The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी याने लाकडी खोक्यातून स्वतःला पार्सल केलं होतं

by द पोस्टमन टीम
22 May 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


गुलामगिरीतून मुक्तीसाठी या व्यक्तीनं स्वत:ला एका लाकडी खोक्यात बंद करून स्वत:लाचा पार्सल केलं आणि गुलामगिरीतून स्वत:ची सुटका करून घेतली. कालांतराने एक कलाकार म्हणून ही व्यक्ती नावारुपाला आली. या अचाट धाडसाचं आणि भन्नाट व्यक्तीचं नाव आहे हेन्री ब्राऊन.

गुलामगिरीतून सुटका करून घेणं सोपं नव्हतंच. अनेकांची आयुष्यं गुलाम म्हणून राबण्यात गेली. अनेकांनी अयशस्वी प्रयत्न केले मात्र या जोखडातून त्यांची सुटका झाली नाही.

हेन्री ब्राऊन यानं यातून सुटका करवून घेण्याचा एक अचाट मार्ग निवडला. त्यानं चक्क स्वत:लाच लाकडी खोक्यातून पार्सल करवलं आणि त्याचं नाव हेन्री बॉक्स ब्राऊन असं पडलं.

हेन्री ब्राऊनचा जन्म १८१५ साली व्हर्जिनियाच्या लुई काऊंटीत झाला होता. त्याच्या जन्माची नेमकी तारीख अज्ञात आहे कारण गुलामांचे जन्मदिवस कोणी लक्षात ठेवत नाही. पंधरा वर्षांच्या हेन्रीनं एका तंबाखूच्या कारखान्यात काम करायला सुरवात केली. त्यासाठी त्याला रिचमंड येथे पाठविण्यात आलं. त्याचं त्याच्यासोबत काम करणार्‍या नॅन्सी या दासीसोबत लग्न झालं होतं मत्र त्याच्या या लग्नाला कायदेशीर मान्यता मिळालेली नव्हती. या लग्नापासून त्यांना तीन अपत्यंही झाली.

तंबाखूच्या कारखान्यात काम करत असतानाच त्यानं एक छोटं घरही भाड्यानं घेतलं आणि आपली पत्नी आणि तीन मुलांसह तो तिथे राहू लागला. हेन्रीचा मालक बराच कनवाळू होता. आपल्या गुलामांकडून काम करवून घेत असला तरी त्यांना किमान गुरासारखी वागणूक देत नसे मात्र त्याची पत्नी जिथे काम करायची तो मालक इतर मालकांसारखाच होता. तो गुलामांना किड्या-मुंगीसारखं वागवत असे. त्यांच्याकडून अमानुषपणे काम तर करवून घेतच असे शिवाय चार पैसे जास्त मिळाले की विकूनही टाकत असे.



आपल्या पत्नीला त्यानं विऊ नये यासाठी हेन्री त्याच्या वारंवार विनंत्या करत असे, पाया पडत असे आणि तो सांगेल ते कष्टही करत असे. इतकं असूनही या मालकानं हेन्रीला धोका दिला आणि त्याच्या चौथ्यांदा गर्भवती असणार्‍या पत्नीला तिच्या तीनही मुलांसहित त्यानं विकलं. 

१८४८ साली उत्तर करोलिनाच्या एका शेतकर्‍याला या चौघांना विकलं गेलं. पत्नी आणि मुलं दूर जाताना बघून हेन्री मनातून तळमळत राहिला. त्या क्षणाला तो काहीही करू शकला नाही तरीही त्याला गुलामगिरीतून सुटण्याची प्रेरणा या घटनेमुळे मिळाली.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

काहीही झालं तरी या पारतंत्र्यातून सुटका करून घ्यायचीच या विचारानं हेन्री रात्ररात्र तळमळू लागला. यातून सुटका इतकी सोपी नव्हती तरीही तो सतत सुटकेच्या विविध पर्यायांचा विचार करु लागला. स्थानिक चर्चचे सक्रिय सदस्य असणार्‍या जेम्स सीजर ॲन्थनी स्मिथ आणि श्वेतवर्णीय सॅम्युएल स्मिथ यांनी त्याला त्याच्या या पलायनात मदत करण्याचं अश्वासन दिलं. हे तिघेही विविध पर्यायांवर विचार करत असतानाच हेन्रीला एक अचाट साहसाची कल्पना सुचली.

फ़िलाडेल्फ़ियामधे गुलामगिरी संपुष्टात आलेली होती. त्यामुळे रिचमंडहून फ़िलाडेल्फ़ियाला पलायन करण्याची ही योजना त्यानं या दोघांना सांगितली.

हे पलायन तो लाकडी खोक्यातून आणि मालवाहू जहाजातून करणार होता. जेणेकरून कोणालाही त्याच्या पलायनाचा पत्ताच लागणार नव्हता. 

