The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जगाला वेड लावणाऱ्या ‘क्वीन रॉक बँड’चा लीड सिंगर ‘फ्रेडी मर्क्युरी’ आपल्या साताऱ्यात शिकलाय

by द पोस्टमन टीम
5 September 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


१९७५ मध्ये ‘बोहेमियन रॅपसॉडी’ या गाण्यानं जगभरात धुमाकूळ घातला होता. हे गाणं ब्रिटिश रॉक बँड क्वीनचं होतं. जगाला वेड लावणाऱ्या या गाण्याचा जो गायक व गीतकार आहे त्याचं आणि आपल्या महाराष्ट्राचं घट्ट नातं आहे. आपल्याचं या मातीमध्ये त्याची संगीताची तालीम सुरू झाली होती. ‘फ्रेडी मर्क्युरी’, असं या गायकाचं नाव आहे. फ्रेडीनं संपूर्ण संगीत विश्वाचं रूप पालटलं असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यानं आपल्या कारकिर्दीत संगीताच्या चाहत्यांना अनेक नजराणे पेश केले.

५ सप्टेंबर १९४६ रोजी एका पारशी कुटुंबात फ्रेडीचा जन्म झाला होता. तो गायक, गीतकार, रेकॉर्ड निर्माता आणि रॉक बँड क्वीनचा मुख्य गायक म्हणून जगाला परिचित आहे. रॉक संगीताच्या इतिहासातील एक सर्वकालीन महान गायक म्हणून त्याची ओळख आहे. त्याचं भारदार व्यक्तिमत्व आणि फोर-ऑक्टॅव्ह व्होकल रेंज श्रोत्यांना अगदी मंत्रमुग्ध करत. जंझीबार येथे जन्म झालेल्या फ्रेडीला शिक्षणासाठी त्याच्या आई-वडिलांनी बोर्डींग स्कूलमध्ये ठेवलं होतं.

१९५४ मध्ये वयाच्या सातव्या वर्षी त्याची रवानगी सातारा जिल्ह्यातील पाचगणीच्या सेंट पीटर्स स्कूलमध्ये करण्यात आली. हे एक ब्रिटिश शैलीचं मुलांसाठीचं बोर्डींग स्कूल होतं. पाचगणीत असताना त्यानं पियानो शिकण्यास सुरुवात केली होती आणि वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी शाळेत ‘हेक्टिक्स’ नावाचा एक बँड तयार केला होता.

या शाळेतचं त्याला फ्रेडी हे नाव मिळालं. तो फक्त वेस्टर्न पॉप म्युझिक ऐकत असे. त्याला त्याचं वेडचं होतं. त्याच्याकडं रेडिओ ऐकण्याची आणि तेचं गाणं पियानोवर पुन्हा वाजवण्याची विलक्षण क्षमता होती, असं त्याचे शाळेतील मित्र सांगतात. फेब्रुवारी १९६३मध्ये ते जंझीबारला त्याच्या आई-वडिलांकडे परत गेला.

१९६४च्या वसंत ऋतूमध्ये, जंझीबारमधील क्रांतीच्या हिंसाचारापासून बचाव करण्यासाठी त्याचं कुटुंब इंग्लंडमध्ये निघून गेलं. मिडलसेक्समधील हॅमिल्टन क्लोज १९, या भागात ते स्थायिक झाले. वेस्ट लंडनमधील आयलवर्थ पॉलिटेक्निकमध्ये फ्रेडीनं शिक्षण घेतलं. १९६९मध्ये इलिंग आर्ट कॉलेजमधून त्यानं ग्राफिक आर्ट आणि डिझाइनची पदवी घेतली. पदवीनंतर, फ्रेडी विविध बँडमध्ये सामील झाला. सोबतचं त्यानं लंडनमधील केन्सिंग्टन मार्केटमध्ये रॉजर टेलरसह सेकंड-हॅन्ड एडवर्डियन कपडे आणि स्कार्फ विकले.



टेलर सांगतो की, “त्यावेळी, मी त्याला गायक म्हणून ओळखत नव्हतो. त्याला संगिताचं प्रचंड वेड होतं. तो माझा एक क्रेझी पार्टनर होता. आम्ही दोघांनी खूप धमाल केली.” हिथ्रो विमानतळावर बॅगेज हँडलर म्हणूनही त्यानं काही दिवस नोकरी केली होती.

१९६९मध्ये, तो लिव्हरपूलमधील ‘आयबेक्स बँड’मध्ये सामील झाला (नंतर या बँडचं नाव ‘रेकेगेज’ ठेवलं गेलं). हा बँड हेन्ड्रिक्स-शैलीतील हेवी ब्लूज् साठी प्रसिद्ध होता. त्यानंतर फ्रेडी ऑक्सफर्डमधील ‘सोर मिल्क सी’ या बँडध्ये सामील झाला. परंतु, १९७०च्या सुरुवातीला हा बँडही तुटला. एप्रिल १९७० मध्ये, फ्रेडीनं गिटारीस्ट ब्रायन मे आणि ड्रमर रॉजर टेलरसोबत एकत्र येऊन स्माईल नावाचा बँड तयार केला. फ्रेडी मुख्य गायक होता.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

पुढे १९७१ मध्ये बॅसिस्ट जॉन डीकन त्यांना सामील झाला. नंतर फ्रेडीनं बँडसाठी ‘क्वीन’ हे नाव निवडलं. क्वीन हे नाव युनिर्व्हसल आणि प्रत्येकाच्या जवळ जाणारं होतं.

