The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या पुस्तकाची सुरुवात कशी झाली माहितीये का..?

by द पोस्टमन टीम
27 August 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब


‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ या पुस्तकाबद्दल माहिती नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. जगभरातील काही अनोख्या, एकदम वेगळ्या, भन्नाट आणि हटके नोंदीसाठी प्रसिद्ध असलेले हे पुस्तक सुरु करण्याची कल्पना कुणाला, कधी आणि कशी सुचली असेल याची तुम्हाला काही कल्पना आहे का? नसेल तर मग हा लेख नक्की वाचा.

कुठलीही जगावेगळी गोष्ट, एखादा विक्रम नोंदवायचे झाले तर आपल्या डोळ्यासमोर पहिले नाव येते ते गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे. या जगप्रसिद्ध पुस्तकात कुठल्या प्रकारच्या माहितीची नोंद केली जाते हे तर आपल्याला माहितीच आहे.

अशा प्रकारे जगभरातील नोंदी गोळा करून त्या प्रकाशित करण्याची भन्नाट कल्पना पहिल्यांदा सुचली ती सर ह्युग बीवर यांना. ते सध्या आयडिया गिनीज ब्रेव्हरीचे व्यवस्थापक संचालक आहेत.

ही कल्पना त्यांना कशी सुचली यामागेही एक कथा आहे.

एकदा सर ह्युग एका निशाणेबाजीच्या पार्टीत गले होते. तिथे एका मित्राशी बोलता बोलता युरोपमधील सर्वात वेगाने उडणारा पक्षी कोणता असा प्रश्न समोर आला. दोघांनाही त्यावेळी तरी या प्रश्नाचे उत्तर माहिती नव्हते. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी दोघांनीही बरीच पुस्तके धुंडाळली. पानामागून पाने पालथी घालूनही, त्यांना काही या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. तेव्हा दोघांच्याही असे लक्षात आले की, फक्त याच प्रश्नाचे उत्तर नाही तर अशा प्रकारची कितीतरी तथ्ये सांगणारे आणि त्याबद्दल माहिती देणाऱ्या पुस्तकांची संख्या खूप कमी आहे.



मग त्या दोघांनी ठरवले की, अशा प्रकारे तथ्ये आणि माहिती देणारे पुस्तक आपणच का काढू नये? ह्युगने आपला हा विचार नोर्रीस आणि रॉस यांच्यासमोर मांडला. त्या दोघांनाही ही कल्पना खूपच आवडली.

मग ह्युग, नोर्रीस आणि रॉस तिघांनी मिळून असे पुस्तक लिहिण्याचे काम सुरु केले. यासाठी आवश्यक होते ते अशा तथ्यांचे संशोधन करणे, त्यांचे एकत्रीकरण करणे आणि त्यांचा अभ्यास करणे. यासाठी त्यांनी अनेक दिवस प्रचंड मेहनत घेतली. सगळी माहिती जमवल्यानंतर आणि एकही दिवस विश्रांती न घेता कित्येक आठवडे सलग काम केल्यानंतर त्यांचे तथ्यांबाद्द्ल माहिती देणारे पुस्तक तयार झाले.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

आता प्रश्न होता पुस्तक खपवण्याचा. हे पुस्तक नेमके खपवायचे कुठे? सुरुवातीला त्यांनी पबमध्ये हे पुस्तक विक्रीसाठी ठेवण्याचा विचार केला. परंतु त्यांना पुस्तक विकण्यासाठी फारशी मेहनत करावीच लागली नाही. पुस्तक बाजारात आल्या आल्या लोकांच्या अक्षरश: त्यावर उड्या पडल्या. या पुस्तकाची पहिलीच आवृत्ती प्रचंड लोकप्रिय ठरली, विक्रमी संख्येने या पुस्तकाची विक्री झाली.

कारण, अशाप्रकारची माहिती देणारे एकही पुस्तक तत्पूर्वी बाजारात आले नव्हते. कुणीही अशा प्रकारचे पुस्तक लिहिण्याची कल्पना देखील केली नव्हती. हे पुस्तक जेव्हा लोकाच्या हातात पडले तेव्हा त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता.

त्याकाळी हे एक बेस्ट सेलर पुस्तक ठरले होते. हळूहळू दरवर्षी त्यांचे एकेक पुस्तक येऊ लागले आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड हा एक ब्रँड बनून गेला.

