The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या वैमानिकाने डिप्रेशनमध्ये विमान पर्वतावर धडकावून दीडशे लोकांचा जीव घेतला होता

by Heramb
13 October 2025
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


२४ मार्च २०१५ रोजी ‘जर्मनविंग्ज एअरलाइन’चे एक विमान फ्रान्सच्या आल्प्स पर्वतरांगांमध्ये कोसळले आणि विमानातील सर्व १५० प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या तपासात एक विदारक वास्तव समोर झाले. 4U 9525 या विमानाचे २८ वर्षीय सह-पायलट, एंड्रियास लुबित्झ कॉकपिटमध्ये एकटे होते.

लुबित्झ बरोबरचा एक पायलट तसेच कॅप्टन शौचालय वापरण्यासाठी कॉकपीट बाहेर गेला होता. त्यानंतर लगेचच, लुबित्झने हेतुपुरस्सर विमान धोकादायक पातळीपर्यंत आकाशातून खाली आणले आणि हा घातक अपघात घडवून आणला. प्रवासी आणि वैमानिकाने विनवणी करूनही, लुबित्झने विमान कोसळवले आणि विमानातील प्रत्येकालाच आपले प्राण गमवावे लागले. कोणाला कदाचित हा घातपातही वाटेल, पण या भीषण आणि आश्चर्यजनक घटनेमागचं कारण अत्यंत विचित्र पण तितकंच गंभीरही होतं. विश्वास बसायला अवघड आहे, पण या घटनेमागचं कारण म्हणजे नैराश्य!

नैराश्य (मेजर डिप्रेशनिव्ह डिसऑर्डर) हा सामान्य आणि गंभीर वैद्यकीय आजार आहे. यामुळे तुमच्या विचारक्षमतेवर, विचारसरणीवर आणि तुम्ही कसे वागता यावर नकारात्मक परिणाम होतो. नैराश्यामुळे दुःखाची भावना आणि/किंवा आपण या आधी आनंद घेतलेल्या काही गोष्टींमध्ये रस कमी होतो. यामुळे विविध प्रकारच्या भावनिक आणि शारीरिक समस्या उद्भवू शकतात. नैराश्यामुळे कामावर आणि घरी काम करण्याची क्षमतासुद्धा कमी होऊ शकते. असंच काहीसं लुबित्झच्या बाबतीतही घडलं होतं.

अँड्रियास लुबित्झ एक जर्मन तरुण होता. १९८७ साली जन्मलेला लुबित्झ जर्मनीतील बवारिया आणि मॉन्टाबौर या शहरांमध्ये मोठा झाला. त्याने मॉन्टाबौरमधील ‘लुफ्ट्स्पोर्टक्लब वेस्टरवाल्ड’ या ‘एव्हिएशन स्पोर्ट्स क्लब’मध्ये उड्डाणाचे धडे घेतले. तो किशोरवयात ग्लायडर (लहान आकाराचे विमान) उडवत असे. लहानपणापासूनच त्याने नैराश्याशी झुंज दिली होती, पण बहुतेकांचे त्याच्या नैराश्याकडे लक्ष गेलेच नाही. २००८ साली अँड्रियासने ‘लुफ्थांसा’ या संस्थेतील पायलट प्रशिक्षण कार्यक्रमात प्रवेश घेतला.

लुफ्थांसा या संस्थेकडे ‘जर्मनविंग्स’ एअरलाइनची मालकी आहे. याचवेळी त्याला नैराश्याचा सामना करावा लागल्याने त्याला या प्रशिक्षण कार्यक्रमातून माघार घ्यावी लागली. कालांतराने तो पुन्हा या प्रशिक्षणात सामील झाला आणि २०१२ साली त्याने वैमानिकाचे प्रशिक्षण पूर्ण करून ‘वैमानिक परवाना’ मिळवला. एका वर्षातच त्याने एअरलाइनमध्ये काम करण्यास सुरुवात केली. 



या घटनेच्या आधी काही दिवस त्याने ‘आत्मह*त्या करण्याचे मार्ग’ इंटरनेटवर सर्च केले होते. त्याच्या ‘सर्च हिस्टरी’ मध्ये कॉकपीटच्या दरवाजाच्या सुरक्षेसंबंधी माहिती होती. विचित्र गोष्ट म्हणजे उड्डाणापूर्वी डॉक्टरने त्याला उड्डाण करण्यास अयोग्य ठरवले होते. या डॉक्टरकडे तो अनेकदा जात असत. पण यावेळी लुबित्झने आपले मेडिकल रिपोर्ट्स वरिष्ठांच्या हाती लागू दिले नाही.

