The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हा भारतीय दिग्दर्शक सुपर नॅचरल हॉलिवूड चित्रपटांचा बादशाह आहे..!

by द पोस्टमन टीम
28 October 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


सिनेमा किंवा चित्रपट या क्षेत्राचे वेड असलेले कमी लोक नाहीत. यात करिअर करू इच्छिणाऱ्या लोकांची संख्याही खूप आहे. आपल्याकडे डोळ्यांत अगणित स्वप्ने घेऊन उमेदवार मायानगरी मुंबईत दाखल होतात ते याच वेडापोटी. कोणी इथे टिकतात, कुणी परत फिरतात. तरी या क्षेत्रात असलेला पैसा, ग्लॅमर यांची भुरळ कित्येकांना पडतेच.

मात्र चित्रपटनिर्मिती हा एक फार मोठा गुंता आहे. ही एक सांघिक प्रक्रिया असते. विविध कलांचा व तंत्रांचा उपयोग करून, अनेक कलावंतांच्या आणि तंत्रज्ञांच्या परस्परांच्या सहकार्याने चित्रपट साकार होतो. यात, विशेषतः चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यांना अनेक व्यवधाने सांभाळावी लागतात.

लेखकाला एखादी कथा सुचल्यावर त्यातून संपूर्ण चित्रपट तयार होईपर्यंत अनेक आव्हाने असतात. त्यामुळे चित्रपट क्षेत्रातील करिअर म्हणजे मौजमजा, पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमर आणि सुखे पायाशी लोळण घेत आहेत अशी आरामदायी जीवनशैली असा कुणाचा (गैर)समज असेल तर ‘घी देखा लेकिन बडगा नहीं देखा’ असाच त्याचा अर्थ आहे.

उलट या वरकरणी छानछान वाटणाऱ्या गोष्टींना भुलून ‘इझी मनी’च्या अपेक्षेने कुणी इथे येत असेल तर अपयश येण्याचीच शक्यता जास्त असते. पण एखादा असाही असतो, ज्याने लहानपणीच याची स्वप्ने पाहिलेली असतात, आणि त्या दिशेने वाटचालही सुरू केलेली असते.



त्यातही एकेकाची आपली अशी खासियत असते. आपल्याकडे नाही का, हॉरर फिल्म म्हटले की रामसे बंधू डोळ्यासमोर येतात. क्लासिकल आणि कंटेम्पररी यांचा मेळ असलेल्या फिल्म ही मणिरत्नमची खासियत. तर सामाजिक विषय संवेदनशीलतेने हाताळणे ही सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांची स्पेशालिटी.

अशाच प्रकारे हॉलिवूडमध्ये एक व्यक्ती प्रसिद्ध आहे. ती म्हणजे एम नाईट श्यामलन. त्यांचे पूर्ण नाव मनोज नेलीयट्टु श्यामलन. ही व्यक्ती प्रसिद्ध आहे ती सुपरनॅचरल प्लॉट असणाऱ्या आणि हटके शेवट असणाऱ्या सिनेमांचे दिग्दर्शक म्हणून. ते इंडियन अमेरिकन फिल्म मेकर आणि कलाकार आहेत.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

डॉक्टर दांपत्याच्या पोटी जन्म घेतलेल्या श्यामलन यांचा जन्म भारतातील असला, तरी बालपण अमेरिकेत गेले. ‘प्रेईंग विथ अँगर’ हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यानंतर ‘वाइड अवेक’, ‘द सिक्स्थ सेन्स’, ‘अनब्रेकेबल’, ‘साइन्स’, ‘द व्हिलेज’ अशा एकाहून एक सरस चित्रपटांचे निर्माते म्हणून त्यांची कारकीर्द गाजली.

‘द सिक्स्थ सेन्स’ या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट ओरिजिनल पटकथा अशा दोन विभागांत अकॅडमी अवॉर्डसाठी नामांकन मिळाले. त्यानंतरही त्यांचा चित्रपट निर्मितीचा आणि वेगवेगळी कथानके उत्तम पद्धतीने सादर करण्याचा सिलसिला सुरूच राहिला. ‘लेडी इन द वॉटर’ ‘द हॅपनिंग’, ‘द लास्ट एअरबेंडर’, ‘आफ्टर अर्थ’, ‘द व्हिजिट’, ‘स्प्लिट’, ‘ग्लास’ असे थ्रिलर चित्रपट त्यांच्या खाती जमा आहेत.

श्यामलन यांचा जन्म पॉंडीचेरी येथील माहे इथला. त्यांचे वडील न्यूरोलॉजिस्ट तर आई गायनॅकॉलॉजिस्ट. ते केवळ सहा आठवड्यांचे असताना त्यांचे आई-वडील अमेरिकेला गेले. पेनसिल्व्हानिया येथील पेन व्हॅली या उच्चभ्रू वस्तीत श्यामलन लहानाचे मोठे झाले. लहानपणी हिंदू धर्मीय असल्यामुळे त्यांना काहीशी वेगळी वागणूक देण्यात आली. त्यामुळे त्यांना शाळेत असतानाही एकटे, अस्पृश्य असल्यासारखे वाटायचे.

