The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या महिलेने पैठणीपासून बनवलेल्या वस्तूंनी तरुणाईला भुरळ घातलीये..!

by द पोस्टमन टीम
13 August 2024
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


‘साडी’ हा प्रत्येक स्त्रीच्या अगदी जवळचा विषय आहे, आणि त्यातही पैठणी म्हटलं की काही बोलायलाच नको. आपल्या वॉर्डरोबमध्ये एक तरी पैठणी असावी, ही प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. लग्नसमारंभ असो किंवा इतर एखादा महत्त्वाचा कार्यक्रम महिला आणि मुली पैठणीलाच प्राधान्य देतात.

साडी ही नेसण्यासाठीच असते हा पूर्वापार आलेला समज आहे मग, ती अगदी पैठणी का असेना. मात्र, विद्या आणि संस्कृतीचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे शहरातील एका महिलेनं हा समज मोडीत काढला आहे.

पैठणीपासून विविध वस्तू तयार करून त्या विकण्याचा व्यवसाय ही महिला करते. याच व्यवसायातून स्वतःसोबत इतर महिलांना देखील रोजगाराची संधी तिनं उपलब्ध करून दिली आहे. धनश्री पाठक असं या ‘क्रिएटीव्ह’ महिलेचं नाव आहे आणि त्यांनी ‘धनाज् पैठणी’ या नावानं आपला हा आगळावेगळा असा व्यवसाय उभा केला आहे.

धनश्री आणि पैठणीची कशी गट्टी जमली हे पाहण्याअगोदर आपण जरा पैठणीबद्दल जाणून घेऊया.

पैठणीला महाराष्ट्राचं महावस्त्र समजलं जातं. पैठणीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. सातवाहन राजांच्या काळात पैठणीच्या निर्मितीला सुरूवात झाली, असं सांगितलं जातं. औरंगाबादच्या पैठण शहरात प्रथम या साडीची निर्मिती झाल्याचे संदर्भ सापडतात आणि त्यावरूनच तिला पैठणी असं नाव देण्यात आलं. पूर्णतः हातमागावर विणलेली ही पैठणीवर प्राचीन काळी फक्त मोरपीशी रंगात मिळत असे. पदरावर आणि काठांवर सोन्याच्या धाग्यांचं विणकाम केलं जाई.



राजघराण्यातील महिला याच साड्यांना पसंती देत असत. मुघल काळातही औरंगजेबानं पैठणी वस्त्रउद्योगाला राजाश्रय दिला होता. पेशव्यांनी पैठणी साडीच्या कारागिरांना येवला शहरात स्थायिक होण्यासाठी जागा दिली. आता ‘येवला पैठणी’ म्हणूनच या साड्या प्रसिद्ध आहेत. विविध रंगांच्या आणि आकर्षक नक्षीकाम केलेल्या पैठण्या पाहताक्षणी ग्राहकांना भूरळ घालतात. ताग्यावर विणलेल्या ओरिजनल पैठणीची किंमत ७ हजारपासून ते अगदी अडीच लाख रुपयापर्यंत आहे. तर साध्या मशीनमेड पैठण्या आणि सेमी पैठण्यांच्या किंमती 2 हजारांपासून सुरू होतात.

अशा या पैठणीनं लहानपणापासून साड्यांचं वेड असलेल्या धनश्रीला भूरळी घातली नसती तर नवलंच म्हणावं लागेल. आपला व्यवसाय सुरू करण्याअगोदर धनश्री देखील अगदी सर्व सामान्य मुलींप्रमाणं उच्च शिक्षण घेऊन, नोकरी आणि लग्न यात रमल्या होत्या. कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतलेल्या धनश्रीला नेहमी नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड होती. त्यात एक दिवस पतीनं सहज केलेल्या चेष्टेमुळं त्यांना आपला व्यवसाय उभा करण्याची कल्पना सुचली. याबाबतचा एक गमतीशीर किस्सा धनश्री सांगतात,

हे देखील वाचा

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

‘मला विविध प्रकारच्या पर्स आणि हॅण्डबॅगचा मोठा शौक आहे. संधी मिळेल तेव्हा मी पर्स आणि बॅग खरेदी करायचे. माझं हे कलेक्शन पाहून एक दिवस सहज माझा नवरा मला गमतीनं म्हणाला, अगं एवढ्या बॅग जमा करून काय दुकान मांडणार आहेस का? मी ही गमतीनं त्याला म्हणाले होते हो नक्कीचं मांडेल. तेव्हा ना त्याला माहित होत ना मला की, यातूनच भविष्यात आमचा व्यवसाय उभा राहिल’.

एखादी स्त्री जेव्हा काही धाडसी निर्णय घेते तेव्हा तिला पाठिंबा मिळणं फार गरजेचं असतं. कारण तिला त्यातून आणखी बळ मिळतं. धनश्रीनं जेव्हा आपली प्रस्थापित नोकरी सोडून ‘पैठणी आणि पैठणी हॅन्डबॅग’चा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना त्याचे पती चैतन्य पाठक यांनी पूर्ण पाठिंबा दिला. त्यांनी ‘धनाज् पैठणी’ हा ब्रँड उभा करण्यात आपल्या पत्नीला साथ दिली.

चैतन्य आयटी क्षेत्रात काम करत असल्यामुळं धनश्रीच्या व्यवसायासाठी लागणारी वेबसाईट असो किंवा सोशल मीडिया ब्रँडिंग असो, ही सर्व काम ते आनंदानं करतात. त्यांच्या कुटुंबियांनी देखील आपल्या या धडपड्या सुनबाईला पाठिंबा दिला. ऑर्डर्स घेणं, माल पॅक करणं यासारखी कामं करण्यात धनश्रीला घरातील सदस्य उत्स्फुर्तपणे मदत करतात. कुटुंबाचं पाठबळ आणि सहकार्यामुळचं घर, मुलगा आणि व्यवसाय सांभाळणं शक्य होत असल्याचं धनश्री अगदी नम्रपणे सांगतात.