लुबित्झने या आत्मघाती मोहिमेची या घटनेच्या आधीही तालीम केली होती. त्याच दिवशी आधीच्या फ्लाइट दरम्यान, लुबित्झने विमानाची उंची १०० फूट इतक्या उंचीवर सेट केली होती, तेव्हाही त्याचा सह-पायलट कॉकपिटच्या बाहेर होता, असे फ्लाईट रेकॉर्ड्समधून दिसून येते. पण, को-पायलटने प्रसंगावधान दाखवत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि कोणाच्याही लक्षात येण्यापूर्वी विमान वर आणले.

हे देखील वाचा

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

अपघाताच्या एक वर्षानंतर, फ्रेंच तपासनीसांनी या घटनेचा अंतिम अहवाल जाहीर केला. अहवालात नमूद केलेले पुरावे कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरमधून मिळाले. या रेकॉर्डिंगनुसार या घटना घडल्या.. २४ मार्च २०१५ रोजी स्पेनमधील बार्सिलोना विमानतळावरून जर्मनविंग्जची फ्लाइट 4U 9525 सकाळी ९ वाजता निघाली. या ‘एअरबस ३२०’ विमानाने जर्मनीच्या डसेलडोर्फकडे प्रवास सुरू केला. विमानाला ३८००० फूट उंचीवर पोहोचण्यासाठी सुमारे ३० मिनिटे लागली. विमानाचे उड्डाण २ तासासाठी निर्धारित होते आणि कॉकपिटमधील रेकॉर्डिंगच्या पहिल्या २० मिनिटांमध्ये, वैमानिक आणि फ्लाइट अटेंडंट यांच्यामध्ये बार्सिलोना येथे थांबण्याविषयी चर्चा ऐकायला मिळाली.

सकाळी साडे नऊ वाजता, या विमानाने हवाई वाहतूक नियंत्रण (एअर ट्रॅफिक कंट्रोल) कक्षाशी शेवटचा संपर्क साधला. आपल्या मार्गावर पुढे जात राहण्याच्या परवानगीसाठी या विमानाने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला होता. सर्व काही सामान्य होते. थोड्या वेळाने, कॅप्टनने लुबित्झला कॉकपिट सोडल्याची माहिती दिली आणि दरवाजा बंद केल्याचे ऐकू आले.

कॅप्टन कॉकपिटमधून बाहेर पडल्यानंतर काही सेकंदांनी लुबित्झने विमानाची उंची ३८ हजार फुटांपासून १०० फुटांवर आणली आणि विमान वेगाने खाली येऊ लागले. ९ वाजून ३३ मिनिटांनी, विमानाचा वेग वाढला आणि हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने सह-वैमानिकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने काहीही प्रतिसाद दिला नाही. यादरम्यान फ्रेंच लष्करी ‘मिराज’ जेट विमानाला अडवण्यासाठी ऑरेंज-कॅरिटॅट हवाई तळावरून निघाले होते.

९ वाजून ३४ मिनिटांनी एक बजरचा आवाज आला. हा बजरचा आवाज म्हणजे कॅप्टन किंवा इतर केबिन मेम्बरद्वारे कॉकपीटमध्ये प्रवेश करण्याच्या विनंतीचा आवाज होता. या आवाजासोबतच दार ठोठावण्याचा आवाज आणि दरवाजा उघडण्याच्या विनंतीचा आवाज देखील आला. विमान प्रचंड गतीने जमिनीकडे जात आहे हे कॅप्टन आणि केबिन क्रूला समजले होते. यामुळे विमानाला कोणताही अपघात होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टीने कॅप्टन आणि केबिन क्रू दरवाजा ठोठावत असल्याचे त्या रेकॉर्डिंगमधून स्पष्ट होत होते.

९/११ च्या ह*ल्ल्यानंतर लुफ्थांसा एअरलाइन्सने आपल्या विमानांमध्ये अक्षरशः तटबंदी असलेले कॉकपिट दरवाजे बसवले होते. कॉकपीटमधील पायलटच्या पुढे तीन बटणे होती: लॉक, अनलॉक आणि जनरल. जनरल मोडमध्ये दरवाजा आतून लॉक केलेला असताना देखील केबिन क्रू किंवा कॅप्टन किंवा सह-वैमानिक अनलॉक कोड वापरून कॉकपिटमध्ये प्रवेश करू शकतो.

