The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाब्लो एस्कोबारचा मृत्यू नेमका कसा झाला, याबद्दल अजूनही लोकांमध्ये एकमत नाही आहे.

by द पोस्टमन टीम
30 November 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


३ डिसेंबर १९९३ रोजी जगभरातील टीव्ही चॅनेल्सवर पाब्लो एस्कोबारच्या निधनाची बातमी झळकली. प्रत्येक वर्तमानपत्र आणि रेडिओ चॅनेलवर पाब्लो एस्कोबारच्या मृत्यूच्याच चर्चा सुरु होत्या. पाब्लो एस्कोबार हा कुख्यात गर्भश्रीमंत ड्र*ग डीलर मारला गेला, यावर लोकांचा विश्वासच बसत नव्हता. १ डिसेंबरला पाब्लोने आपला वाढदिवस साजरा केला आणि २ डिसेंबरला त्याचा एन्काउंटर करण्यात आला. पाब्लोचं प्रेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं होतं. त्याच्या अवतीभवती त्याला गोळ्या घालणारे पोलीस अधिकारी फोटो काढत होते.

पाब्लो एस्कोबार हा ड्र*ग्जच्या दुनियेचा बादशहा होता. पाब्लो एस्कोबारच्या मृत्युनंतर लोकांनी त्याच्या मृत्यूवर अनेक कथा रचल्या. अनेक रंजक कथा त्यावेळी रचण्यात आल्या होत्या. त्याला नेमकं कसं मारण्यात आलं हे जाणून घेऊया…

एव्हाना पोलीस, सैन्य आणि राज्यव्यवस्थेच्या विरोधात छेडलेल्या यु*द्धात पाब्लोने बरंच काही गमावलं होतं, तो मेडेलिनमध्ये लपून राहत होता. १ डिसेम्बरला त्यानं आपला वाढदिवस साजरा केला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी, पोलिसांची शोध पथके त्या दिवशी नेहमीप्रमाणे आपल्या शोधमोहिमेवर निघाली होती. ते त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील फोन ट्रेस करत होते. त्याचवेळी त्यांना त्यांच्या ओळखीचा एक आवाज ऐकायला मिळाला. त्यांना कळून चुकलं की हा पाब्लो एस्कोबारचा आवाज आहे. पाब्लो त्याच्या मुलांशी फोनवर बोलत होता. शोध पथकांना संधी चालून आली होती. टीमला अलर्ट करण्यात आलं.

एक मोठी टीम पाब्लो एस्कोबारचा खात्मा करण्यासाठी तैनात करण्यात आली होती. काही तासातच विशेष पोलिसांचे पथक त्याच्या मेडेलिनच्या घरासमोर येऊन उभी होती. त्याच्या घरातून सिग्नल येत होते.



या अगोदर देखील कोलंबिया पोलिसांनी पाब्लो एस्कोबारला पकडण्याचा प्रयत्न केला होता, पण प्रत्येक वेळी तो निसटण्यात यशस्वी ठरला होता. पण यावेळी मात्र प्रत्येकाला आशा होती की नशीब साथ देईल.

पोलिसांना पाब्लो इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पडद्याच्या मागे उभा दिसला. पोलीस जसे पहिल्या मजल्यावर पोहचले तसा त्यांच्यावर पाब्लोच्या अंगरक्षकांनी ह*ल्ला चढवला. दोन्ही बाजूंनी अंधाधुंद गोळीबार करण्यात येत होता. या गोळीबाराचा फायदा घेऊन पळ काढता येईल, या विचाराने पाब्लो एस्कोबार गच्चीच्या दिशेने पळाला. पावसाचा फायदा घेऊन पळून जाण्याची त्याची तयारी होती. पण तितक्यात पोलिसांच्या गोळीने त्याच्या शरीराचा वेध घेतला. पोलिसांच्या गोळीने पाब्लो जमिनीवर कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. पाब्लोच्या मृत्यूची ही कथा सर्वाना माहिती आहे.

पोलिसांच्या रिपोर्टमधून या घटनाक्रमाची पुष्टी होते.

पण कोलंबियामधील अनेक लोकांच्या मते पाब्लो एस्कोबारचा मृत्यू हा त्याच्या शत्रूच्या गोळीने झाला होता. १९८९ मध्ये कोलंबिया सरकारने आपल्या पोलिस दलाला आणि सैन्य दलाला पाब्लोच्या पाठी लावले होते. पाब्लो फक्त कोलंबियासाठी नाहीतर अमेरिका व मध्य अमेरिकेतील इतर देशांसाठी फार मोठा धोका बनला होता.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

तो आपले ड्र*ग्ज अमेरिकेत निर्यात करत होता. अमेरिकेच्या सीआयएबरोबरच डीइए अर्थात ड्रग एन्फोर्समेंट ॲडमिनिस्ट्रेशन या संस्था देखील पाब्लोच्या मागावर होत्या. अमेरिकेने देखील त्यांचे काही कमांडोज आणि एजंट्स पाब्लोच्या मागावर कोलंबियात पाठवले होते. कोलंबिया सरकारच्या बरोबरीने सगळेच या मोहिमेत सहभागी झाले होते.

