The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या रडणाऱ्या मुलाच्या पेंटिंगला जगातली सगळ्यात अपशकुनी पेंटिंग मानतात..!

by द पोस्टमन टीम
16 June 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


“कोणाचा चेहरा पाहिल्यावर दिवस चांगला जातो तर कोणाच्या चेहरा पाहिल्यावर संपूर्ण दिवसाची वाट लागते, एखाद्याचा पायगुण चांगला किंवा वाईट असतो.” अशा अनेक समजुती आजही समाजात पक्क्या रुजल्या आहेत. अशा समजुतींमुळे अनेकांना आयुष्यभर वनवास भोगावा लागला आहे. माणसाचे तर सोडाच पण असे हे शकून-अपशकुनाचे शिक्के कुत्रा-मांजर यासारख्या प्राण्यांवरही मारले जातात. मांजर आडवे गेले तर काम होत नाही, सकाळी सकाळी मुंगुस दिसले तर दिवस चांगला जातो. तशी ही यादी खूप मोठी होईल.

असेच एकदा ८०च्या दशकात इंग्लंडमधे एका पेंटिंगला अशा प्रकारे अपशकुनी ठरवण्यात आलं होतं. कोणतं पेंटिग होतं ते आणि त्याला अपशकुनी का ठरवण्यात आलं? जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा.

इंग्लंडच्या यॉर्कशायरमधील एका घराला एका रात्री अचानक आग लागली. घरातील सगळ्या वस्तू जळून खाक झाल्या. पडदे, फर्निचर, छत, भिंती सगळ्यांना या आगीची झळ पोहोचली होती. त्या ठिकाणी कालपर्यंत घर होते हे कुणाला सांगूनही पटले नसते. पण या सगळ्यात एक मोठी विचित्र गोष्ट घडली होती. ती म्हणजे त्या घराच्या एका भिंतीवर एका रडणाऱ्या मुलाचे पेंटिंग टांगण्यात आले होते. या पेंटिंगला मात्र आगीचा अजिबात धक्का लागला नव्हता. उलट त्या पेंटिंगमधील त्या रडणाऱ्या मुलाचे डोळे आणखी खुनशी झाल्यासारखे वाटत होते. ते पेंटिंग इतके सुखरूप राहिले होते की त्यावर धुराची काजळी देखील साठली नव्हती.

अशा प्रकारे राख झालेल्या घरात हेच पेंटिंग सुरक्षित कसे राहू शकते? आणि ही काही पहिलीच घटना होती असे नाही. ज्या ज्या घरात हे पेंटिंग असेल त्या घराला कधी न कधी आग लागत असेच आणि त्यात सगळे जाळून राख झाले तरी हे पेंटिंग मात्र सुरक्षित राहत असे. वारंवार घडणाऱ्या या घटनांनी सर्वांचीच मती गुंग झाली होती.

ब्रिटीश वर्तमान पत्र, ‘द सन’नेही या पेंटिंगची दखल घेऊन ४ सप्टेंबर १९८५च्या अंकात त्यावर एक स्टोरी छापली होती. ‘एका रडक्या मुलाच्या चित्राचा धगधगता शाप’ अशा आशयाचा मथळा देऊन त्यांनी कशा प्रकारे हे पेंटिंग अपशकुनी आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. हे पेंटिंग असलेल्या किती घरांना आग लागली आणि त्या सगळ्या घरातील इतर वस्तूंची राख झालेली असताना हे पेंटिंगच तेवढे कसे सुरक्षित राहिले, याचे विस्तृत वर्णन त्यांनी यामध्ये केले होते. खुद्द वर्तमानपत्रेच अशा प्रकारच्या अफवा पसरवण्यात पुढे होते हा तर त्याहून मोठा धक्का.



‘द सन’सारख्या विश्वसनीय दैनिकातून जर अशा बातम्या येत असतील तर त्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही?
एका दांपत्याला त्याच्या मित्रांनी हे पेंटिंग अपशकुनी असल्याचा इशारा दिला होता. तरीही त्यांनी त्या इशाऱ्याकडे हसून दुर्लक्ष केले आणि जेव्हा खरोखरच त्यांच्या घराला अचानकच आगीच्या ज्वालांनी लपेटले तेव्हा त्यांना कसा याचा पश्चाताप झाला याची चटकदार रहस्यमय कथाही या वर्तमान पत्रात छापून आली होती.

कहर म्हणजे या वर्तमानपत्राने ज्या कुणाकडे अशा रडक्या मुलांची पेंटिंग असतील ती ‘द सन’च्या कार्यालात आणून जमा करावीत आणि या अपशकुनी पेंटिंगपासून तत्काळ मुक्ती मिळवावी असे आवाहन देखील केले होते.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

लहान मुलांचे पेंटिंग कुणाला आवडत नाहीत? १९५०-७० च्या काळात अशा प्रकारच्या पेंटींग्जना खूप मोठी मागणी होती. अनेक घरातील दिवाणखान्यात अशाप्रकारचे पेंटीग हमखास लटकताना दिसत असत. शिवाय, तरूण आणि नवविवाहित दाम्पत्यांना तर या पेंटींग्जचे खूपच आकर्षण वाटत असे. मुले कशीही असली तरी छानच वाटतात. त्यातही रडणारी मुले तर अधिकच घायाळ करतात. म्हणूनच कदाचित त्याकाळात हे अशाप्रकारे रडणाऱ्या मुलाचे पेंटिंग लोकप्रिय झाले असावे. रस्त्यावरील विक्रेत्यांकडे तर याप्रकारची मुबलक पेंटींग्ज उपलब्ध असत.

