The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एका बॉक्समध्ये ७२ तास विषारी सापांसोबत राहून या पुणेकराने गिनीज बुकमध्ये नाव नोंदवलंय

by द पोस्टमन टीम
30 July 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


“खतरों के खिलाडी” नावाचा एक शो आपल्या सर्वांना माहितीच असेल. यामध्ये बऱ्याच वेळा टास्कच्या नावाखाली खेळाडूंना काचेच्या बॉक्समध्ये बंद करुन, त्यात विविध कीटक आणि किडे सोडले जातात. यासोबतच कित्येक वेळा सापांसोबतही रहावं लागतं. रिॲलिटी शो असला, तरी यामधील कन्टेस्टन्ट्सच्या सुरक्षेची काळजी यावेळी घेतली असते. तसेच, यातील साप हे बऱ्याच वेळा बिनविषारी असतात. आपल्याला हे सगळं टीव्हीवर पाहतानाही अंगावर काटा येतो.

मात्र हे प्रकार सुरू होण्यापूर्वी, आणि भारतात टीव्हीदेखील आला नव्हता तेव्हा एका अवलियाने चक्क विषारी सापांनी भरलेल्या एका बॉक्समध्ये तब्बल ७२ तास राहण्याचा पराक्रम केला होता. ही कामगिरी केल्याबद्दल या व्यक्तीच्या नावावर गिनिज बुकमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला गेला. या व्यक्तीचं नाव होतं निलिम कुमार खैरे. विशेष म्हणजे, ही व्यक्ती कुठल्या दुसऱ्या राज्यातील नसून, आपल्या पुण्यातील आहे.

निलिम यांनी केटरिंगध्ये डिप्लोमा केला होता. डिप्लोमानंतर सुरुवातीच्या काळात ते महाराष्ट्र टूरिझम डिपार्टमेंटसोबत काम करत होता. यावेळी मुंबईजवळील माथेरानमधील एका हॉलिडे होममध्ये मॅनेजर म्हणून ते काम करत होता. सह्याद्रीच्या डोंगर-दऱ्यांमध्ये असलेल्या माथेरानमध्ये हे हॉटेल असल्यामुळे, याठिकाणी वारंवार साप येत. यातील बरेचसे साप हे बिनविषारी असल्यामुळे निलिम त्यांना पकडून जंगलात सोडून देत असे.

एक दिवस त्यांनी असाच एक साप पकडून मुंबईच्या हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये नेला होता. यावेळी त्यांना सांगण्यात आलं, की त्यांनी पकडलेला साप अतिशय विषारी आहे. या सापाला अशा प्रकारे हातात पकडणं धोक्याचं आहे. हे ऐकून दुसरा कोणी असता, तर पुन्हा सापांच्या नादीच लागला नसता. मात्र, निलिम यांचा कॉन्फिडन्स हे ऐकून अधिकच वाढला. त्यानंतर त्यांनी अशा प्रकारे सापांना पकडून जीवदान देण्यास सुरुवात केली.



अवघ्या नऊ वर्षांंच्या काळात त्यांनी २५ हजार साप पकडले होते. या दरम्यान त्यांना सुमारे सहा हजार वेळा सापांनी चावलं होतं.

साऊथ आफ्रिकेमधील पीटर स्नेमॅरिस नावाच्या एका व्यक्तीने १८ विषारी आणि ६ निमविषारी सापांसोबत ५० तास राहण्याचा विक्रम केला होता. या रेकॉर्डबद्दल माहिती मिळाल्यानंतर आपणही असंच काही करावं असा विचार २८ वर्षांच्या निलिमच्या मनात आला.

भारताला खूप आधीपासून सापांचा आणि गारुड्यांचा देश म्हणून ओळखलं जातं. अगदी जेम्स बॉन्डच्या ‘ऑक्टोपसी’ सिनेमामध्येही भारताला अशाच प्रकारे दाखवलं आहे. भारताची अशी ओळख असल्यामुळे सापांसोबत राहण्याचा विक्रम एका भारतीयाच्या नावावरच असावा, असं निलिमला वाटलं. त्यामुळे हा रेकॉर्ड मोडायचं त्याने ठरवलं. मात्र, हा रेकॉर्ड करणं म्हणजे आत्मह*त्या केल्यासारखं होतं. यामुळे हा रेकॉर्ड करण्याची कल्पना मांडताच लोकांनी त्याला वेड्यात काढलं. अगदी पोलिसांनीही अशा प्रकारच्या आत्मघातकी प्रकाराला परवानगी देण्यास नकार दिला होता. अखेर कित्येक प्रयत्नांनंतर त्याला हा रेकॉर्ड करण्यासाठी परवानगी मिळाली.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

२० जानेवारी १९८० रोजी पुण्यातील बी.जे. मेडिकल कॉलेजच्या स्पोर्ट्स ग्राऊंडमध्ये या रेकॉर्डला सुरुवात झाली. याठिकाणी विशेष तयार करण्यात आलेल्या एका काचेच्या मोठ्या बॉक्समध्ये निलिमला बसवण्यात आलं.

