The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्राचीन इजिप्तमध्ये शोध लागलेल्या या गोष्टींचा आपण आजही वापर करतो

by द पोस्टमन टीम
6 November 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


इजिप्तचे नाव घेताच आपल्या डोळ्यासमोर विशाल पिरॅमिड्स आणि अशाच काही गूढ गोष्टींच्या कहाण्या उभ्या राहतात. पण काही आश्चर्यकारक गोष्टीही आपल्याला इजिप्तमध्ये पाहायला मिळतील. उदाहरणार्थ, इजिप्शियन कारागिरांनी प्रथमच ‘संपा’चा शोध लावला आणि संप सुरु केला. तसेच याच इजिप्शियन लोकांनी मगरीच्या विष्ठेपासून गर्भनिरोधी औषध तयार केले.

इजिप्तचा इतिहास गणित तज्ज्ञांसाठी, ग्रीसच्या वैद्यकीय पद्धतींसाठी म्हणजेच युनानी औषधांसाठी आणि संरक्षित थडग्यांसाठी अर्थात ममींसाठी प्रसिद्ध आहे. जर जगातील ७ आश्चर्यांची आणि पर्यटनाची चर्चा होत असेल तर इजिप्तचे नाव नक्कीच घेतले जाते. हा देश पर्यटकांच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. आजही आपल्या जीवनाचा एक भाग असलेले अनेक शोधही प्राचीन इजिप्तमध्ये लागले होते, हे आपल्यापैकी काहीच जणांना ज्ञात असेल. त्याविषयीच जाणून घेण्यासाठी हा प्रपंच.

आतापर्यंत असे मानले जाते की चीनने जगाला कागद आणि पेनचा वापर शिकवला. पण प्राचीन इजिप्तची संस्कृती चीनपेक्षा अधिक प्रगत आणि अद्यायावत होती. इजिप्तमध्ये लिहिण्यासाठी एका विशिष्ट प्रकारच्या रसाचा वापर ‘शाई’ म्हणून केला जात असे. हा रस बनवण्याची पद्धत गुप्त ठेवण्यात आली होती. पण या रसाचा प्रचार इतर देशांमध्ये झाला आणि त्यानंतर त्याचा व्यापार सुरू झाला. इजिप्शियन पापारांनी प्रभावित होऊन, नंतर युरोपमध्ये चर्मपत्र आणि चीनमध्ये कागद सादर केले गेले.

याचबरोबर असेही मानले जाते की इजिप्तने जगाला वर्णमालेची ओळख करून दिली आणि ध्वन्यात्मक वर्णमाला तयार केली.  इजिप्तमध्ये मात्र प्रथम ध्वनी वर्ण वापरले गेले, नंतर नंतर प्रतीके किंवा अक्षरे वापरली गेली. इजिप्शियन ‘हायरोग्लिफ’ सुमारे १००० चित्रे होती, जी एखाद्या शब्द अथवा ध्वनीसाठी वापरली जात. हायरोग्लिफमध्येच पुढे २२ अक्षरी वर्णमाला विकसित झाली. याचेच विस्तृत रूप आज आपण वापरत आहोत!

चेंडूशिवाय कल्पनाही करता येत नाही असे फुटबॉल आणि क्रिकेटसारखे काही खेळ आहेत. खरंतर इजिप्त हा या खेळांच्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय संघाचा भाग नाही. असे असूनही सुमारे ५००० वर्षांपूर्वी सर्वप्रथम चेंडू इथेच वापरण्यात आला. १९३० साली प्रसिद्ध शास्त्रज्ञ सर पिल्डर्स यांनी इजिप्शियन कबरींचे उत्खनन केले.



या दरम्यान, त्यांनी ख्रिस्तपूर्व ३२०० मध्ये मरण पावलेल्या मुलाच्या थडग्यात दगडापासून बनवलेल्या बॉलच्या आकाराची आकृती पाहिली. संशोधनात असे दिसून आले की इजिप्शियन लोक मनोरंजनासाठी धातू आणि दगडापासून बनवलेला बॉल खेळत असत. पुरातत्त्वशास्त्रज्ञ ॲडा ब्रेस्सियानी आणि तिच्या टीमने कैरोच्या आसपास शोध घेतला. तेथे शिकण्यासाठी आणि गोलंदाजीसाठी खोल्या बांधलेल्या आहेत हे त्यांना आढळून आले.

इजिप्शियन लोक शरीरावर वाढणाऱ्या केसांचा तिरस्कार करत असत, परंतु देशातील हवामान गरम होते. अशा परिस्थितीत, जरी त्यांनी शरीराचे सर्व केस कापून टाकले तरी त्वचेला कडक उन्हापासून वाचवणे कठीण होते. हे टाळण्यासाठी इजिप्तमध्येच पहिल्यांदा ‘विग’ तयार करण्यात आले. विग सहसा प्राण्यांच्या केसांपासून बनवले जात. वितळलेल्या मेणाच्या मदतीने लोक आपल्या डोक्यावर विग ठेवत. मेणाच्या मदतीने ते सहज चिकटते आणि गरज पडल्यावर निघतेही. यामुळे डोक्यावर थेट सूर्यप्रकाशाचा परिणाम होत नाही.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

याशिवाय इजिप्तच्या लोकांना डोळ्यांमध्ये काजळ लावण्याची विशेष आवड होती. हिरवे आणि काळे काजळ सूर्याच्या किरणांपासून आणि हानिकारक संक्रमणांपासून त्यांचे संरक्षण करते अशी त्यांची समजूत होती. तसेच, सूर्यदेवांना नमन करण्याची त्यांची ती पद्धतच होती.

