The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संग्रहालयांमध्ये दिसणाऱ्या ‘फिजी मरमेड’ नेमक्या आहेत तरी काय..?

by द पोस्टमन टीम
4 August 2025
in मनोरंजन, ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


मत्स्यकन्या म्हणजे मरमेड हा लहान-मोठ्यांसाठी कायम कुतुहलाचा विषय राहिला आहे. या मरमेडविषयी विविध पुरातन ग्रंथांमध्येही अनेक दंतकथा सांगितलेल्या आहेत. त्यांच्या अस्तित्त्वाबाबत देखील अनेक अफवा आहेत.

१८४०च्या दरम्यान मात्र, एक मरमेड जगप्रसिद्ध झाली होती. शोमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पी. टी. बर्नमनं ‘फीजी मरमेड’ नावानं मत्स्यकन्येचा एक सांगाडा सर्वांना दाखवला होता. त्यावेळी झालेल्या सर्वात मोठ्या फसवणुकींपैकी एक ही फीजी मरमेड होती. न्यूयॉर्क, बोस्टन आणि लंडनमध्ये या मरमेडचे प्रदर्शन करण्यात आलं. सगळ्या जगाला कोड्यात टाकणार हे मत्स्यकन्या प्रकरण होतं तरी काय?

स्टीव्हन सी. लेव्ही यांनी ‘वेस्टर्न फोकलॉर’ या जर्नलमध्ये ‘पी.टी. बर्नम अँड फीजी मरमेड’ नावाचा एक निबंध लिहलेला आहे. त्यात त्यांनी या मरमेडच्या उगमाविषयी शक्यता वर्तवली आहे. लेव्ही यांच्यामते १८००मध्ये जपानी मच्छीमारांनी गंमत म्हणून ही फीजी मरमेड तयार केली होती.

मरमेडसारख्या अनेक चमत्कारी प्रतिकृती जपान व पूर्व भारतीय खेड्यांमध्ये धार्मिक प्रथांसाठी वापरल्या जातात. ही फीजी मरमेड देखील याच कारणासाठी तयार केलेली असावी, अशी शक्यता होक्ससच्या संग्रहालयातील अ‍ॅलेक्स बोस यांनी व्यक्त केलेली आहे. 

जान बॉन्डसन यांनी लिहिलेल्या ‘द फिजी मरमेड अँड अदर एसेज इन नॅचरल अँड अननॅचरल हिस्टरी’नुसार फिजी मरमेड म्हणजे वानराच्या मुंडक्याला माशांचं शरीर शिवलेलं होतं.



फीजी मरमेड कदाचित १८१०च्या दशकात डच व्यापाऱ्यांना विकण्यात आली. कारण, त्यावेळी फक्त डच लोकांना जपानबरोबर व्यापार करण्याची परवानगी होती. पुढे १८५३ मध्ये कमोडोर मॅथ्यू पेरीनं जपान आणि उर्वरित पाश्चात्य जगाचा व्यापार खुला केला. त्यावेळी देखील अशा अनेक बनावट मरमेड चर्चेत आल्या होत्या.

हान्स क्रिस्टीन अँडरसन, शेक्सपियर आणि इतरांनी वर्णन केलेल्या सुंदर मरमेडसारख्या या दिसत नव्हत्या. मात्र, तरी देखील एशियन मर्मेड्सची रचना इतकी चांगली होती की कुणीही त्यांना खऱ्याखुऱ्या मरमेड म्हणून सहज फसेल. डचांनी ताब्यात घेतल्यानंतर ही फिजी मरमेड इंग्लंडला गेली. डच व्यापारी जहाज बुडालं मात्र, सॅम्युअल बॅरेट एडेस नावाच्या अमेरिकन कॅप्टनंन क्रू आणि या मरमेडला वाचवलं.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

एडेस ही मरमेड पाहून इतका मोहित झाला होता की त्यानं जानेवारी १८२२ला ती डचांकडून विकत घेतली. मरमेडची ६ हजार डॉलर्स किमंत देण्यासाठी त्यानं आपलं जहाज देखील विकलं होतं.

सप्टेंबर १८२२ मध्ये, एडेस या मरमेडसह लंडनमध्ये आला. तिथं एका कॉफी हाउसमध्ये त्यानं ती प्रदर्शनात ठेवली. या मरमेडची शहरभर चर्चा होती. दररोज शेकडो लोक १ शिलिंग किंमत देऊन तिला पाहण्यासाठी येत.

लंडनमध्ये आल्यानंतर एडेसनं मरमेडची तपासणी करण्यासाठी दोन नामांकित निसर्गशास्त्रज्ञांना बोलवलं. त्यांनी ती मरमेड बनावट असल्याचं सांगितलं. मात्र, एडेसची अवस्था अखंड प्रेमात बुडालेल्या तरूणासारखी झाली होती. त्यामुळं तो मरमेड खोटी असल्याचं सत्य स्वीकारण्यास तयार नव्हता. नंतर त्यानं दोन कमी अनुभव असलेल्या निसर्गशास्त्रज्ञांचा सल्ला घेतला आणि त्यांनी ती खरी असल्याचा शिक्का दिला.

