The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ती मुकी हिरकणी माणसाला माफ करेल का?

by Adv Anjali Zarkar
3 June 2020
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


निसर्गासाठी छोट्या मुंगीपासून ते अजस्त्र हत्तीपर्यंत, छोट्या पक्ष्यापासून ते माणसापर्यंत सगळे प्रिय असतात. सृष्टी हीच शक्ती आणि सगळी तिची लेकरे तिच्यासाठी समान. हा न्याय निसर्गातील सगळे प्राणी पाळतात फक्त माणूस सोडून!

कुठलाही प्राणी मादीच्या इच्छेशिवाय तिचा उपभोग घेत नाही, कुठलाही प्राणी भूक नसताना दुसऱ्या प्राण्यावर हल्ला करत नाही पण स्वतःच्या महत्वाकांक्षेसाठी आई-बापाच्या डोक्यात दगड घालणारी क्रूर हंडगी जात फक्त माणसाची असते! त्याला हत्तीच्या जीवाचं काय पडतंय!

नदीच्या मधोमध निश्चल उभी असलेल्या एका हत्तीणीचा फोटो सोशल मीडियावर फिरतोय. त्या फोटोबाबतची कहाणी अत्यंत करूण आहे.

केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील वेल्लीयार नदीत उभा राहिलेल्या गर्भवती हत्तीणीचा तो फोटो आहे. 27 में 2020 ला केरळ राज्याच्या एका वनअधिकारी, मोहन कृष्णन, यांनी “माफ कर बहिणी” म्हणून एक पोस्ट त्याबद्दल शेअर केली!



सायलेंट वॅली मधुन एक हत्तीण पलक्कड जिल्ह्यात भुकेने व्याकुळ होऊन फिरत होती. तिला कुणीतरी फटाक्यांनी भरलेला अननस खाऊ घातला. फटाके तोंडात फुटल्यामुळे तिचे तोंड आणि जीभ फाटली.

त्याही अवस्थेत तिने आजुबाजुच्या कुठल्याही माणसाला मारले नाही, कुठल्याही इमारतीला इजा केली नाही, रागाने कसली नासधूस केली नाही, शांतपणे पाण्याच्या शोधत ती चालत राहिली!

शेवटी तिला नदी दिसल्यावर नदीच्या मधोमध जाऊन ती शांत उभी राहिली. वन विभागाला माहिती कळल्यावर मोहन कृष्णन तिथे पोचले. तिने बाहेर यावं म्हणून दोन हत्तीसुद्धा पाण्यात सोडले गेले तिला वाट दाखवण्याकरता पण ती बाहेर आली नाही. पाण्यात डोकं खुपसून निश्चल राहिली! दिवसभर वन विभागाने प्रयत्न केले आणि शेवटी 5 च्या सुमारास तिने जलसमाधी घेतली. त्यानंतर केलेल्या पोस्टमोर्टममध्ये कळलं की ती गर्भवती होती.

हे देखील वाचा

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

मोहन कृष्णन यांनी लिहिलंय आम्ही तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो तिने तो नाकारला! माणसाच्या कृतीचा तिने केलेला तो निषेध होता! तिला त्यांच्यावर विश्वास ठेवावा वाटला नाही! तिने नदीतून बाहेर येण्याचं नाकारलं.

20 महिने लागतात एक हत्तीचं बाळ बाहेर यायला. नदीत उभी राहिली तेव्हा काय भावना असतील तिच्या? तिच्या पोटातल्या बाळाला फटाक्याच्या वेदना होऊ नये म्हणून बाहेर नसेल का आली ती? वेदना सहन करण्याच्या पलीकडे गेल्या म्हणून, बाळ सुरक्षित राहिलं पाहिजे म्हणून पाण्यात डोकं खुपसून निश्चल राहिली असेल का ती?

1200 फुटांचा कडा हिरकणी फक्त बाळाला दूध पाजता यावं म्हणून उतरली होती. आईपण निभावण्यासाठी आई स्वतःचे प्राण पणाला लावते मग ती माणसातली आई असो नाहीतर प्राण्यांमधली!

एका गर्भार हत्तीणीला फटाके चारून काय मिळवलं आपण? असं समजू नका तुम्ही घरात बसला आहात म्हणून तुम्ही जबाबदार नाही! माणूस म्हणून केलेल्या असल्या हीन अत्याचाराची फळे सामूहिक नशिबाच्या (collective fate) रुपाने प्रत्येक माणसाच्या वाट्याला येतात!

कोरोना, चक्रीवादळ, आग ही सगळी प्रलयाची रूपे भूतकाळात केलेल्या पापाची गोळाबेरीज असेल का? असा प्रश्न मी फालतू म्हणून उडवून लावणार इतक्यात नदीच्या पाण्यात निश्चल उभा राहिलेल्या हिरकणी हत्तीणीचा चेहरा माझ्या समोर येतो! डोळ्यात खळणारं पाणी थांबवणं मुश्किल होऊन जातं!

एका मुक्या आईच्या आक्रोशाचा न्याय कदाचित माणसांनी बनवलेल्या कोर्टात होणार नाही पण लक्षात ठेवा जेव्हा निसर्ग न्याय करायला उतरेल तेव्हा तुमच्या गर्वाची, नीचपणाची मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही! या मृत्यूचा न्याय व्हावा!

कधी न भेटलेल्या प्रिय हिरकणीसाठी!

लेखक – ऍड अंजली झरकर 


या माध्यमावर व्यक्त केलेली मते संबंधित लेखकाची असतात. संपादक मंडळ त्याच्याशी कदाचित सहमत असू शकते. 
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

मुंडे साहेबांनी मुंबईतून अंडरवर्ल्डची दहशत कायमची संपवली होती..!

Next Post

ट्रम्पच्या पराभवात वाटा असलेली ‘अँटीफा’ संघटना काय आहे?

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

2 May 2024
Next Post

ट्रम्पच्या पराभवात वाटा असलेली 'अँटीफा' संघटना काय आहे?

बौद्ध धर्माचे भाष्यकार द्वितीय बुद्धघोष धर्मानंद कोसंबी

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.