The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पेट्रोल-डिझेलला फाट्यावर मारून फोर्डने अणुऊर्जेवर चालणारी कार बनवली होती..!

by द पोस्टमन टीम
8 May 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


इंधनाच्या वाढत्या किंमती आणि पेट्रोल डीझेलमुळे होणारे प्रदूषण यावर उपाय म्हणून सध्या CNG गाड्या आणि इलेक्ट्रिक गाड्यांकडे आपण पर्याय म्हणून पाहत आहोत. सध्या CNG कार्स आपल्याकडे बऱ्यापैकी कॉमन झालेल्या दिसतात आणि इलेक्ट्रिक गाड्या हळूहळू आपला जम बसवत आहेत.

विचार करा, आपल्याकडे सध्या इलेक्ट्रिक गाड्याही अजून तेवढ्या प्रमाणात वापरात नाहीत तर फोर्डने १९५० साली चक्क अणुउर्जेवर चालणारी गाडी बनवली होती.

हो तुम्ही बरोबर वाचलं अणुउर्जेवर चालणारी गाडी. फोर्डच्या त्या कारचं नाव होतं ‘न्यूक्लिऑन’

न्यूक्लिऑनमधे आत्ताच्या कार्ससारखं कमबस्चन इंजिन नव्हतं. ती एका छोट्याशा न्यूक्लिअर रीॲक्टरवर चालत होती. त्यावेळी जगासाठी न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी नवीन होती. आणि शास्त्रज्ञांना असा विश्वास होता की लवकरच अणु इंधन हेच मानवासाठी प्राथमिक इंधनाची गरज भागवेल. त्यासाठी लागणाऱ्या अणुभट्ट्यांचा आकार हळूहळू कमी करता येईल आणि इंधन म्हणून वापरात असणाऱ्या गॅसोलीनची जागा अणुइंधन घेईल.

तसेच त्यावेळी लष्करी पाणबुड्यांमध्ये न्यूक्लियर रिॲक्टरचा वापर केला जात होता आणि त्यासाठी युरेनियम हे इंधन म्हणून वापरले जात होते. त्यामुळेच कारसाठी न्यूक्लिअर रिॲक्टरचा प्रयोग करण्यात आला. तो न्यूक्लिअर रिॲक्टर कारच्या पाठीमागच्या बाजूला फिट केला होता. वाटेल तेव्हा तो कार पासून वेगळा करता येत होता. त्यामुळे रिॲक्टरमधलं इंधन संपलं की कारला त्याच्यापासून वेगळं करणं सहज शक्य होतं.



ती कार एका बिगर सीटवाल्या ट्रकसारखी दिसत होती. आणि प्रवाशांना अगदीच समोरच्या बाजूला बसावं लागत होतं कारण पाठीमागे रिॲक्टर होता. त्याच्यापासून कायम सावध राहावं लागत होतं . त्या रिॲक्टरच्या सहाय्याने पाण्याची वाफ केली जात असे आणि त्यावर टर्बाइन फिरवली जायची. फिरत्या टर्बाइन्समुळे वीज तयार होऊन तीच कारसाठी इंधन म्हणून वापरली जात होती. 

कारच्या इंजिनियर्सनी लावलेल्या अंदाजानुसार एकदा इंधन भरल्यानंतर ही कार पाच हजार मैल (अंदाजे ८०४६ किलोमीटर) अंतर कापू शकत होती. पण या क्रांतिकारी कल्पनेमागे बऱ्याच अडचणी होत्या. न्यूक्लिअर रिॲक्टरला असणाऱ्या शील्डमुळे कारचे वजन प्रचंड वाढले होते शिवाय इंधनासाठी छोटासा का होईना पण अणुस्फो*ट घडवावा लागत होता. रेडिओ ॲक्टिव्हिटीज् प्रक्रिये दरम्यान निघणाऱ्या किरणांचा प्रवाशांना धोका होता. या गोष्टींमुळे ही कार व्यावहारिकदृष्ट्या योग्य आणि सुरक्षित वाटत नव्हती.

