The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॅनियल क्रेगला रॉयल नेव्हीमध्ये रियल लाईफ ००७ जेम्स बॉण्डचा किताब बहाल केलाय

by द पोस्टमन टीम
25 October 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


डॅनियल क्रेगच्या चाहत्यांची प्रतिक्षा संपली आणि जेम्स बाँड सिरीजमधला ‘नो टाईम टू डाय’ हा चित्रपट २०२१ साली चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला. या चित्रपटाची विशेषता म्हणजे, ब्रिटिश संरक्षण मंत्रालयानं चित्रपट निर्मात्यांसोबत हातमिळवणी केली. रॉयल नेव्हीच्या ताफ्यातील डिस्ट्रॉयर शिप एचएमएस ‘ड्रॅगन’ ही ‘नो टाईम टू डाय’मध्ये दिसणार आहे.

इंग्लंडमधील सर्वांत मोठं हवाई केंद्र असलेलं रॉयल एअर फोर्स ब्रिझ नॉर्टन हे ठिकाण नाटोचा तळ दाखवण्यासाठी वापरण्यात आलं आहे. या सर्व गोष्टींशिवाय डॅनियल क्रेगबाबत आणखी एक खास गोष्ट समोर आली आहे. अभिनेता डॅनियल क्रेगला रॉयल नेव्हीमध्ये मानद कमांडरपद बहाल करण्यात आलं आहे. त्यामुळं रिल लाइफ कमांडर आता रियल लाइफमध्ये देखील कमांडर झाला आहे.

आपल्याकडे खेळाडूंना लष्कारानं मानद पदं बहाल केल्याची काही उदाहरणं आहेत. कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी यांना टेरिटोरियल आर्मीमध्ये मानद लेफ्टनंट कर्नल पद मिळालेलं आहे. तर, सचिन तेंडुलकरला वायुसेनेनं मानद ग्रुप कॅप्टनपद दिलं आहे. ब्रिटनच्या रॉयल नेव्हीनंसुद्धा चित्रपटाच्या माध्यमातून त्यांची प्रतिमा उंचावण्याचं काम करणाऱ्या डॅनियल क्रेगला असा सन्मान बहाल केला. कमांडर क्रेगनं कायम यूके आर्म्ड फोर्सेसला समर्थन दिलं असून विशेषत: नेव्हीमध्ये काम करणाऱ्यांच्या आयुष्याबाबत त्याला कायम कुतुहल राहिलं आहे. त्यामुळं मिळालेला सन्मान नक्कीच क्रेगसाठी खास आहे.

‘नो टाईम टू डाय’ या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर रॉयल नेव्हीनं क्रेगच्या सन्मानाची घोषणा केली. मानद कमांडर डॅनियल क्रेग यांचं रॉयल नेव्हीमध्ये स्वागत करताना मला आनंद होत आहे. आमचे मानद अधिकारी राजदूत आणि वकील म्हणून नेव्हीसाठी सेवा देतात. डॅनियल क्रेग गेल्या पंधरा वर्षांपासून कमांडर बॉण्ड म्हणून प्रसिद्ध आहे. एक नौदल अधिकारी असलेला बॉण्ड ब्रिटनला जगभरातील अनेक धोक्यांपासून सुरक्षित ठेवत आहे.

रॉयल नेव्हीचे कर्मचारी गेल्या कित्येक दशकांपासून प्रत्यक्षात हे काम करत आहेत. येत्या काही वर्षांमध्ये बॉण्डचं तंत्रज्ञान वापरून आम्ही देखील त्याच्यासारखी प्रगत सेवा देण्याचा प्रयत्न करू, अशा शब्दांमध्ये रॉयल नेव्हीचे फर्स्ट सी लॉर्ड ॲडमिरल सर टोनी राडाकिननं क्रेगचं स्वागत देखील केलं आहे.



गंमत म्हणजे रॉयल नेव्हीकडं प्रत्यक्षात एक रिअल-लाइफ बाँड आहे. फ्रान्सिस बाँड नावाचे अधिकारी लेफ्टनंट कमांडर म्हणून पोर्ट्समाउथमधील रॉयल नेव्हीच्या मुख्यालयात काम करतात. जेम्स बाँडच्या पात्रामुळं त्यांचे सहकारी कायम फ्रान्सिसची चेष्टा-मस्करी करतात. डॅनिलयल क्रेगला मानद पद बहाल करताना फ्रान्सिस बाँड यांनासुद्धा आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यानिमित्त पहिल्यांदाचं ‘रियल’ बाँड आणि ‘रिल’ बाँडची भेट झाली.