क्वीन्सच्या ग्रेटेस्ट हिट्स अल्बमच्या १७ गाण्यांपैकी १० गाणी फ्रेडीनं लिहिली होती. बोहेमियन रॅपसॉडी, सेव्हन सीज् ऑफ राय, किलर क्वीन, समबडी टू लव्ह, गुड ओल्ड-फॅशन लव्हर बॉय, वी आर द चॅम्पियन्स, बायसिकल रेस, डोन्ट स्टॉप मी नाऊ, क्रेझी लिटल थिंग कॉल्ड लव्ह, आणि प्ले द गेम या एव्हरग्रीन गाण्यांचा त्यात समावेश आहे. २००३ मध्ये फ्रेडीला मरणोत्तर गीतकारांच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समाविष्ट करण्यात आलं.

२००५ मध्ये क्वीन बँडच्या चारही सदस्यांना आयव्होर नोव्हेलो पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 2002 मध्ये, बीबीसीच्या ‘१०० ग्रेटेटेस्ट ब्रिटन्स’ सर्वेक्षणात फ्रेडी ५८व्या क्रमांकावर आहेत. २०१८ मध्ये त्याच्या आयुष्यावर ‘बोहेमियन रॅपसॉडी’ नावाचा चित्रपट काढण्यात आला आहे.

संगीतानं त्याला जगभर प्रसिद्धी दिली. मात्र, त्याचं वैयक्तीक आयुष्य काहीसं वादळी ठरलं. ७० च्या दशकाच्या सुरुवातीला फ्रेडी आणि मेरी ऑस्टिन रिलेशनशीपमध्ये होते. त्या दोघांची भेट गिटारीस्ट ब्रायन मेच्या माध्यमातून झाली होती. लंडनमधील वेस्ट केन्सिंग्टनमध्ये अनेक वर्षे तो ऑस्टिनसोबत राहिला. नंतर मात्र, फ्रेडीनं डेव्हिड मिन्स या अमेरिकन रेकॉर्ड एक्झिक्युटिव्हशी अफेयर सुरू केलं. १९७६मध्ये मेरी ऑस्टीन आणि फ्रेडीचं ब्रेकअप झालं. मात्र, फ्रेडीनं मेरीला एक घर खरेदी करून दिलं होतं आणि तो स्वत: डेव्हिड मिन्स राहू लागला.

मेरी आणि फ्रेडीचं नात शेवटाला गेलं नसलं तरी ते दोघे कायम एकमेकांचे मित्र बनून राहिले. १९८५मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत ‘एकुलती एक आणि खरी मैत्रीण’ म्हणून फ्रेडीनं मेरीचा उल्लेख केला होता. मेरीनंतरही त्याच्या अनेक प्रेयसी झाल्या मात्र, तिची जागा कुणीच नाही घेऊ शकलं. ऑस्टीनचा मोठा मुलगा, रिचर्ड, फ्रेडीला ‘गॉडफादर’ मानत होता.

फ्रेडी समलैंगिक होता आणि त्यानं आपली लैंगिक प्रवृत्ती(सेक्शुअल ओरिएंटेशन) लोकांपासून लपवून ठेवल्याचा आरोप अनेकांनी केला होता. १९८६मध्ये ‘द सन’ टॅबलॉईडनं या वृत्तपत्रानं फ्रेडीला ‘बायसेक्शुअल रॉक स्टार’ म्हणून संबोधलं होतं.

संपूर्ण जगाला आपल्या तालावर नाचवणाऱ्या फ्रेडीला एड्सची लागण झाली होती. १९८७मध्ये त्याच्या आजाराचं निदान झालं होतं. तरी देखील तो काम करत राहिला. एड्सच्या गुंतागुंतीमुळे वयाच्या ४५व्या वर्षी १९९१ मध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर ‘क्विन’चा ‘मेड इन हेव्हन’ (१९९५) हा अल्बम आला होता. त्यात त्यानं अगोदर रेकॉर्ड करून ठेवलेली गाणी होती. त्याच्या मृत्यूनंतर श्रद्धांजली म्हणून वेम्बली स्टेडियमवर एक कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. फ्रेडी एक दानशूर व्यक्ती होता. हयात असताना अनेक ठिकाणी आपली संपत्ती दान केली होती. मृत्यूनंतर आपली संपत्ती मेरी ऑस्टीन, बहिण कश्मिरा कूक यांना द्यावी, अशी तरतूद त्यानं केली होती. संगीत फ्रेडीच्या रक्तात भिनलेलं होतं. तो आयुष्यभर आपल्या पॅशनसाठी जगला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

सद्दाम हुसेनचा मुलगा उदय एखाद्या सैतानापेक्षा किंचितही कमी नव्हता

Next Post

तुर्कीतल्या आर्मेनियन लोकांच्या नृशंस शिरकानाविषयी कुठेच वाच्यता केली जात नाही

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

तुर्कीतल्या आर्मेनियन लोकांच्या नृशंस शिरकानाविषयी कुठेच वाच्यता केली जात नाही

हॉलिवूड सुपरस्टार 'जॅकी चॅन'चे वडील जासूस तर आई स्मग्लर होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.