The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वयाच्या पन्नाशीत महिलांचा एक ब्रँड उभा केला, संपत्तीत झुनझुनवालांनाही मागे टाकलं होतं

by द पोस्टमन टीम
12 November 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असतं, असं कायम म्हटलं जातं. तरीदेखील जागतिक सौंदर्य प्रसाधन उद्योगावर याचा कधीच परिणाम झाला नाही. गेल्या कित्येक शतकांपूर्वी सुरू झालेल्या या उद्योगानं पिढ्यानपिढ्या अनेक एकनिष्ठ ग्राहक मिळवलेले आहेत. प्रत्येक स्त्री-पुरुषाला, प्रत्येक मुला-मुलीला सौंदर्यप्रसाधनांचा वापर करणं आवडतं. काही मुली तर मेकअप ट्युटोरियल्सचा वापर करून मेकअप करण्याचा सराव करतात. लग्न असो किंवा एखादा सण-समारंभ त्यापूर्वी कपड्यांच्यासोबत मेकअपचा न चुकता विचार केला जातो. अगदी घराच्या बाहेर पाऊल जरी टाकायचं असेल तरी बेसिक मेकअप केला जातो. एकूणच काय तर सौंदर्यप्रसाधनं आपल्या दैनंदिन आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहेत.

काही वर्षांपूर्वी कॉस्मेटिकच्या खरेदीसाठी स्टोअरला प्रत्यक्ष भेट द्यावी लागे. आता मात्र, परिस्थिती बदलली आहे. आता ऑनलाइन स्टोअर्सच्या माध्यमातून सौंदर्यप्रसाधनांची विक्री होते. भारतामध्ये असे काही ऑनलाइन कॉस्मेटिक स्टोअर्स आहेत जे ग्राहकांना कधीही आणि कुठेही त्यांच्या आवडीची वस्तू पुरवतात.

कोविड महामारीच्या काळात सर्व उद्योगांना फटका बसला. मात्र, लॉकडाऊन असूनही अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्थिर राहिले. त्यामध्ये ‘नायका’ या ई-कॉमर्स साइटचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल. कॉस्मेटिक्स आणि वेलनेस प्रॉडक्टच्या विक्रीसाठी प्रसिद्ध असलेलं नायका मोठ्या प्रमाणात भारतीयांच्या पसंतीस उतरलं आहे.

२०१२ साली स्थापन झालेल्या या ब्युटी कंपनीनं ई-कॉमर्सच्या माध्यमातून ब्युटी रिटेल भारतात चांगली कामगिरी करूनही नफा मिळवू शकत नाही, या समजूतीवर मात केली आहे. नायकानं १० नोव्हेंबर २०२१ रोजी शेअर मार्केटमध्ये पदार्पण केलं आहे. कंपनीच्या मालक फाल्गुनी नायर जगातील सर्वांत श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये समाविष्ट झाल्या आहेत. 

५८ वर्षीय फाल्गुनी सध्या भारतातील सर्वात श्रीमंत सेल्फमेड महिला अब्जाधीश आणि दुसऱ्या सर्वांत श्रीमंत महिला आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार ओपी जिंदाल समूहाच्या अध्यक्षा सावित्री जिंदाल यांच्यानंतर फाल्गुनी यांचा क्रमांक लागतो. वयाच्या पन्नाशीमध्ये आल्यानंतर फाल्गुनी नायर यांनी कशाप्रकारे अब्जावधींचा व्यवसाय उभा केला, ही गोष्ट जाणून घेण्यासाठी अनेकजण नक्कीच उत्सुक असतील.



मुंबईतील एका गुजराती कुटुंबात जन्मलेल्या फाल्गुनी व्यावसायिक वातावरणात वाढल्या होत्या. त्यांच्या वडिलांची एक स्मॉल बेअरिंग निर्मिती कंपनी होती. त्याचं ठिकाणी त्यांची आई देखील काम पाहत होती. त्यामुळं गुंतवणूक, शेअर बाजार, व्यापार हे शब्द लहानपणापासून फाल्गुनीसाठी परिचयाचे होते.

माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर फाल्गुनी यांनी आयआयएम अहमदाबाद या प्रतिष्ठित संस्थेतून मॅनेजमेंट पदवी मिळवली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एएफ फर्ग्युसन ऍण्ड कंपनीमध्ये व्यवस्थापन सल्लागार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी आयआयएममध्ये मैत्री झालेल्या संजय नायर यांच्याशी लग्न केलं. संजय नायर हे केकेआर अँड कंपनीचा भारतातील कारभार पाहतात.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

१९९३ मध्ये, फाल्गुनी नायर कोटक महिंद्रा ग्रुपमध्ये सामील झाल्या. जवळपास १९ वर्षांच्या काळात त्यांनी महिंद्रा ग्रुपमध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. २००५ ते २०१२ या काळात त्या कोटक महिंद्राच्या व्यवस्थापकीय संचालक होत्या. महिंद्रा ग्रुपमध्ये सर्व काही सुरळीत सुरू होतं. 