एक अभिनेता आणि समाज सेवक म्हणून डॅनियल प्रसिद्ध आहे. २ मार्च १९६८ रोजी जन्मलेल्या डॅनियलनं नॅशनल युथ थिएटरमध्ये प्रशिक्षण घेतलं. याशिवाय १९९१ साली त्यानं गिल्डहॉल स्कूल ऑफ म्युझिक अँड ड्रामामधून पदवी प्राप्त केली. त्यानंतर १९९२ मध्ये त्यानं ‘द पॉवर ऑफ वन’ या नाटकातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ऐतिहासिक टेलिव्हिजन ड्रामा असलेल्या ‘शार्प्स ईगल’ आणि कौटुंबिक चित्रपट ‘ए किड इन किंग आर्थर कोर्ट’ यामधील भूमिकांच्या माध्यमातून त्यानं प्रेक्षक आणि समिक्षकांचं लक्ष वेधलं.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

त्यानंतर त्यानं अवर फ्रेंड्स इन द नॉर्थ, एलिझाबेथ, लारा क्रॉफ्ट: टॉम्ब रायडर, रोड टू परडीशन आणि लेयर केक या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. मात्र, त्याला खरी प्रसिद्धी मिळाली ती ‘जेम्स बाँड’च्या भूमिकेमुळं. २००६ साली कॅसिनो रॉयल चित्रपटात डॅनियल क्रेगनं पहिल्यांदा जेम्स बाँडची भूमिका साकारली.

त्यानंतर त्याची क्वाँटम ऑफ सोलॅस, स्कायफॉल, स्पेक्टर आणि नो टाईम टू डाय या ‘बाँड’पटांमध्ये देखील वर्णी लागली. नोव्हेंबर २००६ मध्ये रिलीज झालेल्या कॅसिनो रॉयलमधील क्रेगच्या भूमिकेला समीक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रमुख भूमिकेसाठी बाफ्टा पुरस्कारासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं नामांकन मिळालं. याशिवाय त्याच्या द गोल्डन कंपास, वेस्टर्न काउबॉय अँड एलियन्स, लोगान लकी आणि नाईव्ह्ज आउटमधील भूमिका देखील गाजल्या.

आपल्या अफलातून अभिनयानं जगभरात आपली ओळख निर्माण केलेल्या डॅनियल क्रेगनं समाजकार्यात देखील पुढाकार घेतलेला आहे. २००७ साली क्रेगनं ब्रिटीश पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्यासह युनायटेड किंगडमच्या कॉमिक रिलीफ चॅरिटी फंडरायझर मोहिमेमध्ये भाग घेतला होता. दोघांनी मिळून १ करोड डॉलर्सपेक्षा जास्त निधी जमा केला होता. कॅथरीन टेटच्या बीबीसी रेड नोज डेसाठी निधी उभारण्यासाठी कॅथरीन टेटनं शो केला होता, त्यामध्ये क्रेगनं देखील सहभाग नोंदवला होता.

८ डिसेंबर २००९ रोजी ब्रॉडवे केअर्स/इक्विटी फाइट्स एड्स निधी उभारणीमध्ये क्रेगनं सहभाग घेतला, २१व्या जिप्सी ऑफ द इयर स्पर्धेत सहभाग घेऊन त्याने १ लाख ५४९ हजार ९५३ डॉलर्सचा निधी उभारला. २०११ साली जुडी डेंचनं आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एका लघुपटाची निर्मिती केली होती. या लघुपटात क्रेगनं अभिनय केला होता. त्यानंतर त्यानं मंगोलियातील ऑर्बिस इंटरनॅशनलसोबत काम केलं. तेखील लोकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठीही त्याने काम केलं होतं.

अपॉर्च्युनिटी नेटवर्कसोबत मिळून डॅनियल क्रेगनं न्यूयॉर्कमधील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीसुद्धा मदत केलेली आहे. एप्रिल २०१५ साली संयुक्त राष्ट्रांनी डॅनियल क्रेगला खाणकामांतील स्फो*टकांच्या धोक्यांचं निर्मूलन करण्यासाठी जागतिक दूत म्हणून नियुक्त केलं होतं. ‘यूएन माइन ॲक्शन सर्व्हिस’साठी  (UNMAS) जागरूकता वाढवण्याचं काम त्याला देण्यात आलं होतं.

डॅनियल क्रेगनं आपली अभिनय कारकिर्द सांभाळून सामाजिक कार्यांमध्ये व्यापकपणे योगदान दिलेलं आहे. त्याचं हेचं काम पाहून रॉयल नेव्हीनं त्याला मानद कंमाडरपद बहाल केलं आहे. नेव्हीप्रती असलेलं त्याचं आकर्षण पाहता येत्या काही दिवसात डॅनियल नेव्हीसाठी काम करताना दिसला तर नवल नको वाटायला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

कांगारूंना वाटलं मॅच हातात आली, परंतु कुंबळे आणि श्रीनाथने सामना खेचून आणला

Next Post

एका भूकंपाने अवघ्या २३ सेकंदात संपन्न शहराचं मातीच्या ढिगाऱ्यात रूपांतर केलं..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

एका भूकंपाने अवघ्या २३ सेकंदात संपन्न शहराचं मातीच्या ढिगाऱ्यात रूपांतर केलं..!

...जेव्हा धनदांडग्यांनी एकत्र येऊन सरकारच उलथवून टाकण्याचा कट रचला होता..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.