The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सिगारेट सुटत नाही, तर हे पाच सोपे घरगुती उपाय कराच

by द पोस्टमन टीम
27 March 2025
in आरोग्य
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब


कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा घातकच ठरतो. त्यातही अमलीपदार्थांचे व्यसन तर संपूर्ण कुटुंबाला उ*ध्वस्त करते. तुमच्या आजूबाजूलाही अशी कितीतरी उदाहरणे तुम्ही पहिली असतील.

सिगारेटच्या पाकिटावर तर स्पष्ट सूचना दिलेली असते, ‘धुम्रपान केल्याने कॅन्सर होऊ शकतो’/धुम्रपान आरोग्याला हानिकारक आहे.’ तरीही हौसेने अनेकजण हा रोग विकत घेतात.

सिगारेटने तर लोकांच्या फुफ्फुसाचाच कोळसा होतो. या व्यसनांमुळे कौटुंबिक आणि सामाजिक जीवन उ*ध्वस्त होते. तेव्हा अशा हानिकारक व्यसनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत. हे छोटे छोटे बदल जर तुम्ही स्वीकारले तर नक्कीच सिगारेटच्या विळख्यातून लवकर मुक्त व्हाल. चला तर पाहूया या टिप्स कोणत्या आहेत.

मध

सिगारेटच्या व्यसनापासून लवकरात लवकर सुटका करून घ्यायची असेल तर ही टीप तुम्हाला जास्त फायदेशीर ठरेल. यासाठी आपण मधासारख्या गोड नैसर्गिक पदार्थाचा वापर करायचा आहे. मधामध्ये खूप जास्त प्रमाणात जीवनसत्वे, एन्झाइम्स आणि प्रथिने असतात. माधामुळे रक्तशुद्धी होते. सिगारेटमुळे जे काही विषारी घटक तुमच्या रक्तात मिसळले असतील ते मधाच्या सेवनामुळे शरीरातून बाहेर फेकले जातील.



ज्या क्षणी तुम्हाला सिगारेट पिण्याची तीव्र इच्छा होईल त्याक्षणी तुम्ही जर मधाचे सेवन केले तर तुमच्या इच्छेची तीव्रता कमी होईल. यासाठी विशेषत: सेंद्रिय पद्धतीने तयार केलेला आणि कुठलाही फ्लेवर नसलेला मध वापरा. या पद्धतीने तुम्हाला नक्कीच चांगला फरक पडेल.

मुळा

मुळा थोडा तिखट असतो चवीला पण, सिगारेटपेक्षा मुळा नक्कीच फायद्याचा आहे. यामध्ये क जीवनसत्व, फॉस्फरस, झिंक, आणि जीवनसत्व ब, असे घटक असतात हे आपल्या निरोगी आरोग्यासाठी खूप महत्वाचे घटक आहेत. मुळ्याचे सेवन केल्यानेही रक्तशुद्ध होते. रक्तातील ऑक्सिजनची मात्र वाढते. मुळ्याचा ज्यूस पिल्याने सिगारेट पिण्याची इच्छा कमी होते. मुळ्याच्या ज्यूसमध्ये थोडा मध टाकून घेतला तरी चालेल. यानेही तुम्हाला लवकर फरक पडेल.

लाल मिरची पावडर

तुमच्या आहारात लाल मिरची पावडरचा जास्तीत जास्त वापर करा. लाल मिरची पावडर पाण्यातून घेतली तरी चालते. अशाप्रकारे पाण्यातून मिरची पावडर सेवन करण्यानेही चांगला फायदा होतो. यामुळे श्वसन संस्थेचे कार्य सुरळीत होते. या उपायाने तुम्हाला लवकरच फरक पडलेला दिसेल.

हे देखील वाचा

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

ज्येष्ठमध

सिगारेट पिण्याची जेव्हा जेव्हा तलप होईल तेव्हा तेव्हा ज्येष्ठमधाची कांडी चघळा. ज्येष्ठमधाच्या सेवनाने अशक्तपणा कमी होतो. सिगरेटला हा एक उत्तम पर्याय आहे.

ज्येष्ठमधाच्या सेवनाने घशाला देखील आराम मिळतो, मुखारोग्य चांगले राहते. सिगारेट प्रमाणेच याचाही वापर केल्यास तुम्हाला सिगारेटची आठवणही होणार नाही.

पाणी

पाण्याचे महत्त्व वेगळे सांगण्याची गरज नाही. पाण्यामुळे आपल्या शरीरातील विषारी द्रव्ये जास्त प्रमाणात बाहेर फेकली जातात. जेव्हा जेव्हा सिगारेट पिण्याची इच्छा होईल तेव्हा तेव्हा पाणी पिल्याने सिगारेट पिण्याची इच्छा मारली जाईल. भरपूर पाण्याचे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकार शक्तीही वाढते. यामुळे नक्कीच सिगारेट पिण्याची सवय सुटण्यासाठी जास्त मदत होईल.

सिगारेट किंवा इतर कुठलेही व्यसन तुमच्यासोबतच तुमच्या कुटुंबियांनाही त्रासदायकच ठरते. जगभरात दरवर्षी कॅन्सरमुळे लाखो लोकांचा मृत्यू होतो. कित्येक कुटुंबे उध्वस्त होतात.

धुम्रापानाच्या परिणामांविषयी जागृती करण्यासाठी दरवर्षी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘नो स्मोकिंग डे’ साजरा केला जातो.

जितक्या लवकर या विळख्यातून बाहेर पडाल तितक्या लवकर तुम्हाला याचा फायदा होईल. धुम्रपानामुळे तुमच्या आरोग्याची ही काही झीज झाली असेल ती लवकर भरून निघेल आणि तुम्ही पुन्हा पूर्णतः निरोगी व्हाल. गरज आहे फक्त पक्का निर्धार करण्याची!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

आज स्टाईल स्टेटमेंट बनलेल्या सनग्लासेसचा इतिहास माहित आहे का..?

Next Post

समुद्रावर द*हश*तीचे साम्राज्य उभारणारा समुद्री लुटेरा एडवर्ड ब्लॅकबियर्ड

Related Posts

आरोग्य

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
आरोग्य

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

1 June 2025
विज्ञान तंत्रज्ञान

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

19 April 2025
आरोग्य

फ्रेंच फुटबॉलर करीम बेंझेमासुद्धा ज्याचा फॅन आहे ती हिजामा थेरपी काय आहे?

8 April 2025
आरोग्य

स्टील्थ ओमिक्रॉनमुळे भारतात पुन्हा लॉकडाउन लावावं लागणार का..?

25 March 2022
Next Post

समुद्रावर द*हश*तीचे साम्राज्य उभारणारा समुद्री लुटेरा एडवर्ड ब्लॅकबियर्ड

Explainer - मनसुख हिरेन, सचिन वाझे, परमवीर सिंह. समजून घ्या संपूर्ण प्रकरण!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.