The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एका व्यसनावर उपाय म्हणून हे औषध दिलं आणि लोकांना याचंच व्यसन लागलं

by द पोस्टमन टीम
14 February 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


हेरो*ईन हा जगातला सर्वात धोकादायक अंमली पदार्थ म्हणून गणला जातो, त्याच्या आरोग्यावर होणाऱ्या गंभीर दुष्परिणामामुळे आरोग्याला गंभीर धोका उत्पन्न होऊ शकतो. आज जरी हेरोईन बहुतांश देशांत बंदी असली तरी एकेकाळी हेरो*ईन हे पॅरासिटेमॉलप्रमाणे एक लोकप्रिय औषध होते.

अनेक लोक खोकल्यावर एक जालीम उपाय म्हणून या अंमली पदार्थाचे सेवन करायचे. १९व्या शतकात अंमली पदार्थांचे सेवन फार कमी व्हायचे, लोकांना जर व्यसन करायचे असेल तर ते दारूकडे वळून त्याचे सेवन मोठ्या प्रमाणात करत होते.

या शतकाच्या सुरुवातीला रासायनिक अंमली पदार्थ लोकांना अधिक माहिती नव्हते, जे निर्माण केले जात होते, त्यापैकी बहुतांश हे अ*फू आणि च*रस यांच्या रसापासून तयार केले जात होते.

जर्मन शास्त्रज्ञ फेड्रिक सर्टनर हा पहिला व्यक्ती होता ज्याने रासायनिक पद्धतींचा वापर करून अ*फूच्या तत्त्वांना वेगळं केलं. त्याने नवीन मॉर्फीनची निर्मिती केली आणि यासाठी त्याचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता.

या नवीन पदार्थांना त्यावेळी मोठी मागणी होती. हर्बल ड्र*ग्ज म्हणून यांची विक्री केली जात होती. जॉर्ज मर्क या माणसाने तर आपल्या औषधालयाचे रूपांतर हर्बल ड्र*ग्जच्या निर्मिती आणि विक्री केंद्रात केले होते.



१८६३ साली या क्षेत्रावर संशोधकांनी आपले लक्ष केंद्रित केले, फ्रेडरिक बेयर नावाच्या एका व्यापाराने एल्बरफेल्ड येथे डांबरापासून रंग तयार करण्याचा कारखाना सुरु केला. पुढे त्याला या व्यवसायात नफा मिळवायला अडचण निर्माण व्हायला लागली, त्यामुळे त्याने रासायनिक औषधनिर्मितीत पैसे गुंतवण्यास सुरुवात केली.

औषध निर्मिती करताना १८८८ साली त्याने पहिल्या रासायनिक औषधाची निर्मिती केली होती, पुढे याच औषधापासून ह्नेरिक ड्रेसरने हेरो*ईनची निर्मिती केली. यात त्याने दोन मॉर्फीनचे कॉम्पोनन्ट आणि एक असेटाईल कॉम्पोनन्ट एकत्र केले होते.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

हेरो*ईनला हे नाव हेरोइक या त्याकाळी अत्यंत शक्तिशाली औषधाला देणाऱ्या जाणाऱ्या नावावरून देण्यात आले होते. ड्रेसरने हेरो*ईनला श्वसनाच्या विकारावरील एक उत्तम औषध म्हणून समोर ठेवले. त्याकाळात न्यूमोनिया आणि क्षयरोग हे दोन्ही आजार फार चरमावर होते, असंख्य लोक या आजारांनी पीडित होते. त्याकाळात या आजारांवर चांगले औषध नसल्याने लोकांना नार्कोटिक ड्र*ग्ज घेण्याचा सल्ला देत जेणेकरून त्यांना शांत झोप लागून, त्यांना होणारा त्रास कमी होऊ शकेल.

हेरो*ईन त्यावेळी लोकांमध्ये खूप जास्त प्रसिद्ध औषध होतं. लोक आवर्जून हेरो*ईनचे डोस घेऊन लागले. हेरो*ईनचा प्रभावामुळे लोकांना गुंगी येऊन एक शांत झोप लागायची, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक या ड्र*ग्जचे सेवन करू लागले होते.

हेरो*ईनमुळे लोकांचा खोकला कमी झाल्याचे समोर आले होते. लोकांना डॉक्टर हेरो*ईन घेण्याचा सल्ला तर देऊ लागले पण लोक बरे झाल्यानंतर देखील हेरो*ईनचे सेवन करत. त्याचे व्हायचे तेच परिणाम झाले, अनेक लोकांना हेरो*ईनचे व्यसन लागले.