जसे इजिप्शियन लोकांना अंगावरचे केस आवडत नव्हते, तसेच तोंडातील घाणसुद्धा अजिबात सहन होत नव्हती. त्यांनी नेहमीच दात स्वच्छ ठेवले. इजिप्शियन संस्कृतीत, जो दात स्वच्छ करत नाही त्याचे वर्णन ‘दरिद्री’ म्हणून केले जाते. जेव्हा इजिप्शियन लोकांनी ममींना पुरले तेव्हा त्यांचे दात त्यांच्याबरोबर दफन केले. इजिप्शियन लोकांनी बैलांच्या खुरांची पावडर, जळलेल्या अंड्यांची साल आणि राख मिसळून दात स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्ट तयार केली होती.

काच पृथ्वीवर नैसर्गिकरित्या उपलब्ध आहे. पण, काचेची निर्मिती प्रथम इजिप्तमध्ये ख्रिस्तपूर्व ३२०० मध्ये मानवाने केली होती. इजिप्शियन सम्राट फारोच्या काळात कलाकृती आणि मातीची भांडी बनवण्यासाठी काचेचा वापर केला जात असे. मग काचेची भांडी  आणि फुलांसाठीची भांडी यांसारख्या इतर वस्तूही तिथे तयार केल्या गेल्या.

आशियाई देशांमध्ये कुलूप लावण्याची प्रथा सुरू झाली असेल, परंतु ही कल्पना प्रथम इजिप्शियन लोकांना आली. त्यांनी दरवाजा आतून आणि बाहेरून बंद करण्यासाठी कुलूप तयार केले. इजिप्शियन लोकांनी दरवाजाचे कुलूप तयार करण्यासाठी लाकूड आणि पितळ वापरले. त्यांचा हा शोध नंतर ग्रीक आणि रोमन राज्यांमध्येही वापरला गेला.

याच वेळी, वैद्यकीय क्षेत्रात इजिप्तने अनेक प्रयोग केले. उर्वरित जग जखमा भरण्यासाठी मर्यादित प्रमाणात औषधी वनस्पतींवर अवलंबून असताना इजिप्शियन सैन्याचे विविध वैद्यकीय उपयोग होते असे ‘एडविन स्मिथ पॅपिरस’ने नमूद केले आहे. त्यांनी झाडे, फुले आणि प्राण्यांच्या रक्तात सापडणाऱ्या घटकांपासून औषधे तयार केली. यानंतर, जखमा, फ्रॅक्चर, हाडे आणि ट्यूमर यासह सुमारे ४८ प्रकारच्या आरोग्याच्या समस्यांवर उपचार शक्य झाले.

सुश्रुत संहितेप्रमाणे इजिप्शियन लोकांनी शास्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणारी साधने तयार केली. यामुळेच शारीरिक आजार सहज बरे होऊ शकत होते. तसेच त्यांनी बॅक्टेरियाचा वापर करून अल्सरसारख्या आजारांवर उपचार सुरू केले.

आज जगात सर्वत्र आंदोलने आणि संप सुरु असतात. यामुळे अनेक मालकांचे अतोनात नुकसान होते. परंतु कामगारांनाही त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्याची संधी या अफलातून मार्गाद्वारे मिळते. तथापि, संप हा शब्द प्रथम इजिप्तमध्येच परिभाषित करण्यात आला. असे म्हटले जाते की जेव्हा ‘रॉयल ​​नेक्रोपोलिस बिल्डिंग’ वर काम करणाऱ्या कारागिरांना धान्याचा वाटा मिळाला नाही, तेव्हा त्यांनी जवळच्या मंदिरात आश्रय घेतला आणि काम करण्यास नकार दिला. जगातील पहिल्या संपाची ही सुरुवात होती.

अशा प्रकारे प्राचीन इजिप्तने जगाला अनेक देणग्या दिल्या आहेत. त्यामुळे मानवता ही फक्त युरोपीय देशांमुळे विकसित झाली हा अनेकांचा गोड गैरसमज आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

राजा राम वर्मन कुलशेखर हा इस्लामचा स्वीकार करणारा पहिला भारतीय राजा होता

Next Post

‘एमआयटी’मधील संगणकाने ‘विश्वाच्या अंताची’ भविष्यवाणी केली आहे.

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

'एमआयटी'मधील संगणकाने 'विश्वाच्या अंताची' भविष्यवाणी केली आहे.

१३ जणांना वाचवण्यासाठी १० हजार लोकांच्या टीमने जगातलं सगळ्यात मोठं रेस्क्यू ऑपरेशन केलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.