The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सुरुवातीला ‘कोका कोला’मध्येही को*केन असायचं, पुढे त्याचं प्रमाण कमी करत काढून टाकलं

by द पोस्टमन टीम
17 October 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


लोकप्रिय शीतपेयांच्या यादीत ‘कोका कोला’चं नाव आघाडीवर आहे यात दुमत नाही. १३५ वर्षे जुने असलेले हे अमेरिकन पेय आज जगभरातील जवळपास सर्वच देशांमध्ये पोहोचले आहे. आपल्या भन्नाट चवीने अबालवृद्धांना वेड लावणाऱ्या या पेयाने शीतपेयांच्या वर्गवारीमध्ये ‘कोला’ हा नवा पायंडा पाडला. या पेयाची नक्की रेसिपी काय आहे हे जरी सध्या ‘कोका कोला’ कंपनीचं ट्रेड सिक्रेट असलं तरी या पेयाच्या व्युत्पत्तीमागचा रंजक इतिहास शोधून काढण्यात संशोधकांना यश आलं आहे.

‘कोका कोला’ पहिल्यांदा एकोणिसाव्या शतकात बनवला गेला आणि त्याचं संपूर्ण श्रेय लष्करात वैद्यकीय सेवा बजावलेल्या डॉ. जॉन स्टीथ पेंबर्टन या औषधनिर्मात्याला दिलं जातं. पेशाने फार्मसिस्ट असलेल्या स्टीथचं बालपण जॉर्जियामध्ये गेलं. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी त्याने रिफॉर्म मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शास्त्रात पदवी घेतली. रसायनशास्त्रात विशेष रुची असलेल्या स्टीथने अल्पावधीतच डॉक्टरकीला रामराम ठोकून कोलंबसमध्ये औषधविक्रीचा व्यवसाय सुरु केला. पुढे त्याने ऐतिहासिक अमेरिकन सिव्हील वॉरमध्ये सक्रीय सहभाग घेतला.

सन १९६५ साली कोलंबसच्या लढाईत तलवारीचा घाव वर्मी बसून स्टीथ जखमी झाला. ही जखम लवकर बरी व्हावी यासाठी त्याने मॉर्फीन या मादक पदार्थाचा औषध म्हणून वापर सुरु केला. पण हे औषध अंमली पदार्थांच्या व्यसनासाठी कारणीभूत असल्याचं त्याला कळून चुकलं आणि त्याने मॉर्फीनचा समावेश असलेल्या औषधांसाठी पर्याय शोधण्यावर भर दिला.

मॉर्फीनपेक्षा कमी मादक असलेल्या पदार्थांचा स्टीथने औषधनिर्मितीसाठी वापर सुरु केला.



आपल्या प्रयोगाचा एक भाग म्हणून त्याने ‘कोका’ या वनस्पतीचा आधार घेतला. या वनस्पतीमध्ये को*केनचं प्रमाण अधिक असल्याने वेदनाशमक औषधांमध्ये याचा वापर करण्याची शक्कल त्याने लढवली आणि त्याचबरोबर को*केनची मादकता कमी करण्यासाठी कोकोआ प्रवर्गातील कोला नट या कॅफेनयुक्त वनस्पतीची निवड केली. असंख्य प्रयोगांनंतर त्याने कोका, कोला नट आणि डॅमियाना या वनस्पतींचा अर्क बनवला. हा अर्क म्हणजेच सध्याच्या कोका कोलाची ‘पहिली आवृत्ती’ होती.

स्टीथने या अर्काला ‘पेंबर्टन्स फ्रेंच वाईन कोका’ असं नाव दिलं होतं. खरंतर हे पेय म्हणजे एक औषध होतं. हे औषध विक्रीसाठी बाजारात आणलं गेलं तेव्हा सामान्य जनतेमध्ये, विशेषतः स्त्रीवर्गामध्ये नैराश्य आणि वैफल्याची झाक दिसून येत होती. याच संधीचा फायदा घेऊन ‘कोका-कोला’ची जाहिरात केली गेली.

१८८६ साली आलेल्या एका कायद्यानुसार मादक द्रव्यांच्या प्रमाणावर निर्बंध आणले गेले आणि पेंबर्टनने आपल्या औषधातून को*केनची मात्रा कमी करण्याचं ठरवलं. त्यासाठी त्याने अटलांटा येथील विलीस वेनेबल यांची मदत घेतली आणि ‘ट्रायल अँड एरर’ तत्त्वावर नव्या औषधाचं निर्मितीकार्य सुरु केलं.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

एके दिवशी असाच एक प्रयोग करता करता पेंबर्टनकडून मूळ औषधात ‘सोडा वॉटर’ घातलं गेलं आणि त्यातून तयार झालेला हा द्रव औषधापेक्षा अधिक चविष्ट असल्याचं निष्पन्न झालं. पेंबर्टनने या नव्या द्रावाला औषधाऐवजी पेय म्हणून विकायचं ठरवलं. त्यावेळच्या जाहिरात क्षेत्रातील एक मोठी हस्ती असलेल्या फ्रँक मॅसन रॉबिन्सनने या पेयाला ‘कोका कोला’ असं नाव दिलं.

