The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हा तस्कर स्वतःच्या देशापेक्षा चार पट श्रीमंत होता..!

by द पोस्टमन टीम
15 May 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


को*केन या अत्यंत हानिकारक अंमली पदार्थाचा अथवा ड्र*गचा व्यापार आज जगभरात सर्रास चालतो. हा व्यापार कितीही बेकायदेशीर पद्धतीने सुरु असला आणि यामुळे कितीही मोठं नुकसान होत असलं तरी याचे रॅकेट मोठ्या प्रमाणावर जगभर पसरले असून को*केनचा व्यापार करणारे अनेक लोक यातून अतिश्रीमंत झाले आहेत.

कोलंबिया देशात असणाऱ्या प्रख्यात ड्र*ग लॉर्ड म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पाब्लो एस्कोबारने देखील यातून अशीच गडगंज संपत्ती जमवली होती.

तो इतका श्रीमंत होता की त्याची कमाई त्याचा देश – कोलंबियाच्या शासनापेक्षा चार पट होती. त्याचा मृत्यूनंतर त्याचा पैसा कुजून सडला होता, इतक्या निरनिराळ्या ठिकणी त्याने तो लपवून ठेवला होता.

पाब्लो एस्कोबारप्रमाणे अजून एक असाच ड्रग लॉर्ड म्हणवून घेणारा माफिया आहे, ज्याने या बेकायदेशीर व्यवसायातून इतकी संपत्ती  कमवली की त्याला ‘कोकेनच्या धंद्यातील बिल गेट्स’ अशी पदवी मिळाली होती.

त्याच्या आयुष्यावर नेटफ्लिक्स मेक्सिकोने एक वेबसिरीज पण तयार केली आहे.



या व्यक्तीला मेक्सिकन भाषेत ‘एक पाद्रीनो’ अर्थात गॉडफादर देखील म्हटले जाते. अशा या क्रू*रकर्म्याचे नाव फेलिक्स गॅलार्डो आहे. सध्या तो मेक्सिकोच्या जेलमध्ये एका अमेरिकन एजंटच्या ह*त्येची शिक्षा भोगत आहे.

मिग्युएल एंजल फेलिक्स गॅलार्डो असे त्याचे पूर्ण नाव असून त्याचा जन्म मेक्सिकोच्या सिनालोआ येथे १९४६ साली झाला. वयाच्या सतराव्या वर्षी तो पोलीस दलात भरती झाला.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

गॅलार्डो ज्या विभागात काम करत होता तो विभाग आपल्या भ्रष्टाचारासाठी आणि लाचलुचपतीसाठी प्रसिद्ध होता.

सिनालोआच्या राज्यपालाचा बॉडीगार्ड म्हणून गॅलार्डो आधी काम करत होता. त्याचवेळी त्याची भेट अव्हिलेस पेरेजशी झाली, जो त्याच्यासोबत राज्यपालाच्या सुरक्षाव्यवस्थेत तैनात शिपाई होता. पण अव्हिलेसची एक अजून बाजू होती, तो एक ड्र*ग डीलर होता.

त्याने गॅलार्डोला अंमली पदार्थांच्या दुनियेत आणले. त्याने त्याला हे*रॉईन आणि गां*जाचा व्यापार करायला शिकवले. १९७८ साली अव्हिलेस हा पोलिसांसोबतच्या गोळीबारात मृत्युमुखी पडला.

मग गॅलार्डोने आपले प्रभुत्व प्रस्थापित करायला सुरुवात केली आणि अंमली पदार्थांच्या तस्करीची एक सिंगल चेन निर्माण केली, ज्यातून त्याने स्वतःच्या टोळीची निर्मिती केली आणि त्या टोळीला नाव दिले ‘गुंडालजारा कार्टेल’.

आता तो त्या कार्टेलच्या स्थापनेमुळे मेक्सिकोच्या ड्रग इंडस्ट्रीचा तो बादशहा बनला होता.

त्याने स्वतःला गॉडफादर म्हणवून घ्यायला सुरुवात केली. १९८० साली राफेल क्विंटरो आणि एर्नेस्टो कॅरिलो यांच्या मदतीने त्याने मेक्सिकोच्या बाजारात आपली एकाधिकारशाही प्रस्थापित केली होती. त्याने १३३० एकरवर गां*जाचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आणि त्यातून त्याने ८ अब्ज डॉलरची कमाई केली.

आपला धंदा मोठा होतो आहे हे बघून त्याने त्याचा अजून विस्तार करायला सुरुवात केली, त्याने कोलंबियाची मेडलिन कार्टेल आणि काली कार्टेल यांच्याशी संबंध प्रस्थापित केले. याच काळात त्याने पाब्लो एस्कोबार याची भेट घेतल्याचं देखील म्हटलं जातं.

गॅलार्डोच्या टोळीला मेक्सिकोच्या गुप्तचर संस्थेचे संरक्षण होते, त्यामुळे कुठलीच तो तमा बाळगत नव्हता.