आधीच घाबरून गेलेल्या लोकांमध्ये ‘द सन’ने अशी अफवा पसरवल्याने सगळ्यांचाच हे पेंटिंग अपशकुनी असण्यावर विश्वास बसला. त्यात ‘द सन’ने आणखी एक कडी केली.

ज्या चित्रकाराने हे पेंटिंग बनवले होते त्याचीही कथा आपल्या वर्तमानपत्रातून छापली. त्या चित्रकाराने त्याच्या पेंटिंग मागची कथा सांगितल्यावर तर आगीत तेल ओतल्याचाच प्रकार घडला.

या चित्रकारांचे नाव होते, फ्रँको सिव्हिल. या चित्रकाराने इटली आणि स्पेनमधील अनाथ बालकांची अशी शेकडो चित्रे रेखाटली होती. यातील बहुतांश मुले रस्त्यावर सोडून दिलेली होती.

त्याने ज्या मुलांचे चित्र रेखाटले होते त्यात एक डॉन बॉनिलो नावाचा स्पेनचा मुलगा होता. बॉनिलोच्या हातून चुकून लागलेल्या आगीत त्याच्या आई-वडीलांचा होरपळून मृत्यू झाला. आई-वडिलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारा मुलगा म्हणून त्याला रस्त्यावर सोडून देण्यात आले. असे म्हटले जाते की, नंतर तो जिथे जाईल तिथे अशाच आगी पेटू लागल्या. पुढे १९७० साली एका कार अपघातात कारने पेट घेतल्यामुळे त्याचाही मृत्यू झाला. त्या मुलाचे हे पेंटिंग सर्वांनाच शाप देत असल्याने जिथे हे पेंटिंग असेल तिथे आग लागण्याची घटना घडत होती. या कथेमुळे तर या शापित पेंटिंगवरचा लोकांचा विश्वास आणखी दृढ झाला.

पुढे डॉ. डेव्हिड क्लार्क नावाच्या एका पत्रकाराने या पेंटिंगचा आणि या चित्रकाराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याला असे आढळले की डॉन बनिलो आणि फ्रँचो सिव्हिल या नावाच्या व्यक्ती कधी अस्तित्वातच नव्हत्या. त्यांच्या अस्तित्वाचे कुठलेच पुरावे त्याला सापडले नाहीत. शिवाय, ऍना झिंकसेन नावाच्या आणखी एका चित्रकारानेही अशीच काही रडक्या मुलांची २०-३० चित्रे बनवली होती आणि या चित्रांवरही शापित असल्याचा शिक्का मारण्यात आला होता.

‘द सन’ सोबतच ‘द मिरर’ या वृत्तपत्रानेही अशा घटनांचे वृत्त आपल्या दैनिकातून प्रकाशित केले. या आधीच्या कथेत त्यांनी थोडी स्वतःची भर घातली. नंतर या एकाच घटनेवरून वाचकांना खिळवून ठेवण्याची जणू या दोन वृत्तपत्रात स्पर्धाच सुरू झाली. या दोन दैनिकांतील अशा चढाओढीत सत्याची मात्र पार वासलात लागली.

डॉ. क्लार्कने जेव्हा अशा घटनांचा वस्तुनिष्ठपणे अभ्यास केला तेव्हा त्याच्या लक्षात आले की, या आगीच्या घटनांमागे नेहमीचीच कारणे होती जसे की, सिगारेट, किचनमधील काही छोटे छोटे अपघात. पण सगळ्यात मोठे रहस्य हे होते की सगळ्या वस्तूंची राख होत असताना हे पेंटिंग तेवढे सुरक्षित कसे?

तर त्यामागचे कारण असे होते की हे पेंटिंग रंगवण्यासाठी वापरले गेलेले वार्निश हे अग्नी-रोधक होते. त्यामुळे या पेंटिंगपर्यंत आगीच्या ज्वाळा पोहोचल्या तरी त्यातील अग्नी-रोधक वार्निशमुळे त्याला काहीही धोका पोहोचत नव्हता.

त्यात हे पेंटिंग एका कम्प्रेस्ड बोर्डवर छापलेले असे त्यामुळेही त्याच्यावर आगीच्या ज्वाळांचा फारसा परिणाम होत नव्हता. नंतर डॉ. क्लार्कनी आपला हा अभ्यास आपल्या फोर्टीन टाईम्स या वृत्तपत्रातून प्रकाशितही केला. पण, या वृत्तावर कोणीही विश्वास ठेवण्यास तयार नव्हते.

‘द सन’ने तोपर्यंत या कथेत भरपूर मसाला घालून ही अफवा चांगलीच बिंबवली होती. त्यांच्या शापित पेंटिंगपासून मुक्ती मिळवण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी आपल्या घरातील हे पेंटिंग ‘द सन’च्या ऑफिसमध्ये पाठवले होते. अक्षरश: ऑफिसमध्ये या पेंटींग्जचा ढीग लागला होता. शेवटी ‘द सन’ने थेम्स नदीच्या काठावर या सगळ्या पेंटींग्जची एकत्रित होळी केली आणि आता हा शाप कायमचा नष्ट झाल्याची घोषणाही केली.

अशा पद्धतीने ‘द सन’ने स्वतःच जन्माला घातलेल्या कथेचा स्वतःच शेवट केला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

पॅराशूटची आयडिया पण ‘लिओनार्दो दा विंची’च्या सुपीक डोक्यातून आली होती

Next Post

गुजरातमध्ये एक बहादूर शाह होऊन गेला जो हुमायूनला नडला होता..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

गुजरातमध्ये एक बहादूर शाह होऊन गेला जो हुमायूनला नडला होता..!

बोरबाकी - अस्तित्वात नसलेल्या या शास्त्रज्ञाने गणितात प्रचंड मोठं योगदान दिलंय..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.