The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पारसी बांधवांनी ओळख करून दिलेल्या शीतपेयांची चव आजही आपल्या जिभेवर रेंगाळत आहे

by द पोस्टमन टीम
9 July 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


उन्हाळ्याच्या दिवसांत थोडा थंडावा आणि जिभेची चव दोन्हींची पूर्तता व्हावी म्हणून अधिकाधिक लोक शीतपेयांची निवड करतात. आजकाल तर दैनंदिन आहारातही शीतपेयांचा समावेश झालेला आहे. कोणत्याही ऋतूत शीतपेये पिणारा एक मोठा वर्ग आज पहायला मिळतो.

सरबत, ताक, पन्हे, हे भारतीय शीतपेयांचे काही पारंपारिक प्रकार आहेत, पण आज यापेक्षा कार्बोनेटेड पेये पिण्याकडे जास्त कल आहे. सोडा असो किंवा थम्सअप, पेप्सी, कोकसारखी उत्पादने असोत भारतीय बाजारपेठेत यांचे आगमन कधी झाले आणि भारतीयांना अशा पेयांची चव कुणामुळे ओळखीची झाली?, कार्बोनेटेड पेयांची सुरुवात कधी आणि कशी झाली?, भारतीयांच्या जिभेवर ही चव कशी रुळत गेली? हा सगळा प्रवास जाणून घेणे फारच मनोरंजक आणि माहितीत अधिक भर घालणारा ठरेल.

आज या शितपेयांनी भारतातील तब्बल ८ बिलियन डॉलरची बाजारपेठ काबीज केली आहे. पण, याचा पाया घातला तो भारतात अल्पसंख्य होत चाललेल्या पारसी समाजाने. गेल्या दोन शतकात या समाजाने भारतीयांना या कार्बोनेटेड शीतपेयांची ओळख करून देण्यात आणि त्यांची चव अंगवळणी पाडण्यात बरेच योगदान दिले आहे.

अठराव्या शतकापर्यंत सोडा हे ब्रिटीशांचे एक आवडते पेय होते. काही कंपन्या याच सोड्याला लेमन, ऑरेंज आणि रास्पबेरीचे फ्लेवर देऊन त्याची विक्री करत. अर्थातच ब्रिटीशांच्या मागून हा सोडा देखील भारतात पोहोचला. १८३७ च्या दरम्यान हेन्री रॉगर्स यांनी मुंबईत पहिली सोड्याची फॅक्टरी सुरु केली. त्याकाळी मुंबईत पिण्यायोग्य मुबलक स्वच्छ पाणी मिळत नव्हते. त्यामुळे काविळीसारख्या जीवघेण्या आजाराच्या साथी थैमान घालत असत.



पण कार्बोनिक ॲसिड आणि सोड्यामुळे व्हायरस आणि बॅक्टेरिया नष्ट होतात. म्हणून लोकांनी ही शीतपेये अगदी सहज स्वीकारली. त्यानंतर कार्बोनेटेड टॉनिक वॉटर आले. ज्यामध्ये मलेरियाचे जंतू नाहीशी करण्याची क्षमता होती.

पारसी लोकांनी या व्यवसायाला सुरुवात केल्यामुळे भारतातील ब्रिटीश सैनिकांना त्यांची तहान शमवण्याची चांगली सोय होऊ लागली. या शीतपेयांच्या व्यवसायात पैसा गुंतवल्यास भरपूर परतावा मिळू शकतो, हे त्याकाळी पारसी बांधवांनी पुरते ओळखलेले होते. अनेकजण याआधीच या व्यवसायात उतरलेले होते आणि त्यांची उत्पादने ब्रिटनला निर्यात केली जात.

पारसी बांधवांनी मुंबईत अनेक ठिकाणी छोटेछोटे इराणी स्टॉल सुरु केले. या व्यवसायावरून पारसी लोकांमध्ये तर सोडाबॉटलवाला, सोडावॉटरबॉटलवाला अशी आडनावे देखील रुळू लागली होती. हळूहळू भारतातील इतर जात बांधव देखील या व्यवसायात उतरू लागले. १९१३ पर्यंत मुंबईत जवळपास दीडशे सोडा फॅक्टरीज् उभ्या राहिल्या होत्या. या व्यवसायात त्याकाळी पारसी लोकांचाच वरचष्मा होता. हळूहळू या सोड्याला मुंबईच्या सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातही अनन्य साधारण स्थान निर्माण झाले.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

टिळकांवर राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक झाली तेव्हा सरकारविरोधात निदर्शने करण्यासाठी जमलेल्या आंदोलकांनी रस्त्यावर सोडा वॉटरच्या बाटल्या फोडल्या होत्या.

