The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिंग असलेल्या टकल्या शैतानाने हा टीव्ही घराघरात पोहोचवला

by द पोस्टमन टीम
8 April 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब 


आपल्या संस्कृतीमध्ये फार पूर्वीपासूनच १४ विद्या ६४ कलांचे महत्त्व सांगितले जाते. आधुनिक काळात यात एका ६५व्या कलेचा समावेश करता येईल. ती म्हणजे विपणन अर्थात ॲडव्हरटाइजमेंट.

१९९१ साली भारतात उदारीकरणाची सुरुवात झाल्यानंतर अनेक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील वस्तूंची देशात रेलचेल झाली. पूर्वी लोकांसमोर साधे घड्याळ घ्यायचे म्हटले तरी टायटन हा एकाच पर्याय असायचा तिथे शेकडो ब्रँड लोकांच्या नजरेसमोर यायला लागले. हीच गोष्ट पार पायात घालणाऱ्या चपला, बूटपासून केसाला लावण्यात येणाऱ्या तेलापर्यंत.

जेव्हा तुमच्यासमोर वस्तू आणि उत्पादनांची रेलचेल सुरु असते तेव्हा कुठली वस्तू चांगली अथवा कुठलं उत्पादन चांगलं याविषयी तुम्हाला कोण माहिती देणार आणि तुम्ही कशावरून अंदाज बांधणार? यातूनच कंपन्यांनी स्वत:च्या उत्पादनांची जाहिरातबाजी टीव्हीवर करायला सुरुवात केली आणि भारतातील जाहिरातींचं युग सुरु झालं.

आपल्यापैकी अनेक लोकांना लहानपणी आपण दूरदर्शनवर पाहिलेल्या जाहिराती आठवत असतील. अनेक लोकांना त्यांच्या लहानपणी पाहिलेल्या “अमूल द टेस्ट ऑफ इंडिया”, “नये भारत की बुलंद तस्वीर.. हमारा बजाज” अशा जाहिरातींच्या जिंगल्स तोंडपाठ असतात.



मजेची बाब म्हणजे, ज्या दूरदर्शनवर या जाहिराती लागायच्या तो टीव्ही हासुद्धा जाहिरातीचाच विषय होता.

८०च्या दशकात घरात रंगीत टीव्ही असणे ही एक गरज, स्टेटस बनलं होतं. याचाच फायदा घ्यायचा छ. संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) येथे राहणाऱ्या नंदलाल धूत यांनी ठरवलं. वर्षाला १ लाख कलर टीव्ही उत्पादनाचे लक्ष ठेऊन आपली “व्हिडीओकॉन” कंपनी सुरु केली.

१९८२ साली भारतात रंगीत टीव्हीचं अवतरण झालं. रामायण आणि महाभारत या मालिकांनी लोकांचं जग व्यापून टाकलं. व्हिडीओकॉन या स्वदेशी उत्पादक कंपनीने प्रत्येक घरात आपलं स्थान मिळवलं ८०च्या दशकात व्हिडीओकॉन दूरचित्रवाणी क्षेत्रातला दादा ब्रँड बनला. या टीव्हीची जाहिरात स्वदेशी बनावटीचं मातीतलं उत्पादन अशीच केली जायची.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

त्यावेळी व्हिडीओकॉनला टक्कर देणारी दुसरी कंपनी होती ओनिडा. याची स्थापना देखील विजय मनसुखानी आणि गुलू मिरचंदानी या दोन सिंधी व्यापाऱ्यांनी मिळून केलेली होती. मात्र व्हिडीओकॉनचा समकालीन प्रतिस्पर्धी असूनही ओनिडाला आपलं स्थान लोकांच्या मनात पक्कं करता आलं नव्हतं.

जाहिरात आणि मार्केटिंगचं वाढतं महत्त्व लक्षात घेऊन ओनिडाने आपल्या दूरदर्शन संचाची जाहिरात वेगळ्या प्रकारे करायचं ठरवलं आणि इथून जन्म झाला तो जगप्रसिद्ध ‘ओनिडा डेव्हिल मॅन’चा.

९०च्या दशकात जन्म झालेल्या प्रत्येक मुलाला आणि मुलीला लहानपणी जाहिरातीमध्ये दिसणारा टकलू, दोन शिंगे उगवलेला आणि ओनिडा टीव्हीची जाहिरात करणारा “ओनिडा डेव्हिल मॅन” आठवतोच आठवतो.

या जाहिरातीचा मॉडेल त्या काळात टीव्ही ॲडसाठी गाजत असलेले मिलिंद सोमण, मधु सप्रे, मृणाल कुलकर्णी या देखण्या चेहऱ्याच्या मॉडेल बरोबर मेळ खाणारा नव्हता. इतर जाहिरातीत असायचे तसे लग्न समारंभ, घरगुती वातावरण, नायक-नायिका यांच्यातील प्रेम आणि त्यांच्यामध्ये कुठेतरी ज्याच्यावर जाहिरात आहे ते मेन प्रोडक्ट या जाहिरातीमध्ये नव्हते.

भयाण हिरव्या काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर शिंग फुटलेला, शेपटी असलेला टकला सैतान उगवतो आणि “Neighbor’s envy, Owner’s pride” अशी टॅगलाईन घेऊन टीव्हीची जाहिरात करतो हे दृश्य जाहिरात क्षेत्रासाठी प्रचंड नवीन होते.

अनेक लोकांनी यावर टीका केली. अशा प्रकारची नकारात्मक जाहिरात ओनिडा कंपनीला मातीत घेऊन जाईल अशी अनेक दिग्गजांनी भविष्यवाणी केली.