‘लॉक मोड’ कोणालाही बाहेरून कॉकपिटमध्ये प्रवेश करू देत नाही. अगदी अनलॉक कोड टाकूनही ‘लॉक मोड’ कोणालाही कॉकपिटमध्ये प्रवेश देत नाही. वास्तविक हे बदल हायजॅकिंग टाळण्यासाठी आणि विमानाचे नियंत्रण संभाव्य द*हश*तवाद्यांकडे जाऊ नये यासाठी तयार करण्यात आले होते. अमेरिकन विमानांप्रमाणे, कॉकपिटमध्ये प्रत्येक वेळी दोन वैमानिक उपस्थित राहण्याची आवश्यकता नव्हती. पण या घटनेच्या बाबतीत हे ‘अघटित’ थांबवणे जवळजवळ अशक्य होते असा याचा अर्थ होतो.

सकाळी ९ वाजून ३९ मिनिटांनी, दारावर जोरदार हिसके दिल्याचे आवाज पाच वेळा ऐकू आले – हा कॅप्टन आणि बाहेर असणाऱ्या लोकांकडून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न होता. पण कॉकपिटचे दरवाजे एखाद्या ग्रेनेडचा ब्लास्ट सहन करण्यासाठीही पुरेसे मजबूत तयार केलेले असल्याने, कोणालाही दरवाजा तोडण्यात यश आले नाही. त्याच वेळी, दुसऱ्या विमानाने रेडिओद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनाही अँड्रियासकडून प्रतिसाद मिळाला नाही.

थोड्याच वेळात, को-पायलटच्या फ्लाइट कंट्रोलमध्ये कमी उंचीचे इनपुट नोंदवले गेले. विमानाची हालचाल खूपच कमी असल्याने, ‘ऑटोपायलट मोड’ परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले आणि विमान जमिनीच्या दिशेने वेगाने पुढे जात राहिले. ९ वाजून ४० मिनिटांनी “टेरेन टेरेन पूल अप पूल अप” असे संदेश मिळाले. विमान दुर्घटनाग्रस्त होणार आहे हे सूचित करण्यासाठी शेवटच्या सेकंदाचे सुरक्षा संदेश ९ वाजून ४१ मिनिटांपर्यंत सुरूच होते पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. 

विमानाने ताशी ४३० मैल इतक्या भयाण वेगाने डोंगरावर धडक दिली. तपासकांच्या मते, “उपस्थितांचा मृत्यू तत्काळ ठरलेलाच होता.” रेकॉर्डिंगच्या अगदी शेवटी, प्रवाशांच्या किंचाळ्या ऐकू येतात. तथापि, लुबित्झला अजिबात त्रास झाला नाही. संपूर्ण रेकॉर्डिंग दरम्यान, त्याचा श्वास पूर्णपणे स्थिर होता आणि तो शांतपणे बसला होता. त्याने स्वतःसह १५० लोकांचा दुर्दैवी मृत्यू घडवून आणला.

एका वैमानिकाचे हे सुसाईड मिशनच होते. ज्याच्यावर सर्वांच्या संरक्षणाची जबाबदारी होती, त्यानेच सगळ्यांचा घात केला. १४४ प्रवासी, चार केबिन क्रू सदस्य आणि दोन वैमानिक हे सर्व २४ मार्च २०१५ च्या सकाळी विमानाने डोंगरावर धडक दिल्याने ठार झाले. लुबित्झच्या त्या सकाळच्या कृतीमागील कारण कदाचित पूर्णपणे स्पष्ट होऊ शकले नाही, परंतु मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीला विमान उडवण्याचा परवाना देणे म्हणजे साक्षात मृत्यूला आवाहन हे स्पष्ट आहे.

क्रॅशनंतर तीन दिवसांनी, जर्मन गुप्तहेरांनी लुबिट्झच्या मोंटाबौर येथील प्रॉपर्टीचा शोध घेतला आणि चाचणीसाठी संगणक आणि इतर इलेक्ट्रोनिक वस्तूंचा शोध घेतला. त्यांना एकही सुसाईड नोट सापडली नाही किंवा त्याची ही कृती “राजकीय किंवा धार्मिक पार्श्वभूमी”द्वारे प्रेरित असल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही.

