The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकेकाळी ऑस्कर मिळवणाऱ्या अभिनेत्यावर कंगाल होण्याची वेळ आली होती

by द पोस्टमन टीम
5 January 2026
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


तुम्हाला तुमच्या मेहनतीने कमावलेला पैसा वाया घालायला आवडतो का? जगात कोणीच नसेल ज्याला त्याच्या आयुष्यभराची कमाई अशा गोष्टीत वाया घालवायला आवडेल, ज्यामुळे तो भविष्यात रस्त्यावर येईल. पण आजवर अनेक लोकांनी नको त्या गोष्टींच्या हव्यासापायी आपले सर्वस्व गमावले आहे. असाच एक हॉलिवूड अभिनेता देखील होता ज्याने आपली संपूर्ण कमाई अनावश्यक गोष्टींसाठी वाया घालवली होती.

निकोलस केज असे त्या अभिनेत्याचे नाव आहे. तुम्ही त्याला घोस्ट रायडर चित्रपटात पाहिले असेल.

निकोलस केज हॉलिवूडमधील एका प्रसिद्ध परिवारात वाढला होता. त्याचे काका फ्रान्सिस फोर्ड कोप्पोलो हे त्यांच्या काळातील एक महान दिग्दर्शक होते. त्याची काकू तालिया शियर प्रसिद्ध अभिनेत्री होती. त्यांचे चुलत बंधू सोफिया कोप्पोलो आणि रोमन कोप्पोलो हे देखील दिग्दर्शक आहेत. त्यांचा एक चुलत भाऊ जेसन श्वार्ट्जमन हा देखील एक अभिनेता आहे.

आपल्या घरातील फिल्मी वातावरणाचा आणि स्टारडमचा निकोलस केजवर देखील चांगलाच प्रभाव पडला. वयाच्या पंधराव्या वर्षी त्याने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकण्याचा निश्चय केला. शाळा महाविद्यालयांवर केजने कधी विशेष लक्ष दिले नाही, त्याला फक्त प्रसिद्धी कमवायची होती. निकोलस किम कोप्पोलो असे त्याचे मूळ नाव होते.



पण मार्व्हल कॅरेक्टर ल्युक केजपासून प्रेरणा घेऊन त्याने स्वतःच्या नावातील कोप्पोलो काढून टाकत निकोलस केज असे नामकरण केले.

१९८२मध्ये निकोलसला मोठ्या कष्टाने एका चित्रपटात भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्याचा हा चित्रपट तुफान हिट ठरला. यातून त्याने करोडो डॉलर्सची कमाई केली. निकोलस केज यांना १९९६ साली लिविंग लास वेगास या चित्रपटातील भूमिकेसाठी ऑस्कर पुरस्काराने गौरविण्यात आले. यानंतर त्याचे नशिबच पालटले. फोर्ब्ज मासिकाने त्याचा सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता म्हणून गौरव केला होता. २००९ मध्ये चार कोटींची कमाई करणारा तो एकमेव अभिनेता होता.

निकोलस केज आता कोट्याधीश बनला होता. पण, एवढ्या मोठ्या संपत्तीचे काय करावे हेच केज याला कळत नव्हते, यामुळेच त्याला संपत्ती सांभाळता आली नाही. कमाई वाढत होती, तसा अनावश्यक खर्च देखील वाढत चालला होता. काही काळात याच्या खर्चाला सीमा उरली नाही. त्याने अकाउंट्स सांभाळायला एक मॅनेजर ठेवला होता पण, त्याला देखील खर्चाचे नियोजन करता आले नाही.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

१९९६ ते २०११ या काळात निकोलसने १५ कोटी डॉलर्सची संपत्ती वाया घालवली होती. २००१ मध्ये तर एखादा अरबी शेख करणार नाही एवढा पैसा केजने खर्च केले. त्याच्या खर्चाचा आकडा पाहून ब्रुनेईच्या सुलतानाला राग आवरता आला नव्हता. केजला आपल्या संपत्तीत घट होते आहे, याची जाणीव झाली त्यावेळी त्याने मॅनेजरवर दोषारोप करण्यास सुरुवात केली आणि त्याला कोर्टात खेचले. केजच्या खटल्याला प्रतिउत्तर म्हणून मॅनेजरने देखील खटला दाखल केला.

निकोलसने वेगवेगळ्या प्राण्यांना पाळले होते. एवढे की निकोलस प्राणिसंग्रहालय सुरु करतो की काय असे लोकांना वाटायला लागले.

निकोलसने फक्त आपली श्रीमंती दाखवण्यासाठी ३ लाख डॉलर खर्च करून ६ कोटी वर्ष जुनी डायनोसॉरचे सांगडे विकत घेतले होते, दीड लाख डॉलर्स खर्च करून ऑक्टोपस देखील विकत घेतला होता. एवढेच काय पण, त्याने एक मगर आणि पांढऱ्या रंगाचा कोब्रा देखील विकत घेतला.

