवाच्या रुपात विकसीत होणाऱ्या एप वानराचे ते अवशेष असावेत. म्हणूनच तो मानवी उत्क्रांतीच्या संसोधनातील हरवलेला दुवा आहे, असं मानलं गेलं. मात्र, जेव्हा त्याची सत्यता समोर आली तेव्हा ब्रिटनची नाचक्की झाली. मानवी उत्क्रांतीच्या शोधाबाबतचा मोठेपणा इंग्लंडला मिळावा म्हणूनच त्यांनी ‘पिल्टडाउन मॅन’चा बनाव रचला, असा आरोप झाला.

१९०७ साली बेल्जियम, फ्रान्स आणि जर्मनीमधील शास्त्रज्ञांनी मानवाच्या उत्क्रांतीवर प्रकाश टाकणारी मानवी जीवाश्म शोधली. या शोधांमध्ये जर्मनीतील होमो हीडेलबर्गेनसिसमध्ये सापडलेल्या जबड्याच्या जीवाश्माचा समावेश होता. युनायटेड किंगडम आणि जर्मनीचे संबंध तुलनेने कमकुवत होते. त्यातही पहिल्या महायु*द्धाच्या पार्श्वभूमीवर मोठा तणाव निर्माण झाला होता. याच वातावरणात चार्ल्स डॉसन, हा वकील व हौशी पुरातत्वशास्त्रज्ञ ‘पिल्टडाउन मॅन’ घेऊन समोर आला. त्यानं पूर्वी देखील ब्रिटीश संग्रहालयात जीवाश्मांचा संग्रह दान केला होता.



‘अमेरिकन सायंटिस्ट’ या जर्नलमधील किथ स्टुअर्ट थॉमसनच्या लेखानुसार, डॉसन हा अतिशय खोटारडा माणूस होता. त्यानं हेस्टिंग्ज किल्ल्याच्या ऐतिहासिक कागदपत्रांची चोरी केली होती. ती आपली मालमत्ता असल्याचे भासवून तो त्या इस्टेटमध्ये आला होता. दुर्दैवाने या सर्व गोष्टी जगापासून त्यावेळी अज्ञात होत्या. जर याबद्दल माहिती असती तर, संशोधकांनी आणि अभ्यासकांनी कदाचित त्याच्या ‘पिल्डडाउन’ प्रकरणाला गांभीर्यानं घेतलंच नसतं.

पिल्टडाउन शोधातील सुरुवातीचा घटनाक्रम देखील अस्पष्ट आहे. थॉमसन यांच्या लेखानुसार, डॉसन म्हणाला होता की, १९०८ मध्ये वाळू खोदकाम करणारे काही कामगार त्याच्याकडे नाराळाच्या आकाराची एक वस्तू घेऊन आले होते. ती कवटी असण्याची शक्यता होती. यामुळं त्याची उत्सुकता वाढली.

हे देखील वाचा

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

डॉसननं सॅम्युअल ऍलिनसन वुडहेड नावाच्या स्थानिक रसायनशास्त्र शिक्षकाला त्याच्याबरोबर उत्खननात सामील होण्याचं आवाहन केलं. पुढे त्या दोघांना दगडाचे काही तुकडे सापडले. त्यांचा आकार देखील ‘कवटी’सारखा होता.

१९०९ मध्ये, डॉसनने पेरी टिलहार्ड डी चारडिन नावाच्या एका ज्यू प्रिस्टसोबत मिळून काम केलं. पुढील काही वर्षे दोघांनी एकत्र उत्खनन केलं. इतर काही हौशी पुरातत्वशास्त्रज्ञही त्यात सामील झाले. त्यांना मानवाचे काही अवशेष सापडले.

थॉमसनच्या म्हणण्यानुसार, १९०९ ते १९११ च्या दरम्यान डॉसननंच वुडहेडला हाडांवर प्रक्रिया करण्यास सांगितलं जेणेकरून ते जीवाश्मांसारखे दिसतील.

फेब्रुवारी १९१२ मध्ये डॉसन, ‘नॅचरल हिस्ट्री म्युझियम’मध्ये भूशास्त्र विभागात प्रमुख असलेल्या आर्थर स्मिथ वुडवर्ड यांच्यापर्यंत पोहचला. आपल्याला काही मानवी जीवाश्म सापडल्याचं त्यांन स्मिथ वुडवर्डला सांगितलं. स्मिथ वुडवर्ड ही बातमी ऐकून इतका प्रभावित झाला की, त्याने उर्वरित आयुष्य याचा अभ्यास करण्यासाठी समर्पित केलं. तो डॉसनसोबत पिल्टडाउन साइटवर गेला आणि त्याच्याबरोबर उत्खनन करण्यास सुरवात केली.

