The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

घरच्या जेवणाचं एटीएम!- अख्ख्या शहराच्या जेवणाची गरज भागवतंय हे स्टार्ट-अप

by द पोस्टमन टीम
12 March 2021
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


शिक्षणासाठी अथवा नोकरीनिमित्त घरापासून लांब राहणाऱ्या लोकांची सर्वात मोठी समस्या असते ती जेवणाची, घरी मिळतं तसं जेवण मिळावं यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. पण दुर्दैवाने तसं अन्न मिळत नाही. शेवटी घरचं जेवण हे घरचं असतं, आईच्या आणि आजीच्या हातच्या डाळ भाताची चव कशालाच नाही.

याच विचारातून दिल्लीमध्ये ‘दालचिनी’चा उदय झाला. दालचिनी हे एका मसाल्याचे नाव. या नावाचं दिल्लीत एक स्टार्ट-अप सुरु झाले आहे, जे लोकांची घरच्या वरण-भाताची इच्छा पूर्ण करतं.

२०१८ साली प्रेरणा कालरा आणि विद्या भूषण ह्या दोघांनी दालचिनीची स्थापना दिल्ली येथे केली.

दालचिनीच्या माध्यमातून अत्यंत कमी दरात, लोकांना घरी तयार करण्यात आलेले जेवण एका व्हेंडिंग मशिनच्या माध्यामातून दिलं जातं.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या व्हेंडिंग मशीन्सची निर्मिती करण्यात आली असून लोक यातून फुड पॅकेट्स विकत घेऊ शकतात. हे व्हेंडिंग मशिन एखाद्या एटीएमसारखे कार्य करतात.



हा स्टार्ट-अप सुरु करण्याअगोदर हे दोघेही पेटीएमच्या बिझनेस डेव्हलपमेंट विभागात कार्यरत होते. तेथेच दोघांची भेट झाली. आज गृहिणी असलेली प्रेरणा त्यावेळी आपल्या मुलाची आणि घराची जबाबदारी सांभाळून पेटीएममध्ये कामाला जात होती.

बऱ्याचदा वेळेअभावी तिला ताजं जेवण तयार करायला अनंत अडचणी येत होत्या. पण तिला तिच्या ऑफिसच्या मित्राकडून अखेरीस मदत मिळाली.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

विद्या भूषण सोबतच्या गप्पांमधून त्या दोघांना या व्हेंडिंग मशीनची कल्पना सुचली. त्यांनी व्हेंडिंग मशिन्सच्या माध्यमातून कमीतकमी दरात घरी बनवण्यात आलेले अन्न पदार्थ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.

या माध्यमातुन घरी जेवण तयार करणाऱ्या गृहिणींना आपल्या घरी जेवण तयार करून ते उपलब्ध करून देण्याची मुभा देखील देण्यात आली.

२०१८ साली सुरुवातील २ व्हेंडिंग मशीन्ससोबत सुरु झालेला हा प्रवास आज तब्बल १७० व्हेंडिंग मशिन्सपर्यंत येऊन पोहचला आहे. दिल्ली, मुंबई आणि चंडीगडमधील विविध कार्यालये, रुग्णालये आणि हॉस्टेल इत्यादी ठिकाणी त्यांनी दालचिनीला पोहचवलं आहे.

स्वयंपाकघर ते व्हेंडिंग मशीन

दालचिनीकडे आज घरगुती जेवण बनवणारे २० स्वयंपाकी आहेत. सर्वांना सकाळी लवकर उठून जेवण तयार करावे लागते. डिलीव्हरी बॉय त्यांच्याकडून जेवणाचे पाकीटं घेतो आणि ते व्हेंडिंग मशीनपर्यंत नेतो.

व्हेंडिंग मशिनचे मॉडेल आंगिकारण्यामागे खर्च वाचवणे हीच आमची भूमिका राहिली आहे.

लोकांच्या घरी ऑर्डर घेऊन जाण्यापेक्षा आम्हाला व्हेंडिंग मशीनमध्ये सकाळी ८-९ या कालावधीत ३०० प्रकारचे खाद्यपदार्थ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे जास्त सोयीचे वाटले.

संध्याकाळी ३-४ दरम्यान आम्ही पुन्हा एकदा व्हेंडिंग मशिनमध्ये खाद्यपदार्थ ठेवतो, जेणेकरून लोकांना ताजं अन्न मिळतं आणि तुटवडा देखील भासत नाही, असं मत प्रेरणा यानी व्यक्त केलं आहे.

