The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फ्रेंच फ्राईजचा हा इतिहास तुम्हाला माहिती आहे का ?

by द पोस्टमन टीम
8 February 2025
in मनोरंजन, ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


जगभरात ‘फ्रेंच फ्राईज’च्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे. आबालवृद्धांना फ्रेंच फ्राईज खायला आवडतात. फ्रेंच फ्राईजसमोर एखादा फास्ट फूट आयटम देखील फिका वाटतो.

फ्रेंच फ्राईजचा स्वाद जितका जबरदस्त आहे तितकाच जबरदस्त त्याचा इतिहास देखील.

जर युरोपियन लोकांना बटाट्याचा शोध लागला नसता तर आज जगभरातील लोकांना फ्रेंच फ्राईज खाण्याचा आनंद मिळाला नसता. १५३७ साली गिमीनेज-डी-कुइस्टा आणि त्यांच्या स्पॅनिश साथीदारांनी कोलंबियातील एका गावावर ह*ल्ला चढवला, याठिकाणी त्यांना एक वेगळ्या प्रकारचा बटाटा बघायला मिळाला. हा बटाटा आकाराने मोठा आणि स्वच्छ होता. कोलंबियाच्या या यु*द्धाने युरोपियन लोकांपर्यंत बटाटा पोहचवला.

स्पॅनिश लोकांनी स्पेनमध्ये बटाट्याचे पिक घेण्यास सुरुवात केली. १६व्या शतकाच्या सुरुवातीला लोकांनी स्पेनमध्ये बटाट्याची शेती करायला सुरुवात केली होती. यानंतर वॉल्टर रालेच्या प्रयत्नांमुळे हा बटाटा आयर्लंडपर्यंत पोहचला आणि त्यानंतर चार दशकांनी बटाटा संपूर्ण युरोपात पसरला होता.



आज जरी आपण या पदार्थाचा उल्लेख फ्रेंच फ्राईज असा करत असलो, तरी फ्रेंच फ्राईजचा शोध हा फ्रान्समध्ये लागला नव्हता. फ्रेंच फ्राईजचा शोध बेल्जियममध्ये लागला होता.

बेल्जियमच्या म्यूज व्हॅलीतील शेतकरी नेहमी लहान लहान माशांना तळून खायचे. पण हिवाळ्यात जेव्हा पाण्याची पातळी कमी व्हायची तेव्हा खाण्यासाठी मासे मिळत नसत. अशावेळी बटाट्यांनी माशांची जागा घेऊन त्यांची कमतरता भरून काढली होती.

बेल्जियमनंतर फ्रान्सच्या सेनहेबिनी येथील एक डॉक्टर अँथनी ऑगस्टिन परमेंट यांनी युरोप आणि फ्रान्समध्ये बटाट्याला लोकप्रियता मिळवून दिली होती. त्यांनी अशी अफवा पसरवली की बटाटा खाल्ल्याने कुष्ठरोग होत नाही. १७७२ साली पॅरिसच्या फॉरेन्सिक विभागाने बटाटा शरीरासाठी हानिकारक नाही, हे सांगितले. तरीदेखील फ्रेंच लोकांच्या मनात बटाट्याची भीती कायम होती.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

डॉक्टर अँथनी परमेन्ट यांनी आपल्या दवाखान्याच्या बागेतच बटाटे लावले. खरंतर, त्यावेळी फ्रेंच सरकारने बटाटे लावण्यास मनाई केली होती. आपल्या बटाट्याचा शेतीला अनुमती मिळावी म्हणून परमेन्ट यांनी एका मिथ्या भोजन समारंभाचे आयोजन केले. यात बटाट्यापासून तयार करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांची रेलचेल होती.