या बॉक्समध्ये निलिमसोबत २७ मोनोक्लेड कोब्रा, २४ रसेल्स वायपर्स, नऊ बायनोक्लेड कोब्रा, आठ बँडेड क्रेट्स आणि चार साधे साप असे एकूण ७२ साप सोडण्यात आले. चार साधे साप सोडले तर इतर साप असे होते ज्यांच्या एका दंशानेच निलिमचा जीव धोक्यात आला असता. 

मोनोक्लेड कोब्रा तर अजूनही थायलंडमधील सर्वांत विषारी साप मानला जातो. असे तब्बल २७ कोब्रा साप या बॉक्समध्ये सोडण्यात आले होते. पीटर केवळ १८ सापांसोबत राहिला होता. त्याच्या चौपट साप निलिमच्या बॉक्समध्ये सोडण्यात आले होते. सापांच्या या संख्येमुळे गिनिज बुकच्या अधिकाऱ्यांनी निलिमला असंही सांगितलं होतं, की तो दररोज अर्धा तास बॉक्सच्या बाहेर येऊन ब्रेक घेऊ शकतो. तरीही तो पीटरचा रेकॉर्ड मोडू शकेल. मात्र, निलिमने हा ब्रेकही घेतला नाही. ७२ तास या बॉक्समध्ये राहिल्यानंतर त्याला गिनिज बुकच्या अधिकाऱ्यांनी १५१२ गुण मिळाल्याचे जाहीर केले. पीटरला केवळ ९०० गुण मिळाले होते. म्हणजेच निलिमने पीटरचा रेकॉर्ड मोठ्या फरकाने मोडला होता.

काचेच्या या बॉक्समध्ये निलिमला बसण्यासाठी एक खुर्ची आणि टेबल देण्यात आला होता. हे साप इकडे तिकडे फिरत कित्येक वेळा या खुर्चीवर बसलेल्या निलिमच्या अंगावर जात होते. त्यामुळे निलिमला त्यांना उचलून दूर फेकावं लागत होतं. इतर लोकांना जिथं लांबूनही साप पाहिला, तरी घाम फुटतो, तिथे निलिम तर अंगावर फिरणारे साप अलगदपणे उचलून बाजूला ठेवत होता.

हा रेकॉर्ड करुन झाल्यानंतर निलिमला जुना रेकॉर्ड मोडल्याचं समाधान तर होतंच. मात्र, ‘साप केवळ त्यांना डिवचल्यानंतरच ह*ल्ला करतात’ हा आपला दावा सिद्ध केल्याचा आनंदही त्याला होता. या ७२ तासांमध्ये कित्येक वेळा त्याने सापांना अंगावरुन उचलून अलगदपणे जमीनीवर सोडलं होतं. मात्र, एकदाही त्याला कोणत्याच सापाने दंश केला नाही. “मी आता स्नेक पार्कसाठी एक ट्रस्ट उभारू शकतो”, असे निलिम हा रेकॉर्ड झाल्यानंतर म्हणाले होते.

खैरे यांनी पुढे खरोखरच ‘इंडियन हर्प्टोलॉजिकल सोसायटी’ आणि ‘कात्रज स्नेक पार्क’ची स्थापना केली. यासोबतच त्यांनी सापांची माहिती देणारी कित्येक पुस्तकं लिहिली. या पुस्तकांसोबतच इतर माध्यमांतूनही त्यांनी सापांविषयी जनजागृती केली. तसेच, खैरेंमुळे आजपर्यंत हजारो सापांचा जीव वाचला आहे. सापांसाठी खैरेंनी केलेलं काम एवढं मोठं आहे, की एका सापाच्या एका प्रजातीला चक्क त्यांचं नाव देण्यात आले आहे. ‘मेलानोफिडियम खैरे’ (Melanophidium Khairei) असं या प्रजातीचं नाव आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थिती आटोक्यात आणण्यासाठी गाडगीळ समिती काय सांगते, जाणून घ्या!

Next Post

ज्या शास्त्रज्ञाने पाकिस्तानला न्युक्लीअर पॉवर बनवलं तो आज आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आहे

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

ज्या शास्त्रज्ञाने पाकिस्तानला न्युक्लीअर पॉवर बनवलं तो आज आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आहे

भारतात जन्मलेल्या या शास्त्रज्ञामुळे पाकिस्तान न्युक्लीअर पावर बनलाय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.