The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जॉन डॅनियल – या गोरिलाच्या पिलाला माणसाच्या मुलाप्रमाणे वाढवलं होतं

by Heramb
4 November 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आपल्यापैकी बहुतेक जणांना प्राणी पाळण्याचं एक भलतंच वेड असतं. अनेक लोक तर आपल्या पाळीव प्राण्यांना घरातील सदस्यांप्रमाणेच वागणूक देतात. काहींना तर कुत्र्याला/मांजराला ‘कुत्रं’/’मांजर’ म्हटलेलंही आवडत नाही, त्या जनावराला दिल्या गेलेल्या विशेष नावानेच हाक मारावी असा त्यांचा आग्रह असतो. आपण याआधी एका चिम्पान्झीने निवडलेल्या शेअर्सनी ३६५.४ टक्के इतका परतावा दिल्याचे वाचले आहे, परंतु इंग्लंडमध्ये एकदा एका ‘गोरीलाच्या’ पिल्लाला अगदी माणसाच्या मुला-बाळाप्रमाणे वागणूक देण्यात आली. ही ‘जॉन डॅनियल’ नावाच्या गोरिलाची कथा आहे. तो काही सामान्य गोरिला नव्हता..

जॉन डॅनियल या तरुण गोरिलाला एका इंग्रज कुटुंबाने १९१८ साली दत्तक घेतले होते. इंग्लडमधील ‘उले’ गावात या कुटुंबाने त्याचे पालन-पोषण अगदी स्वतःच्या अपत्याप्रमाणे केले होते. जॉन डॅनियलला स्वतःची खोली होती, तो शाळेत जात होता, इतकंच काय तर त्याला चहा आणि सफरचंदाचा रस आवडत होता. उले गावामधील ‘मार्गारेट ग्रुम’ नावाच्या आर्काइव्हिस्टने (संग्रहणांची देखभाल करणारी व्यक्ती) त्याची उल्लेखनीय कथा सर्वांसमोर आणली.

जॉन डॅनियल नावाच्या या गोरिलाला ‘डेरी अँड टॉम्स’ या लंडनमधील डिपार्टमेंटल स्टोअरमधून ‘रुबर्ट पेन्नी’ या श्रीमंत ब्रिटिशाने १९१७ साली आणले होते. या वानराची किंमत तत्कालीन बाजारात ३०० युरोज इतकी होती (आज त्या ३०० युरोजची किंमत सुमारे २५ हजार युरोज किंवा ३४ हजार डॉलर्स इतकी आहे). या गोरिलाच्या पालनकर्त्यांना आताच्या गॅबॉन या आफ्रिकेतील देशात फ्रेंच सैनिकांनी गो*ळ्या मारून ठा*र केले आणि त्यांच्याबरोबरच्या या अर्भक गोरिलाला इंग्लंडला आणले गेले. मेजर पेनीने त्याचे नाव जॉन डॅनियल ठेवले.

अनेक लोक आजही लहरीनुसार ‘प्राणीप्रेमी’ बनून विविध प्राणी आपल्या घरी आणतात आणि नन्तर आपण या प्राण्याला सांभाळू शकत नाही याची त्यांना प्रचिती येते, अगदी असंच मेजर साहेबांबरोबर झालं. म्हणून १९१८ साली त्याने हे वानर आपली बहिण, ‘ॲलिस कनिंगहॅम’कडे पाठवले. ती ग्लॉसेस्टरमधील उले नावाच्या छोट्या गावात राहात होती.

परंतु, अ‍ॅलिस किंवा इतर गावकऱ्यांना लहान गोरिलाची काळजी कशी घ्यावी याची कल्पना नव्हती. म्हणून त्यांनी जॉन डॅनियलला लहान मुलाप्रमाणे वागवण्याचा निर्णय घेतला. ॲलिस कनिंगहॅमने जॉनला दत्तक घेतले, त्या लहान वानरालाही गावातील त्या घरात करमत होते. ॲलिसने त्याला ‘सुलतान’ हे टोपणनाव दिले आणि त्याला एखाद्या लहान मुलाप्रमाणे वाढवले.



लहान मुलांप्रमाणे, जॉनला स्वतःची बेडरूम होती, त्याला लाइट स्विच वापरता येत असे आणि बाथरूममध्ये कसे जायचे हे देखील त्याला माहित होते. विशेष म्हणजे बहुतेक लहान मुलांपेक्षा काहीसे वेगळे गुण त्याच्यात विकसित झाले, उदाहरणार्थ त्याला सफरचंदाचा रस फार आवडत असे. संपूर्ण गावात हा पिटुकला गोरिला लोकप्रिय होता. जॉन नियमितपणे खेळ खेळत असे, तसेच तो उले गावातील इतर विद्यार्थ्यांप्रमाणे शाळेतही जात असत. त्याने कनिंगहॅम कुटुंबाच्या कारमध्ये सहलीचा आनंदही घेतला.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

जॉन डॅनियल केवळ उलेपुरता मर्यादित नव्हता. अ‍ॅलिस कनिंगहॅम त्याला नियमितपणे लंडनला घेऊन जात असत. ‘स्लोअन स्ट्रीट’ येथे अ‍ॅलिसचे घर होते. याठिकाणी आल्यावर जॉन अ‍ॅलिसच्या डिनर पार्टीत सामील व्हायचा आणि भरपूर चहा प्यायचा. या तरुण गोरिलाने १९१८ ते १९२१ ही तीन वर्षे उले गावात आनंदात घालवली. दुःखद गोष्ट म्हणजे लवकरच उले गावातील त्याचा निवास संपणार होता.