स्पेन्सरीयन लिपीमध्ये जाहिरात केलेल्या या ब्रँडची मागणी झपाट्याने वाढू लागल्यावर पेंबर्टनने ‘कोका-कोला’चं अधिकृत पेटंट केलं आणि वरून हे पेय डोकेदुखी, अपचन आणि अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेसारख्या अनेक आजारांवर औषध म्हणून चालू शकते असा दावाही केला.

एकोणिसाव्या शतकात औषधांचं पेटंट मिळवण्यासाठी आजच्याइतकी दिव्यं पार पाडावी लागत नसत. त्यामुळे या औषधांमध्ये अंमली पदार्थांचं प्रमाणही अधिक असायचं. पेंबर्टनने मॉर्फीनवर उपाय म्हणून को*केन वापरलं होतं आणि त्यामुळे हे पेय लोकांना आपल्या जाळ्यात ओढू लागलं.

अल्पावधीतच या पेयाने आपला जम बसवला आणि लाखोंची उलाढाल सुरु झाली. १६ ऑगस्ट १८८८ रोजी पेंबर्टन यांचं आकस्मिक निधन झालं आणि व्यवसायाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या चार्ल्स नावाच्या व्यसनी मुलावर आली. त्यावेळी व्यवसायात भागीदार असलेल्या ऍसा कॅंडलरने हिकमतीने या व्यवसायावर आपली एकहाती पकड जमवली आणि ‘द कोका कोला कंपनी’ची स्थापना केली. पुढे १८९१ साली औषधांतील मादक पदार्थांवर मर्यादा आणण्याच्या चळवळीने आणखी जोम धरला आणि ‘कोका कोला’ को*केनमुक्त करण्याची प्रक्रिया सुरु झाली.

लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या पेयामधून को*केन काढून घेणं हे एका रात्रीत घडणारं नव्हतं. पेंबर्टन यांच्या निधनानंतर या पेयाचा मूळ फॉर्म्युला बदलणे हेही एक अवघड काम होते, ज्यात अचूकतेचा कस लागणार होता. याचा परिणाम पेयाच्या चवीवर होणार होता आणि त्याचबरोबर हा बदल व्यवसायासाठीही घातक ठरणार होता.

‘कोका कोला’मधून अगदी सावकाश पण नियमितपणे को*केन कमी करत राहण्याची ही प्रक्रिया तब्बल ३८ वर्षे चालू होती आणि सन १९२९ साली हे पेय पूर्णतः को*केनमुक्त करण्यात आणि त्याचबरोबर त्याची लोकप्रियता टिकवून ठेवण्यात निर्मात्यांना यश आलं.

‘को*केनयुक्त’ ते ‘को*केनमुक्त’ कोका कोलाच्या या पन्नास वर्षांच्या प्रवासात ‘कोका कोला’ने कित्येक छोट्यामोठ्या कंपन्यांशी हातमिळवणी करून मार्केटमध्ये आपल्या नावाचं वर्चस्व निर्माण केलं होतं. या पेयाची प्रसिद्धी इतकी वाढली की अमेरिकेत ‘कोका कोला’ला राष्ट्रीय चिन्हाचा दर्जा प्राप्त झाला. आपला फॉर्म्युला एक ना एक दिवस ‘राष्ट्रीय पेय’ म्हणून ओळखला जाईल आणि सर्वच वयोगटांतील ग्राहकांना त्याचा आस्वाद घेता येईल, हे पेंबर्टन यांचं स्वप्न कॅंडलर यांनी स्थापन केलेल्या ‘द कोका कोला कंपनी’कडून पूर्ण झालं.

कॅंडलर यांनी ही कंपनी चार्ल्स पेंबर्टकडून त्यावेळी अवघ्या १७५० अमेरिकी डॉलर्समध्ये खरेदी केली होती. आजच्या तारखेला या कंपनीची उलाढाल सुमारे ३७.२७ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी आहे. पेंबर्टन यांच्या परसदारी मुठभर लोकांमध्ये सुरु झालेला हा छोटेखानी व्यवसाय आज तब्बल दोनशेहून अधिक देशांमध्ये पसरला आहे. हार्ड ड्रिंक्स म्हणून गणल्या जाणाऱ्या अल्कोहोलिक ब्रँड्सला पर्याय म्हणून ‘कोका कोला’सारखं सॉफ्ट ड्रिंक गेली कित्येक वर्षे या व्यवसायात पाय रोवून उभं आहे आणि राहीलही यात शंकाच नाही!!!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

जंगल बुकच्या लेखकाने ‘जनरल डायर’चं जाहीर कौतुक केलं होतं, त्याच्यासाठी निधीही दिला होता

Next Post

‘झिमरमन टेलिग्राम’ लीक झाला आणि अमेरिका पहिल्या महायु*द्धात सहभागी झाला..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

'झिमरमन टेलिग्राम' लीक झाला आणि अमेरिका पहिल्या महायु*द्धात सहभागी झाला..!

डुकराचा चेहरा असलेली एक महिला लंडनमध्ये राहत असल्याची अफवा परसली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.