The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मॅकडोनाल्ड जगातली सगळ्यात मोठी फूड चेन आहे, त्यामागे ‘रे क्रॉक’ यांची मेहनत आहे

by द पोस्टमन टीम
15 October 2025
in गुंतवणूक
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


१९४० साली रिचर्ड आणि मॉरिस मॅकडोनाल्ड या दोन भावांनी मिळून एक फास्ट फूड कंपनी सुरू केली. नंतर तिचंच रुपांतर एका रेस्टॉरंट चेनमध्ये झालं. हळूहळू त्यांच्या व्यवसायाचा पसारा इतका विस्तारला की कंपनीला फ्रँचायझी सुरू कराव्या लागल्या. याआधी आपण मॅकडॉनल्ड्सचे ड्राइव्ह थ्रू कसे सुरु झाले याबद्दल जाणून घेतले आहे. आता याच रेस्टॉरंटचा विस्तार कसा झाला याबद्दल आणखी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

१९५५ साली आणखी एका साध्या अमेरिकन व्यावसायिकानं मॅकडोनाल्डमध्ये एक फ्रँचायझी एजंट म्हणून प्रवेश केला. पुढे जाऊन याचं व्यक्तीनं मॅकडोनाल्ड बंधूंकडून त्यांच्या रेस्टॉरंटची चेन खरेदी केली. या व्यक्तीचं नाव होतं, रे क्रॉक! आता अनेकांना प्रश्न पडला असेल मॅकडोनाल्ड्स सारख्या प्रस्थापित उद्योजकांच्या गोटात प्रवेश मिळवणारा हा व्यक्ती होता कोण? याच प्रश्नाचं उत्तर आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

रे क्रॉक सुरुवातीला पेपर कप आणि मिल्कशेक मशीन विकत असे. नंतर त्याला मॅकडोनाल्ड हॅम्बर्गर रेस्टॉरंटच्या चेनविषयी माहिती मिळाली आणि त्याने हा व्यवसाय आजमावून बघायचा ठरवले. क्रॉकनं १९६१ साली संपूर्ण कंपनीच खरेदी केली. त्याच्या काटेकोर नियोजन आणि मार्गदर्शनामुळे मॅकडोनल्डला जगातील सर्वांत मोठ्या रेस्टॉरंटच्या चेनमध्ये स्थान मिळालं.

सध्या एक यशस्वी दिवंगत उद्योगपती अशी त्यांची जगभरात ओळख आहे. मात्र, क्रॉकचं सुरुवातीचं आयुष्य रंजक आहे. रेमंड अल्बर्ट क्रॉकचा जन्म ५ ऑक्टोबर १९०२ रोजी इलिनॉयच्या ओक पार्कमध्ये राहणाऱ्या झेक वंशाच्या कुटुंबात झाला. लहानपणी त्यानं पियानोचे धडे घेतले होते. त्यानं किशोरवयात लेमनेड स्टँड आणि सोडा विक्रीचा लहानसा व्यवसाय देखील केला होता.



क्रॉक लहानपणापासूनच धडपड्या वृत्तीचा होता. त्यानं आपल्या वयाबद्दल खोटी माहिती देऊन पहिल्या महायु*द्धात रेड क्रॉस ॲम्ब्युलन्स चालक म्हणून भाग घेतला. तेव्हा तो केवळ १५ वर्षांचा होता. प्रशिक्षणादरम्यान, त्याची ओळख वॉल्ट डिस्नेशी झाली होती. पुढे दोघांनी आयुष्यभर एकमेकांशी व्यावसायिक संबंध ठेवले. याशिवाय ओक पार्कचा रहिवासी असलेला आणि नंतर जगप्रसिद्ध लेखक म्हणून नावारुपाला आलेला अर्नेस्ट हेमिंग्वेसुद्धा क्रॉकसह यु*द्धात रुग्णवाहिका चालक म्हणून काम करत होता.

पहिलं महायु*द्ध संपल्यानंतर क्रॉक बेरोजगार झाला. त्यानं पियानोवादक, संगीत दिग्दर्शक आणि रिअल इस्टेट सेल्समन म्हणून काम करत उत्पन्न मिळवले. अखेरीस, त्यानं लिली-ट्यूलिप कप कंपनीत सेल्समन म्हणून काम मिळवले. तिथे त्याची मिडवेस्टर्न सेल्स मॅनेजरच्या पदापर्यंत बढती झाली. कप कंपनीचा कर्मचारी म्हणून त्याची आणि आईस्क्रीम शॉपचा मालक अर्ल प्रिन्स याची ओळख झाली.

