The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘गंगनम स्टाईल’ एवढं व्हायरल झालं होतं की युट्युबचं व्ह्यू काउंटरच क्रॅश झालं..!

by द पोस्टमन टीम
24 November 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


संगीताला भाषा, धर्म, जाती-पातीचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. जगातील कुठल्याही व्यक्तीवर संगीताची जादू चालून जाते. याची प्रचिती जगानं अनेक वेळा घेतली आहे. जगाच्या एका कोपऱ्यात तयार झालेलं गाणं जगभर प्रसिद्ध झाल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला आलेल्या सोशल मीडियामुळं तर अनेक गाण्यांनी प्रसिद्धीचे नवनवीन उच्चांक प्रस्थापित केले आहेत.

गाण्यांचे लिरिक्स समजो अथवा न समजो लोक आनंदानं परदेशी गाण्यांवर थिरकताना दिसतात. एका गाण्यानं तर प्रसिद्धीचे सर्व उच्चांक मोडून काढले होते. अगदी युट्युबला देखील त्यांचं व्ह्युवर काउंटर रिसेट करावं लागलं होतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, असं नेमक कोणतं गाणं आहे ज्यानं युट्युबचं व्ह्युवर काउंटर देखील मोडून काढलं? याचं उत्तर मिळवण्यापूर्वी तुम्हाला त्या गाण्याच्या निर्मात्याची गोष्ट जाणून घेणं आवश्यक आहे.

‘साय’ नावानं प्रसिद्ध झालेल्या पार्क जे-सांगचा जन्म १९७७ मध्ये दक्षिण कोरियाच्या सेऊलमधील ‘गंगनम’ जिल्ह्यात झाला. तो एका श्रीमंत कुटुंबातील मुलगा होता. १९९६ मध्ये व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी तो यूएसएला गेला. त्याठिकाणी त्यानं सेमीकंडक्टर उपकरणे तयार करण्याच्या कौटुंबिक व्यवसायाचं प्रशिक्षण घेणंअपेक्षित होतं. मात्र, त्याला व्यवसायामध्ये रस नव्हता. त्यानं अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपला वेळ आणि पैसा संगीतावर खर्च केला.

त्यानं ‘बर्कले कॉलेज ऑफ म्युझिक’मध्ये प्रवेश घेतला. परंतु त्यानं डिग्री न मिळवताच कॉलेज सोडलं आणि कोणत्याही विद्यापीठाच्या पदवीशिवाय गायन क्षेत्रात करिअर करण्यासाठी दक्षिण कोरियाला परतला. २००१ साली सायनं ‘Psy from the Psycho World!’ नावाचा पहिला अल्बम लाँच केला. त्याचा हा अल्बम वादग्रस्त ठरला. अल्बममधील कन्टेट आक्षेपार्ह असल्याचं सांगून दक्षिण कोरियाच्या सरकारनं त्याला दंड ठोठावला. त्याच्या अनेक अल्बममधील गाणी वादग्रस्त ठरली आहेत.



२०१२ मध्ये त्यानं ‘साय ६’ (Six Rules) नावाच्या अल्बमचा पहिला पार्ट लाँच केला. त्यामध्ये ‘गंगनम स्टाईल’ गाणं होतं. या गाण्यानं सायला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवून दिली. सायनं दिलेल्या माहितीनुसार, त्यानं केवळ ४८ तासांच्या कालावधीमध्ये हे व्हिडिओ गाणं तयार केलं आहे. चार मिनीट १२ सेंकद लांबीचं हे गाणं तयार करण्यासाठी कुठलेही स्पेशल इफेक्ट वापलेले नाहीत किंवा महागडे कॅमेरेदेखील वापरलेले नाहीत. शहरातील पार्क्स, रोड्स, ट्रेन्स आणि ‘टॉयलेट सीट्सटवर हे गाणं चित्रित केलेलं आहे.

२०१२ मध्ये रिलीज झाल्यानंतर गंगनम स्टाईल हे गाणं अल्पावधीतचं जगभरात हिट झालं होतं. गाण्याचं म्युजिक आणि डान्समुव्हज्-मुळं अनेकांना या गाण्याचं वेड लागलं होतं. क्रिकेटच्या मैदानापासून ते हॉलिवुड-बॉलिवुड पार्ट्यांमध्येसुद्धा सेलिब्रेटी या गाण्यावर थिरकले होते. दक्षिण कोरियन गायक सायच्या गंगनम स्टाईल गाण्याच्या व्हिडिओनं युट्युब व्ह्युव काउंटरची मर्यादा ओलांडली होती. त्यामुळे युट्युबला आपलं काउंटर देखील अपग्रेड करावं लागलं होतं.