सुरुवातीच्या काळात जगभरातील असे रेकॉर्ड्स जमा करणे वाटते तितके सोपे काम नव्हते. कारण यात कुठल्या एका विशिष्ट प्रदेशाची, देशाची खंडाची माहिती असते असे नाही. यात सगळ्या जगातील माहितीचा खजिना दडलेला असतो. जगभरातील अशी माहिती गोळा करत फिरण्याचे काम खूपच कठीण होते. यासाठी या पुस्तकाच्या मालकांनी देशविदेशातील आपला संपर्क वाढवण्यास सुरुवात केली.

आपल्या या संपर्काच्या माध्यमातून त्यांनी त्या त्या देशातील अशी तथ्यावर आधारित असलेली माहिती जमा केली. हे सगळे काम खूपच किचकट आणि वेळ खाऊ होते पण, तिघांनीही प्रयत्न सोडले नाहीत.

या पुस्तकाच्या पहिल्या प्रतीसाठी त्याकाळी सुमारे ३५,००० डॉलर इतका खर्च आला. तेव्हाच्या दृष्टीने ही रक्कम खूप मोठी होती.

जसजसा या पुस्तकाचा बोलबाला वाढू लागला तसतसे लोकं स्वतःहून पत्र लिहून या पुस्तकासाठी माहिती देऊ लागले. आपलेही नाव या रेकॉर्डमध्ये यावे म्हणून धडपडू लागले. काही कालावधी नंतर तर माहिती जमा करण्याचाही प्रश्न उरला नाही. कारण, या पुस्तकासाठी लोकं स्वतःहून माहिती देऊ लागले आणि ती घेण्यासाठी या पुस्तकांच्या मालकांना आमंत्रणही मिळू लागले. माहिती स्वतःहून चालत त्यांच्याकडे येऊ लागली. त्यांना यासाठी कुठेही जाण्याची गरज भासली नाही.

गेली कित्येक वर्षे सातत्याने हे पुस्तक प्रकाशित होत आहे. ज्यामध्ये जगभरातील विशिष्ट विक्रमांची नोंद केलेली असते. आजही या पुस्तकाची लोकप्रियता कमी झालेली नाही. अमेरिकेतील लोक तर या पुस्तकाचे खूपच मोठे चाहते आहेत.

अमेरिकेतील सार्वजनिक ग्रंथालयातून सर्वाधिक चोरीला जाणारे पुस्तक कोणते असेल तर ते ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स.’

सर्वात जास्त चोरीला जाणारे पुस्तक म्हणून गिनीज बुकचीच गिनीज बुकमध्ये नोंद करण्यास हरकत नसावी. लोकांना हे पुस्तक इतके आवडते की ते ग्रंथालयातून चोरून घेऊन जातात. गिनीज बुकची लोकप्रियता दर्शवणारी यापेक्षा आणखी वेगळे उदाहरण देण्याची गरजच नाही.

काही तरी अनोखी, हटके आणि एकदम विचित्र गोष्ट करून आपले नाव या बुकात यावे म्हणून धडपडणाऱ्या लोकांची काही कमी नाही. यात भारतीयांचाही समवेश आहे. भारतातीलही काही लोकांनी जगावेगळ्या आणि अफलातून गोष्टींचा विक्रम करून या बुकात आपले नाव नोंदवले आहे. (येथे वाचा.) काही लोक तर आपलाच जुना विक्रम मोडून काढून पुन्हा एकदा आपले नाव नव्या विक्रमासह नोंदवले जावे म्हणूनही प्रयत्न करत असतात. यासाठी आयुष्यातील कितीतरी वर्षे घालवतात. पण, त्यांना माहिती असते गिनीज बुक मध्ये नाव येणे म्हणजे काळाच्या विशाल पटलावर आपले नाव कोरण्यासारखे आहे.

तुमच्याकडेही कधी अद्भुत कौशल्ये, विशिष्ट कलागुण, असतील तर तुम्हीही आपले नाव या बुकात नोंदवण्याचा प्रयत्न करू शकता. न जाणो कदाचित काळाच्या पडद्यावर तुमच्या नावाचाही ठसा उमटून जाईल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

म्हणून आजही ज्यू आणि अरब लोकांमध्ये इस्राईलवरून भांडणं सुरु आहेत

Next Post

आपल्या श्रीरामपूरचा झहीर खान अख्ख्या देशाचा फेव्हरेट बॉलर बनला होता

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

आपल्या श्रीरामपूरचा झहीर खान अख्ख्या देशाचा फेव्हरेट बॉलर बनला होता

हरभजन सिंह - भारतीय संघाचा टर्बिनेटर

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.