The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली बॉलीवूडने आजवर इतिहासाची बरीच वाट लावलेली आहे

by द पोस्टमन टीम
28 March 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


भारताचा इतिहास अतिशय गौरवशाली आहे. अनेक यो*द्ध्यांच्या शौर्यगाथांनी भरलेला आहे. ज्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान असलाच पाहिजे अशी जाज्वल्य ऐतिहासिक सत्ये आपल्या भारताच्या भूमीत आज देखील जिवंत आहेत. अनेक वेळा हा इतिहास पुस्तकांच्या रूपाने, दूरदर्शनवरील मालिकांच्या रूपाने, हिंदी चित्रपटांच्या रूपाने आपल्या समोर येतो.

यात जिथे पुस्तकांचा विषय येतो तिथे ऐतिहासिक पुस्तकांचा जो लेखक असतो त्याने बरेच परिश्रम घेऊन, प्रवास करून तसेच अनेक संदर्भ शोधून आपले पुस्तक परिपूर्ण बनवण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यामुळे ऐतिहासिक कादंबऱ्या असतील, पुस्तके असतील तेव्हा त्या बऱ्यापैकी ऐतिहासिक तथ्यांवर आधारलेल्या असतात.

पण जिथे गोष्ट बॉलीवूडची येते तिथे मात्र ऐतिहासिक चित्रपट हे Major Failure असतात. करोडो रुपये खर्च करून बॉलीवूड ऐतिहासिक चित्रपट काढतं पण या चित्रपटांची Research & Development Team कुठे माती खायला गेलेली असते ठाउक नाही पण ऐतिहासिक तथ्यांपासून कोसो दूर असलेले अनेक प्रसंग चित्रपटात घुसडले जातात.

नव-नवीन काल्पनिक पात्रे भरती केली जातात, नाचगाणी घुसडली जातात. प्रेमकहाण्या रंगवून सांगितल्या जातात आणि यामध्ये ज्या शौर्यगाथा आहेत त्या मागे पडतात.



अनेक वेळा अशा चित्रपटांच्या माध्यमातून खोटा इतिहास पसरवला जातो आणि नायकापेक्षा खलनायक अधिक उठावदार पद्धतीने रंगवला जातो.

उदाहरणादाखल शाहरुख खानचा अशोका चित्रपट आठवा. त्याच्यामध्ये करीना कपूरचे जे पात्र आहे कौरवाकी नावाचे. चित्रपटात ही कौरवाकी कलिंग देशाची राजकन्या दाखवली गेली आहे, जिच्या प्रेमात सम्राट अशोक पडतो. खरे ऐतिहासिक सत्य मात्र फार वेगळे आहे. कौरवाकी ही एक बौद्ध कोळ्याची मुलगी होती जिला सम्राट अशोकाने पळवून आणलेले होते.

thepostman

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

बौद्ध धर्म स्वीकारण्यापूर्वी सम्राट अशोक हा अत्यंत क्रू*र राज्यकर्ता म्हणून ओळखला जात होता, तो यु*द्धखोर होता, निर्दयी होता आणि जगावर राज्य करण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती. अशोकाने आपल्या यु*द्धकैद्यांना छळण्यासाठी एका खास तळघराची देखील निर्मिती केली होती. त्याला सम्राट अशोकाचे नरक स्थान असे म्हटले जायचे. देशोदेशीच्या यु*द्धात हरून कैदी झालेल्या लोकांना तेथे अत्यंत हीन वागणूक मिळत असे.

जसा चित्रपटात दाखवलेला आहे तसा अशोका कधीही एक प्रेम करणारा किंवा झाडांच्या मागे नायिकेच्या मागे हिंडणारा माणूस नव्हता.

तुम्हाला अजून एक दूरदर्शनवरील मालिका आठवत असेल. टिपू सुलतान नावाची. टिपू सुलतानला त्या मालिकेमध्ये एका नायकाच्या रुपात दाखवण्यात आलेले होते पण प्रत्यक्षात टिपू सुलतान अत्यंत क्रू*र, निर्दयी आणि हिंदुद्वेष्टा शासक होता. टिपू सुलतानने त्याच्या काळात अनेक हिंदू मंदिरे उ*ध्वस्त केली होती.

thepostman

कर्नाटकमधील मलबार भागात टिपूच्या कौर्याचा दरारा गझनीच्या मोहम्मद, नादिरशहा इतकच काय अल्लाउद्दिन खिलजीपेक्षा जास्त होता. इंग्रजांच्या काळातील कर्नल फुल्ट्रन जो मंगलोरला त्यावेळी नेमणुकीस होता त्याने त्याच्या अहवालात टिपूच्या हकीकती मांडलेल्या आहेत.

टिपूने पालघर किल्ला जिंकून घेतला त्यावेळी तिथल्या अनेक निर्दोष ब्राम्हणांची क*त्तल केली. त्यांची डोकी भाल्यावर लावून किल्ल्यावरून आणि गावातून फिरवली, जेणेकरून स्थानिक लोकांमध्ये त्यांची द*हश*त बसावी.

William Logan आणि  Fra Bartolomeo या इतिहासकारांच्या मते टिपू अत्यंत क्रू*र आणि निर्दयी मुस्लिम शासक होता ज्याचे जीवितकार्य हिंदुना संपवणे आणि संपूर्ण देशात मुस्लिम अंमल गाजवणे हे होते.

