The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चार्ली चॅप्लिनच्या ‘द ग्रेट डिक्टेटर’ने दुसऱ्या महायु*द्धाचं भाकीत वर्तवलं होतं

by Heramb
26 October 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


जागतिक चित्रपटांना मोठा वारसा आणि इतिहास आहे. या चित्रपटांचा संबंध जगातील प्रत्येक व्यक्तीशी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मग त्यांच्यातून हि*टलर कसा वेगळा राहील? चार्ली चॅप्लिन हे  जागतिक चित्रपटसृष्टीत अजरामर झालेलं व्यक्तिमत्व. या व्यक्तिमत्वाने अनेक पिढ्यांना खळखळून हसवले. चॅप्लिनने दुसऱ्या महायु*द्धाचे भाकीत आपल्या “द ग्रेट डिक्टेटर” या चित्रपटातून केले होते.

‘द ग्रेट डिक्टेटर’ हा १९४० चा अमेरिकन व्यंगात्मक, कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे. हा चित्रपट ब्रिटिश कॉमेडियन चार्ली चॅपलिन लिखित, दिग्दर्शित, निर्मित आणि अभिनीत आहे. चॅप्लिनने हा त्यांचा पहिला खऱ्या अर्थाने ध्वनी-चित्रपट बनवला होता. या चित्रपटाला १५ ऑक्टोबर २०२४ रोजी ८४ वर्षे पूर्ण झाली.  १५ ऑक्टोबर १९४० रोजी मोठ्या पडद्यावर रिलीज झालेला हा चित्रपट ॲडॉल्फ हि*टलर आणि ना*झी राजवटीवरील व्यंग आहे.

चित्रपटाच्या पहिल्या रिलीझच्या वेळी, युनायटेड स्टेट्सचे संबंध ना*झी जर्मनीबरोबर चांगले होते आणि दुसऱ्या महायु*द्धाच्या सुरुवातीच्या काळातही युनायटेड स्टेट्स तटस्थ होते. या चित्रपटात चॅपलिन दोन टोकाच्या प्रमुख भूमिका बजावतो: ‘एक निर्दयी फॅ*सिस्ट हुकूमशहा आणि एक छळ झालेला ज्यू न्हावी’.

चार्ल्स चॅप्लिनची ही कलाकृती विलक्षण आहे. कारण १९३७ साली चित्रीकरण सुरु झालेल्या या चित्रपटामध्ये हि*टल*रच्या आक्र*मक धोरणामुळे दुसरे महायु*द्ध घडले असे अचूकपणे दाखवण्यात आले होते. अशा प्रकारचा चित्रपट तयार करण्याची जोखीम त्यावेळी कोणीही घेतली नसती. पण ना*झी-विरोधी चित्रपट तयार केल्याने चार्लस् चॅप्लिन एका विनोदी अभिनेत्याबरोबरच किती धैर्यवान माणूस होता हे सिद्ध झाले.

हा चित्रपट ज्या देशात तयार होत होता, असं अमेरिका यु*द्धाच्या उत्तरार्धात ना*झींविरुद्ध फक्त संघर्षातच उतरलं नव्हतं तर युरोपमध्ये ज्यूंवर होणाऱ्या अ*त्याचारांविरुद्धसुद्धा अमेरिकेने आवाज उठवला होता. या ऐतिहासिक चित्रपटाला अमेरिकन प्रेक्षकांसाठी ‘फॅ*सिझमच्या विरोधातील प्रचाराचा एक भाग’ देखील मानला जातो.



‘द ग्रेट डिक्टेटर’ हा चॅपलिनच्या कलात्मक कारकीर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. चार्ल्स चॅप्लिनच्या कारकिर्दीतील हा पहिलाच “स्पोकन” चित्रपट आहे. स्पोकन चित्रपट म्हणजेच ‘ध्वनी’ चित्रपट. यापूर्वी मोठ्या पडद्यावर फक्त दृश्य दाखवली जात असत आणि त्या दृश्यांच्या बरोबरीने संवादांच्या पाट्या घेऊन काही लोक पडद्यासमोर उभे राहत असत.