या समारंभासाठी त्याने बेंजामिन फ्रँकलिन, अँथनी, फ्रान्सचा राजा सोळावा लुई आणि त्याची बायको मेरी एन्टिनेंट या सगळ्यांना आमंत्रित केले होते. या भोजन समारंभाच्या माध्यमातून त्यांनी बटाट्याच्या शेतीसाठी अनुमती मिळवली. यानंतर त्यांनी आपल्या बागेत बटाट्याची रखवालदारी करायला रखवालदार नेमले, जणू कुठली महागडी गोष्ट आहे, असा पहारा ठेवला. त्याने गार्डला सूचना दिली, जर कोणी बटाटा घ्यायला आलं आणि त्या बदल्यात लाच देत असेल, तर त्याच्याकडून लाच घ्या आणि त्याला बटाटा द्या.

मग काय लोकांनी लाच देऊन मोठ्या प्रमाणात बटाटे विकत घेतले आणि त्यांची फ्रान्समध्ये विक्री होण्यास सुरूवात झाली. १७८५ साली फ्रान्समध्ये बटाट्याचा दुष्काळ पडला होता, यानंतर १७९५ सालापासून फ्रान्सने मोठ्या प्रमाणात बटाटे उत्पादन करायला सुरुवात केली.

त्यांनी बटाटे सोलून तळायला सुरुवात केली. त्यांनी या नवीन डिशला फ्रिट्स हे नाव दिले.

आता आपल्यासमोर फ्रेंच फ्राईजशी निगडित दोन प्रकारचा इतिहास आहे. एक आहे बेल्जियमच्या बाजूचा आणि दुसरा फ्रान्सच्या बाजूचा आहे. फ्रान्समध्ये बटाटे लोकप्रिय होण्याआधी फ्रान्स आणि ऑस्ट्रियादरम्यान यु*द्ध सुरु होते. कदाचित याच काळात फ्रान्सच्या सैन्याला बेल्जियमच्या निर्वासित जनतेकडे हा पदार्थ बघितला असावा. असं असलं तरी फ्रेंच फ्राईज हे नाव कुठून आलं हे मात्र अजूनही एक कोडंच आहे.

आज फ्रेंच फ्राईजचा प्रसार अमेरिका आणि युरोपातून संपूर्ण जगभरात झाला आहे. इंग्रजी बोलल्या जाणाऱ्या देशांत तर बटाट्याच्या आकारावरून त्याचे नामकरण करण्यात आले आहे. जर बटाटा कापलेला असेल तर फ्राईज म्हटले जाते. जर मोठा, पातळ असेल तर त्याला चिप्स म्हटले जाते.

उत्तर अमेरिकेत याला फ्रेंच फ्राईज म्हणतात. खाण्याच्या प्रकारानुसार याचे वेगेवेगळे नामकरण करण्यात आले आहे. प्रत्येक देशात फ्रेंच फ्राईजचे वेगवेगळ्या प्रकारे सेवन करण्यात येते.  फ्रान्समध्ये याला मीठाबरोबर खाल्ले जाते. अमेरिकेत केचअप आणि ब्रिटनमध्ये मायोनीजबरोबर याचे सेवन केले जाते. एकोणिसाव्या शतकात तर आयरिश लोक मटणाबरोबर फ्रेंच फ्राईजचे सेवन करायचे.

फ्रेंच फ्राईज आता भारतात देखील लोकप्रिय होत आहेत. पुढच्या वेळी “MacD”मध्ये जाऊन फ्रेंच फ्राईजची ऑर्डर देताना हा रंजक इतिहास नक्की आठवा!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या आहेत जगातील सर्वात प्राचीन भाषा!

Next Post

मध्यमवर्गीय स्त्रियांना आत्मनिर्भर बनवणाऱ्या स्कुटरची गोष्ट

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

मध्यमवर्गीय स्त्रियांना आत्मनिर्भर बनवणाऱ्या स्कुटरची गोष्ट

ग्लोबल वार्मिंगचा सामना करण्यासाठी या देशातील लोकांनी बनवले शेवाळापासून छप्पर

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.