व्हेंडिंग मशीन्स या IOT पद्धतीने कार्यरत असून खाद्यपदार्थ खराब होऊ नये म्हणून व्हेंडिंग मशिनच्या आतील तापमान नियंत्रण करणारी यंत्रणा त्यात आहे, जेणेकरून अन्न पदार्थ ताजे राहतात. जेवण हे वेगवेगळ्या किंमतीत उपलब्ध असून त्याची किंमत ही ३९ रुपये ते ७९ रुपये इतकी आहे.

प्रत्येकाला आपल्या भूकेनुरूप अन्नपदार्थ घेण्याची मुभा आहे. ज्यांना जेवण हवे असेल त्यांना दालचिनीचे मोबाईल अप्लिकेशन डाउनलोड करावे लागते, त्यात आपले ऑनलाईन पेमेंट करून लोक जेवण घेऊ शकतात.

अप्लिकेशनमध्ये युपीआय पेमेंट करून झाल्यानंतर ग्राहकांना एक कोड दिला जातो, ज्याच्या मदतीने ग्राहक आपले अन्नपदार्थ व्हेंडिंग मशीनमधून काढू शकतो.

ही प्रक्रिया वाचायला किचकट असली तरी प्रत्यक्षात फारच सुलभ आहे.

महिला सबलीकरण : गृहिणी ते बिझनेस वूमन 

लोकांना घरगुती जेवण देण्यामागे गृहिणींचा वाटा मोठा आहे. प्रेरणा यांचा हे स्टार्ट अप सुरु करण्यामागचा उद्देश देखील महिलांचे सबलीकरण करण्याचा आहे. अनेक गृहिणी सकाळी लवकर उठून जेवण तयार करतात आणि डिलीव्हरी बॉयला देतात. यातून त्यांना पैसेदेखील चांगले मिळतात.

यात अजून एक नवीन योजना दालचिनीने चालू केली असून या योजनेनुसार गृहिणीना फ्रांचायझी देऊन गृहिणीना स्वत:चे व्हेंडिंग मशीन्स उपलब्ध करून द्यायचे आहे.

आज दालचिनीच्या ६० ते ७०% व्हेंडिंग मशीन्स फ्रांचायझीच्या माध्यमातून चालत आहेत. यात ७०% महिला आहेत.

दालचिनीच्या फ्रांचायझीसाठी आधी २ लाख रुपये द्यावे लागतात. या संदर्भात विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून सुलभ कर्ज देखील उपलब्ध आहे. या फ्रांचायझीच्या माध्यमातून अनेक महिला आज २५ ते ३० हजार रुपये महिना पैसे कमवत आहेत.

व्हेंडिंग मशीन्समध्ये असलेले जेवण हे वेगवेगळ्या प्रकारचे असते, कधी एकच प्रकारचे खाद्य पदार्थ नसतात, यामुळे ग्राहकांना जेवणात विविधता मिळते.

आज दालचिनी ८००० लोकांपर्यंत जेवण पोहचवण्यात दालचिनी यशस्वी ठरलं आहे. अनेक अडचणींचा सामना देखील त्यांना यादरम्यान करावा लागला होता, परंतु त्यावर यशस्वीपणे मात करून दालचिनीची वाटचाल सुरू आहे.

आधी फक्त दिल्लीपुरता मर्यादित असलेला हा उद्योग लवकरच प्रसार पावत असून मुंबईत आपला विस्तार करत आहे. त्यांनी चंडीगड शहरात देखील विस्तार केला असून, चंडीगड शहरात तब्बल १८ व्हेंडिंग मशीन्स आहेत.

याबरोबरच पुढे अजून १००० महिलांना फ्रांचायझी देऊन हा व्यवसाय मोठा करण्यासाठी हे जोडपं प्रयत्नशील आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: DalchiniFoodHomemade FoodStart Up
ShareTweet
Previous Post

अवघ्या १६व्या वर्षी कचऱ्यापासून ड्रोन बनवणारा ‘ड्रोन बॉय’

Next Post

आधीच्या सरकारवरचा रोष म्हणून जर्मनीने हि*टल*रला निवडून दिले तीच त्यांची सगळ्यात मोठी चूक ठरली

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

आधीच्या सरकारवरचा रोष म्हणून जर्मनीने हि*टल*रला निवडून दिले तीच त्यांची सगळ्यात मोठी चूक ठरली

फक्त दहावी शिकलेला माणूस हजारो कासवांचे प्राण वाचवतोय!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.