असे म्हणतात की सेक्श्युअल ॲक्टिव्हिटीसाठी तो या कोब्राचा वापर करायचे. पांढरा कोब्रा ही एक दुर्मिळ प्रजाती असून फक्त आपल्या खास संग्रहासाठी केजने तो साप विकत घेतला होता. केजच्या अनावश्यक हौशींमुळे त्याच्यावर कंगाल होण्याची पाळी आली होती.

केजने आपल्या राजेशाही राहणीमानाचे प्रदर्शन करण्यासाठी १५ नवीन घरे विकत घेतली होती. यापैकी दोन घरे ही आलिशान राजवाड्यासारखी होती. २००६ मध्ये निकोलसने न्यू ओरलँस येथील एक झपाटलेले घर विकत घेतले. असे म्हणतात की १८व्या शतकात या घरात राहणाऱ्या माणसाने इथे त्याच्या गुलामांचे खू*न केले होते. केजने ४० एकरात पसरलेल्या बेटांना ७० लाख डॉलर्सला विकत घेतले होते. याबरोबरच केजकडे लास वेगासमध्ये एक बंगला, रोड आयलंडवर घर, एक कोटी पंच्याहत्तर लाख डॉलर किंमतीचा आलिशान महाल, मलिबू बीचवरील घर, अशी भरमसाठ संपत्ती होती.

केजने प्रेमिकेसाठी कोट्यवधी रुपयांचे दागिने विकत घेतले होते. त्याने दीड लाख डॉलर खर्च करून सुपरमॅनचे पहिले कॉमिक बुक विकत घेतले होते. त्याने ५० महागडे चित्र विकत घेतले होते. पिरॅमिडसारखा दिसणारा ९ फूट उंच मकबरा देखील केजने विकत घेतला होता. केज यांच्याकडे एक आलिशान लॅम्बबोर्गिनी गाडी होती.

१९९७ मध्ये इराणच्या शाही लॅम्बोर्गिनी गाडीचा लिलाव करण्यात येत होता. तब्बल ४ लाख ५० हजार डॉलर्स देऊन केजने ही गाडी विकत घेतली होती.

२००४ मध्ये केजने ३० मोटरसायकल आणि ५० व्हिंटेज कार्स विकत घेतल्या होत्या. त्याच्याकडे ९ रोल्स रॉईस आणि एक फेरारी एनजु गाडीदेखील होती. १२ मास्टर बेडरूम्स असलेल्या ४ याट त्याने विकत घेतल्या होत्या. यातील एका याटची किंमत तब्बल दोन कोटी डॉलर इतकी होती. याव्यतिरिक्त त्याच्याकडे ३ कोटी रुपयांचे जेटदेखील होते.

२०१५ सालपर्यंत केजवर अमेरिकन टॅक्स डिपार्टमेंटचे १ कोटी ८० लाख डॉलर्स परत करायचे होते. पण केजने आपली सर्व संपत्ती वाया घालवली होती. पैसे भरले नाही म्हणून त्याची संपत्ती जप्त करण्यात आली होती. ज्या डायनासोरच्या हाडांना त्याने कोट्यवधी खर्च करून विकत घेतले होते, ते चोरीचे असल्याची माहिती मिळाली. मंगोलियाच्या गोबी वाळवंटातून त्या हाडांना चोरून अमेरिकेत आणण्यात आले होते. केजला ते सांगडे तर परत करावेच लागले, शिवाय कोट्यवधी रुपये देखील गमवावे लागले.

२००७ मध्ये त्याने इंग्लंडमध्ये पंधरा लाख पाउंड्सला आलिशान महाल खरेदी केला होता, पण पैशाच्या अभावी त्यांना तो महाल विकावा लागला. आर्थिक अडचणीमुळे त्याने आपली बहुतांश संपत्ती विकली. त्याने फक्त त्याचे ते बेट विकले नाही. आज त्या बेटाची किंमत ७५ लाख डॉलर इतकी आहे.

त्याने आपले पहिले सुपरमॅन कॉमिक २२ लाख डॉलर्सला विकले. एवढं करून देखील आपला खर्च भागविण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. २०१७ मध्ये त्याच्याकडे ४ कोटी डॉलर्सची एकूण संपत्ती होती, जी त्याच्या २००९ सालच्या वर्षभरातील कमाई इतकी होती.

नीट नियोजन लावले असते तर आज एवढी मोठी संपत्ती एका फटक्यात गमावण्याची वेळ निकोलस केजवर आली नसती.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

शास्त्रज्ञांनी माणसावरच केलेले हे प्रयोग वाचून कोणाच्याही अंगावर काटा येईल !

Next Post

टोमॅटो हे फळ आहे की भाजी हा वाद अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालायात गेला होता

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

टोमॅटो हे फळ आहे की भाजी हा वाद अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालायात गेला होता

राष्ट्राची अंतर्गत सुरक्षा लक्षात घेऊन सरदार पटेलांनी नॅशनल पोलीस अकॅडमीची स्थापना केली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.