आपली इच्छाशक्ती आणि कुटुंबाच्या सहकार्याच्या आधारावर २६ डिसेंबर २०१६ला धनश्री यांनी आपला व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्या पैठणी साडी आणि त्यापासून तयार केलेल्या हॅन्डबॅग विकत. मात्र, आपण ग्राहकांना नवीन काहीतरी दिलं पाहिजे, या मताच्या धनश्री आहेत. त्यामुळं त्यांनी पैठणीपासून नवनवीन वस्तू तयार करण्यास सुरुवात केली. आपण कल्पनाही करू शकणार नाहीत अशा कित्येक वस्तू धनश्री यांनी सत्यात उतरवल्या आहेत.

सध्या त्या पैठणी की-होल्डर, डायरी, गुढी, ट्रे, तोरण, कुशन, टेबलर रनर, टी कोस्टर, ब्लाऊजपीस, फ्रॉक, कुर्ती, चप्पल, ओढणी, मास्क, जॅकेट, बॉक्स क्लच, स्लिंग बॅग, ज्वेलरी अशा अनेक वस्तू तयार करून विकतात. त्यांच्या दुकानात ३५पेक्षा जास्त प्रकारच्या पर्स उपलब्ध आहेत. म्हणजे एकदा जर तुम्ही दुकानात गेलात तर अगदी पूर्ण तयार होऊनच बाहेर पडू शकता, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

कुठलाही व्यवसाय म्हटलं की, त्यात रिस्क फॅक्टर खूप मोठा असतो. असंख्य अडचणी असतात. धनश्री यांना देखील अडचणींचा सामना करावा लागला. त्यात सर्वात मोठं संकट म्हणजे कोविड महामारी आणि लॉकडाऊनचं होतं. लॉकडाऊनमुळे शेकडो लहान-मोठ्या व्यवसायांना फटका बसला. त्यात पैठणी ही काही अत्यावश्यक गरजांमध्ये मोडत नाही, त्यामुळं लॉकडाऊनच्या काळात करायचे काय? असा प्रश्न धनश्रीला पडला. पण, म्हणतात ना ‘ईच्छा तिथे मार्ग’. लॉकडाऊनमध्ये त्यांनी पैठणी मास्क तयार करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या कल्पनेवर काही लोकांनी टीका केली. मात्र, कुठल्याही टीकेवर लक्ष न देता त्या आपलं काम करत राहिल्या. पण, फक्त फॅशन म्हणून त्यांनी मास्क तयार केले नाही. आपले मास्क वापरून लोक कोविडपासून सुरक्षित कसे राहतील यावर त्यांनी भर दिला. अल्पावधीतच त्यांच्या मास्कला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

आतापर्यंत त्यांनी ७ हजारपेक्षा जास्त मास्क तयार करून विकले आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना देखील धनश्रीचा मास्क लावण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी धनश्रीचं कौतुक केलं आहे.

एका साध्या कल्पनेतून उभा झालेला हा व्यवसाय फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता आता थेट विदेशात जाऊन पोहचला आहे. कॅनडा, अमेरिका, लंडन, दुबई, ऑस्ट्रेलिया याठिकाणी धनाज् पैठणीच्या विविध वस्तू पोहचल्या आहेत. तिथे देखील काही रिसेलर आहेत जे धनश्री यांच्याकडून वस्तू खरेदी करून तेथील बाजारपेठेत विकतात.

धनश्रीच्या पैठणीनं कित्येक महिलांना रोजगार दिला आहे. त्यांच्या सोबत एकून ५० जणांची टीम काम करते तर प्रत्यक्ष दुकानात १२ महिला काम करतात. अगदी कोविडच्या संकट काळात सुद्धा या महिलांचा रोजगार बंद झाला नाही. लॉकडाऊनमध्ये या महिलांनी मास्क तयार करून पुणे, सातारा, सांगली, जळगाव, मुंबई यासारख्या ठिकाणी मास्क पाठवले. धनश्रीच्या वस्तूंचे आज देशभरात ३०० पेक्षा जास्त रिसेलर आहेत.

आपल्या महाराष्ट्राची शान असलेली पैठणी भविष्यात जागतिक स्तरावर एक ब्रँड व्हावी, असं धनश्री यांचं स्वप्न आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पैठणी आणि त्यापासून तयार केलेल्या वस्तूंना ओळख मिळावी या ध्येयासाठी धनश्री मेहनत घेत आहेत. त्यांचासारखा विचार जर इतर महिलांनी केला तर त्यादेखील स्वत:च्या पायावर उभ्या राहू शकतात, यात शंका नाही.


धनाज् पैठणी पर्स–  शिवशक्ती अपार्टमेंट्स, बी-विंग, तिसरा मजला, केळकर रोड ५९२, नारायण पेठ, पुणे-४११०३०


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

मिल मालकांना कळलं की धान्याच्या पोत्यांचा वापर फ्रॉक शिवण्यासाठी होतोय, ते रंगीबेरंगी पोते बनवू लागले

Next Post

…म्हणून या लढाऊ हेलिकॉप्टरला आकाशात उडणारा रणगाडा म्हणतात…!

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

2 May 2024
Next Post

...म्हणून या लढाऊ हेलिकॉप्टरला आकाशात उडणारा रणगाडा म्हणतात...!

भटकंती : या श्रीकृष्णमंदिरांना तुम्ही एकदातरी भेट द्यायलाच हवी!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.