The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आपल्या मालकाची दहा वर्षे वाट पाहणारा हा आहे जगातला सगळ्यात इमानदार कुत्रा

by द पोस्टमन टीम
6 May 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


एकटं राहणाऱ्या लोकांना माणसापेक्षा एखाद्या प्राण्याचा सहवास जास्त आवडतो. प्राणी नेहमी आपल्या मालकाशी प्रामाणिक राहतात. तुमच्याही घरी जर पाळीव प्राणी असेल तर तुम्ही याचा अनेकदा अनुभव घेतला असेल.

जपानमधील एका कुत्र्याचा प्रामाणिकपणा तर तिथल्या माणसांसाठीही प्रेरणादायक ठरत आहे. या कुत्र्याचे नाव होते हचीको.

जपानमध्ये तुम्हाला हचीकोचे स्मारक दिसेल, त्याचा ब्रॉंझचा पुतळा दिसेल. अनेक ठिकाणी हचीकोच्या आठवणी जतन करून ठेवलेल्या आढळतील.

जपानी लोकांसाठी हचीको एखाद्या हिरोसारखा आहे. जपानमध्ये हचीकोवर कित्येक चित्रपट बनवण्यात आले आहेत. हचीको जपानी लोकांना इतका प्रिय असण्यामागे काय कारण आहे? एका कुत्र्याला जपानी लोकांनी इतके का डोक्यावर घेतलेले आहे? जाणून घेण्यासाठी हा पूर्ण लेख नक्की वाचा.

जपानच्या टोकियो युनिव्हर्सिटीमध्ये ॲग्रीकल्चरल्स सायन्स शिकवणारे प्राध्यापक इझाबुरो युनो यांना एक पाळीव कुत्रा हवा होता. तोही त्यांना जपानी आकीता जातीचाच हवा होता. खूप शोधाशोध केल्यानंतर त्यांना शुद्ध आकीता जातीचे एक पिल्लू सापडले. त्यांच्या एका विद्यार्थ्याने त्यांना हे कुत्र्याचे पिल्लू घेण्याची गळच घातली. शेवटी युनोंनी देखील ते पिल्लू घेतले.



पिल्लू जेव्हापासून युनोंच्या घरी आले तेव्हापासून त्याची इझाबुरोंशी पक्की दोस्ती झाली. इझाबुरोंनी त्याचे नाव हचीको ठेवले, पण हाक मारताना मात्र ते त्याला हाची म्हणत. इझाबुरो हचीकोला आपल्या मुलाप्रमाणेच जपत. दिवसेंदिवस त्या दोघांमधले प्रेम वाढत होते. कुठेही गेले तरी दोघे सोबतच असत.

हचीको मोठा झाला तेव्हा त्याला कळले की इझाबुरो म्हणजे त्याचा मालक रोज सकाळी टोकियोच्या शिबुया ट्रेन स्टेशनवरून निघतात आणि दुपारी परत येतात. तो रोज त्या स्टेशनवर त्यांना पोहोचवायला आणि आणायला जात असे.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

२१ मे १९२५ रोजी हचीको नेहमीप्रमाणे आपल्या इझाबुरोची वाट पाहत होता. इझाबुरोला घेऊन येणारी ट्रेन आली पण इझाबुरो काही आला नाही. इझाबुरोच्या मेंदूत अचानकच रक्तस्त्राव सुरू झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता. इझाबुरोच्या मृत्युनंतर हचीकोला युनो कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीने आपल्या घरी नेले.

यानंतर हचीको दहा वर्षे जगला, पण हे दहा वर्ष तो रोज त्याच स्टेशनवर त्याच वेळेत आपल्या मालकाची वाट पाहत बसत असे. इझाबुरो आता कधीही येणार नाही हे सत्य त्याला कोण सांगणार आणि ते त्याला कळणार तरी कसे.

रोजच्या सवयीप्रमाणेच तो इझाबुरोची ट्रेन येण्याच्या वेळेत नेहमीच स्टेशनवर जाऊन बसत असे. कधी तर तो तासनतास इझाबुरोची वाट पाहत बसत असे.

१९३२ साली जपानमधील एक प्रसिद्ध वृत्तपत्राने हचीकोची बातमी छापली. हचीकोच्या या गोष्टीने जपानच्या नागरिकांमध्ये हचीकोला भरपूर प्रसिद्धी मिळाली. हचीको जपानमधील एक प्रसिद्ध व्यक्ती बनला होता.

