The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या माणसाने जगाला नैतिकतेचे धडे दिले..!

by द पोस्टमन टीम
23 April 2025
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


जगात असे असंख्य लोक होऊन गेले आहेत, ज्यांनी आपल्या असामान्य बुद्धिमत्तेच्या बळावर समाजाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. इम्यानुएल कांट हा विचारवंत त्यापैकीच एक होता. कांटला रूढार्थाने जगातील पहिला तत्त्वज्ञ मानले जातात. इम्यानुएलने तर्कसंगततेवर भाष्य केले. त्याचे भाष्य वाचून जर्मन लोक ‘टीका’ या शब्दाचा खरा अर्थ समजू शकले. कांटच्या सिद्धांताने जगाला एक वेगळी दिशा प्रदान केली.

इम्यानुएल कांटचा जन्म १७ एप्रिल १७२४ साली क्रोनिन्सबर्ग, प्रशिया येथे  झाला. आज हे शहर कॉलिनीग्राड नावाने ओळखले जाते व हे शहर रशियाचा भाग आहे. इम्यानुएलचे वडील युद्धासाठी कवच तयार करण्याचे काम करायचे तर त्याची आई गृहिणी होती. इम्यानुएलचा परिवार हा परंपरावादी होता.

आपल्या परिवारासोबत इम्यानुएल नेहमी चर्चमध्ये जायचा. इम्यानुएलची शिक्षणाची ओढ बघून चर्चच्या फादरने त्याच्या शिक्षणाची व्यवस्था केली. सुरुवातीच्या काळात इम्यानुएलला लॅटिन भाषेचे आकर्षण निर्माण झाले होते. त्याला या भाषेत उत्तम गती देखील होती. इम्यानुएलच्या प्रगतीने त्याचे प्राध्यापक प्रभावित झाले होते.

१७०४ साली इम्यानुएलने युनिव्हर्सिटी ऑफ क्रोनिन्सबर्गमध्ये प्रवेश घेतला. इथे त्याने धर्मशास्त्राचे शिक्षण घेतले.

यादरम्यान गणित आणि भौतिक विज्ञानाकडे इम्यानुएलचा ओढा वाढतच चालला होता. १७४४ साली शिक्षण सुरु असताना इम्यानुएलने आपले पहिले पुस्तक प्रकशित केले. ‘द क्रिटिक ऑफ प्युअर रिझन’ असे या पुस्तकाचे नाव होते. यानंतर शिक्षक म्हणून काम करण्यास इम्यानुएलने सुरुवात केली. १७४६ मध्ये इम्यानुएलच्या वडिलांचे निधन झाले. आता आपल्या घरची जबाबदारी उचलण्यासाठी इम्यानुएलने मुलांना ट्युशन देण्यास सुरुवात केली. याच काळात तर्कसंगतता आणि  अनुभववादावर त्याने काही लेख लिहिले जे फार प्रसिद्ध झाले.



इम्यानुएलच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या, पण अभ्यासाप्रती असणारी ओढ काही कमी झाली नाही. ९ वर्षांनी, घराची आर्थिक घडी बसवल्यानंतर १९५५ मध्ये त्याने पुन्हा एकदा विद्यापीठात प्रवेश घेतला. इथे शिक्षण पूर्ण करून फिलॉसॉफीत डॉक्टरेट संपादन केली.

पुढे १५ वर्ष प्राध्यापक म्हणून तो विद्यापीठात कार्यरत होता. त्याने गणित व भौतिकशास्त्राच्या व्यतिरिक्त नैतिक दर्शनशास्त्राचे देखील शिक्षण विद्यार्थ्यांना दिले.

हे देखील वाचा

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

त्याने तर्कवादाच्या एका नवीन सिद्धांताला याठिकाणी जन्म दिला. त्याने लोकांना चर्चच्या नियमांना नाकरून न्युटनच्या आधुनिक सिद्धांतांचा स्वीकार करण्यासाठी आग्रह धरला होता. 

त्याने तर्कवादाच्या आधारावर लोकांची निर्णयक्षमता विकसित व्हायला हवी असे देखील म्हटले आहे. माणसाचा मेंदू त्याला येणाऱ्या अनुभवांच्या बळावर जगातील कामकाजाला समजून घेत असतो, असे देखील त्याने आपल्या लेखात म्हटले आहे.

त्याने आपले विचार एकत्रित लिहून एक पुस्तक तयार केले. त्याच्या क्रिटिक ऑफ प्युअर रीझन या पुस्तकाला १९८१ मध्ये पुन्हा प्रकाशित करण्यात आले. काही काळ लोकांचे याकडे लक्ष नव्हते पण नंतर लोकांनी यात लपलेले संदर्भ समजून घेण्यास सुरुवात केली. १७८५ मध्ये कांटच्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली.  १७९० मध्ये त्याचे क्रिटिक ऑफ प्युअर जजमेंट नावाचे अजून एक पुस्तक प्रकाशित करण्यात आले. त्याचे क्रिटिक ऑफ प्रॅक्टिकल रीझन नावाचे पुस्तक देखील याच काळात प्रकाशित करण्यात आले.

त्याचे सर्व लिखाण कांट क्रिटीकल फिलोसॉफी नावाच्या ग्रंथात एकत्रित करण्यात आले.

इम्यानुएल कायम नैतिकतेच्या बाजूने असायचा. त्याने कॅटेगोरिकल इम्परेटीव्ह नावाचा नैतिकतेशी संबंधित कायदा बनवण्याचा प्रयत्न देखील केला होता. प्रत्येक नैतिक निर्णय हा तर्कसंगत असायला हवा, असा त्यांचा आग्रह होता. इम्यानुएलने सुचवलेल्या प्रस्तावाने अनेक लोक प्रभावित झाले. अनेक बुद्धीजीवी आणि सामान्य लोकांनी त्याच्या तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केला. इम्यानुएल सदैव आपल्या सिद्धांतात बदल करून त्याला अजून प्रभावी बनवत राहिला. त्याने आपले लेख संग्रहित केले.

तर्कसंगत विचारांचा अभ्यास करण्यात इम्यानुएलने आपले सर्व आयुष्य खर्च केले. १२ फेब्रुवारी १८०४ मध्ये इम्यानुएलचे निधन झाले. इम्यानुएल जरी शरीराच्या रूपाने आपल्यात नसला तरी त्याच्या तत्वज्ञानाच्या रूपाने तो अजूनही आपल्यात आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

जयचंद – खोट्या इतिहासामुळे गद्दार आणि राष्ट्रद्रोही असा शिक्का बसलेला राजा

Next Post

प्रजासत्ताक दिनाला २१ तोफांची सलामी देण्यामागे हा किस्सा आहे..!

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

2 May 2024
Next Post

प्रजासत्ताक दिनाला २१ तोफांची सलामी देण्यामागे हा किस्सा आहे..!

इब्राहिम लोदी - लोदी वंशाचा शेवटचा सुलतान

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.