The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘कोकेन किंग’ पाब्लो एस्कोबारने गरिबांचा रॉबिनहूड बनायचा भरपूर प्रयत्न केला होता..!

by Heramb
30 November 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवरील नार्कोस ही चित्रपटमालिका पहिली असेल तर ‘पाब्लो एस्कोबार’ हे नाव तुम्हांला नवं वाटणार नाही. पाब्लो अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील होता. त्याने संपूर्ण कोलंबियामध्ये ड्र*ग संबंधी हिं*साचार चालवला.

पाब्लो एमिलियो एस्कोबार गेविरिया उर्फ पाब्लो एस्कोबार हा कोलंबियन ‘ड्रग लॉर्ड’ होता. तो मेडेलिन कार्टेलचा संस्थापक आणि एकमेव लीडर होता. पाब्लोला ‘किंग ऑफ कोकेन’ म्हणूनही ओळखले जात होते. तो इतिहासातील सर्वांत श्रीमंत ‘गुन्हेगार’ आहे. १९९० सालच्या सुरुवातीच्या काळात त्याची संपत्ती अंदाजे ३० अब्ज डॉलर्स होती.

अनेक प्रयत्नांनंतरही अमेरिकन पोलीस आणि इंटेलिजन्स टीम पाब्लोला पकडू शकले नाहीत. अखेरीस २ डिसेम्बर १९९३ रोजी पाब्लो एस्कोबार पोलीस एन्काउंटरमध्ये मारला गेला. हा फक्त एका गुन्हेगाराचा अंत नव्हता तर अनेक गुन्ह्यांसाठी जबाबदार असलेल्या जगातील सर्वात कुख्यात ड्र*ग डीलर्सच्या राज्याचा अंत होता.

सध्या, त्याची बहीण, लुझ मारिया एस्कोबार, एस्कोबारच्या पीडितांची माफी मागण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, बीबीसी या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये लूझ मारिया एस्कोबार म्हणते, “दररोज मी त्या सर्व लोकांचा विचार करते ज्यांना माझ्या भावामुळे अथवा त्याने छेडलेल्या यु*द्धामुळे त्रास सहन करावा लागला आहे किंवा अजूनही त्रास होत आहे.”

रिओनेग्रोमध्ये जन्मलेल्या आणि मेडेलिनमध्ये वाढलेल्या, एस्कोबारने मेडेलिनच्या ‘युनिव्हर्सिडॅड ऑटोनोमा लॅटिनो-अमेरिकाना’ येथे आंशिक शिक्षण घेतले. पदवी न घेताच त्याने विद्यापीठ सोडले. यानंतर तो गुन्हेगारी कृत्यांमध्ये गुंतू लागला, बेकायदेशीर सिगारेट आणि बनावट लॉटरी तिकिटे विकू लागला, तसेच कार चोरीमध्येही त्याचा सहभाग वाढू लागला होता. १९७० च्या दशकाच्या सुरुवातीस, त्याने विविध ड्र*ग्स तस्करांसाठी काम करण्यास सुरुवात केली, अनेकदा खंडणीसाठी त्याने किडनॅपिंगही केली.



१९७६ साली, एस्कोबारने मेडेलिन कार्टेलची स्थापना केली. या कार्टेलने ‘पावडर कोकेन’चे वितरण सुरु केले आणि युनायटेड स्टेट्समध्ये तस्करीचे पहिले-वहिले ड्र*ग-नेटवर्क स्थापित केले. एस्कोबारच्या यूएसमध्ये झालेल्या घुसखोरीमुळे कोकेनची प्रचंड मागणी निर्माण झाली आणि १९८० च्या दशकात एस्कोबारने कोलंबियामधून अमेरिकेमध्ये महिन्याला सुमारे ७० ते ८० टन कोकेन पोहोचवले असा अंदाज होता. त्यामुळे, तो लवकरच जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक बनला.