पाब्लो एस्कोबारच्या फक्त सरकारी संस्था शत्रू नव्हत्या. गुन्हेगारी जगतात देखील त्याचे अनेक शत्रू होते, त्यापैकीच एक होता, ‘लॉस पापेस’ नावाचा एक कुख्यात ड्र*ग तस्कर, ज्याचे पाब्लो एस्कोबारशी जुने शत्रुत्व होते. अनेक लोक म्हणतात की पाब्लो एस्कोबारच्या मृत्यूला लॉस पापेस जबाबदार होता.

पाब्लो एस्कोबारने उभ्या केलेल्या ड्र*ग्जच्या साम्राज्यामुळे लॉस पापेसला त्याचे ड्र*ग्ज विकणं अवघड होऊन बसलं होतं. पाब्लोमुळे त्याला व्यवहारात मोठे नुकसान सहन करावं लागत होतं.

त्यामुळे त्याने पडद्यामागून पाब्लो एस्कोबारच्या विरोधात कट शिजवण्यास सुरुवात केली. तो सरकारला पाब्लोच्या माणसांच्या ठावठिकाण्याच्या टीपा देऊन पोलिसांच्या मदतीने त्याच्या ह*त्या घडवून आणत होता. त्याने अशाप्रकारे एक एक करत पाब्लोचे अनेक विश्वसनीय साथीदार मारले होते. पाब्लोच्या गॅंगला कमजोर करण्यात लॉस पापेसचा मोठा हात होता. कोलंबियाच्या माजी सैनिकांनी मान्य केलं होतं की पाब्लो एस्कोबारच्या विरोधात ते लॉस पापेसच्या माहितीच्या आधारावर मोहिमेची आखणी करायचे.

पाब्लो एस्कोबारचा शेवटचा ठिकाणा ज्या भागात आहे, त्याची माहिती देखील पोलिसांना लॉस पापेसच्या माणसांनी दिली होती. इतकंच नाही ज्यावेळी पाब्लो एस्कोबारचे अंगरक्षक आणि पोलीस एकमेकांवर गोळीबार करत होते, त्यावेळी पाब्लो एस्कोबारवर गोळी चालवणारा माणूस हा लॉस पापेसचाच माणूस होता. पाब्लोच्या मृत्यूबद्दल ही देखील कथा सांगितली जाते.

पाब्लोच्या मृत्यूबद्दल जगात एक कथा सांगण्यात येते आणि पाब्लोच्या मुलाकडून देखील एक भलतीच कथा ऐकवण्यात येते. त्याच्या मते त्याच्या पित्याची कोणीच ह*त्या केली नव्हती, त्यांनीच स्वतःला गोळी झाडून जीवन संपवले होते.

पाब्लोचा मुलगा जुआन एस्कोबारने म्हटलं होतं की मेडेलिनमधील छतावर त्याच्या बापाने आत्मह*त्या केली होती.

पाब्लोच्या मुलाने म्हटलं आहे की त्याचे  वडील त्याला नेहमी फोनचा वापर टाळण्यासाठी सूचना करायचे. पाब्लोला माहिती होते की त्याच्या मागावर जगातील सर्वांत भयानक पोलीस खाते लागले आहे. फोनच्या वापरावरून त्याच्या ठावठिकाण्याची माहिती त्यांना मिळू शकते, यामुळे तो त्याचा वापर टाळण्यास सांगत असे. त्यादिवशी या फोननेच त्याचा घात केला होता.

त्याला शत्रूच्या हातून मरण नको होते त्यामुळे त्याने आत्मह*त्या केली होती, असं जोहान सांगतो. तो असे देखील म्हणतो की पाब्लो एस्कोबारने त्याला सांगितले होते की तो आत्मह*त्या करताना स्वतःच्या कानाच्या खाली बंदूक ठेवून ट्रिगर दाबेल. ज्यावेळी पाब्लोची बॉडी पोलिसाना सापडली त्यावेळी त्यांना तसेच काहीसे दृश्य बघायला मिळाले. आज पाब्लोच्या मृत्यूनंतर इतकी वर्ष उलटली तरी जोहान सर्वांना सांगतो की त्याच्या बापाने आत्मह*त्या केली होती.

पाब्लोने आत्मह*त्या केली की त्याला मारण्यात आले, यावरील वाद आजही सुरु आहेत. पण ते इतके महत्त्वाचे नाही. पाब्लो एस्कोबारने आयुष्यभर वाईट कामे केली, कोट्यवधीची दौलत कमावली, पण शेवटी त्याचे देखील तसेच हाल झाले जे कुठल्याही दुष्टकर्म करणाऱ्या माणसाचे होतात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

शरीराच्या आरपार पाहणाऱ्या ‘एक्स-रे’चा शोध लावला आणि फिजिक्सचं पहिलं नोबेल मिळालं

Next Post

ऑस्ट्रेलियाचा शोध लावणाऱ्या कॅप्टन जेम्स कुकचा समुद्रसफारीवरच मृत्यू झाला होता.

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

ऑस्ट्रेलियाचा शोध लावणाऱ्या कॅप्टन जेम्स कुकचा समुद्रसफारीवरच मृत्यू झाला होता.

या आहेत जगातील सर्वात प्राचीन भाषा!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.