इंधन संपल्यानंतर पुन्हा भरण्यासाठीसुद्धा अडचण येणारच होती कारण त्यासाठी शहरात जागोजागी रेडीओॲक्टिव्ह एलिमेंट – युरेनियम विक्रीचे स्टेशन्स उभारावे लागणार होते. आणि त्या स्टेशनला जबाबदारीपूर्वक हाताळणारे कर्मचारीसुद्धा लागणार होते कारण जगाने अ*णुबॉ*म्बचा भयंकर वि*ध्वंस आधी एकदा अनुभवला होता. त्यात होणाऱ्या चुकांना माफी नव्हतीच.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

कारचा अपघात झाल्यानंतरही रेडिओॲक्टिव्ह पदार्थ बाहेर पडण्याचा धोका होता.  ज्याचे अनेक दुष्परिणाम आपल्या सर्वांना ज्ञात आहेत. या अशा अनेक कारणांमुळे फोर्ड मोटर कंपनीने ही अणु इंधनावरील कार कधीही पूर्णपणे विकसित केली नाही. ⅜ इतकं पूर्ण झालेलं मॉडेल त्यांनी बनवलं होतं ते सध्या मिशिगन येथील हेन्री फोर्ड म्युझियममधे पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

त्यावेळी न्यूक्लिऑन कार बरीच प्रसिद्ध झाली होती. त्या कारच्या थीमवर आधारित, फॉल आऊट नावाचा एक व्हिडिओ गेमसुद्धा बनवला गेला होता. त्या गेममधल्या कारला ॲटोमिक विएट नावाचं इंजिन दाखवण्यात आलं होतं. या गेमचं डिझाईन काहीसं उपरोधिक करण्यात आलं होतं, ज्यामधे कारचा ॲक्सीडेंट झाल्यानंतर मोठमोठे मशरूम क्लाउड्स दाखवले जायचे. म्हणजेच अशी कार खरंच अस्तित्वात आली तर जपानमध्ये अ*णुबॉ*म्बने जसा वि*ध्वंस केला तसाच वि*ध्वंस रस्त्यांवर दिसू शकतो असा संदेश त्यातून दिला जात होता.

पण न्यूक्लिअर कारचा यशस्वी प्रयोग करणारी फोर्ड ही एकमेव कंपनी नव्हती. १९५८ साली फ्रांसमधल्या दोन कंपन्यांनी न्यूक्लियर कार बनविण्याचा प्रयत्न केला होता. त्यातली एक म्हणजे अलबर सिमेट्री आणि दुसरी म्हणजे सीमका फलगर . या दोन्ही कंपन्या न्यूक्लिअर कार बनविण्यात अपयशी ठरल्या. Studebaker-Packard या कंपनीने या आधी ऑस्ट्रेल नावाची सायफाय कन्स्पेप्ट कार मांडली होती. पण हे कामसुद्धा प्रत्यक्षात उतरण्यापासून दूरच राहिले. शिवाय त्यांनी मांडलेलं रेडिएशन शील्डसुद्धा कधीच अस्तित्वात आलं नाही.

१९६२ साली फोर्डने पुन्हा एकदा प्रयत्न केला, त्यांनी sittelite XXL नावाची कार बनवली. या कारमध्ये अत्याधुनिक सुविधा होत्या ज्या आपल्याला आजच्या कारमधे पाहायला मिळतात. त्यात इंटरचेंजेबल बॉडीज, इंटरचेंजेबल पॉवर युनिट्स, इंटरॅक्टिव्ह कम्प्युटर नेव्हिगेशन सिस्टीम, ऑटो इन्फॉर्मेशन सिस्टीम यासारख्या सुविधा होत्या. शिवाय या कारला सहा चाकं होती. त्यापैकी पुढची चार चाकं स्टेरिंगच्या साह्याने नियंत्रित करता येत होती आणि बाकी दोन चाकं इतर कारप्रमाणे मागच्या बाजूला होती.

ही कार आत्तापर्यंतची सर्वांत स्टायलिश कार असली तरीही या कारलासुद्धा न्यूक्लिऑनसारख्या अडचणी येऊ लागल्या. फक्त न्यूक्लिऑनच्या मोठ्या रिॲक्टरच्या जागी, sittelite XXL मध्ये फोर्डने खूप छोटा रिॲक्टर आणला होता एवढाच काय तो फरक! शिवाय उत्सर्जित होणाऱ्या रेडिएशनचा दोष दूर करण्यासाठी मोठे शील्ड लागणार नाही असाही फोर्डचा ओव्हर कॉन्फिडन्स होता! असे असले तरीही त्या काळात एवढी मॉडर्न कार बनवणे, ही एक आव्हानात्मक बाब फोर्डने पेलली होती. आत्तापर्यंतची सर्वात कुलेस्ट कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या sittelite XXL चे आजही लाखो चाहते आहेत!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

ही संस्था ‘मासिक पाळी’विषयी प्रबोधन अभियान राबवत आहे, त्यात तुम्हीही सहभागी होऊ शकता..!

Next Post

एका बेकरीत आग लागली आणि थोड्याच वेळात लंडनची अक्षरशः राख झाली

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

एका बेकरीत आग लागली आणि थोड्याच वेळात लंडनची अक्षरशः राख झाली

हा आहे चंद्रावर दफन केलेला एकमेव माणूस..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.