 या चित्रपटात हि*टल*रची व्यक्तिरेखा हायन्केल नावाचे पात्र साकारते. हायन्केल हे हि*टलर नावाचेच विडंबन आहे. त्याप्रमाणे हायन्केलच्या साथीदारांची नावेसुद्धा हि*टल*रच्या साथीदारांची विडंबने आहेत. हायन्केलचा उजवा हात गर्बिश्चचे नाव ‘जोसेफ गोबेल्स’च्या नावाशी तंतोतंत जुळते. तसेच इटलीचा हुकूमशहा ‘बेनिटो मुसो*लिनी’ची व्यक्तिरेखा ‘बेंझिनो नेपालोनी’ नावाच्या पात्राने चित्रपटात साकारली होती.

ग्लोबबरोबर खेळणारा हायन्केल

चित्रपटात अनेक गमतीदारआणि संस्मरणीय विनोदी क्षण आहेत. हुकूमशहा हायन्केलचे ग्लोबचे चित्र काढलेल्या फुग्यावरील नृत्य, ज्यू नाव्ह्याचे विनोदी नृत्य. या नृत्यात तो एका संगीतकाराच्या संगीताच्या तालावर आणि ‘हायन्केल’च्या भाषणाच्या तालावर आपल्या ग्राहकाच्या चेहऱ्यावरून रेझर फिरवत असतो. हा सीन ॲ*डॉल्फ हिट*लर*च्या वक्तृत्व शैलीचे व्यंग आहे. चॅप्लिनने हिट*लरच्या वक्तृत्व शैलीचा अत्यंत काळजीपूर्वक अभ्यास केला आहे असे यावरून दिसते.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

जर्मनीमध्ये ना*झींच्या प्रभावाखालील रोमानियासह अनेक ठिकाणी या चित्रपटावर बंदी होती. असं असलं तरी खुद्द हिट*लर आणि काही ना*झी अधिकाऱ्यांनी हा चित्रपट पहिला होता. या चित्रपटामुळे अमेरिकन्स आपल्याबद्दल काय विचार करीत आहेत याची पुसटशी का होईना पण कल्पना त्यांना आली.

अप्रत्यक्ष स्वरुपात कॉमेडी हे अमेरिकेचे ना*झी जर्मनीविरुद्धचे एकमेव शस्त्र आहे अशी टीका दुसऱ्या महायु*द्धात तटस्थ असलेल्या इतर राष्ट्रांनी यु*द्धाच्या सुरुवातीला अमेरिकेवर केली. हिट*लर आणि मुसो*लिनी दुसऱ्या महायु*द्धात काय भूमिका घेतील याचे अगदी अचूक भाकीत या चित्रपटाने केले.

चार्ली चॅपलिनने हायन्केलच्या रूपात दिलेले प्रेरणादायी भाषण चित्रपटाने दर्शविलेला एक उत्तम घटक आहे. भाषणाचे बोल प्रत्यक्षात फॅ*सिस्ट नेत्यांच्या मतांच्या उलट आहेत, या भाषणात सैनिकांना वापरून फेकून देण्याचे शस्त्र मानणार नाही किंवा इतर राष्ट्रांना हीन दर्जाचे मानणार नाही असा आशय देऊन व्यंग तयार केले आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

एअर लाईन्सची जाहिरात म्हणून विमानात गाईचं दूध काढण्याचा स्टंट केला होता

Next Post

सोव्हिएतच्या इंजिनिअर्सनी एक महाकाय इमारत एका जागेवरून दुसरीकडे नेली होती

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

सोव्हिएतच्या इंजिनिअर्सनी एक महाकाय इमारत एका जागेवरून दुसरीकडे नेली होती

सोन्यावर आधारित अर्थव्यवस्था संपुष्टात आली असली तरीही सोन्याची झळाळी कायमच आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.