गॅलार्डोने सरकारमधील बहुतेक लोकांना पैसे देऊन गप्प केलं होतं. पण त्याच्या हातून एक चूक घडली आणि ती चूक त्याला प्रचंड महागात पडली.

७ फेब्रुवारी १९८५ रोजी मेक्सिकोच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी किकी कामरेना नावाच्या अमेरिकेच्या ड्र*ग इन्फोर्समेंट एजन्सीच्या अधिकऱ्याला अटक केली, ज्याने गुंडालजारा कार्टेलमध्ये घुसून काही गुप्त माहिती मिळवल्याची खबर त्यांच्या कानी येऊन पडली होती.

त्याच्यामुळे रँचो बफेलो नावाचा कार्टेलचा एक महत्त्वाचा म्होरक्या पकडला गेला होता.

आर्मी इंटेलिजन्सला कामरेनाने माहिती दिली होती, त्यामुळे तो पकडला गेला होता. कामरेनाला खूप हाल हाल करून मारण्यात आलं. त्याचा शरीराचे तुकडे करण्यात आले आणि त्याचा डोक्यात ड्रिल मशीन घुसवण्यात आली. यामुळे हे ड्र*ग कार्टेल जगाच्या नजरेत आलं.

१९८८ साली कामरेनाचा चौकशीचं एक ऑडियो रेकॉर्डिंग बाहेर पडलं, यात कार्टेलवाले अत्यंत हिं*स्त्र पशूंप्रमाणे त्याची चौकशी करत होते आणि त्याचे हाल करत होते असं स्पष्ट ऐकू येत होते. कामरेनाच्या आक्रोशाने अमेरिका हादरली.

अमेरिकेची संपूर्ण ड्र*ग इन्फोर्समेंट एजन्सी मेक्सिकोत उतरून त्यांनी गॅलार्डोच्या कार्टेलविरोधात आघाडी उघडली.

सर्वांत आधी जे ह*त्येला जबाबदार आहेत, त्यांचा शोध घेण्यात आला. एजन्सीच्या इतिहासातील सर्वांत मोठं ऑपरेशन हाती घेण्यात आलं आणि लेएन्डा असं त्या ऑपरेशनचं नामकरण करण्यात आलं.

कार्टेलमधील अनेक खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीतनुसार गॅलार्डोने त्याच्या ह*त्येचे आदेश दिले, हे लक्षात घेऊन एजन्सी त्याच्या पाठीमागे लागली. पण खरे आदेश क्विंटेरोने दिले होते.

पुढे एजन्सीला या सगळ्या गोष्टी कळत गेल्या. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेला याची आधीच माहिती होती, पण त्यांनी ती पुरवली नाही, याचा रोष देखील एजन्सीने व्यक्त केला.

एजन्सीने क्विंटेरो आणि कॅरिलो या दोघांना अटक केली. पण आपल्या राजकीय नेत्यांशी असलेल्या संबंधांमुळे गॅलार्ड १९८९ सालापर्यंत स्वतःचा बचाव करू शकला होता. पण मेक्सिकन एजन्सीने त्याला त्याच्या घरातून अटक केली.

किकी कामरेनाच्या ह*त्येसाठी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. पुढे एकदा त्याने आपल्या स्टेटमेंटमध्ये असं नमूद देखील केलं होतं की कामरेनाची ह*त्या त्याने केली नसून त्याला एका अमेरिकन सैनिकाच्या मृत्युचं दुःख आहे.

गलार्डो जेलध्ये गेला तरी शांत बसला नाही, त्याने जेलमधून आपलं ड्र*ग्जचे साम्राज्य सुरु ठेवले.

पण तो बाहेर नसल्यामुळे इतर कार्टेलचं फावलं आणि एल चापोच्या उदयानंतर त्याचा बिझनेस संपत गेला आणि त्याची एकाधिकारशाही संपुष्टात आली.

तब्बल ७० वर्षे मेक्सिको आणि संपूर्ण उत्तर अमेरिकेच्या गुन्हेगारी विश्वावर घोंघावणारं फेलिक्स गॅलार्डो नावाचे घोंघावणारं वादळ शांत झालं असून आजही तो मेक्सिकोच्या जेलमध्ये आपलं उर्वरीत आयुष्य घालवतो आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: Anti NarcoticsFelix GallardoMexican Narcotics NetworkNarcoticsNarcotics Network
ShareTweet
Previous Post

अमेरिकन गुप्तहेरांच्या चलाख ‘गनिमी काव्याने’ ब्रिटीशांचा पराभव केला होता

Next Post

स्त्रिया जेव्हा घराबाहेरही पडत नव्हत्या तेव्हा तिने विमान उडवण्याची स्पर्धा गाजवली होती

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

स्त्रिया जेव्हा घराबाहेरही पडत नव्हत्या तेव्हा तिने विमान उडवण्याची स्पर्धा गाजवली होती

या ब्रिटिश संशोधकामुळे भारताचा अश्मयुगीन इतिहास जगासमोर आला आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.