त्यावेळी इराणी लोकांच्या दुकानात अगदी ओसंडून गर्दी वाहत असल्याचे निरीक्षण सिटी पोलीस कमिशनरने नोंदवले होते. सोड्याच्या बाटल्या या दं*गली आणि आंदोलनात ऐच्छिक ह*त्यार म्हणून वापरल्या जाऊ लागल्या.

कार्बोरेटेड पेये अधिकाधिक लोकप्रिय होऊ लागली तसतशी पारसी बांधवांचा सोडा व्यवसाय अधिकाधिक बहरू लागला. दिनशा पंडोले या पारसी इसमाने ड्युक रास्पबेरी सोडा नावाने सोडा वॉटर कंपनी सुरु केली. ड्युक हे क्रिकेट बॉलच्या एका ब्रँँडचे नाव होते. ते स्वतः क्रिकेट शौकीन असल्याने त्यांनी आपल्या कंपनीसाठी हेच नाव निवडले. एक आण्याला एक बॉटल सोडा वॉटर विकणारी ड्युक कंपनी १९०७ च्या काळात फारच फाॅर्मात होती.

हळूहळू पारसींचा सोडा वॉटरचा हा उद्योग मुंबई पुरताच मर्यादित न राहता भारताच्या इतर भागातही पसरू लागला होता. अगदी कोलकत्तापासून ते कालिकतपर्यंत या व्यवसायाचा विस्तार झाला होता. यातल्या अनेक कंपन्या छोट्या होत्या. त्यांना मिळणारा फायदा देखील तुटपुंजा होता, पण सोड्याची चव आणि त्याचा दर्जा याबाबत कुठेही तडजोड केली जात नव्हती. अगदी १९७० च्या दशकातही अहमदाबादमधील पी. धुंजीभाय अँड सन्स ही कंपनी सोड्याच्या बाटल्या वितरीत करण्यासाठी बैलगाडीचा वापर करत असे.

हैद्राबादजवळील निझामाबाद या शहरातील मरोलिया कुटुंबाकडे सोड्याच्या बाटल्या पोचवण्यासाठी चार कामगार होते. जे सकाळी लवकर सायकलवर सोड्याच्या बाटल्यांच्या चार कॅरेट लावत असत आणि त्या वितरीत करत असत. सोडा तयार करण्यासाठी जितका खर्च येत नसे त्यापेक्षा जास्त खर्च काचेच्या बाटलीसाठी येत असे. म्हणून काही कंपन्या सोड्याच्या बाटल्या ग्राहकांकडून त्वरित परत घेत आणि त्याचाच पुनर्वापर करत असत.

१९८० पासून हळूहळू या क्षेत्रातील स्पर्धा तीव्र होत गेली तसे पारसी बांधवांची मक्तेदारी मोडीत निघू लागली. अशातही ड्युक आणि रॉगर्सच्या रास्पबेरीने बाजारात चांगला जम बसवला होता. अशातच १९९२ पासून जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले. पेप्सी आणि कोकाकोलासारख्या कंपन्या देशी कंपन्यांना जास्तच फाईट देऊ लागल्या. १९९४ साली ड्युक कंपनी पेप्सीमध्ये विलीन करण्यात आली.

अर्थात रास्पबेरी सोडा अगदीच काळाच्या पडद्याआड गेला अशी स्थिती आहे का? तर अजिबात नाही. आजही भारतातील अनेक इराणी कॅफे-रेस्टॉरंटमधून रेट्रो ड्रिंकच्या नावाने हे पेय दिले जाते. रास्पबेरीचे नाव बदलले असले तरी, चव मात्र आजही तीच आहे.

पारसी बांधवांनी दीडशे दोनशे वर्षापूर्वी ज्या पेयांची भारतीयांना ओळख करून दिली, त्याची चव आजही भारतीयांच्या जिभेवर रेंगाळत आहे. आजही अनेक ग्राहक रास्पबेरी कुठे मिळेल याची चौकशी कोल्ड्रिंक हाउसमध्ये करत असतात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

चिनी सैनिकांच्या नजरेला नजर भिडवून सीमेचे रक्षण करणाऱ्या बिहार रेजिमेंटची पराक्रमगाथा !

Next Post

इंग्रजांनी अनेकवेळा फडणीसांना बदलण्याची विनंती पेशव्यांकडे केली होती

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

इंग्रजांनी अनेकवेळा फडणीसांना बदलण्याची विनंती पेशव्यांकडे केली होती

'वन डे'मध्ये शतक ठोकलं, सलामीला फलंदाजी केली तरी नावावर एकही सिक्स नाही

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.