The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या एका नवीन आजाराने अमेरिकन अधिकाऱ्यांची झोप उडवलीये..!

by द पोस्टमन टीम
26 February 2024
in आरोग्य
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


दुसऱ्या महायु*द्धात रशिया आणि अमेरिका एकमेकांच्या सहकार्यानं लढले. शीतयु*द्धाच्या काळात अशी अनेक छुपी शस्त्रास्त्रे तयार करण्यात आली होती, जी अतिशय शांतपणे एखाद्याचा जीवही घेऊ शकत होती. महायु*द्ध संपल्यानंतर दोन्ही देशांच्या संबंधात मोठी दरी पडली अन् प्रदीर्घ काळ चाललेल्या शीतयु*द्धाला सुरुवात झाली.

शीतयु*द्धामध्ये मुत्सद्दीपणाचा वापर झाल्याचं वरकरणी दिसत असलं तरी वस्तूस्थिती मात्र, भयानक होती. शीतयु*द्धाच्या काळामध्ये अमेरिकन गुप्तहेर संघटना सीआयए आणि रशियन गुप्तहेर संघटना केजीबी हे दोन मेजर प्लेयर्स होते. या दोन्ही संस्थांनी शीतयु*द्धाच्या ‘बॅकस्टेज’ला अनेक अकल्पनीय इव्हेंट्ला मूर्तरूप दिलं होतं.

सीआयएनं आपल्या मार्गात येणाऱ्या लोकांना मात देण्यासाठी अनेक प्रकारच्या युक्त्या शोधून काढल्या होत्या. मात्र, इतक्या वर्षात सीआयए स्वत: कधी एखाद्या मोठ्या संकटात सापडली नाही. निदान त्याबाबत माहिती तरी उघड झाली नाही. पण, आता सीआयएचे अधिकारी आणि गुप्तहेर एका विचित्र आजाराच्या कचाट्यात सापडले आहेत. हा आजार नेमका मानसिक आहे शारीरीक हे ठरवणंसुद्धा कठीण होऊन बसलं आहे. सीआयएला वेठीस धरणारा हा आजार नेमका आहे तरी काय? हे जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा…

२०२१ साली अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचा व्हिएतनाम दौरा काही काळासाठी पुढे ढकलावा लागला होता. हा दौरा पुढे ढकलण्यामागे ‘हवाना सिंड्रोम’ असल्याचं नंतर स्पष्ट झालं होतं. त्यानंतर महिनाभरातच भारतात आलेला अमेरिकन गुप्तचर संस्थेचा एक अधिकारी अचानक आजारी पडला होता. न्यूयॉर्क टाइम्स आणि सीएनएनच्या वृत्तानुसार, त्याला जाणवलेली लक्षणंसुद्धा हवाना सिंड्रोमसारखीच होती. हा अधिकारी सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी (सीआयए) संचालक विल्यम बर्न्स यांच्यासोबत भारतात आला होता. त्यानंतर हवाना सिंड्रोमची जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.



सुमारे पाच वर्षांपूर्वी, क्युबाची राजधानी हवाना येथील अमेरिकन दूतावासात तैनात असलेले अधिकारी एकापाठोपाठ एक आजारी पडले होते. त्यांनी सांगितलं होतं की, हॉटेलच्या खोल्या आणि राहत्या घरांमध्ये त्यांनी विचित्र आवाज ऐकले होते. शिवाय त्यांच्या शरीरात विचित्र संवेदना जाणवल्या होत्या. या विचित्र आजाराला ‘हवाना सिंड्रोम’ असं नाव देण्यात आले. आतापर्यंत २००पेक्षा जास्त अमेरिकन गुप्तहेर आणि त्यांच्या कुटुंबियांना हवाना सिंड्रोमची लक्षण जाणवल्याची नोद आहे.

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, ‘हवाना सिंड्रोम’ची प्रकरणं आता प्रत्येक खंडातून समोर येत आहेत. क्युबानंतर चीन, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, तैवान आणि अगदी वॉशिंग्टन डीसीमध्येही त्याची प्रकरणं आढळली आहेत. २०२२ च्या सुरुवातीला ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथूनही हवाना सिंड्रोमची डझनभर प्रकरणं आढळून आली होती. भारतातसुद्धा ‘हवाना सिंड्रोम’ची लक्षणं दर्शविणारी पहिलीच घटना घडली होती.

नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेसच्या मते, हवाना सिंड्रोमची काही विशिष्ट लक्षणं आहेत. ती अचानक जाणवतात. यातील काही लक्षणं दीर्घकाळ टिकतात तर काही तात्पुरती जाणवतात. हा सिंड्रोम झालेल्या व्यक्तीला अचानक मोठे आणि विचित्र आवाज (क्लिक, किलबिलाट, एखाद्याला ओढत नेल्याचा आवाज, कानांमध्ये वेदना होतात) ऐकू येतात. आतापर्यंत हवाना सिंड्रोमचा अनुभव घेतलेल्या अधिकाऱ्यांनी पुढील गोष्टी नोंदवल्या आहेत.

