The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फेरारीने अपमान केला म्हणून जगातली सगळ्यात लॅव्हिश कार जन्माला आली

by द पोस्टमन टीम
24 June 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


प्रत्येक सामान्याच्या स्वप्नात कार असते. संध्याकाळी आपल्या हक्काच्या गाडीतून कुठे तरी लांब फिरायला जावे हे स्वप्न घेऊन प्रत्येक जण जगत असतो. पूर्वी लहानपणी कार न म्हणता मोटर म्हणत. ज्यादिवशी पाहुणे मोटरमधून यायचे तो दिवस म्हणजे घरातल्या चिल्लर पार्टीसाठी खास असायचा. कारण येणारे पाहुणे मोठे असायचे, त्यांच्यासाठी ठेवणीतल्या कपबश्या निघायच्या, चांगलंचुंगलं खायला बनायचं. ते पाहुणे येताना खाऊ आणायचे. मग त्यांनी दिलेले चॉकलेट, गोळ्या आपण पुरवून पुरवून खायचो. कारण तो काळच तसा होता.

अतिश्रीमंत लोकांच्या दारात कार असण्याचा तो काळ. कार एकतर त्यांच्या घरी दिसायची नाही तर कधी हिंदी सिनेमा बघायचा चान्स मिळाला तर त्यातल्या खलनायकाकडे! त्या खलनायकाची गाडी बघितली की आपल्याकडे पण एखादी “मोटार” असावी असं कधीतरी वाटून जाई. मग मारुतीने त्यांची मारुती 800 गाडी बाजारात आणली आणि अनेकांचे हे स्वप्न पूर्ण झाले.

आज प्रत्येक कुटुंबात एक तरी कार असतेच. कार शौकिनांबद्दल तर विचारूच नका! ह्युंडाईच्या गाड्यांपासून ते फरारीपर्यंत सगळ्या गाड्यांचे प्रेमी आपल्याला सापडतील. प्रत्येक कार शौकिनांचे एक स्वप्न म्हणजे लँबॉर्गिनी! अतिशय आकर्षक अशा या सगळ्यांच्या स्वप्नातल्या गाडीची गोष्ट आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

फारुशियो लँबॉर्गिनी, लँबॉर्गिनीचे निर्माते यांच्या आयुष्यात एक घटना घडली आणि त्यातून लँबॉर्गिनीचा जन्म झाला.



फारुशियो हे सुरुवातीला ट्रॅक्टर बनवायचे. त्यांचा व्यवसाय अतिशय व्यवस्थित चालू होता. त्यांच्याकडे इतके पैसे साठले होते की ते एखादी लक्झरी कार घेऊ शकतील. चांगली रेसिंग कार घेण्याच्या इच्छेने त्यांनी फरारीची एक गाडी घेतली. परंतु ती चालवताना त्यांना लक्षात आले की गाडीचा क्लच नीट काम करत नाहीये. तो ते दुरुस्त करु शकले असते. परंतु त्यांनी ती बाब फरारीवाल्यांच्या कानावर घातली.

परंतु एका ट्रॅक्टर बनवणाऱ्या मेकॅनिकचे म्हणणे ऐकून ती गोष्ट बदलणे म्हणजे फरारीसारखी गाडी बनवणाऱ्या मालकाचा अपमानच!

असं म्हणतात की एंजोने चिडून फारुशियोला सांगितले चूक गाडीत नसून गाडी चालवणाऱ्यात आहे. त्याच बरोबर ते हे पण म्हणाले फारुशियोने ट्रॅक्टर चालवावा फेरारी नाही. हा अपमान फारुशियोच्या मनाला खूप लागला आणि त्यातून जन्म झाला आजच्या सगळ्यात टॉपच्या रेसिंग कारचा. आपल्या लाडक्या लँबॉर्गिनीचा.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

फारुशियोला माहिती होते त्याला कशा पद्धतीची कार पाहिजे आहे. त्याने काहीच महिन्यात आपली पहिली रेसिंग कार बनवली. त्याचा लोगो म्हणून बैलाचे चित्र ठेवले कारण त्यांची रास वृषभ होती आणि बैल हे वृषभ राशीचे चिन्ह आहे.

लँबॉर्गिनी तयार करण्यासाठी त्यांनी फरारीमधील एक जुना व दोन नवे इंजिनियर ठेवले. या चौघांनी दिवसरात्र एक करून फरारीपेक्षा देखील एक चांगली कार बनविली.

350GTमध्ये तेव्हाचे सर्वात चांगले V12 हे इंजिन लावण्यात आले. १९६३ साली गाडी पूर्ण तयार होऊन लोकांच्या समोर आली. सगळ्यांना गाडीची माहिती व्हावी म्हणून प्रेझेंटेशन ठेवण्यात आले. सगळ्यांनाच त्या गाडीची उत्सुकता होती.

गाडीच्या फॅक्टरीसाठी २५ स्क्वेअर किमी आवाराची जमीन घेण्यात आली. १९६४ साल उजाडले आणि लँबॉर्गिनीची ओळख सगळ्यांना झाली. आता ही गाडी घेण्यासाठी लोकांमध्ये चढाओढ लागली होती. आजसारखीच तेव्हा पण प्रत्येकाला ही कार हवी होती.

ही एक टु सिटर लक्जरी स्पोर्ट्स कार होती. तिचं देखणं रूप सगळ्यांना भुरळ घालत होतं. लोक तिच्या प्रेमात पडले. पहिल्या खेपेला १२० गाड्या विक्रीसाठी तयार झाल्या. हे मॉडेल इतके लोकप्रिय झाले की थोड्या दिवसात त्याचं नवीन मॉडेल बाजारात आले, 400GTआणि तेदेखील अतिशय लोकप्रिय झाले.

१९६६ साली लँबॉर्गिनीने मिउरा कार बाजारात आणली. ती संपूर्ण जगातली पहिली सुपर कार ठरली.

आपल्या दमदार इंजिनमुळे गाडीची स्पीड खूप वाढली होती. पहिल्यांदाच या कारमध्ये चार लिटर पेट्रोलची टाकी होती. त्याचबरोबर या गाडीच्या डिझाईनमध्ये अजून एक बदल होता तो म्हणजे गाडीचे इंजिन मागील बाजूस होते.

आज तर कितीतरी मॉडेल आले आहेत. प्रत्येक शौकिनाजवळ एक तरी मॉडेल असतंच. एका अपमानाचा बदला घेण्यासाठी बनवण्यात आलेली ही गाडी आज सगळ्यांच्या गळ्यातला ताईत ठरली आहे!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

अमेरिकेने एकदा ब्रिटनवर ह*ल्ला केला होता पण ब्रिटनने एवढं सिरियसली घेतलं नाही

Next Post

दुसऱ्या महायु*द्धात पराक्रम गाजवून व्हिक्टोरिया क्रॉसचे मानकरी ठरलेले ‘नामदेव जाधव’..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

दुसऱ्या महायु*द्धात पराक्रम गाजवून व्हिक्टोरिया क्रॉसचे मानकरी ठरलेले 'नामदेव जाधव'..!

"भाकरी नसेल तर केक खा” असं क्वीन मेरी कधीच बोलली नव्हती..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.