The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

…तेव्हा इलॉन मस्कलाही रतन टाटांचं कौतुक करण्याचा मोह आवरला नव्हता..!

by द पोस्टमन टीम
21 November 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


रतन टाटा आणि एलॉन मस्क या दोन व्यक्ती जवळपास सर्वांनाच माहिती आहेत. ०९ ऑक्टोबर २०२४ रोजी रतन टाटा यांचे निधन झाले. पण ते कदापि विस्मरणात जाणार नाहीत. एक वेळ भारतातील लोकांना एलॉन मस्क माहिती नसेल मात्र, रतन टाटांना न ओळखणारा भारतीय सापडणं कठीणचं आहे. भारतामध्ये उद्योगांचा पाया रचणाऱ्या टाटा घराण्याचे वंशज असलेले रतन टाटा त्यांच्या समाजकार्यासाठी कायम चर्चेत असतात.

रतन टाटा हे केवळ भारतातीलच नव्हे तर जागतिक स्तरावरील सर्वात प्रतिष्ठित उद्योगपतींपैकी एक होते. जगभरात असे अनेक उद्योगपती आहेत ज्यांनी रतन टाटांचं कौतुक केलेलं आहे. जगभरातील दिग्गज लोक टाटांचा आदर करतात. यामध्ये टेस्ला आणि स्पेस एक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांचा देखील समावेश होतो. अब्जाधीश असलेल्या मस्कनं देखील रतन टाटांचं तोंडभरून कौतुक केलं होतं. त्यानंतर भारतीयांनी देखील मस्कच्या ‘कौतुकाचं कौतुक’ केलं होतं! मस्क टाटांबद्दल काय आणि केव्हा म्हणाला होता, हे जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा.

प्रसिद्ध अमेरिकन जर्नलिस्ट आणि टॉक शो होस्ट असलेल्या चार्ली रोजनं २००९ साली टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क यांची एक मुलाखत घेतली होती. आपल्या पाहुण्याला गोडीगुलाबीत प्रश्न विचारून त्याच्या मनातील चांगल्या-वाईट गोष्टी बाहेर काढण्यात चार्लीचा हातखंडा आहे. त्यानं मस्कला देखील जगभरातील वाहन निर्मिती उद्योगासह इतर अनेक प्रश्न विचारले होते.

वाहन निर्मिती उद्योग म्हटलं की, त्यामध्ये टाटांचं नाव हे येणारच होतं. चार्लीनं एलॉन मस्कला रतन टाटांच्या नॅनो कार प्रोजेक्टबद्दल प्रश्न विचारला होता. भारतामध्ये रतन टाटा अतिशय कमी किमतीत एक छोटीशी सेडान विकसित करत आहेत. अशा गाडीला भविष्य आहे का? असा प्रश्न चार्लीनं मस्कला केला होता. या प्रश्नावर मस्कनं सविस्तर उत्तर दिलं होतं. सोबतचं त्यानं रतन टाटांची स्तुती देखील केली होती.



‘मी रतन टाटांना ओळखतो. ते एक सज्जन आणि विद्वान व्यक्ती आहेत. त्यांचा अनुभव दांडगा आहे, अशा शब्दांमध्ये मस्कनं टाटांचं कौतुक केलं होतं. मात्र, मस्कला टाटांच्या नॅनो प्रोजेक्टच्या यशाबद्दल शाश्वती नव्हती. तसं त्यानं आपल्या मुलाखतीमध्ये उघडपणे सांगितलं देखील होतं. सामान्य नागरिकांसाठी स्वस्त गाडी बाजारामध्ये उपलब्ध करून देणं ही नक्कीच कौतुकाची गोष्ट आहे.

मात्र, लाखभर रुपये किंमतीच्या गाडी खरेदी करणाऱ्यांना भविष्यात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कारण, गाडीला लागणाऱ्या इंधनाचे दर सातत्यानं कमी-जास्त होतात. भविष्यामध्ये तर दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशावेळी गाडीच्या किमतीपेक्षा तिचा इतर खर्चचं जास्त होण्याची शक्यता आहे, असं परखड मत मस्कनं व्यक्त केलं होतं. एका उद्योगपतीच्या आणि वाहन निर्मात्याच्यादृष्टीनं विचार केला तर मस्कनं दिलेल्या उत्तरामध्ये नक्कीच तथ्य होतं.

