The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमेरिकन इतिहासातील एकमेव माणूस जो मृत्यूनंतर बुटांच्या जोडीमध्ये रुपांतरीत झाला..!

by द पोस्टमन टीम
13 August 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की, साधारणपणे त्याच्या धर्माप्रमाणं त्याचा अंत्यविधी केला जातो. अगदीच एखाद्यान अवयवदान किंवा देहदान केलेलं असेल तर त्याचा मृतदेह संबंधित यंत्रणांच्या हवाली केला जातो. मात्र, मृत्यूनंतर व्यक्तीच्या कातडीपासून बुटांची जोडी तयार केल्याचं तुम्ही कधी ऐकलय का? अमेरिकेत ही घटना घडल्याचं सांगितलं जातं. जॉर्ज पॅरट, जॉर्ज फ्रान्सिस वार्डन, जॉर्ज मॅन्युज आणि बिग नोज जॉर्ज अशा कितीतरी नावांनी हा व्यक्ती ओळखला जातो. हा अमेरिकन इतिहासातील एकमेव माणूस आहे जो मृत्यूनंतर बुटांच्या जोडीमध्ये रुपांतरीत झाला..!

जॉर्ज पॅरट हा एका लुटारू(रोड एजंट्स) टोळीचा सदस्य होता. सिम जॅन नावाची व्यक्ती ‘आऊट लॉ’ नावाच्या टोळीचं नेतृत्त्व करत होती. या टोळीमध्ये फ्रँक मॅककिनी, जो मॅन्युज, जॅक कॅम्पबेल, जॉन वेल्स, टॉम रीड, फ्रँक टोल आणि चार्ली बुरेस या डच व्यक्तीचाही समावेश होता. वायोमिंगच्या नदीच्या प्रदेशात ही टोळी सक्रिय होती. मालगाड्या, प्रवाशांचे पैसे आणि दागिने लुटण्याचं काम करण्यात ही टोळी निष्णात होती. नागरिकांच्या मनात त्यांच्याविषयी प्रचंड द*हश*त पसरली होती.

१६ ऑगस्ट १८७८ रोजी, या रोड एजंट्सनी ‘मेडिसिन बो’जवळ युनियन पॅसिफिक ट्रेन लुटण्याची योजना आखली. त्यासाठी त्यांनी ट्रॅकमध्ये फेरफार करून ठेवले जेणेकरून ट्रेन रुळावरुन घसरेल आणि यांना आपली चोरीची मोहिम फत्ते करण्यात यश मिळेल. ट्रॅकमध्ये फेरफार करून पॅरट आणि त्याची टोळी जवळच्या झुडपांमध्ये ट्रेनची वाट पाहत लपून बसले.

मात्र, ट्रेन येण्याच्या अगोदरचं नियमित पाहणी करणारा एक सेक्शन क्रू आला आणि त्यांनी छेडछाड केलेल्या रेल्वे ट्रॅकचा शोध घेतला. सोबत असलेल्या कामगारांच्या मदतीनं रेल्वे ट्रॅक दुरुस्त करण्यात आला. यामुळं पॅरटच्या व त्याच्या टोळीच्या मनसुब्यांवर पाणी फिरलं.

ट्रेन लुटण्याच्या हेतूनं ट्रॅकमध्ये बिघाड करून ठेवल्याचा संशय सेक्शन क्रूला आला होता. कारण त्या सुमारास पॅरट आणि त्याची टोळी आसपासच्या परिसरात चांगलीचं कुप्रसिद्ध झाली होती. या लुटारूंना पकडण्यासाठी दोन पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. माऊंटन एल्क जवळील ‘रॅटलस्नेक कॅनियन’मध्ये ही टोळी वावरत असल्याचा माग काढला. टोळीला पकडण्यासाठी केलेल्या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना या बदमाशांनी गोळ्या घालून ठार केलं.