खरंतर हेरो*ईनच्या व्यसनाचे प्रमाण अत्यल्प होते, त्या आधीच मॉर्फीनच्या व्यसनाने लोक जास्त ग्रस्त होते. महत्त्वाचा भाग असा आहे की मॉर्फीनच्या व्यसनावर आळा घालण्यासाठी डॉक्टर लोक हेरो*ईनचे डोस घेण्याचा सल्ला देत होते.

१९०३ साली हेरो*ईन हे सुद्धा एक व्यसन निर्माण करणारे औषध आहे, असे संशोधन जी. पट्टे नावाच्या शास्त्रज्ञाने केले, त्याचे संशोधन अनेक शास्त्रीय मासिकात प्रकाशित करण्यात आले. कालांतराने हेरो*ईन हे अमेरिका, इंग्लंड व इतर युरोपीय देशात चांगलेच फोफावले, त्यामुळे लोकांच्या आरोग्यावर खूप गंभीर परिणाम झाला.

अमेरिकेत तर औषधांच्या विक्रीवर बंदी आणणारे कुठलेच कायदे अस्तित्वात नसल्यामुळे लोक सहज मेडिकलमध्ये जाऊन हेरो*ईनची खरेदी करू लागले. हेरो*ईन खरेदीचे प्रमाण इतके वाढले होते की अडीच लाख लोक कट्टर व्यसनी झाले होते.

अखेरीस अमेरिकन सरकारने १९०६ मध्ये प्युअर ड्र*ग एंड फुड कायदा पारित केला. यात अनेक औषधांवर बंदी घालण्यात आली, कुठल्या आजारावर कुठले औषध योग्य ठरेल यासाठी एक नियमावली तयार करण्यात आली. १९१४ साली अमेरिकन राष्ट्रपती विड्रो विल्सन यांनी हे अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा करून हेरो*ईनच्या व्यापारास आणि विक्रीस बंदी घातली.

१९१० साली अमेरिकेत पहिला हेरो*ईनचे व्यसन असणाऱ्या रुग्णाची नोंद झाली. यानंतर काही महिन्यातच ही सांख्य ४२८ पर्यंत गेली. १७ ते २५ वयोगटातील तरुण हे हेरो*ईनचे व्यसन करत होते.

१९१४ च्या कायद्यानंतर १९१९ सालापासून हेरो*ईन अमेरिकेच्या मार्केटमध्ये इंजेक्शनच्या स्वरुपात आलं आणि लोक त्याची काळ्या मार्गाने खरेदी विक्री करू लागले.

हेरो*ईनची खरेदी विक्री करण्याचे काम करणाऱ्या वेगवेगळ्या टोळ्या अमेरिकेत अस्तित्वात आल्या, या टोळ्यांनी मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररित्या हेरो*ईनची विक्री केली. १९२४ साली अमेरिकन सरकारने यावर कठोर पावले उचलत हेरो*ईनच्या व्यसनाला बेकायदेशीर ठरवत, तसे करणाऱ्या व्यक्तीला शिक्षेची तरतूद केली.

पुढे लीग ऑफ नेशनने हेरो*ईनवर बंदी आणली. हेरो*ईनचा व्यापार, विक्री व तस्करी बेकायदेशीर ठरवली पण हेरो*ईन तेव्हा बहुतांश लोकांपर्यंत पोहचलं होतं.

हेरो*ईन जगभर उपलब्ध असून पाकिस्तानमार्गे मोठ्या प्रमाणात भारतात हेरो*ईनची बेकायदेशीर वाहतूक केली जाते. आजही मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग या हेरो*ईनच्या नादी आपलं आयुष्य खराब करतो आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या आफ्रिकन हुकुमशहाने भारतीयांना अल्लाहच्या आदेशावरून हाकलून लावलं होतं

Next Post

एका काँग्रेस नेत्याच्या सांगण्यावरून अडवाणींनी अटलजींना पंतप्रधानपदासाठी पुढे केलं

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

एका काँग्रेस नेत्याच्या सांगण्यावरून अडवाणींनी अटलजींना पंतप्रधानपदासाठी पुढे केलं

हातावर लावायच्या रंगीत स्टिकर्सनी बबलगम नाईन्टीज किड्समध्ये फेमस केला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.