त्यानंतर १८४० च्या सुरूवातीला बोस्टन संग्रहालयाचे मालक मोसेस किमबॉल, एडेसच्या मुलाला भेटले आणि त्यांनी ‘जलपरी’ विकत घेतली. १८४२ला किमबॉल बोस्टनहून आपला मित्र पी. टी. बर्नम याच्याकडे न्यूयॉर्कला आला. त्यावेळी बर्नमनं नुकतचं एक संग्रहालय खरेदी केलं होतं.

दोघांनी मिळून फिजी मरमेड तिथे प्रदर्शनात ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यापूर्वी दोघांनी एक कथा रचली. त्यांनी माध्यमांना सांगितलं की, किमबॉल लंडनमधील निसर्गशास्त्रज्ञ डॉ. ग्रिफिन यांना भेटला होता आणि त्यांनी देखील ही मरमेड खरी असल्याची खात्री केलेली आहे. प्रत्यक्षात असा कुणीही व्यक्ती अस्तित्वात नव्हता. त्यांनी एका नवोदित संशोधकाला डॉ. ग्रिफिन म्हणून समोर आणलं.

असं सांगितलं जातं की, याचं डॉ. ग्रिफिन आणि बर्नम या दोघांनी मिळून पुढील कित्येक वर्ष जगाची फसवणूक केली. ठरल्याप्रमाणं त्यांनी न्यूयॉर्कच्या कॉन्सर्ट हॉलमध्ये फिजी मरमेड प्रदर्शनास ठेवली. मरमेडला पाहण्यासाठी हजारो लोकांची गर्दी उसळली होती. विशेष म्हणजे, त्याठिकाणी हा तोतया निसर्गशास्त्रज्ञ आलेल्या लोकांना लेक्चरही देत होता.

बर्नमनं फिजी मरमेडचं न्यूयॉर्कमध्ये बऱ्याच ठिकाणी प्रदर्शन केलं. त्यानंतर, त्यानं तिला दक्षिण अमेरिकेच्या दौर्‍यावर पाठविण्याचं ठरवलं. याची जबाबदारी त्यानं आपल्या काकावर, अ‍ॅलन्सन टेलरवर दिली. बर्नम मुळातचं शोमॅन म्हणून प्रसिद्ध होता. त्याच्याकडे आपल्याकडील गोष्ट लोकांच्या गळी उतरवण्याचं कौशल्य होतं. मात्र, त्याच्या काकाकडे या गोष्टीचा अभाव होता.

चार्लस्टनमध्ये, टेलर दोन स्थानिक वृत्तपत्रांमधील संघर्षाच्या मध्यभागी सापडला. मरमेड खरी असल्याचं एका वृत्तपत्राचं म्हणणं होतं तर दुसर्‍यानं ठासून सांगितलं की फिजी मरमेड एक फसवणूक आहे. मरमेडच्या विरोधात असलेल्या लोकांच्या एका गटानं टेलरला जाहीरपणे धक्काबुक्की केली आणि ती नष्ट करण्याची धमकी देखील दिली. त्यामुळं तिथून त्याला आपला गाशा गुंडाळावा लागला.

चार्ल्सटनहून परत आल्यानंतर फिजी मरमेड पुन्हा न्यूयॉर्कमधील बर्नमच्या ‘अमेरिकन’ संग्रहालयात ठेवण्यात आली. अ‍ॅलेक्स बोसच्या म्हणण्यानुसार, १८५९ मध्ये, बर्नमने आपल्या लाडक्या जलपरीला पुन्हा लंडनच्या दौर्‍यावर नेलं. त्याठिकाणी पुन्हा ती लोकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरली.

जेव्हा बर्नम अमेरिकेत परत आला तेव्हा फीजी मरमेडला बोस्टनमधील किमबॉलच्या संग्रहालयात ठेवण्यात आलं. हे या मरमेडचं शेवटचं ज्ञात ठिकाण आहे. कारण, एक दिवस किमबॉलच्या संग्रहालयाला आग लागली. त्या आगीतून फिजी मरमेडला वाचवण्यात आलं की नाही याबाबत दुमत आहे. 

काही सूत्रांच्या माहितीनुसार संग्रहालयातील अवशेषांमध्ये मरमेड सापडली होती. पुढे १८९७मध्ये किमबॉलनं हावर्ड विद्यापीठाच्या संग्रहालयाला मरमेड दान केली. हावर्डकडे याबाबत काहीही डॉक्युमेंटशन उपलब्ध नाही. त्या ठिकाणी ती आजही आहे. मात्र, ती खरी आहे खोटी हे किमबॉलच जाणो!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

अंतराळवीरांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये केलं होतं ऑलिम्पिक खेळांचं आयोजन

Next Post

या हिरव्या त्वचेच्या मुलांनी कित्येक वर्षे शास्त्रज्ञांना कोड्यात टाकलं होतं

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

या हिरव्या त्वचेच्या मुलांनी कित्येक वर्षे शास्त्रज्ञांना कोड्यात टाकलं होतं

या भामट्याने ताजमहाल, संसद, लाल किल्ला आणि राष्ट्रपती भवनसुद्धा विकलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.