आजही त्यांना आठवते, त्यांचे शिक्षक शाळेत ज्यांनी कोणी ‘बाप्तिस्मा’ घेतला नसेल तो नरकात जाईल असे म्हणून ख्रिस्ती धर्माचा प्रचार करत. ते विद्यार्थी असताना एकदा त्यांना सर्वोत्कृष्ट असा शेरा मिळाला होता आणि त्याचे त्यांच्या शिक्षकांना चक्क वाईट वाटले होते! केवळ एका नॉन कॅथोलिक किंवा हिंदू मुलाला चांगली ग्रेड मिळाली म्हणून!!

या आठवणी आजही त्यांच्या मनावर खोलवर कोरलेल्या आहेत. पुढे त्यांनी शिक्षणात चांगलीच प्रगती दाखवली. १९८८ मध्ये त्यांना न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीची मेरिट स्कॉलरशिप मिळाली. ते न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी टिश स्कूल ऑफ आर्ट्स चे विद्यार्थी आहेत. तिथे शिकत असतानाच त्यांनी नाईट हे नाव घेतले. अमेरिकन नागरिकत्वासाठी अर्ज करत असताना त्यांना ही कल्पना सुचली असे म्हणतात. त्यांना भारत सरकारने पद्मश्री देऊन सन्मानित केले आहे.

अगदी लहानपणापासूनच श्यामलन यांना चित्रपट निर्मितीत रस होता. तरुणपणी सुपर एट कॅमेरा हातात आल्यावर त्यांनी अनेक प्रयोग केले. वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत त्यांनी घरच्या घरी ४५ चित्रपट बनवले होते. वडिलांची इच्छा त्यांनी आपल्या पावलावर पाऊल टाकून डॉक्टरकीकडे वळावे अशी होती.

मात्र त्यांच्या आईने त्यांना चित्रपट बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले. विशेष म्हणजे लेडी इन-द-वॉटर या चित्रपटाचा अपवाद वगळता त्यांच्या प्रत्येक सिनेमाच्या डिव्हिडीवर त्यांनी लहानपणी निर्मिलेल्या या ४५ चित्रपटांपैकी एक तरी सीन असतोच. त्यानिमित्ताने आपल्या करिअरचे अगदी सुरुवातीचे दिवस ते नव्याने जगतात.

श्यामलन यांना सुपरनॅचरल गोष्टींमध्ये कसा रस निर्माण झाला याविषयी काही सुरस कथा सांगितल्या जातात. साय-फाय चॅनेल या एका वाहिनीच्या एका डॉक्युमेंटरी दरम्यान चॅनेलने असा दावा केला, की श्यामलन लहान असताना एका गोठलेल्या तलावामध्ये बुडून जवळपास अर्धा तास मृत अवस्थेत होते. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली, तरी या प्रसंगानंतर ते आत्म्यांशी नियमितपणे संवाद साधू लागले. त्यातूनच सुपरनॅचरल गोष्‍टींविषयीचे त्यांचे वेड वाढत गेले.

मात्र म्हणून श्यामलन केवळ सुपरनॅचरल, हॉरर, किंवा थ्रिलर सिनेमांचीच निर्मिती करतात असे नाही. त्यांनी काही वेगळ्या धाटणीचे चित्रपटही हाताळले आहेत. ‘लेबर ऑफ लव्ह’ हा असाच एक सिनेमा. यामध्ये ते लेखक, निर्माता, दिग्दर्शक अशा तिहेरी भूमिकेत आहेत. यामध्ये पत्नीचे निधन झाल्यानंतर पायी क्रॉस कंट्री ट्रिप करून आपल्या स्वर्गीय पत्नीची आठवण जपण्याचा आगळावेगळा प्रयत्न करणाऱ्या माणसाची गोष्ट सांगितलेली आहे.

०२ फेब्रुवारी २०२३ रोजी त्यांचा अजून एक ‘सस्पेन्स थ्रिलर’ येत आहे. त्याचे नाव आहे ‘नॉक ऍट द केबिन’. युनिव्हर्सल स्टुडिओ या अग्रगण्य संस्थेच्या सहकार्याने हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येत आहे. पुढचा त्यांचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय करिष्मा दाखवतो हे तेव्हा कळेलच!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

आजही ‘विलियम टेल’ची गोष्ट स्वित्झर्लंडमध्ये धैर्य आणि स्वाभिमानाचे उदाहरण आहे

Next Post

जाहिरात करून सावज शोधणारा हा एकमेव न*रभ*क्षक होता

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

जाहिरात करून सावज शोधणारा हा एकमेव न*रभ*क्षक होता

म्हणून ताजिकिस्तानसह नऊ देशांमध्ये असलेले भारतीय लष्करी बेस सामरिकदृष्ट्या महत्वाचे आहेत

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.