फाल्गुनी यांना देखील कंपनीसोबत काम करण्यात आनंद मिळत होता. मात्र, २०१२च्या दरम्यान त्यांनी एखादा ‘हटके’ व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्या वयाच्या पन्नाशीमध्ये होत्या.

फाल्गुनी यांना लहानपणापासून मेकअप आणि सौंदर्यप्रसाधनांबद्दल कुतुहल आणि आवड होती. त्यांनी आपल्या आवडीचं व्यवसायामध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २०१२मध्ये ‘नायका’ नावाची कंपनी स्थापन केली आणि महिंद्रा ग्रुपमधून एक्झिट घेतली. त्यावेळी त्यांची जुळी मुलं अचिंत आणि अद्वैता यांनी देखील शिक्षणासाठी यूएस गाठलं होतं. मुलांच्या आणि नोकरीच्या प्रत्यक्ष जबाबदारीतून मुक्त झाल्यामुळं फाल्गुनी यांना आपल्या नवीन व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आवश्यक तो वेळ मिळाला.

कंपनीची सुरुवात झाली होती तेव्हा नायकाला दिवसाकाठी जवळपास ६० ऑर्डर्स मिळत होत्या. ऑर्डर्स कमी मिळाल्या तरी चालतील मात्र, प्रॉडक्टचा दर्जा आणि किंमत यांच्याशी तडजोड झाली नाही पाहिजे, या मताच्या फाल्गुनी होत्या. उच्च दर्जाची आणि सुरक्षित उत्पादनं मिळत असल्यामुळं ग्राहकांमध्ये नायकाची प्रसिद्धी वाढत गेली. एकटीच्या बळावर उभ्या केलेल्या नायकाचं रुपांतर आता एका मोठ्या वटवृक्षामध्ये झालं आहे.

मधल्या काळात फाल्गुनीच्या मुलांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि ते देखील आईच्या व्यवसायामध्ये सहभागी झाले. फाल्गुनी यांचा मुलगा अचिंत कोलंबिया विद्यापीठातून पदवीधर झाला असून तो नायकाची ब्युटी ई-कॉमर्स विंग पाहतो तर मुलगी अद्वैता, ही नायकाच्या फॅशन वर्टिकलचं नेतृत्व करते. अद्वैतानं हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए केलेलं आहे.

सीएनबीसीटीव्ही18 च्या माहितीनुसार नायकाचे मंथली ५ मिलीयनपेक्षा जास्त ॲक्टिव युजर्स आहेत. भारतभरात ७० स्टोअर्स, ५०० ​​हून अधिक ब्रँड्सची जवळपास दीड लाख उत्पादनं नायकाच्या वेबसाइट, ॲप तसेच स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत.

लॉकडाऊन दरम्यान नायकाच्या प्लॅटफॉर्मवर एप्रिल महिन्यात विक्रीमध्ये ७० टक्क्यांनी घसरण झाली होती. मात्र, त्यानंतर नायकानं भारतभर पसरलेल्या आपल्या ७० स्टोअर्सच्या मदतीनं हायपरलोकल डिलिव्हरीची सुविधा सुरू केली. यामुळं कंपनीनं कमाईचा एक नवीन उच्चांक प्रस्थापित केला. कंपनीनं अलीकडील काळात मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार मिळवले आहेत. Steadview Capital कडून ६६.६४ कोटी रुपये नायकानं मिळवले होते. बॉलिवूड स्टार आलिया भट आणि कॅटरिना कैफ यांनी देखील फाल्गुनी नायर यांच्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे.

फोर्ब्स इंडियाच्या यादीनुसार फाल्गुनी नायर आता मुथूट फायनान्सच्या मुथूट कुटुंब, मारिकोचे संस्थापक आणि अध्यक्ष हर्ष मारीवाला, एशियन पेंट्सचे अभय वकील यांच्यापेक्षा श्रीमंत आहेत. सध्याच्या घडीला नायकामध्ये अनेकांनी गुंतवणूक केली आहे. 

आता फाल्गुनी यांची मुलं देखील त्यांना व्यवसायामध्ये मदत करत आहेत. मात्र, जवळपास १० वर्षांपूर्वी फाल्गुनी नायर यांनी स्वत:च्या बळावर कंपनी उभी करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता आणि व्यवसाय उभं करण्यासाठी वयाची मर्यादा नसते हे त्यांनी सिद्ध केलं.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

एलोन मस्कच्या स्पेसX च्या अंतराळवीरांची पहिली तुकडी अवकाशात पोहोचलीसुद्धा

Next Post

सुकुमारा कुरूप – तीन दशकांपासून पोलिसांना चकवा देणारा कुख्यात कि*लर

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

सुकुमारा कुरूप - तीन दशकांपासून पोलिसांना चकवा देणारा कुख्यात कि*लर

सेलिब्रिटी किड्स ज्यांनी अभिनय सोडून इतर क्षेत्रात आपला ठसा उमटवला..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.