The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कसा आहे अनुराग कश्यपचा नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला ‘चोक्ड’ हा चित्रपट?

by सोमेश सहाने
8 June 2020
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


“चोक्ड” – अनुराग कश्यपचा नवीन चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला, जिथं त्याचे चाहते सिनेमागृहात येणाऱ्या प्रेक्षकांच्या तुलनेत जास्त आहे. 

वैफल्यग्रस्त नवरा आणि गाणं सोडून बँकेच्या नोकरीवर संसार सांभाळायचा प्रयत्न करणारी पत्नी, यांच्या बिघडत जाणाऱ्या विवाह संबंधात भर पडते ती खराब झालेल्या एका पाईपलाईनमुळे. त्यांच्या घरात पाईप चोक् झाल्यामुळे पाणी लिक होतं आणि त्यात वाहत येतात नोटांचे बंडल. अचानक रोज रात्री पैसे आल्यामुळं होणाऱ्या आनंदावर नोटबंदी विरजन टाकते आणि तिथून पुढे त्या पैश्यांचं काय होईल हे उलगडत जाणारा प्लॉट आपल्याला धरून ठेवतो. 

लग्नघर असलेला मराठी शेजार (अमृता सुभाष), फसलेल्या बिजनेस मधला पार्टनर, ज्याच्याकडून पैसे उधार घेतलेत तो दाक्षिणात्य हॉटेल मालक (उपेंद्र लिमये) यांच्यावाट्याला मुख्य कथेला आधार देण्याची जबाबदारी आहे.

मूळ कथेत पाईप चोक् होऊन येणारे पैसे आणि त्यामुळं घडणाऱ्या गोष्टी होत्या पण नोटबंदीचा इव्हेंट टाकून थ्रिल वाढवायचा प्रयत्न झालाय. सामाजिक आणि राजकीय गोष्टी काही काळाने सिनेमात येतातच. 

याआधी नोटबंदीमुळं दहशतवाद्यांना कसा त्रास झाला यावर सिनेमे आणि सिरीजमधून बरंच आलंय. आता त्याच विषयाची दुसरी बाजू कथानकात एक ट्विस्ट म्हणून येत असेल यात काहीच नवल वाटण्यासारखं किंवा विरोध करण्यासारखं नाहीए. किंबहुना सिनेमा बघत असताना त्या गोष्टीचा अडथळाही वाटत नाही. 



अनुराग कश्यप हे ट्विटरवर स्पष्टपणे मोदी विरोधक आहेत, इथं पात्रांच्या तोंडून स्वतःची मतं मांडणं आणि फक्त त्याकाळात झालेला गोंधळ निरीक्षण म्हणून दाखवणं यात फरक करताना त्यांची झालेली ओढताण आपल्याला दिसते. राजकीय मतं सिनेमात टाकायचा प्रयत्न अजून थोडा सटल पद्धतीने करता आला असता. अर्थात दुसऱ्या बाजूने सिनेमात येणार मोदीप्रेम जेवढं उथळ आणि बोल्ड आहे (ढिशूम, उरी), त्याच्या तुलनेत अनुरागला सटल व्हायला सांगणंही नको वाटतं.

अनुरागचा चित्रपट म्हणलं की कितीही टाळलं तरी काही गोष्टींची अपेक्षा आपण ठेवतो. जसं की व्हलनरेबल होणारे पात्र, रॉनेस, डिस्टर्ब करतील असे सीन्स, अनपेक्षित घटना, इ. चोक्ड’मध्ये मात्र हा “अनुराग फॅक्टर” कमी आहे. पात्र छान सेट होतात पण क्लायमॅक्सपर्यंत खिळवून ठेवायला लागणारा दर्जेदार स्क्रीनप्ले इथं मिसिंग आहे. 

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

कथेचा शेवट आणि पात्रांचे शेवट फार बोल्ड नसले तरी अंतर्मुख करणारे आहेत. सैयमी खैर यात सरलाच्या मुख्य भूमिकेत आहे. याआधी आपण तिला स्पेशल ऑप्स आणि मिरझ्यामध्ये बघितलं होतं. इथेही तिने अभिनयाची विशेष छाप सोडली आहे. बँकेत कॅशिअर ज्या स्पीडने नोटा मोजतात, गृहिणी घरी आल्यावर जी चीड चीड करते, या गोष्टी तिने हुबेहूब साकारल्या आहेत.