कल्पना धाडसी असली तरीही ती वास्तवात आणणं आणखीन धाडसाचं असणार होतं. हेन्रीच्या जिवालाही धोका होताच. मात्र हेन्रीचं मन सर्वप्रकारचे धोके निभावून न्यायला तयार झालं होतं.

योजनेनुसार सॅम्युएल स्मिथनं २३ मार्च १८४९ या दिवशी एडम्स एक्सप्रेस या कंपनीकडून एक मोठा लाकडी खोका ज्यात हेन्री बसला होता तो पार्सल केला. या खोक्यावर सुके सामान असं लेबल चिकटवलं गेलं. खोक्याला वरून कापड गुंडाळलं होतं जेणेकरून आत हेन्री बसला आहे दिसू नये, केवळ हवा आणि एखादं बिस्किट येण्यासाठी एक छोटी फ़ट ठेवण्यात आली होती. तब्बल २७ तासांचा प्रवास करून हा खोका फ़िलाडेल्फ़ियातल्या एंटी स्लेवरी सोसायटीच्या मुख्यालयात पोहोचला.

ब्राऊनच्या या यशस्वी पलायनानंतर सॅम्युएलनं ८ मे १८४९ या दिवशी आणखीन काही जणांना अशाच पध्दतीनं रिचमंड ते फ़िलाडेल्फ़िया पलायन करविण्याची योजना आखली होती. दुर्दैवानं त्याच्या या योजनेचा पत्ता लागला आणि त्याला अटक झाली.

ब्राऊनच्या पलायनाला जाहीर प्रसिध्दी देण्यातला धोका ओळखून काही उन्मूलनवादी नेत्यांनी, ज्यामधे फ़्रेडरिक डग्लस यांचाही समावेश होता, त्यांनी या पलायन मोहिमेला गुप्त ठेवण्याविषयी मत दिलं होतं. मात्र काही लोकांच्या मते ब्राऊनचं हे साहसी पलायन इतर गुलामांनाही गुलामगिरीतून सुटका करून घेण्याची प्रेरणा ठरू शकते. त्यामुळे ब्राऊनची कहाणी प्रसिध्द व्हायला हवी असे अनेकांना वाटत होते. अखेरीस हा निर्णय ब्राऊनवरच सोडण्यात आला आणि ब्राऊननं आपली ही पलायनाची साहसी कथा लोकांसमोर आणण्याचा निर्णय घेतला.

बॉस्टन येथील न्यू इंग्लंड ॲण्टी स्लेवरी सोसायटी कन्वेंशनच्या समोर ब्राऊन आला आणि आपली कहाणी जगाला सांगितली.

यानंतर त्यानं आपली गोष्ट सांगण्यासाठी दौरेच आखले. बोस्टनचे प्रकाशक चार्ल्स स्टर्न यांनी ही कथा प्रकाशितही केली. ही कथा अमेरिकन गुलामगिरीच्या कथांपैकी एक महत्त्वाची कथा बनली. यानंतर ब्राऊननं गुलामांसाठी काम करणार्‍या संस्थेसाठी जी चित्रफीत बनविली जात होती तिच्यासाठी एका स्टेज शोची निर्मिती केली. १८५० साली बोस्टन येथे ’मिरर ऑफ़ स्लेवरी’ या शोची निर्मिती केली गेली. यानंतर पलायनाच्या कायद्यांर्गत त्यांनी आपल्या गटासह इंग्लंडला स्थलांतर केलं. येथे त्याचं आयुष्य सुरळीत सुरू झालं. त्याने रितसर लग्न केलं, मुलं झाली मात्र पहिल्या पत्नीचा विचार त्याला गप्प बसू देत नव्हता. त्याने आपली पहिली पत्नी आणि मुलांचा शोध लावला आणि त्यांना गुलामगिरीतून सोडवलं. अर्थातच याबद्दल त्याला टिकेला सामोरं जावं लागलं.

१८७५ साली ब्राऊन आपली इंग्लिश पत्नी आणि मुलांसहित पुन्हा एकदा अमेरिकेला परतला. उदरनिर्वाहासाठी त्याने जादुच्या प्रयोगाचे स्टेज शो करण्यास सुरवात केली. या स्टेज शो दरम्यान तो एका बॉक्समधून बाहेर येत, हा तोच बॉक्स होता ज्यातून त्याने पलायन केलं होतं. साहसी पलायन आणि धाडसी जीवन जगलेल्या ब्राऊनच्या शेवटच्या दिवसांबाबत मात्र पुरेशी माहिती उपलब्ध नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

स्पार्टाची राणी ट्रॉयच्या राजपुत्रासोबत पळाली आणि भीषण यु*द्धास सुरुवात झाली

Next Post

भटकंती – वड-पिंपळाच्या मुळांपासून बनवलेले मेघालयचे जिवंत पूल

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

भटकंती - वड-पिंपळाच्या मुळांपासून बनवलेले मेघालयचे जिवंत पूल

टाटा उद्योग समूह आणि अवकाश भरारी यांचं एक वेगळंच नातं आहे..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.