जर बाजीराव मस्तानीचं उदाहरण घेतलं तर संजय लीला भन्सालीने अक्षरश: इतिहास तोडून मोडून दाखवला आहे. इतिहास जर पहिला तर मस्तानी बाईंना बाजीराव पेशव्यांच्या घरच्या लोकांनी कधीही स्वीकारले नाही. त्यांना काशीबाईप्रमाणे ‘स्टेटस’ कधीही मिळाले नाही. चित्रपटात मस्तानीचा बाजीरावांच्या कुटुंबाकडून प्रचंड छळ झालेला दाखवण्यात आलेला आहे. राजकारण करून मस्तानीला ठार मारलं हे धडधडीत खोटं चित्रपटात दाखवलं गेलं आणि लोकांनी ते मान्य देखील केलं.

thepostman

प्रत्यक्षात मस्तानीचे निधन बाजीराव यांच्या निधनानंतर काही महिन्यांनी आजारपणामुळे झाले. मस्तानी आणि बाजीरावांचे अपत्य समशेर बहाद्दूर याला काशीबाई यांनी सांभाळले. तो मोठा झाल्यानंतर त्याला स्वतंत्र वाटा देखील दिला. थोरल्या बाजीराव पेशव्यांनी पेशव्यांच्या आठवणीत आपले प्राण सोडले नाहीत. बाजीराव यु*द्ध मोहिमेवर असताना आजारी पडून गेले. जे चित्रपटामध्ये दाखवले गेलेले आहे ते अत्यंत चुकीचे आहे.

तुम्ही जर जोधा अकबर नावाची मालिका जी पूर्वी ‘झी टीव्ही’वर येत असे ती पाहिली असेल तर ती मालिका म्हणजे इतिहासाच्या दृष्टीने निव्वळ पानचटपणा होता. संपूर्ण मालिका ही काल्पनिक होती मात्र ऐतिहासिक पात्रे घेऊन बनवली असल्याचे फोल दावे करत होती.

जर ऐतिहासिक सत्य पाहिलं तर अकबराला जोधाबाई नावाची एकही पत्नी नव्हती. त्याने अनेक लग्ने केलेली होती. त्याच्या आवडत्या बेगमांमध्ये बेगम रुकीया सुलताना हिचे नाव येते जी त्याच्या नात्यातली होती.

अकबराने एका राजपूत राजकुमारीबरोबर विवाह केला होता जिचे नाव हिरा कुवारी असल्याचे बोलले जाते. या हिराबाईच्या पोटी राजपुत्र सलीम जन्माला आला. या सलीमचा विवाह हिराबाईने आपल्यासारख्याच एका राजपूत स्त्रीबरोबर करून दिला तिचे नाव जोधा असल्याचे इतिहास सांगतो. थोडक्यात जोधा ही अकबराची बायको नसून सून होती.

thepostman

अकबर इतर मुस्लीम राज्यकर्त्यांप्रमाणेच अत्यंत क्रू*र मुस्लीम शासक होता. हिंदूंचा विरोधी होता. इस्लाम धर्मात ४ लग्ने करायला परवानगी असते अकबराने मुताह निकाहप्रमाणे जवळपास ३०० लग्ने केलेली होती. अनेक राजपूत आणि हिंदू राजांच्या आया, बहिणी, बायका या त्याच्या जनानखान्यामध्ये भरती झालेल्या होत्या. इतिहासकार अबू फजलने याचे वर्णन स्वत:च्या बखरीमध्ये केलेले आहे. या जनानखान्यामध्ये जोधाबाईचा देखील सामावेश होता.

भंसालीच्या पद्मावतमध्ये देखील पद्मावती ही श्रीलंकेची राजकुमारी होती आणि रतनसिंग तिला चित्तोडला घेवून आला याचा इतिहासामध्ये कसलाही पुरावा नाही आणि आधार नाही. पद्मावती राजस्थानमध्येच जन्माला आलेली होती मात्र चित्रपटात ही गोष्ट काल्पनिक श्रीलंकेची गोष्ट जोडून सांगितली गेली आहे.

thepostman

ऐतिहासिक तथ्ये देखील खूप वेळा मोडतोड करून पसरवली जातात. उदा. आग्रा किल्ला अकबराने बांधला असे आपण ऐकतो प्रत्यक्षात हा किल्ला बादलसिंग सिकवार या हिंदू राजाने बांधलेला आहे. दिल्लीच्या लाल किल्ल्याचे बांधकाम मुघलांनी केले असे म्हणतात त्यांच्या आधीपासून लाल किल्ला अस्तित्वात होता. अनंगपाल तोमर या हिंदू राजाने तो बांधलेला होता.

यावरून एकच सांगता येईल. आपला इतिहास शौर्याने भरलेला आहे आणि बॉलीवूड फक्त खोट्या कहाण्यांनी भरलेले आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: bollywood
ShareTweet
Previous Post

आफ्रिकेतील या छोट्याश्या तळ्याने एकाच रात्रीत तब्बल दोन हजार लोकांचा जीव घेतला होता

Next Post

साबू दस्तगीर – ‘हॉलीवूड वाॅक ऑफ फेम’मध्ये नाव कोरणारा एलिफंट बॉय

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

साबू दस्तगीर - 'हॉलीवूड वाॅक ऑफ फेम'मध्ये नाव कोरणारा एलिफंट बॉय

दोन भावांच्या टोकाच्या वादातून 'आदिदास' आणि 'पुमा' या जगप्रसिद्ध ब्रँड्सचा जन्म झालाय!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.