१९८० पासून ते १९९३ साली त्याच्या मृत्यूपर्यंत, पाब्लो एस्कोबार आणि त्याच्या कार्टेलमुळे कोलंबियातील गुन्हेगारीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. १९९१ साली, एस्कोबारची गुन्हेगारी सत्ता असलेल्या मेडेलिन शहरात १ लाख रहिवाशांमागे ३८१ रहिवाश्यांची ह*त्या होत असे. १९९१ साली सुमारे ७५०० लोक मारले गेले. एस्कोबारचे प्रमुख लक्ष्य राजकारणी, पोलीस अधिकारी, राज्य सुरक्षा दल, पत्रकार आणि न्याय अधिकारी होते.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

कोलंबियामधून अंमली पदार्थ तस्करांचे युनायटेड स्टेट्समध्ये प्रत्यार्पण करता येईल असा कायदा मंजूर होऊ नये यासाठी हे लोक एस्कोबारच्या घोषित यु*द्धात बळजबरीने सामील झाले होते. कारण त्याच्या यु*द्धात जो सामील होत नसत त्याचे मरण निश्चित होते. अशा प्रकारे, दक्षिण अमेरिकन राज्यांत बॉ*म्बस्फो*ट, अपहरण, छळ आणि ह*त्या हे गुन्हे अतिशय सामान्य झाले होते.

यापेक्षाही पुढे जाऊन राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला ठार मारण्याच्या प्रयत्नात एस्कोबारने विमानाचा स्फो*ट करण्यापर्यंत मजल मारली. विमानाचा स्फो*ट झाला तरी पाब्लोचे लक्ष्य अध्यक्ष म्हणून निवडून आलेले सीझर गेविरिया विमानात नव्हते, पण तरीही यामध्ये १०० लोकांना आपले प्राण गमवावे लागले. एस्कोबारची रणनीती सोपी होती, एकतर लाच किंवा बंदुकीची गोळी!!

एकेकाळी पाब्लो एस्कोबार जगातील सातवा सर्वांत श्रीमंत माणूस होता आणि त्याच्या कार्टेलने जगातील ८० टक्के कोकेन मार्केटवर ताबा ठेवला होता. त्याच्या बहिणीने तिला ड्रग ट्रॅफिकिंगमध्ये तिच्या भावाच्या सहभागाबद्दल काहीही माहित नसल्याचे १९८० साली सांगितले. त्याने मृत्युपत्र तयार केल्यानंतर तिला हे सगळे कळाले. एप्रिल १९८४ मध्ये एस्कोबारच्या आदेशानुसार न्यायमंत्री ‘रॉड्रिगो लारा बोनिला’ यांची ह*त्या झाली यावेळी तिच्या भावाच्या सामर्थ्याची तिला प्रचिती आली.

एस्कोबारने ड्रग कार्टेलमधून मिळालेल्या प्रचंड संपत्तीमधून स्वतःची आधुनिक ‘रॉबिन हूड’ची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला आणि केवळ मेडेलिनमध्येच नव्हे तर संपूर्ण कोलंबियामध्ये तो लोकप्रिय व्यक्ती बनला, विशेषतः आर्थिकदृष्ट्या मागास घटकांमध्ये. खेळ आणि फुटबॉलचा मोठा चाहता असलेल्या एस्कोबारने फुटबॉल मैदान आणि जिमच्या बांधकामासाठी भरपूर पैसे दान केले. कॅथोलिक चर्चमधील चाहत्यांचे लक्ष वेधून घेऊन त्याने रुग्णालये, शाळा आणि चर्च देखील बांधले.

त्यामुळे, तो मरण पावला तेव्हा अनेकांनी खेद व्यक्त केला आणि त्याच्या अंत्यविधीला सुमारे २५ हजार लोक उपस्थित होते यात आश्चर्य नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या एका स्टॉकमुळे ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’ सलग तीन दिवस बंद होते!

Next Post

ही आहे जगाच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात विश्वासघातकी माणसांची यादी

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

ही आहे जगाच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात विश्वासघातकी माणसांची यादी

या आहेत जगातील काही 'शे' वर्षे जुन्या कंपन्या ज्या आजही चालू आहेत...!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.