त्यांना एक दातांची कवळी, कवटीचे अधिक तुकडे आणि हाडं आढळली. हे सर्व अवशेष एकाच व्यक्तीचे असल्याचा त्यांनी निष्कर्ष काढला. आणि हेच जीवाश्म ‘पिल्टडाउन मॅन’ म्हणून ओळखले जाऊ लागले. 

१९१४ पर्यंत त्यांनी उत्खननाचं काम सुरू ठेवलं होतं. पुढे पहिल्या महायु*द्धामुळे त्यांच्या कामात अडथळे आले. १९१६ साली डॉसनचा मृत्यू झाला. त्यामुळे स्मिथ वुडवर्ड एकटा ‘पिल्टडाउन मॅन’च्या संशोधनाचा पाठीराखा झाला. त्याच्या मते, ‘पिल्टडाउन मॅन’ हा प्रगत ब्रिटिश मानवाचा पुर्वज होता. त्याने ‘द अर्लिएस्ट इंग्लिशमन’ नावाच एक पुस्तकही प्रकाशित केलं होतं.

आणि लबाडी समोर आली

१९२० आणि ३० च्या दशकात शास्त्रज्ञांना आणखी काही प्रगत मानवाचे अवशेष सापडले. त्यामध्ये आणि ‘पिल्टडाउन मॅन’मध्ये काही प्रमाणात साम्य होते. १९४० च्या उत्तरार्धात जीवाश्मांच्या अभ्यासासाठी काही रासायनिक चाचण्या विकसित केल्या गेल्या. तेव्हा त्या चाचण्यांचा उपयोग करून पिल्टडाउन मॅनचा अभ्यास करण्याचा निर्णय शास्त्रज्ञांनी घेतला. जोसेफ वाईनर, केनिथ ओकले आणि विल्फ्रेड ले ग्रॉस पार्क हे तिघे ऑक्सफर्ड आणि ब्रिटिश संग्रहालयातील शास्त्रज्ञ होते.

त्यांनी पिल्टडाउन मॅनच्या जीवाश्मांवर काही रासायनिक चाचण्या केल्या. या चाचण्यांचे निष्कर्ष पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण, ते अवशेष बनावट असल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं.

फ्लोराईडवर आधारित चाचणीत, कवटीच्या वरचा भाग जवळजवळ ५०० वर्षे जुना असल्याचं तर, जबड्याची हाडं काही दशकांपूर्वीची असल्याचं निष्पण्ण झालं. नायट्रोजन विश्लेषणानं फ्लोराईड चाचणीच्या निकालांची पुष्टी दिली. याव्यतिरिक्त, चाचण्यांमध्ये असेही दिसून आले की, जीवाश्म प्राचीन दिसावे म्हणून लोह आणि पोटॅशियम डायक्रोमेटचा वापर केला गेला होता. जबड्यातील दात मानवासारखे दिसण्यासाठी त्यांना घासून आकार देण्यात आला होता. जबड्याचे काही तुकडे तुटलेले होते आणि ते क्रॅनिअमनं एकमेकांशी जोडलेले होते, असेही शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. वाईनर, ओकले आणि पार्क यांनी त्यांचे निष्कर्ष नोव्हेंबर १९५३ मध्ये टाइम मासिकात प्रकाशित केले आणि पिल्टडाउन मॅनची सत्यता समोर आली.

ही खोटी जीवाश्मं कुणी तयार केली हे रहस्य मात्र, अद्यापही सुटलेलं नाही. अनेकांच्या मते यासर्व प्रकरणाच्या मागे डॉसनचा हात होता. फ्रान्सिस थॅकरी या दक्षिण आफ्रिकेच्या पॅलिओआँथ्रोपोलॉजिस्टच्या मते, पेरी टिलहार्ड डी चारडिन ज्यानं डॉसनला उत्खननात मदत केली होती त्यानेचं या कारस्थानात डॉसनला सहकार्य केलं.

‘पिल्टडाउन मॅन’ प्रकरणातून झालेली फसवणूक उघडकीस आली. मात्र, तोपर्यंत बरेच नुकसान झाले होते. मानवी उत्क्रांती समजून घेणारे अभ्यासक यामुळे कित्येक दशकं भरकटले गेले. त्यांची अनेक गृहीतके क्षणात जमिनदोस्त झाली. अनेकांना पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागली.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

‘ऑपरेशन ब्लु स्टार’ची किंमत जनरल अरुणकुमार वैद्यांना आपल्या प्राणाने चुकवावी लागली

Next Post

या माणसाने रोबोट्सना नियम घालून दिलेत, म्हणून आपण सुरक्षित आहोत..!

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

2 May 2024
Next Post

या माणसाने रोबोट्सना नियम घालून दिलेत, म्हणून आपण सुरक्षित आहोत..!

ज्या स्पर्धेत लहान दिसतो म्हणून प्रवेश नाकारला तिथेच गामा पैलवानाने सगळ्यांना अस्मान दाखवलं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.