हे देखील वाचा

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

कानात शिट्ट्यांचा आवाज येणं, डोक्यावर अचानक प्रचंड प्रेशर व व्हायब्रेशन जाणवणं, स्मरणशक्ती कमजोर होणं, डोळ्यांवर ताण येणं, शरीराचा बॅलन्स बिघडणं ही तात्पुरती लक्षण जाणवतात. तर, डोकेदुखी, एकाग्रता नाहीशी होणं, झोप न येणं, डिप्रेशन येणं अशी दीर्घकालीन लक्षण दिसतात.

हवाना सिंड्रोम कसा होतो याबाबत शास्त्रज्ञांमध्ये एकमत नाही. यूएसच्या नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेसमधील तज्ज्ञांच्या मते, ‘डायरेक्टेड, पल्सड रेडिओ फ्रिक्वेन्सी एनर्जी’ या सिंड्रोमला कारणीभूत असल्याची शक्यता आहे.

सीआयएचे संचालक विल्यम बर्न्स यांनी म्हटलं आहे की, ‘हा सिंड्रोमवर मानवाचं नियंत्रण असण्याची शक्यता आहे व त्यामागे रशियाचा हात असू शकतो.’ बहुतेक अमेरिकन अधिकार्‍यांचा असा विश्वास आहे की, हा इलेक्ट्रॉनिक शस्त्रांनी केलेला ह*ल्ला आहे. मात्र, हे अद्याप सिद्ध झालेलं नाही.

शास्त्रज्ञांनी या सिंड्रोमबाबत यु*द्धपातळीवर संशोधन सुरू केलं आहे. काहींच्या मते हा एक ‘मानसिक आजार’ आहे. कदाचित वारंवार परदेशी मोहिमांच्या तणावामुळं तो उद्भवत आहेत. काही संशोधकांनी मायक्रोवेव्ह शस्त्रांना या सिंड्रोमसाठी कारणीभूत ठरवलं आहे. या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, रशियामध्ये मायक्रोवेव्ह शस्त्रांवर महत्त्वपूर्ण संशोधन झालेलं आहे. त्यामुळं अमेरिकन संरक्षण खात्यानं रशियावर आरोप केले आहेत. जेव्हा कमला हॅरिस यांचा व्हिएतनामचा दौरा पुढे ढकलण्यात आला होता तेव्हा सीआयएचे माजी संचालक, स्वतः या सिंड्रोमचे बळी ठरले होते.

हवाना सिंड्रोमची लक्षणं दिलेल्या व्यक्तींचं एमआरआय स्कॅन केलं असता, निरोगी लोकांच्या तुलनेत त्यांच्या मेंदू आणि पाठीच्या कण्यामध्ये पांढरा द्रव जास्त प्रमाणात असल्याचं निदर्शनास आलं. या सिंड्रोममधून व्यक्तीला बरं करण्यासाठी आर्ट थेरपी, मेडिटेशन, श्वासोच्छवासाचे व्यायाम आणि ॲक्युपंक्चर यासारख्या उपचार पद्धतींचा वापर केला जात आहे.

अमेरिकन सरकारनं सार्वजनिक सेवकांना पाठिंबा देण्यासाठी, सिनेटमध्ये एकमतानं एक कायदा करण्यात आला आहे. संभाव्य एनर्जी अटॅक्समुळं किंवा हवाना सिंड्रोममुळं एखाद्या कर्मचाऱ्याच्या मेंदूला इजा झाल्यास HAVANA Act नुसार त्याला मदत दिली जाणार आहे.

गुप्तचर समितीसह सिनेटर सुसान कॉलिन्स यांनी प्रस्तावित केलेला हा कायदा हवाना सिंड्रोममुळं नुकसान झालेल्या व्यक्तींना आर्थिक सहाय्य देण्याची योजना आखत आहे. सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी (CIA) आणि स्टेट डिपार्टमेंट या दोन्ही संस्था या कायद्याच्या छत्रछायेखाली घेण्यात आल्या आहेत.

दिवसेंदिवस हवाना सिंड्रोमच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असून अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा मोठा धोका मानला जात आहे. अमेरिकेसोबत इतर देशांच्या सुरक्षा एजन्सींमध्येही अशा प्रकारच्या केसेस समोर आल्यानं ‘हवाना सिंड्रोम’च्या मुळाशी जाण्याचा कसून प्रयत्न सुरू आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

चेन्नईच्या केवळ १६ वर्षाच्या या बुद्धिबळपटूने भल्याभल्यांची झोप उडवली आहे!

Next Post

माजी वर्ल्ड चॅम्पियन आता रशियाविरुद्ध शड्डू ठोकून उभा झालाय!

Related Posts

आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
आरोग्य

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

1 June 2025
विज्ञान तंत्रज्ञान

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

19 April 2025
आरोग्य

फ्रेंच फुटबॉलर करीम बेंझेमासुद्धा ज्याचा फॅन आहे ती हिजामा थेरपी काय आहे?

8 April 2025
आरोग्य

स्टील्थ ओमिक्रॉनमुळे भारतात पुन्हा लॉकडाउन लावावं लागणार का..?

25 March 2022
आरोग्य

या पेयांमुळे शरीरातील जळजळ वाढू शकते, त्यामुळे सांभाळूनच!

15 March 2024
Next Post

माजी वर्ल्ड चॅम्पियन आता रशियाविरुद्ध शड्डू ठोकून उभा झालाय!

स्विफ्ट काय आहे? रशियाला वठणीवर आणण्यासाठी त्याचा कसा उपयोग होऊ शकतो?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.