पोलिसांच्या ह*त्येनंतर मात्र, टोळी विभक्त झाली. ते विविध दिशांना निघून गेले. दोन पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्यानं युनियन पॅसिफिक रेलरोडनं मारेकऱ्यांचा मागोवा घेण्यासाठी दुप्पट प्रयत्न केले. काउंटी अधिकाऱ्यांनी तर आरोपींना पकडण्यासाठी १० हजार डॉलर्सचं बक्षीसही जाहिर केलं होतं.

टोळीतून विभक्त झाल्यानंतरही या लुटारूंनी वैयक्तीकपणे आपलं काम सुरूचं ठेवलं होतं. विभक्त झाल्यानंतर एका महिन्याच्या आतचं फ्रँक टोलेचा मृत्यू झाला. ब्लॅक हिल्स स्टेज लाईन लुटण्याच्या प्रयत्नात असताना अपघात होऊन त्याचा जीव गेला. १८७९ मध्ये डच चार्ली पकडला गेला. त्याला न्यायालयात उभं करण्यासाठी रॉलिन्सकडं रेल्वेनं आणलं जात असताना ‘कार्बन’ याठिकाणी जमावाने ती थांबवली. संतापलेल्या लोकांनी डच चार्लीला जबरदस्तीनं ट्रेनमधून ओढून घेतलं आणि त्याला टेलिग्राफच्या खांबावर लटकवलं.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

त्यानंतर जॉर्ज पॅरटचा नंबर लागला. एक दिवस मोंटाना माईल्स सिटीतील एका बारमध्ये मद्यधुंद अवस्थेत पॅरटनं रेल्वे दरोडे आणि खुनांची बढाई मारली. बारमधील कर्मचाऱ्यांनी रॉलिन्सला एक तार पाठवली. तार मिळताच शेरीफ रँकिन हा कार्बन काऊंटीमन जॉर्जला पकडण्यासाठी मोंटानाला रवाना झाला आणि त्यानं पॅरटच्या मुसक्या आवळल्या.

पॅरटला देखील ट्रेनमधून रॉलिन्सकडे आणलं जात होतं. पॅरटच्या दुर्दैवानं, डच चार्लीप्रमाणं त्याला देखील संतापलेल्या एका जमावानं ट्रेनच्या बाहेर ओढून काढलं. प्रसंगावधान राखून पॅरटनं जमावाची माफी मागितली आणि त्यांच्याकडे जीवाची भीक मागितली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर जमावानं पॅरटला सोडून दिलं.

न्यायालयात चाललेल्या खटल्यात १५ डिसेंबर १८८० रोजी जॉर्ज पॅरटला दोषी ठरवण्यात आलं. २ एप्रिल १८८१ रोजी त्याला फाशी देण्याचं निश्चित करण्यात आलं. तोपर्यंत त्याला तुरुंगात ठेवलं होतं. मात्र, पॅरट इतक्या सहजा सहजी हार माणणारा नव्हता. आपल्या फाशीला दहा दिवस बाकी असताना (२२ मार्च) त्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यानं जेलर रॉबर्ट रँकिनवर जीवघेणा ह*ल्ला केला. त्या दिवशी आपल्या पतीला वाचवण्यासाठी श्रीमती रँकिन हातात पिस्तुल घेऊन धावल्या नसत्या तर पॅरट नक्कीच पळाला असता. रँकिनच्या प्रसंगावधानामुळं पॅरटला पुन्हा कोठडीमध्ये जावं लागलं. जॉर्ज पॅरटनं पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची बातमी वेगात पसरली. त्यानंतर जवळपास २०० लोकांच्या समुहानं पॅरटला कोठडीच्या बाहेर काढून भर चौकात त्याला फासावर लटकवलं.

पॅरटच्या मृत्यूनंतर कितीतरी दिवस त्याचा मृतदेह आहे त्याचं जागी लटकत होता, असं म्हटलं जातं. त्यानंतर डॉक्टर थॉमस मॅघी आणि जॉन युजीन ओसबॉर्न यांनी पॅरोटचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यांना त्याच्या मेंदूचा अभ्यास करायचा होता. जमावाच्या ह*ल्ल्यात पॅरटच्या कवटीचा वरचा भाग क्रू*रपणे कापला गेला होता. कवटीची ही टोपी डॉ. मॅघीनं आपली वैद्यकीय सहाय्यक लिलियन हीथला भेट म्हणून दिली. हीथ वायोमिंगमधील पहिली महिला डॉक्टर होती. तिनं पॅरटच्या कवटीचा वापर चक्क ॲश ट्रे आणि पेन होल्डर म्हणून केला. 