दुसऱ्या मुख्य पात्रात आहे रोशन मॅथ्यू. अनुरागने “मुथोन” नावाचा दाक्षिणात्य चित्रपट प्रोड्युस केला होता, त्यातलं काम आवडल्यामुळे रोशनची इथं वर्णी लागली. इथं त्याच्या वाट्याला आलेल्या पात्राला त्याने न्याय दिला आहे. पण सोबतच तो यापेक्षाही जास्त मोठी जबाबदारी साकारू शकतो हे ही त्याने सिद्ध केलंय. 

एका मुलाखतीत अनुरागने सांगितलं की शेजारी राहणाऱ्या मराठी ताईंचं पात्र साकारणाऱ्या अमृता सुभाषचे सगळे सीन्स हे इंप्रोवाईज्ड आहेत. त्यांच्या संभाषणाचं लिखाण आधी केलेलं नव्हतं. रमण राघवपेक्षाही या सिनेमात अमृता सुभाषचं काम उजवं वाटतं. एका सीनमध्ये ती नोटा बदलून देण्याची विनंती करायला सरलाकडे रडारड करत असते पण ती नजरेआड जाताच डाळ शिजली की नाही हे विचारायला तिचे हावभाव क्षणार्धात बदलतात. या एकाच सीनमध्ये तिने स्वतःची सगळी कला ओतल्यासारखं वाटलं. सरप्राईज करणाऱ्या अभिनयामुळेच ती अनुरागच्या आवडत्या अभिनेत्रींच्या यादीत नेहमीच असते. 

उपेंद्र लिमयेला अजून जास्त भूमिका का भेटत नाहीत याचं दुःख सिनेमात त्याला पाहताना होणाऱ्या आनंदापेक्षा जास्त आहे. “पेज थ्री”पासून हा माणूस स्वतःला सिद्ध करतोय. 

मुंबईत राहणारे मराठी कुटुंबही हिंदीत बोलायला लागतात, पण काही शब्द मात्र ते मराठीतलेच वापरतात. एरवी ही परिस्थिती दाखवताना वाटतील ते शब्द मराठी हिंदी करून खिचडी केली जाते. इथे मात्र भाषेतलं खरेपण खूप नीट सांभाळलं आहे. वन बीएचके फ्लॅटमध्ये भांडणारं जोडपं सगळ्या सिंगल टेकमध्ये हँड हेल्ड कॅमेराने दाखवलं आहे. त्यामुळं ते कधी एकदा शांत होतील इतका गोंधळ नीट साकारता आला. 

या सिनेमामुळे मुंबईच्या मराठी कुटुंबांना एका नव्या, सुधारित चष्म्यातून बघता येईल. अनुरागच्या चित्रपटात या बारीकसारीक गोष्टी बघणं खूप मजेदार असतं. पण नेहमी अनुरागचा सिनेमा संपल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर एक काहीतरी अजब बघितल्याचं हसू असतं. शाहीद  खान रामाधीरकडं बघून जसा हसतो ना तसं. या सिनेमात ते नव्हतं. हे काहीसं एका चौकटीत असणाऱ्या अपेक्षाभंगातून होतं आणि बरंचसं ढिसाळ स्क्रीनप्लेमधून प्रेक्षकांना ग्राह्य धरण्याच्या चुकीतून. 

हा सिनेमा काही पॉपकॉर्न एंटरटेनर नाही म्हणून आपण जास्त गूढ, लेयर्ड शोधायला जातो, आणि तसं काहीतरी अनपेक्षित सापडावं याची सवय आपल्याला याच दिग्दर्शकाने लावली आहे. म्हणून असं म्हणावं लागेल की अनुरागचा हा सिनेमा “अनुराग फॅक्टर” पासून बराच वेगळा आहे.

चौकटी वाढवणारा वेगळा अनुभव घ्यायला हा सिनेमा नक्की बघा. पण एकाच सिनेमातून खूप अपेक्षा ठेवत असाल तर नेटफ्लिक्सवर बाकी बरेच चांगले पर्याय आहेत. डिस्टर्ब होण्याची भीती नसेल, काहीतरी अगदीच वेगळं विचित्र जग बघण्याची इच्छा असेल तर अनुराग कश्यपचा “अ गर्ल इन यलो बूट्स” नावाचा चित्रपट नेटफ्लिल्सवर नक्की बघा.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

भारताच्या संविधान निर्मितीत या दोन प्रशासकीय अधिकाऱ्यांचं योगदान बहुमूल्य आहे

Next Post

या भारतीय महिलेमुळे संयुक्त राष्ट्रसंघात महिलांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क मिळाला

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

या भारतीय महिलेमुळे संयुक्त राष्ट्रसंघात महिलांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क मिळाला

भारतीयत्व हेच खरे अस्तित्व!!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.