एक गोंडस आणि मजेदार ३२ पौंडचा छोटा गोरिला, आता १९२१ साली २१० पौंडचा प्रचंड गोरिला बनला होता. आता जॉनची काळजी घेण्यासाठी कोणी विशेष प्राणीप्रेमी आणि त्यातच तज्ज्ञ असलेल्याला शोधण्याची गरज आहे, हे लवकरच अ‍ॅलिसच्या लक्षात आले. आफ्रिकेसारख्या जंगलात ‘माणसाळलेला’ गोरिला एकटा राहण्याची आणि टिकण्याची शक्यता फार कमी होती शिवाय त्याकाळात त्याच्यासाठी कोणतीही सुरक्षित अभयारण्ये देखील नव्हती. शेवटी तिला एक ‘कथित’ प्राणीप्रेमी अमेरिकन खरेदीदार सापडला आणि त्याने जॉनला फ्लोरिडाला नेण्याचे वचन दिले.

खरेदीदाराने हा गोरिला १००० गिनींना विकत घेतला आणि त्याला युनायटेड स्टेट्सला रवाना केले. परंतु त्याने अ‍ॅलिसला वचन दिल्याप्रमाणे जॉनला आनंदी जीवन प्रदान न करता, त्याला बर्नम आणि बेली सर्कसला विकले. अखेरीस, जॉन न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन प्राणीसंग्रहालयात आला. त्याठिकाणी तो लवकरच आजारी पडला आणि त्याची प्रकृती झपाट्याने खालावली. प्राणिसंग्रहालयाच्या रक्षकांनी, तो त्याच्या ‘आई’साठी तळमळत असल्याचा अंदाज करून अ‍ॅलिस कनिंगहॅमशी संपर्क साधला.

प्रत्यक्षात तिच्या लाडक्या ‘सुलतान’चे काय झाले हे ऐकून अ‍ॅलिस कनिंगहॅम ताबडतोब अमेरिकेला रवाना झाली. दुर्दैवाने, जॉन मात्र ती तेथे पोहोचण्यापूर्वी न्यूमोनियामुळे मरण पावला. या गोरिलाचा मृतदेह ‘अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री’ला दान करण्यात आला आहे. १९२२ साली वैज्ञानिक पद्धतीने त्याचे जतन करून न्यूयॉर्कच्या संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले. जॉन आजही तेथे आहे.

न्यूयॉर्क येथे जतन करण्यात आलेला जॉन

डॉ. रॉड व्हाईट, उले सोसायटीचे कोषाध्यक्ष म्हणाले: “आम्ही जॉन डॅनियलच्या आयुष्याची शताब्दी उले येथे साजरी करू इच्छितो. जानेवारी २०१७ मध्ये जॉनचे फोटो व्हायरल होण्यापूर्वी गावातील कोणत्याही तरुणाने ही कथा ऐकली नव्हती. त्यामुळे फोटो व्हायरल झाल्यापासून खूप उत्सुकता आहे. ही कथा उलेच्या रोमँटिक कथांपैकी एक आहे.”

उलेमध्ये अगदी मनापासून त्याचे स्मरण केले जाते. परंतु गावात जॉनला प्रत्यक्ष भेटलेले आता कोणीही नाही. २०१७ साली, आर्किव्हिस्ट ‘मार्गारेट ग्रूमने’ या गोरिलाला त्याच्या आईसोबत आणि मुलांसोबत खेळतानाचे फोटो असलेले एक पुस्तक प्रकाशित केले. अलीकडे, उले येथील लोकांनी एकत्र येऊन जॉनचे स्मारक तयार केले आहे. ‘सेबॅस्टियन रॅच’ या कलाकाराने पोर्टलँड दगडात आकर्षक कोरीव काम करून शिल्प तयार केले आहे.

जॉनचे उले येथील स्मारक

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

दुसऱ्या महायु*द्धात बेपत्ता झालेल्या जपानच्या लाखो सैनिकांचा अजूनही शोध लागलेला नाही

Next Post

जोकोविकच्याही आधी दोन कार्यकर्त्यांनी विमानाच्या पंखांवर टेनिस मॅच खेळली होती

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

जोकोविकच्याही आधी दोन कार्यकर्त्यांनी विमानाच्या पंखांवर टेनिस मॅच खेळली होती

प्रसिद्ध '३००' चित्रपटाची कथा या खऱ्या लढाईवरून घेण्यात आली आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.