The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एअर लाईन्सची जाहिरात म्हणून विमानात गाईचं दूध काढण्याचा स्टंट केला होता

by Heramb
26 October 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


औद्योगिक क्रांतीनंतर जगामध्ये सगळीकडेच आर्थिक प्रगती होऊ लागली. तसेच मानवी जीवनातील सर्वच क्षेत्रांत प्रगती होऊ लागली. मग कृषी आणि कृषीसंबंधी क्षेत्र तरी मागे कसं राहील? पुढे यांत्रिकीकरण आणि ऑटोमेशनच्या विकासामुळे उद्योगांच्या प्रगतीला वेग आला. जगात सगळीकडेच आणि प्रामुख्याने पाश्चिमात्य देशांमध्ये उद्योग मोठ्या प्रमाणात वाढू लागले.

विमान उद्योगही याच काळात भरभराटीला आला होता. अमेरिकेतील अनेक लोक या उद्योगात आपला पाया भक्कम करण्याचा प्रयत्न करीत होते. आपला बिजनेस वाढवण्यासाठी अनेक लोकांनी विविध युक्त्या वापरल्या, जाहिरातबाजी केली. यातील अनेक प्रयत्न आणि जाहिराती अक्षरशः हास्यास्पद होत्या. पण १९३० साली अमेरिकेत वापरल्या गेलेल्या या ‘भन्नाट’ युक्तीला कदाचित काही तोडच नाही. एका उद्योजकाने केलेल्या या अद्भुत ‘पब्लिसिटी स्टंटचा’ आढावा आपण या लेखात घेणार आहोत.

१८ फेब्रुवारी १९३० रोजी ‘एल्सवर्थ डब्ल्यू बन्स’ने इतिहास घडवला. विमानात गायीचे दूध काढणारा तो बहुधा जगातील पहिला माणूस असावा. ‘विस्कॉन्सिन’ डेअरी स्टेटमध्ये राहणाऱ्या एल्सवर्थने हा ऐतिहासिक सन्मान प्राप्त केला आहे. आज, जवळजवळ एका शतकापूर्वी आकाशात घडलेल्या या अविश्वसनीय कामामुळे एल्सवर्थ अजरामर झाला आहे.

ग्रामीण अमेरिकन्सना विमान उड्डाणात स्वारस्य वाटावे या हेतूने हा कार्यक्रम ‘इंटरनॅशनल एअर एक्सपोसिशन’ अंतर्गत एक ‘पब्लिसिटी स्टंट’ म्हणून आयोजित करण्यात आला होता. ‘जर ग्रामीण अमेरिकन्स त्यांची जनावरे जमिनीवर चालवत जवळच्या शहरात नेण्याऐवजी विमानात घेऊन जाऊ शकले तर मोठी सोय होईल,’ हे या स्टंटच्या माध्यमातून आयोजकांना सिद्ध करायचे होते. असे झाल्यास मध्य युनायटेड स्टेट्समध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या शेतकरी वर्गाचा वाढत्या वैमानिकी उद्योगाला मोठा फायदा होईल, असा उद्योजकांचा अंदाज होता. या भागात विरळ लोकसंख्या असली तरी येथील शेतकरी समुदाय अमेरिकन उद्योजकांसाठी महत्वाचा होता.

विमानात प्रवास करणाऱ्या गाईचे नाव होते ‘एल्म फार्म ओली’.  ही गाय तिच्या मृदू स्वभावामुळे विमानातून प्रवास करण्यासाठी निवडली गेली होती. ‘फोर्ड ट्रायमोटर’ नावाचे विमान तिला घेऊन उड्डाण करणार होते. या विमानाच्या अतिशय लहान जागेत काही ‘हजार पौंडचे’ जनावर ‘कोंबण्याचा’ प्रयत्न करणे हे केवळ त्या गायीच्या स्वभावानेच शक्य झाले. मालकाच्या अचूक अंदाजाप्रमाणे ‘एल्म फार्म ओली’ गाय विमानात ‘फिट’ बसली.


फोर्ड ट्रायमोटर

सर्व अडचणींवर मात करून उपस्थितांच्या मनोरंजनासाठी आणि प्रामुख्याने मार्केटिंगसाठी, ती गाय विमानात चढवली गेली. शिवाय विमानात अतिरिक्त वजन असतानाही विमान यशस्वीपणे उडू शकले. एल्म फार्म ओलीसोबत असलेला बन्स तिचा ‘फ्लाईट अटेंडंट’ म्हणून काम करीत होता. 

ओली विमानात चढताना..

ट्रायमोटरच्या ‘बिस्मार्क’ ते ‘सेंट लुईस’ अशा सुमारे ७२ मैलाच्या उड्डाणामध्ये एल्सवर्थ बन्सने या गायीचे दूध काढले. शास्त्रज्ञ आणि शेतकरी विमानप्रवासामध्ये गायीच्या दुधाच्या उत्पादन-क्षमतेवर आणि गायीवर काय परिणाम होतो हे पाहण्यास उत्सुक होते. एवढ्या उंचीवरही गायीच्या दूध-उत्पादन क्षमतेवर कोणताही परिणाम झाला नाही. उड्डाणादरम्यानही ओलीने अतिशय सामान्य पद्धतीने दूध दिले. हे दूध कागदी बॉक्सेस मध्ये भरून जमिनीवरील दर्शकांपर्यंत पॅराशूटच्या मदतीने पाठवण्यात आले.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

या हवाई प्रवासानंतर ‘एल्म फार्म ओली’ गायीला आणखी एक ओळख मिळाली, ती म्हणजे ‘स्काय क्वीन’. शेतातील जनावरे हवाई मार्गाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाता येतात आणि या हवाई प्रवासादरम्यान त्यांचे दूधही काढता येऊ शकते हे ओलीच्या विमानप्रवासाने सिद्ध केले. पण इतके प्रयत्न करूनही जनावरे हवाई मार्गाने कधीही दुसऱ्या ठिकाणी पाठवली गेली नाहीत. 

आज, ‘एल्म फार्म ओली’ गाय स्थानिक लोककथांमध्ये प्रसिद्ध आहे. विमानप्रवासादरम्यान किती गाईंनी दुध दिले हे सांगणे अशक्य आहे. परंतु अशी संख्या खूपच कमी असावी. यामुळे ‘एल्म फार्म ओली’ गाय आणि ‘एल्सवर्थ बन्स’ यांचे योगदान ‘ऐतिहासिक’ बनते. जरी या ‘पब्लिसिटी स्टंट’चे आयोजक शेतीमध्ये हवाई क्रांती करण्यास अपयशी ठरले असले तरी, एल्म फार्म ओली इतिहास आणि कथाकथनाच्या समृद्ध संग्रहामध्ये मोठ्या प्रमाणात भर घालते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

…जेव्हा धनदांडग्यांनी एकत्र येऊन सरकारच उलथवून टाकण्याचा कट रचला होता..!

Next Post

चार्ली चॅप्लिनच्या ‘द ग्रेट डिक्टेटर’ने दुसऱ्या महायु*द्धाचं भाकीत वर्तवलं होतं

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

चार्ली चॅप्लिनच्या 'द ग्रेट डिक्टेटर'ने दुसऱ्या महायु*द्धाचं भाकीत वर्तवलं होतं

सोव्हिएतच्या इंजिनिअर्सनी एक महाकाय इमारत एका जागेवरून दुसरीकडे नेली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.