The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शाळेत असताना खिशाला “फाऊंटन” पेन असणाऱ्यांचा एक वेगळाच माज असायचा

by द पोस्टमन टीम
29 July 2020
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब 


“सुंदर हस्ताक्षर हाच विद्यार्थ्याचा खरा दागिना आहे” हा सुविचार ऐकतच सगळ्यांचे बालपण गेले असेल यात काही शंकाच नाही. हस्ताक्षर सुंदर असावे म्हणून दुरेघी, चाररेघी वह्या वापरून हस्ताक्षर सुधारण्याचे खटाटोप आपण सगळ्यांनीच केले आहेत. याच हस्ताक्षर सुधारणेच्या उपक्रमात महत्त्वाचा घटक होता तो म्हणजे शाई पेन.

शाईचा पेन वापरणाऱ्या व्यक्तीचे हस्ताक्षर सुंदरच असेल असा समज प्रचलित होता.

सगळ्यांच्या हस्ताक्षर सुधारण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भुमिका असणाऱ्या या ‘चेलपार्क’ कंपनीच्या पेनचा आज आपण आढावा घेणार आहोत.

त्यावेळी प्रत्येक शालेय विद्यार्थ्याच्या दप्तरात चाररेघी वही, एक शाई पेन, शाई पेनसाठी लागणाऱ्या शाईची एक बाटली या ३ गोष्टी हमखास सापडत असत. हस्ताक्षरावरुनच त्यावेळी विद्यार्थ्याच्या चरित्राची ओळख केली जात होती.

शाई पेनमध्ये शाई भरताना हाताला पडणारे निळे, काळे दाग दप्तराच्या प्रत्येक कोपऱ्यात हमखास दिसायचे. एखाद्या योद्ध्याने जखमा बाळगाव्यात तसेच ते दाग प्रत्येक विद्यार्थी अगदी अभिमानाने बाळगत असे.



पाटी आणि पेन्सिल त्यांच्या शेवटच्या टप्प्यात असताना लेखणी क्षेत्रात पुढची नवीन क्रांती होती ती म्हणजे शाई पेनचा उदय. परिक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी विद्यार्थी शाई पेनचा वापर करु लागले.

चेलपार्कच्या पेनला पसंती देण्याचे कारण होते त्याची सगळ्यांना परवडणारी किंमत, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक रंगात असणारी त्याची उपलब्धता. चेलपार्क त्यावेळी निळ्या-निलमी पासून ते किरमीजी-निळा या रंगांमध्ये उपलब्ध होता.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

५०च्या दशकात प्रसिध्द शाईपेन कंपनी असलेली ‘पार्कर’ भारतीय बाजारात उतरण्यासाठी भागीदार शोधत होती. त्यावेळी चेल्लाराम नावाचे कर्नाटक राज्यातील एक कुटुंब पार्कर कंपनीबरोबर आफ्रिकेत काम करत होते. भारतीय बाजारपेठ सांभाळण्यासाठी विचारले गेले असता त्यांनी लगेच होकार दिला.

पार्कर आणि चेल्लारामच्या या करारानंतर चेलपार्कचा जन्म झाला. बंगलोरमध्ये उभारल्या गेलेल्या कार्यालयातुन चेलपार्कचा कारभार सुरु झाला.

कंपनीच्या शाईची आणि पेनाच्या टोकाची उत्तम गुणवत्ता हे पेनाच्या यशाचे गमक होते असं तज्ञ सांगतात. चेलपार्कची शाई अतिशय गुळगुळीत आणि दीर्घकाळ टिकणारी होती. या शाईचा वापर अतिशय महागड्या शाई पेनमध्ये सुध्दा बिनधास्तपणे केला जाई.

मोठ्या नोकरदारांपासून शाळेत जाणाऱ्या छोट्या मुलांपर्यंत सगळेच हा पेन आणि शाई वापरत असे. गाजलेल्या दोन प्रसिध्द पेनचे नामकरण त्यावेळी मोती आणि सोना असे केले होते.

एक वेळ अशी आली होती की भारतातील प्रत्येक घरात शाईची बाटली ही चेलपार्क होती. फाऊंटन पेनने लिहिणे, त्यात शाई भरणे, कैलीग्राफीचा सराव या गोष्टी त्यावेळी अतिशय मजेशीर होत्या. चेलपार्कचा पेन खिशाला लावताना वाटणारा अभिमान काही औरच होता.

भारतात सुरुवात करताना चेलपार्क हा पेनचा एक नविन आणि वेगळा ब्रँड आहे अशीच त्याची जाहिरात केली गेली. शाईच्या बाटलीतून चेलपार्कचे चिन्ह दाखवणाऱ्या छापील जाहिराती त्यावेळी करण्यात आल्या.

जाहिरात, पेन आणि शाई तिघेही लगेच गाजण्यास सुरुवात झाली. वापर केलेल्या ग्राहकांनी पेनच्या गुणवत्तेचे भरभरून कौतुक केले. बघता बघता पेन आणि शाई या दोघांची प्रसिध्दी वाढतच गेली.