मार्च २००९ मध्ये टाटांनी बाजारात नॅनो लॉन्च केली होती. नॅनोच्या निर्मितीसाठी जास्त खर्च आलेला असून देखील टाटांनी गाडीची मूळ किंमत एक लाख रुपयेच ठेवली होती. कारण, टाटा आपला शब्द पाळण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी भारतीयांना लाखभर रुपयांमध्ये कार उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला होता. किंबहुना ते त्यांचं स्वत:चं देखील स्वप्न होतं. म्हणून त्यांनी लाख रुपयांमध्ये कार विकली.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

मात्र, एलॉन मस्कनं वर्तवलेल्या शक्यतेप्रमाणं नॅनोला म्हणावं तसं यश मिळालं नाही. २०११च्या दशकामध्ये भारतात मोठ्या प्रमाणात इंधन दरवाढ झाली. पुढे २०१९मध्ये टाटांनी भारतात नॅनो कारची निर्मिती बंद केली. मात्र, इंधन दरवाढ ही नॅनोची निर्मितीबंद होण्यामागचं कारणं नव्हतं. नॅनो लाँच केल्यानंतर काही दिवसातच एका गाडीला आग लागली होती. त्यामुळं लोकांच्या मनामध्ये गाडीच्या सुरक्षिततेबाबत शंका निर्माण झाल्या होत्या.

जुलै २०१५ मध्ये रतन टाटा यांनी देखील, आपला नॅनो लाँच करण्याचा निर्णय फसल्याचं मान्य केलं होतं. मात्र, बिझनेस हा रिस्कवर चालतो. अनेकदा तुमच्या मनाला बरोबर वाटणारी गोष्ट व्यावसायिकदृष्ट्या चुकीची ठरू शकते. नॅनोची मागणी घटल्यानं तिचं उत्पादन बंद करावं लागलं, असे टाटा म्हणाले होते.

ज्याप्रमाणं एलॉन मस्कला टाटांविषयी प्रश्न विचारण्यात आला होता, तसाच प्रश्न २०१४ मध्ये रतन टाटांना देखील विचारण्यात आला होता. नेहमी लोकांच्या खिशाचा विचार करून कार निर्मिती करणाऱ्या टाटांनी मात्र, टेस्लाच्या महागड्या गाड्यांवर टीका केली होती. टेस्लाच्या गाड्यांमध्ये बिघाड झाल्यास त्या गॅरेजमध्ये नाही तर सॉफ्टवेअर इंजिनियरकडे घेऊन जाव्या लागतील. एखाद्याला जर टेस्लाची गाडी खरेदी करायची असेल तर नक्कीच त्याच्या डोक्यावर कर्जाचा मोठा डोंगर उभा राहिल, असे टाटा म्हणाले होते.

रतन टाटा १९९१ पासून २०१२ पर्यंत टाटा सन्सचे अध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळात, टाटा समूहाच्या उत्पन्नात अनेक पटींनी वाढ झाली. रतन टाटा हे टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा पॉवर, टाटा ग्लोबल बिव्हरेजेस, टाटा केमिकल्स, इंडियन हॉटेल्स आणि टाटा टेलिसर्व्हिसेस या प्रमुख टाटा कंपन्यांचे अध्यक्ष होते. त्यांच्या निवृत्तीनंतर, रतन टाटा यांना टाटा सन्स, टाटा इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, टाटा स्टील आणि टाटा केमिकल्सचं मानद अध्यक्षपद बहाल करण्यात आलं होतं.

भारत आणि परदेशातील विविध संस्थांशीही त्यांचा संबंध आहे. टाटा हे मित्सुबिशी कॉर्पोरेशन आणि जेपी मॉर्गन चेसच्या आंतरराष्ट्रीय सल्लागार मंडळावर होते. कामातून पूर्णवेळ निवृत्त झाल्यानंतर त्यांनी समाजसेवेवर आपलं पूर्ण लक्ष केंद्रित केलं होतं. त्यांच्या दानशूरपणामुळं आजही त्यांना समाजात मोठ्या प्रमाणात आदर मिळतो.

तर, विद्युत कार निर्माता आणि टेस्लाचा संस्थापक असलेला एलॉन मस्क अंतराळ आणि पृथ्वीवरील वाहतूक क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणण्याचे काम करत आहे. २०१८मध्ये त्यानं कंपनीचं अध्यक्षपद सोडलं होतं. आता स्पेस एक्सच्या माध्यमातून त्यानं अंतराळ क्षेत्रामध्ये नवनवीन उच्चांक प्रस्थापित करण्याचा निश्चय केला आहे.

पहायला गेलं तर एलॉन मस्क आणि रतन टाटा दोघेही आपापल्या कामामध्ये दिग्गज आहेत. दोघांनीही ऑटोमोबाइल व्यवसायात क्रांती आणली आहे. दोघांचेही जगभरात कोट्यवधी चाहते आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

‘थ्री चाईल्ड पॉलिसी’ आणूनही चीनचा जन्मदर एक टक्क्यांपेक्षाही खाली आलाय..!

Next Post

वेगळ्या मणिपूर देशाची मागणी करणाऱ्या संघटना काय आहेत..?

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

वेगळ्या मणिपूर देशाची मागणी करणाऱ्या संघटना काय आहेत..?

क्रिप्टो करन्सी जुन्या झाल्या, मार्केटमध्ये नवीन गोष्ट आलीये ती म्हणजे NFT..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.