The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या भामट्याने एक नाही तर दोन वेळा आयफेल टॉवर विकला होता

by द पोस्टमन टीम
22 July 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


१९२५ साली पॅरिसच्या एका हॉटेलात व्हिक्टर लुस्टिंग नावाचा मनुष्य वृत्तपत्र वाचत बसला होता. त्या वृत्तपत्रात तो आयफेल टॉवरवर लिहलेला एक लेख वाचत होता, ज्यात त्या धातूने तयार केलेल्या टॉवरला गंज लागतोय असं सांगून त्याचा सांभाळ करणे फ्रेंच राज्य शासनाला अशक्य असल्याचे नोंदवण्यात आले होते. या लेखाच्या शेवटी एक गोष्ट नमूद करण्यात आली होती ती म्हणजे आता आयफेल टॉवरची विक्री करणे हा एकमेव पर्याय सरकारसमोर आहे.

हे वाचताच व्हिक्टरला एक युक्ती सुचली आणि त्याने त्याची कुठलीही मालकी नसलेला आयफेल टॉवर विकायला काढला. हा व्हिक्टर कोणी साधारण मनुष्य नव्हता तर जगाच्या इतिहासातील सर्वांत मोठा ठग होता. खूप मोठ-मोठ्या लोकांना त्याने अत्यंत शिताफीने गंडवून आपल्या गुन्ह्यांना आकार दिला होता व कोट्यवधी रुपयांची लूट केली होती. त्याच्या लुटीचे किस्से आजही अंगावर काटा आणतात.

व्हिक्टर तत्कालीन ऑस्ट्रिया-हंगेरीत व आजच्या झेक प्रजासत्ताकमध्ये असलेल्या होस्टिने नावाच्या छोट्या शहरात त्याचा जन्म झाला होता. तो एका मोठ्या घराण्याचा वारस होता. त्याचे वडील त्या शहराचे प्रमुख होते. एक विद्यार्थी म्हणून व्हिक्टर फार हुशार होता.

तो बहुभाषिक होता. त्याला झेक, इंग्लिश, फ्रेंच आणि इटालियन या चार भाषा उत्तम प्रकारे बोलता येत होत्या. तो लोकांच्या स्वभावाला ओळखण्यात आणि अनुमान लावण्यात तरबेज होता. त्याच्या याच गुणांचा पुढे त्याला फायदा झाला. आपल्या राहणीमान आणि वागण्या-बोलण्याने तो एक वेगळी छाप लोकांवर सोडून जात असे.



एकोणिसाव्या शतकात व्हिक्टर यश कमावू लागला आणि त्याने गुन्हेगारी विश्वात आपलं प्रस्थ निर्माण करायला सुरुवात केली. छोटे मोठे जॅकपॉट, लॉटरी आणि मटक्याचे व्यवसाय करत करत तो एक दिवस प्रसिद्ध गॅम्बलर म्हणून उदयास आला.

त्याच्या उच्च राहणीमानाचा व व्यवहाराचा वेगळाच प्रभाव लोकांवर पडत होता. त्याला पत्ते खेळण्यात विशेष प्राविण्य होते, त्याच्या माध्यमातून अनेक श्रीमंत लोकांना त्याने यशस्वीपणे चुना लावला होता. त्याची श्रीमंत लोकांमध्ये एक चांगला वक्ता आणि एक मोठा सामर्थ्यवान उद्योजक अशी प्रतिमा निर्माण झाली होती. त्याने त्याच्या वागण्यातून एक वेगळीच छाप लोकांच्या मनावर सोडली होती. त्याच्या अशा वागण्यामुळे तो संशयाच्या फेऱ्यात कधी सापडत नसे.

त्याला द काऊंट हे टोपण नाव त्याच्या सट्टेबाजी आणि गॅम्बलिंगच्या प्रतिभेमुळे मिळाले होते. त्याच्या चेहऱ्यावर असलेल्या एका खुणेवरून त्याची ओळख पोलीस करायचे, स्कार्ड हे टोपण नाव त्याला पोलिसांकडून देण्यात आलं होतं.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत औद्योगिक प्रगती मोठा श्रीमंत वर्ग उदयास आला. एका रात्रीत अमेरिकन लोक श्रीमंत होत असल्याच्या अनेक गोष्टी जागोजागी पसरल्या. व्हिक्टरला आता त्याच्या ठगबाजीसाठी नवीन बाजारपेठ डोळ्यासमोर दिसू लागली आणि त्याने निश्चय केला की त्या बाजारपेठेवर डल्ला मारायचा.

त्यासाठी व्हिक्टरने अमेरिकेच्या दिशेने प्रवास सुरू केला, आपण श्रीमंत असल्याची बतावणी करून आणि आपल्या उच्चभ्रू राहणीमानाची छाप सोडून त्याने सरळ अमेरिकेत प्रवेश मिळवला होता. इतकंच नाही तर प्रवासादरम्यान त्याने सोबतच्या एका श्रीमंत जोडप्याची फसवणूक करून पैसे लुबाडले होते.