हे देखील वाचा

कंपनी आणि गुंतवणूकदारांना धक्क्याला लावून, करोडो डॉलर्स घेऊन तो बाहेर पडलाय..!

३ कोटींचा लॉस भरून काढण्यासाठी त्याने करोडोंचे ट्रेडिंग कोर्सेस विकून अनेकांना गंडवलंय..!

या माणसाने कर्ज दिलं म्हणूनच टाटा सन्सचे सुमारे १९% शेअर्स मिस्त्री कुटुंबाकडे आहेत..!

प्रिन्सनं एकाच वेळी पाच मिल्कशेक बॅच तयार करणाऱ्या मशीनचा शोध लावला. १९४० च्या दशकात, क्रॉकनं लिली-ट्यूलिपमधील नोकरी सोडली आणि प्रिन्सनं तयार केलेलं मल्टी-मिक्सर देशभरात विकायचा प्रयत्न केला. साधारण १० ते १५ वर्षं  त्यानं हे काम केलं. त्याचवेळी फास्टफूट कंपनीचे मालक मॅकडोनाल्डस् बंधू एका फ्रँचायझी एजंटच्या शोधात होते. ही आपल्यासाठी सुवर्णसंधी असल्याचं क्रॉकला वाटलं आणि त्यानं मॅकडोनाल्डमध्ये प्रवेश केला.

रे क्रॉकच्या अंगात कमालीची महत्त्वकांक्षा आणि व्यवसाय कौशल्य होतं. तो रेस्टॉरंट अशी एक सिस्टीम बनवू इच्छित होती जी सातत्यानं उच्च दर्जाचे आणि एकसमान पद्धतींचे अन्न पुरवण्यासाठी प्रसिद्ध असेल. त्याला जगभरात एकसारखे बर्गर, फ्राईज आणि पेये लोकांना सर्व्ह करायची होती. आपलं ध्येय साध्य करण्यासाठी त्यानं एक अनोखा मार्ग निवडला.

फ्रँचायझी आणि पुरवठादार दोघांनाही मॅकडोनाल्डसाठी नव्हे तर त्यांच्या स्वत:साठी व्यवसाय करण्याची प्रेरणा दिली. त्यांची कल्पना तीन घटकांवर आधारित होती. एक मॅकडोनाल्डची फ्रँचायझी, दुसरा मॅकडोनाल्डचे पुरवठादार आणि तिसरा मॅकडोनाल्डचे कर्मचारी. गुणवत्ता, सेवा, स्वच्छता आणि मूल्य या तत्त्वांशी एकनिष्ठ राहून क्रॉकनं अमेरिकेत मॅकडोनाल्डचं जाळ पसरवलं. नंतर अल्पावधीतचं त्यानं अटलांटिक महासागर देखील ओलांडला.

मॅकडोनाल्डची गुणवत्ता, चव आणि परिपूर्णता कायम टिकून रहावी यासाठी क्रॉक आग्रही होता. मॅकडोनाल्डचे पुरवठादार, फ्रँचायझी आणि कर्मचारी या सर्वांच्या गळी त्यानं हेच गुण उतरवले होते. त्यानं त्यांच्यावर विश्वास ठेवला. सर्वांना समान दर्जाची वागणूक दिली. त्यांना देखील कंपनी आणि क्रॉकबद्दल आपुलकी व विश्वास निर्माण झाला. परिणामी मॅकडोनाल्डची भरभराट झाली.

१९६१ साली, क्रॉकनं इलिनॉयच्या एल्क ग्रोव्ह व्हिलेजमधील नवीन मॅकडोनाल्ड रेस्टॉरंटमध्ये एक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमाला नंतर हॅम्बर्गर युनिर्व्हसिटी म्हणून नाव मिळालं. त्याठिकाणी व्यवसायात नवीन असलेल्या फ्रँचायझींना मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट चालवण्यासाठी योग्य प्रशिक्षण देण्यात आले.