डिसेंबर २०१४ पर्यंत युट्युबच्या व्ह्यू काउंटरसाठी ३२ बीट्सचा इंटीजर (पूर्णांक) वापरण्यात येत असे. एखाद्या माहितीचे प्रमाण आणि एकक दर्शवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. त्याची मर्यादा २ अब्ज १४ कोटी ७४ लाख ८३ हजार ६४७ इतकीच असते. पण गंगनम स्टाईल गाण्याला मिळालेले व्ह्यूज हे त्यापेक्षाही अधिक होते. त्यानंतर युट्युबनं आपली व्ह्यु लिमीट वाढवली. ही मर्यादा नऊ क्विंटिलियनपेक्षा जास्त करण्यात आली आहे. सध्या यु ट्युबची व्ह्यु लिमीट ९,२२३,३७२,०३६,८५४,७७५,८०८ इतकी आहे. हा आकडा पाहूनचं आपले डोळे फिरतात. तिचं वाचन कसं करायचं हा देखील एक मोठा प्रश्न पडला असेल. ९ क्विंटिलियन २२३ क्विड्रिलियन ३७२ ट्रिलीयन ३६ बिलीयन, ८५४ मिलीयन, ७७५ हजार ८०८ अशा प्रकारे ही संख्या वाचली जाते, तर भारतीय गणितानुसार ही संख्या सुमारे ९ परार्धापेक्षाही जास्त आहे.

डिसेंबर २०१४ मध्ये मात्र, गंगनम स्टाईल गाण्यामुळं यु ट्युबला बिट इंटीजरमध्ये बदल करावा लागला. कोरियन म्युझिक स्टार सायचं गाणे रिलीज झाल्यानंतर बिलबोर्डवर अनेक आठवडे पहिल्या दोन क्रमांकावर राहिलं होतं.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

याशिवाय यूके, ऑस्ट्रेलियामध्ये देखील या गाण्यानं पहिला क्रमांक पटकावला होता. आशिया, युरोप, दक्षिण आणि मध्य अमेरिका व युनायटेड स्टेट्समधील ३१ देशांमध्ये iTunes वर हे गाणं सर्वाधिक डाउनलोड केलं गेलं होतं. ही पहिलीचं वेळ होती जेव्हा एखादं कोरियन गाण्यानं जगातील मोठ-मोठ्या पॉपस्टार्सच्या गाण्यांना मात दिली होती.

कोरिया हा एक छोटा देश आहे. तरीही त्याचे टेलिव्हिजन ड्रामा, म्युजिक आणि चित्रपट संपूर्ण आशियामध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. कार, कॉम्प्युटर, फोन अशा कितीतरी गोष्टींची निर्यात करतो. तुम्हीसुद्धा दररोज अनेक कोरियन उत्पादनं वापरता. कोरियन पॉप साँग्ज हे देखील असंच उत्पादन आहे.

मात्र, त्याचा दर्जा आणि त्यात वापरलं गेलेलं तंत्रज्ञान अतिशय उच्च आहे. त्यामुळं पाश्चिमात्य देशांमध्ये देखील कोरियन गाणी प्रसिद्ध होत आहेत. अमेरिकेत तर कोरियन पॉपची सुरुवातच राष्ट्रीय टेलिव्हिजनपासून झाली. त्याठिकाणच्या लोकांनी ही गाणी रेडिओवर ऐकण्याऐवजी थेट पाहण्यास सरुवात केली. याशिवाय कोरियाला जगाच्या पाठीवरील सर्वात विचित्र देश मानलं जातं. त्याठिकाणचा कुठलाही व्हिडिओ सहज मोठी गर्दी खेचू शकतो. यासर्व कारणांमुळं गंगनम स्टाईल हे गाणं जगभरात प्रचंड लोकप्रिय झालं.

गेल्या काही वर्षांमध्ये सायच्या या गाण्यानं अनेक विक्रम आपल्या नावावर केले होते. २०१५ पर्यंत हे गाणं जगात सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या व्हिडिओच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर होत. २०१५ मध्ये आलेल्या ‘सी यु अगेन’ या गाण्यानं ‘गंगनम स्टाईल’ गाण्याला मागं टाकलं. विझ खलिफा आणि चार्ली पुत या दोघांनी गायलेलं हे गाणं आतापर्यंत सर्वात जास्तवेळा पाहिलेलं गाणं ठरलं आहे. मात्र, जितकी धूम सायच्या गंगनम स्टाईलनं निर्माण केली होती ती ‘सी यु अगेन’ला निर्माण करता आली नाही. कारण, त्या गाण्यासोबत पॉल वॉरच्या मृत्यूची करूण कहानी जोडली गेलेली होती.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

ऑस्ट्रेलियन क्रिकेटची बेअब्रू करणारा ‘टीम पेन’ काही पहिलाच खेळाडू नाही, ही घ्या पूर्ण यादी..!

Next Post

चिकन मंचुरियनचा शोध चीनमध्ये नाही तर मुंबईच्या क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये लागलाय..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

चिकन मंचुरियनचा शोध चीनमध्ये नाही तर मुंबईच्या क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये लागलाय..!

आपला 'बंधुभाव' जगासमोर व्यक्त करण्यासाठी दोन समाजवादी नेत्यांनी एकमेकांना किस केलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.