सर्वसाधारणपणे जाहिरातीमध्ये जे प्रोडक्ट असेल त्याच्याबरोबर एक चेहरा जोडला गेलेला असतो. आठवा, व्हीकोच्या जाहिरातीबरोबर जोडला गेलेला आणि व्हीकोचे नाव घेतले की आठवणारा मृणाल कुलकर्णीचा चेहरा, कॅडबरी पर्क किंवा लिरील साबण म्हटल्यावर समोर येणारा चुलबुली प्रीती झिंटाचा चेहरा, खाद्यतेलाच्या जाहिरातीमधला आई आणि मुलगा यांचा चेहरा.

जाहिरातीमधले चेहरे त्या त्या उत्पादनाची एक प्रकारे ओळख बनत असतात म्हणूनच देखण्या आणि लक्षवेधी चेहऱ्यांना घेऊन जाहिरात करण्यावर कंपन्यांचा भर राहतो.

या गर्दीत किळसवाणा दिसणारा, कसलीही फेस व्हॅल्यु नसणारा विचित्र दिसणारा सैतान एका प्रथितयश टीव्ही कंपनीच्या जाहिरातीचा चेहरा हे दृश्य अजब होते.

९० च्या दशकात ओनिडाने ते करून दाखवले होते. Bad publicity is also a publicity या तत्वाला धरून ओनिडाने ही इतकी मोठी रिस्क घेतली.

त्या काळात व्हिडीओकॉन, बीपीएल, सोनी टीव्ही म्हणजे लोकांच्या गळ्यातले ताईत होते. त्यात तुमचा टीव्ही तुमचा अभिमान आणि तुमच्या शेजाऱ्यांच्या मत्सराचा विषय ही कॅचलाईन घेऊन उतरलेल्या ओनिडाच्या या ‘डेव्हिल मॅन’ला नकारात्मक प्रसिद्धीचा मोठा फायदा झाला. शेवटी टीव्हीवर दिसणारी जाहिरात हे व्हिज्युअल इफेक्ट करणारं मोठं परिणामकारक माध्यम आहे.

बघायला गेलं तर कुठल्याही कंपनीच्या टीव्हीचे जे काही टेक्निकल स्पेसिफिकेशन बऱ्यापैकी एकसारखेच असणार होते. लोकांना टेक्निकल स्पेसिफिकेशनमध्ये इंटरेस्ट नसतो, त्यांना या गोष्टी कळात देखील नाहीत. घरात रंगीत टीव्ही पाहिजे तो इतरांपेक्षा वेगळा असायला हवा ही सर्वसामान्य लोकांची भावना ओनिडाने अचूक हेरली. टीव्हीवर, मोठमोठ्या शहरातल्या होर्डिंगवर, वृत्तपत्रामध्ये ओनिडाचा डेव्हिल मॅन दिमाखाने झळकू लागला.

या जाहिरातीच्या संकल्पनेमागे असलेला कल्पक माणूस होता अव्हेन्यूज् नावाच्या जाहिरात एजन्सीचा मालक गोपी कुकडे.

ओनिडाचा पहिला डेव्हिल मॅन बनला होता “डेव्हिड व्हिटब्रँड”. त्यानंतर अनेक नावाजलेल्या अभिनेत्यांनी हा डेव्हिल मॅन ओनिडासाठी रंगवला त्यातला लक्षात राहिलेला चेहरा म्हणजे अभिनेता आशिष चौधरीचा चेहरा.

ओनिडाला या जाहिरात कॅम्पेनचा मोठा फायदा झाला. देखण्या चेहऱ्याबरोबर असलेले प्रोडक्ट्स विकले जातात हा समज खोटा पाडत डेव्हिल मॅनने भारतीय बाजारपेठेत ओनिडाचा वाटा ६% वरून २०% पर्यंत नेला. ओनिडाची बाजारपेठेत मोठी उलाढाल सुरु झाली. त्यानंतर तब्बल १५ वर्षे ओनिडाच्या विविध जाहिरातींमधून हा डेव्हिल मॅन लोकांना भेटायला यायचा.

शेवटी ओनिडालाच याचा कंटाळा येऊन त्यांनी डेव्हिल मॅनविरुद्ध गॉड ही संकल्पना घेऊन काही जाहिराती बनवल्या पण हाय रे देवा! लोकांना जितका सैतान पसंद पडला तितका ओनिडाचा देव काही पसंद पडला नाही. त्यामुळे २०१८ साली ओनिडाने आपल्या डेव्हिल मॅनला पुन्हा लाँच करण्याचा निर्णय घेतला. ओनिडा एसीचे प्रोडक्ट घेऊन यावेळी डेव्हिल मॅन आणि त्याची बायको डेव्हिल वूमन दोघे पुन्हा भारतीय प्रेक्षकांच्या भेटीस आले.

यापुढेही भविष्यात डेव्हिल मॅनच्या जाहिराती बनवण्याचा कंपनीचा विचार आहेच. थोडक्यात, भारतीय जाहिरात क्षेत्रात आजही डेव्हिल मॅनच्या जाहिराती नकारात्मक प्रसिद्धी आणि आउट ऑफ द बॉक्स थिंकिंगचे उत्तम उदाहरण मानले जाते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या वकिलाने गेली ४० वर्षे सगळे खटले संस्कृतमधूनच लढवले आहेत

Next Post

सरकारी कंपन्यांच्या अपयशाचं इंडियन एअरलाईन्स हे उत्तम उदाहरण आहे

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

सरकारी कंपन्यांच्या अपयशाचं इंडियन एअरलाईन्स हे उत्तम उदाहरण आहे

अशाप्रकारे रिसर्चच्या नावाखाली औषध कंपन्या फसवत आहेत

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.