हॅम्बर्गर विद्यापीठात नवीन स्वयंपाक पद्धती, फ्रिजिंगच्या पद्धती, साठवणुकीच्या आणि सर्व्ह करण्याच्या पद्धती विकसित केल्या गेल्या. त्यासाठी त्यांनी संशोधन आणि विकास प्रयोगशाळेचा वापर केला. आजवर या ठिकाणावरून २ लाख ७५ हजारांहून अधिक फ्रँचायझी, व्यवस्थापक आणि कर्मचारी पदवीधर झालेले आहेत.

मॅकडोनाल्डच्या देखरेखीबरोबरच, क्रॉक १९७४ साली लीग बेसबॉल संघाचे मालक बनले. याशिवाय त्यांनी ‘ग्राइंडिंग इट आउट: द मेकिंग ऑफ मॅकडोनाल्ड्स’ नावाचं आत्मचरित्रही प्रकाशित केलं होतं. १९७२ साली रिचर्ड निक्सन यांच्या पुनर्निवड मोहिमेसाठी क्रॉकनं २ लाख ५५ हजार डॉलर्स दिले होते. कमीत कमी वेतन विधेयक पास करून घेण्यासाठी क्रॉकनं निक्सनला पैसे दिल्याचा आरोप सिनेटर हॅरिसन विल्यम्स यांनी केला होता.

१४ जानेवारी १९८४ रोजी कॅलिफोर्नियाच्या सॅन डिएगो येथील स्क्रिप्स मेमोरियल हॉस्पिटलमध्ये वयाच्या ८१ व्या वर्षी क्रॉकचं हृदयविकारनं निधन झालं. सॅन डिएगोमधील एल कॅमिनो मेमोरियल पार्कमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मृत्यूच्या वेळी मॅकडोनाल्डची जवळपास तीन डझन देशांमध्ये ७५ हजार रेस्टॉरंट्स होती आणि त्यांची किंमत ८ अब्ज डॉलर्स होती. आपल्या आयुष्यातील शेवटच्या दिवसापर्यंत रे क्रॉकनं मॅकडोनाल्डसाठी काम केलं. त्यांनी घालून दिलेले नियम आणि तत्त्वांचं आजही मॅकडोनाल्डमध्ये पालन केलं जातं. आजही ग्राहकांना उत्तम चवीचे आणि दर्जाची उत्पादनं पुरवली जातात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

भारतातील ब्रिटिश राज संपवण्यासाठी प्रेसिडेंट रुझवेल्ट चर्चिलच्या विरोधात गेले होते..!

Next Post

‘ब्रुस ली’च्या मास्टर ‘इप मॅन’ने हॉन्गकॉन्गच्या गल्लीबोळातल्या पोरांना मार्शल आर्ट शिकवलं होतं

Related Posts

गुंतवणूक

कंपनी आणि गुंतवणूकदारांना धक्क्याला लावून, करोडो डॉलर्स घेऊन तो बाहेर पडलाय..!

20 November 2024
गुंतवणूक

३ कोटींचा लॉस भरून काढण्यासाठी त्याने करोडोंचे ट्रेडिंग कोर्सेस विकून अनेकांना गंडवलंय..!

4 November 2024
गुंतवणूक

या माणसाने कर्ज दिलं म्हणूनच टाटा सन्सचे सुमारे १९% शेअर्स मिस्त्री कुटुंबाकडे आहेत..!

5 November 2024
गुंतवणूक

लोन घेऊन इन्व्हेस्टमेंट केली नसती तर आज वॉरेन बफेच्या तोडीस तोड असता..!

7 October 2023
विश्लेषण

रशिया-युक्रेन यु*द्ध थांबले नाही तर लोकांचे खाण्याचे वांधे सुरु होतील!

8 March 2025
गुंतवणूक

खेळणी उद्योगातलं चीनचं वर्चस्व मोडून काढणं भारतासाठी अत्यंत महत्वाचं आहे..!

28 February 2025
Next Post

'ब्रुस ली'च्या मास्टर 'इप मॅन'ने हॉन्गकॉन्गच्या गल्लीबोळातल्या पोरांना मार्शल आर्ट शिकवलं होतं

रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी बनवलेल्या या मशीननेच अनेकांचा ब*ळी घेतला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.