लुबित्झच्या अपार्टमेंटमध्ये जर्मन अधिकाऱ्यांच्या या शोधादरम्यान, गुप्तहेरांना कचऱ्याच्या डब्यात एक वैद्यकीय पत्र सापडले. त्याला डॉक्टरांनी काम करण्यास अयोग्य घोषित केले आहे, हे या पत्रावरून सिद्ध होते. उड्डाणाच्या दिवसासाठी त्याला लुबित्झकडून आजारी असल्याची कोणतीही नोट मिळाली नाही असे जर्मनविंग्सने सांगितले. जर्मन कायद्यानुसार, कंपनीच्या मालकांना, वरिष्ठांना किंवा नियोक्त्यांना कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय नोंदी तपासण्याचे कोणतेही अधिकार नसतात. त्यामुळे त्यांना कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या स्थितीची माहिती जाणून घेण्यासाठी पूर्णतः कर्मचाऱ्यांवरच अवलंबून राहावे लागते.

दुसर्‍या दिवशी पुन्हा अधिकाऱ्यांनी लुबित्झच्या घरी शोध घेतला, तो डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे घेत होता आणि मानसिक आजाराने ग्रस्त होता याचे पुरावे त्यांना मिळाले. लुबित्झने त्याच्या टॅब्लेटवर विमान क्रॅश होण्याच्या आधी केलेल्या वेब सर्चमध्ये “आत्मह*त्या करण्याचे मार्ग” आणि “कॉकपिट दरवाजे आणि त्यांच्या सुरक्षा तरतुदी” समाविष्ट आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

डॉक्टरांनी त्याला विमानाचे उड्डाण करू नये असे सांगितले असल्याचा दावा फिर्यादी ब्रिस रॉबिन यांनी केला. त्यांच्या मते, ‘वैद्यकीय गुप्ततेच्या’ बंधनांमुळे आणि तशाच आवश्यकतांमुळे त्याच्या डॉक्टरांनी जर्मनविंग्जला ही माहिती दिली नाही. अशी गुप्तता पाळताना सार्वजनिक सुरक्षेचा विचार केला पाहिजे, असे बीईएचे तपासनीस अर्नौद डेसजार्डिन म्हणाले.

व्यावसायिक वैमानिक म्हणून प्रशिक्षण घेण्यापूर्वी त्याच्यावर आत्मह*त्या करण्याच्या इच्छेसाठीचा उपचार करण्यात आला होता आणि मानसिक नैराश्याच्या या उपचारांमुळे त्याचा परवानाही तात्पुरता नाकारण्यात आला होता. त्याला अनेक वर्षे निद्रानाशाची समस्या होती याशिवाय त्याला डोळ्यांचाही समस्या होत्या. यासाठी त्याने ४० हून अधिक डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि त्याची अंध असण्याची शक्यता दाट झाली. अंधत्वामुळे पायलटचा परवाना गमवावा लागेल या भीतीने त्याने फ्लाइट 9525 चे उड्डाण करण्याच्या आधीच आत्मह*त्या करण्याच्या पद्धतींबद्दल ऑनलाइन संशोधन करण्यास सुरुवात केली होती. 

या घटनेनंतर को-पायलटच्या रोलबद्दल काही देशांतील विमानचालन अधिकाऱ्यांनी नवीन नियम लागू केले, ज्यासाठी कॉकपिटमध्ये नेहमी दोन अधिकृत कर्मचाऱ्यांची उपस्थिती आवश्यक असते. या घटनेनंतर तीन दिवसांनी, विमान उड्डाणाच्या संपूर्ण कालावधीसाठी कॉकपिटमध्ये कमीतकमी दोन पायलटसह – कमीतकमी दोन क्रू मेंबर्स असतील, अशी तात्पुरती शिफारस युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीने विमान कंपन्यांना केली. यानंतर अनेक विमान कंपन्या आणि देशांनी आपल्या विमान उड्डयनाच्या नियमांमध्ये बदल केले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

अटलांटात वांशिक दं*गल उसळण्याला एका वर्तमानपत्राचं उथळ वार्तांकन कारणीभूत होतं

Next Post

भटकंती – छत्रपती संभाजीनगर शहरातला गरिबांचा ताजमहाल ‘बीबी का मकबरा’

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

2 May 2024
Next Post

भटकंती - छत्रपती संभाजीनगर शहरातला गरिबांचा ताजमहाल 'बीबी का मकबरा'

हेन्रीएट लॅक्स या खऱ्या अर्थाने अमरत्वाला पोचलेल्या व्यक्ती आहेत

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.