यापेक्षाही आश्चर्यकारक प्रकार तर पुढे घडला. पॅरटच्या मांड्या आणि छातीवरील त्वचा डेन्व्हरमधील एका टँनरी(चामड्याचा कारखाना)मध्ये पाठवण्यात आली. तिथे त्यापासून बुटांची एक जोडी आणि पिशवी तयार केली गेली. हे बूट जॉन युजीन ओसबॉर्ननं घेतले. वायोमिंगचा गव्हर्नरम्हणून निवडून आल्यानंतर आयोजित केलेल्या एका पार्टीमध्ये ओसबॉननं हे बूट घातल्याचं सांगितलं जातं. अनेक प्रयोग केल्यानंतर डॉ. मॅघीच्या परसदारात व्हिस्की बॅरलमध्ये टाकून जॉन पॅरटचा मृतदेह पुरण्यात आला.

११ मे १९५० पर्यंत सर्वांना जॉन पॅरटचा विसरही पडला होता. मात्र, बांधकाम कामगारांनी सीडर स्ट्रीटवर नवीन इमारतीसाठी उत्खनन केलं. काही वर्षांपूर्वी डॉ. मॅघी राहत असलेल्या इमारतीच्या मागेचं ही जागा होती. कामगारांना हाडांनी भरलेला एक व्हिस्की बॅरल सापडला. बॅरलच्या आत असंख्य मानवी हाडं आणि कवटीचा काही भाग होता. हे अवशेष पाहण्यासाठी जमलेल्या लोकांपैकी एका व्यक्तीला डॉ. लिलियन हीथकडे असलेली कवटीची टोपी आठवली. वयाच्या ऐंशीपार केलेल्या डॉ. लिलियन त्यावेळी जिवंत होत्या. पोलिसांनी त्यांच्याशी त्वरित संपर्क साधला. जेव्हा त्यांच्या पतीनं घरी असलेली कवटीची टोपी घटनास्थळी आणली तेव्हा ती बॅरलमध्ये सापडलेल्या कवटीशी पूर्णपणे जुळली. सापडेले अवशेष लुटारू जॉर्ज पॅरटचेचं असल्याची सर्वांची खात्री पटली.

आपल्याकडे ‘कर्मा इज बीच’ हा इंग्रजी वाक्प्रचार खूप प्रसिद्ध आहे. पॅरटचं आयुष्य या वाक्प्रचाराचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. त्यानं केलेल्या वाईट कामांमुळे मृत्यूनंतरही त्याच्या मृतदेहाची हेळसांड झाली. सध्या रॉलिन्स वायोमिंगमधील ‘कार्बन काउंटी संग्रहालयात’ जॉर्ज पॅरटचे अवशेष, त्याची कवटी आणि त्याच्या कातड्यापासून बनवलेले कुप्रसिद्ध बुट प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेले आहेत. एकेकाळी लोकांच्या मनात दहशत निर्माण करणारा जॉर्ज पॅरट आता येणाऱ्या पर्यटकांच्या मनोरंजनाचं साधन झाला आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या खटल्यानंतर स्त्री आणि पुरुषांच्या पलीकडची ओळख आपल्या देशाने मान्य केली

Next Post

मिल मालकांना कळलं की धान्याच्या पोत्यांचा वापर फ्रॉक शिवण्यासाठी होतोय, ते रंगीबेरंगी पोते बनवू लागले

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

मिल मालकांना कळलं की धान्याच्या पोत्यांचा वापर फ्रॉक शिवण्यासाठी होतोय, ते रंगीबेरंगी पोते बनवू लागले

या महिलेने पैठणीपासून बनवलेल्या वस्तूंनी तरुणाईला भुरळ घातलीये..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.