आपल्या उच्चभ्रू राहणीमानाच्या आणि श्रीमंत व्यवहाराच्या बळावर अमेरिकेत त्याने प्रस्थ निर्माण केले. त्याने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या बळावर अमेरिकेत लोकांना मनी बॉक्सची विक्री करायला सुरुवात केली. व्हिक्टरने लोकांना त्या मनी बॉक्सवर शंभर डॉलर प्रिंट करून देई आणि त्याला रेडियमने सील केलं आहे अशी बतावणी करत असे. हे एक मनी बॉक्स तो २० ते ३० हजार डॉलर्सला विक्री करायचा आणि मुळात त्याच्या निर्मितीचा खर्च हा १०० डॉलर्सपेक्षा कित्येक पट कमी असायचा. तो लोकांची शुद्ध फसवणूक करायचा पण लोकांना जोवर त्याचा खेळ लक्षात यायचा तोपर्यंत तो लांब निघून गेलेला असायचा.

नंतरच्या काळात त्याला त्या व्यवसायात रस उरला नाही म्हणून काहीतरी नवीन करण्याच्या शोधात असताना त्याला आयफेल टॉवरचा तो लेख वाचायला मिळाला आणि त्याच्या मनात एका मोठ्या कटाने आकार घेतला. त्याने सुरुवातीला स्वत:चे बनावट ओळखपत्र तयार करून घेतले. मग त्याने सरकारच्या मालकीच्या इमारतींची काळजी घेणाऱ्या विभागांच्या नावाने त्याने बनावट कागदपत्र तयार करून पॅरिस शहरातील धातू वितळणाऱ्या पाच मोठ्या उद्योगांच्या प्रमुखांना भेटीसाठी पॅरिसच्या एका प्रसिद्ध आलिशान हॉटेलमध्ये बोलवलं.

त्याने त्यांच्यासमोर अत्यंत शिताफीने आयफेल टॉवर विक्रीची योजना ठेवली. त्यांच्यापैकी आंद्रे पोईजन नावाचा गृहस्थ फारच प्रभावित झाला आणि त्याने आयफेल टॉवरच्या खरेदीची तयारी दर्शवली.

परंतु त्याने जेव्हा व्हिक्टरच्या बनावट नावाचा तपास केला तेव्हा तो इतका श्रीमंत नसल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि तो हे व्हिक्टरला बोलला देखील होता. त्यावर व्हिक्टरने भावनिकपणे तो एक सामान्य नागरिक असल्याचा खोटा कबुलीनामा देऊन आपण एक सरकारी कर्मचारी असून याची विक्री करण्याची जबाबदारी माझ्यावर असल्याचं भासवून त्याने अखेर पोईझनला बाटलीत उतरवून त्याला आयफेल टॉवरची विक्री केली.

पोईझनने दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात आपण आयफेल टॉवर विकत घेतल्याची बोंबाबोंब केल्यानंतर सत्य बाहेर आलं आणि पोईझनची मोठी नाचक्की झाली. बदनामी टाळण्यासाठी त्याने व्हिक्टर विरोधात गुन्हा देखील दाखल केला नाही. पण व्हिक्टरची मजाल बघा, तो परत आला आणि त्याने दुसऱ्या माणसाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला पण यावेळी त्याची चोरी पकडली गेली. पोलिसांना त्याचा ठगबाजीची सूचना मिळून त्याला अटक करायच्या आत तो पॅरिस सोडून अमेरिकेला पळाला.

अमेरिकेत त्याने परत मनीबॉक्स विक्रीचा धंदा करायला सुरुवात केली. त्याने ४७ वेगवेगळी नावं धारण करून असंख्य नवश्रीमंत मंडळींची फसवणूक केली. त्याच्या या फसवणुकीचा चक्राच्या परिणाम अमेरिकन अर्थव्यवस्थेवर होऊ लागला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते, पण तो शेवटपर्यंत पोलिसांच्या हाती आला नाही. पण एकदा त्याचा गर्लफ्रेंडशी त्याचा वाद झाला आणि तिने पोलिसांकरवी १९३५ साली अटक केली. त्यानंतर त्याला २० वर्षांची जेलची शिक्षा सुनावण्यात आली. अल्काट्राजच्या तुरुंगात त्याचे निधन झाले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

नेपच्युनचा शोध निरीक्षणाने नाही तर गणितामुळे लागलाय..!

Next Post

मोबाईलशिवाय आता आपलं जगणं अशक्य झालंय, पण त्याचा इतिहास माहिती आहे का..?

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

मोबाईलशिवाय आता आपलं जगणं अशक्य झालंय, पण त्याचा इतिहास माहिती आहे का..?

पाकिस्तानचं हे प्रवासी विमान हवेत तर झेपावलं पण कधीच लँड नाही झालं..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.