शाईची बाटली काचेची होती. बाटलीचे झाकण प्रसिध्द होते ते छोट्याछोट्या गळतीसाठी. कितीही नीट लावले तरी बाटलीतुन शाई गळती सुरुच असे. यामुळेच की काय पँटच्या खिशाला पडलेले निळे डाग म्हणजे शाई पेन वापरणाऱ्या व्यक्तीची ओळख होती.

चेलपार्कला जाहीरातीत जास्त गुंतवणुक करण्याची गरज भासली नाही. त्याऐवजी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करण्याचा त्यांनी जास्त प्रयत्न केला. ग्राहकांच्या प्रतिसादाचा फायदा घेउन त्यांनी आपला ग्राहक वर्ग वाढवण्यावर भर दिला.

शाळेत होणाऱ्या निबंधाच्या स्पर्धा, शिक्षकांना पेनचे दाखवले गेलेले प्रात्यक्षिक, शाळेत वेगवेगळ्या कार्यक्रमातुन चेलपार्कचा ग्राहकवर्ग वाढत गेला.

शाईचा पेन वापरता यावा म्हणुन लवकरात लवकर चौथीच्या, पाचवीच्या वर्गात जाण्याची विद्यार्थ्यांना घाई होती. शाई पेनचा वापर नीट करता येणे ही बाबही त्यावेळी महत्त्वाची होती.

चेलपार्कची स्पर्धा होती ती कॅमलिन आणि ब्रिल या कंपन्यांशी. मुंबईत सुरुवात झालेली कैमलिन मुख्यतः शाई आणि कलासाहित्य विक्रीत अग्रगण्य होती. १९३१मध्ये सुरु झालेल्या या कंपनीच्या नावाचा उगम ‘कॅमल’ आणि ‘इंक’ या दोन शब्दांच्या एकत्र येण्याने झाला होता. ऊंट जसे वाळवंटातसुध्दा जास्त वेळेसाठी चांगलं काम करतात तसंच आपले उत्पादनसुद्धा करतात हा यामागचा उद्देश होता.

चेलपार्कच्या शाईचा वापर फक्त लिहिण्यासाठीच केला जात नव्हता. काही कलाकार चित्र काढण्यासाठीसुध्दा या शाईचा वापर करत असत. काही कलाकार मात्र चेलमार्कने पाण्याच्या संपर्कात आल्यावरही टिकू शकणारी शाई बनवली नाही यामुळे तक्रार करत असत.

आज चेलमार्कचे पेन अगदीच कमी लोकांकडे सापडतात. फाऊंटन पेनच्या प्रेमात असलेले लोकच आता हा पेन वापरताना दिसतात. शहरातील जनरल स्टोर्समध्ये हा पेन आता कुठेतरी धूळ खात पडलेला दिसतो.

१८ रुपयांना मिळणारी शाईची बाटली आता अमेझॉनसारख्या संकेतस्थळावर ४५० रुपयांत मिळते.

चेलपार्कचा पेन आणि शाई नक्की केव्हा घराघरातुन गायब झाली ते कोणालाच माहीत नाही. चांगल्या गुणवत्तेचे बॉल पेन आणि शाई पेनशी काही प्रमाणात साम्य असलेल्या जेल पेनच्या आगमनाने शाई पेनचे महत्त्व कमी केले खूप. पेन गायब झाले आणि मग हळुहळु पेनची शाई.

पार्करने चेलपार्कमधुन माघार घेतली. कॅमलिन आणि ब्रिल यांनी पण आपल्या उत्पादनाचा दर्जा आणि क्षेत्र वाढवले. वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्याबरोबरच शाई पेनच्या उत्पादनातसुध्दा कॅमलिनने उडी घेतली.

फक्त चेलपार्कच नाही हळूहळू सगळ्याच पेनचा वापर आता कमी होत चालला आहे. डिजिटल तंत्रज्ञानात झालेल्या उत्क्रांतीमुळे लिखाणसुध्दा आता डिजिटलच झाले असुन याचा परिणाम पेनच्या विक्रीवर झाला आहे.

चेलपार्क आता आधी एवढा प्रसिध्द नसला तरीही बऱ्याच जणांच्या शालेय जीवनाचा तो एक महत्त्वाचा भाग होता. कपड्यांवर असलेले शाईचे डाग आणि सुंदर हस्ताक्षर काढण्यासाठी केलेल्या मदतीसाठी चेलपार्क नक्कीच कायम ओळखला जाईल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

मुसोलिनीची सुरुवात वेगळी असली तरी त्याचा शेवट इतर हुकुमशहांसारखाच झाला

Next Post

मारुतीच्या 800ने सामान्य भारतीयाचं चारचाकी घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं होतं

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

मारुतीच्या 800ने सामान्य भारतीयाचं चारचाकी घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं होतं

भटकंती : जाणून घ्या पुण्याच्या हृदयात दडलेल्या पाताळेश्वराचा इतिहास

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.