हचीकोच्या या बातमीने राष्ट्रीय प्रसारमाध्यमांचेही लक्ष वेधून घेतले. अनेकांना हचीकोला भेटण्याची, त्याला पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली. जगभरातून लोक हचीकोला पाहण्यासाठी शिबुया ट्रेन स्टेशनवर येऊ लागले. जपानच्या लोकांसाठी तर हचीको म्हणजे एक आदर्शच होता.

१९३४ साली शिबुया ट्रेन स्टेशनच्या समोर हचीकोचा ब्राँझचा पुतळा बसवण्यात आला आणि विशेष बाब म्हणजे हचीकोने स्वतःच या पुतळ्याचे उद्घाटन केले होते. शिबुया ट्रेन स्टेशनवरच ८ मार्च, १९३५ साली हचीकोचे निधन झाले.

एनोच्या सायन्स म्युझियममध्ये हचीकोच्या अनेक आठवणी जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. अयोमा स्मशानभूमीत त्याच्या मालकाच्या इझाबुरोच्या शेजारीच हचीकोचे एक स्मारक बांधण्यात आले आहे.

शिबुया ट्रेन स्टेशनच्या बाहेर हचीकोचा जो ब्राँझचा पुतळा बसवला आहे, त्याला पाहण्यासाठी जपानच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात. १९३५ साली टोकियोच्या शिबुया स्टेशनच्या बाहेर बसवलेला ब्राँझचा पुतळा काढून तो विरघळवून त्याच्या धातूचा पुनर्वापर करण्यात आला होता. पण, यु*द्ध संपल्यानंतर पुन्हा एकदा ब्राँझचा नवा पुतळा त्याठिकाणी उभारण्यात आला.

जपानमध्ये एक आकीता डॉग म्युझियमदेखील आहे. या म्युझियममध्येही हचीकोला सुप्रसिद्ध डॉगचा सन्मान देण्यात आला आहे. जपानच्या ऑडेट सिटीमध्ये हे म्युझियम पाहायला मिळते. प्राण्यांची आवड असणारे तर या म्युझियमला आवर्जून भेट देतातच.

या म्युझियममध्ये तुम्हाला आकीता जातीच्या कुत्र्यांबद्दल सगळी माहिती मिळते. आकीता कुत्र्यांना कसे सांभाळायचे, त्यांच्यासोबत वेळ कसा घालवायचा अशा अनेक बारीकसारीक प्रश्नांची देखील उत्तरे येथे मिळतात. या म्युझियममधे आकीता जातीची दोन पिल्ले ठेवण्यात आली आहेत. तुम्ही या पिल्ल्यांसोबत खेळून त्याचाही आनंद घेऊ शकता. हे म्युझियम पाहायला खूपच मजा येते.

एप्रिलपासून नोव्हेंबरपर्यंत हे म्युझियम रोज खुले असते. तुम्हालाही जर आकीता कुत्री आवडत असतील तर या म्युझियमला भेट देऊन त्यांच्याबद्दलची सगळी माहिती मिळवू शकता.

हचीकोवर आजपर्यंत अनेक पुस्तके आली आहेत. हॉलीवूडमध्ये तर यावर एक चित्रपटही होऊन गेला आहे. जपानमध्येही १९८७ साली “हचीको मोनोगतारी’ नावाचा एक चित्रपट येऊन गेला. २००९ साली हॉलीवूडने याच चित्रपटाचा अमेरिकन व्हर्जन बनवला ज्याचे नाव होते, “हचीको- अ डॉग’ज टेल.”

हचीकोच्या प्रामाणिकपणा हा जपानमधील अनेक नात्यांचा पाया असल्याचे मानले जाते. जपानमधील तरुणांमध्ये हचीको विशेष लोकप्रिय आहे. हचीकोने आपल्या वागण्यातून आपल्या मालकावरचे प्रेम, निष्ठा व्यक्त केली. इझाबुरोच्या मृत्यूनंतर देखील तो त्याच स्टेशनवर रोज त्याची वाट पाहत राहिला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

पावागढच्या महाकाली मंदिरातील रहस्यमय दगडाचं कोडं अखेर शास्त्रज्ञांना सुटलंय

Next Post

हातपाय नसलेला ‘निक’ जगभरातील लोकांना मोटिवेट करतोय..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

हातपाय नसलेला 'निक' जगभरातील लोकांना मोटिवेट करतोय..!

शेन वॉर्नच्या करिअरची सुरुवातच गुरु रवी शास्त्रींची विकेट घेऊन झाली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.