The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकेकाळी लंडनच्या रस्त्यावर मांजर दारु विकायचे !

by द पोस्टमन टीम
20 December 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब


नियम म्हटलं की त्याला पळवाट ही आलीच. नियमात नमूद केलेल्या शब्दांना पकडून त्याचा वापर आपल्या फायद्यासाठी करून घेण्यात सगळेच जण पटाईत असतात. आपल्याला तर माहितीच आहे नियमाचं उल्लंघन न करता नियम टाळण्यात सगळ्यात पटाईत असतात ते दारू विक्री करणारे. कितीही कडक नियम आले तरीही दारू विक्री काही केल्या बंद होत नाही.

याच दारूच्या विक्रीसाठी लंडनमध्ये नियमापासून एक पळवाट शोधली गेली होती. ही पळवाट जेवढी विचित्र तेवढीच परिणामकारकही होती. आज आपण याच रंजक पळवाटेचा माग काढणार आहोत.

ठिकाण – लंडन. सन १७३६. 

१७३६ साली जिन ॲक्ट आला आणि या दारूच्या प्रेमात अडथळा निर्माण झाला. या कायद्याने छोट्या प्रमाणात दारू विक्रीला बंदी घालण्यात आली.



ज्या व्यक्तीला कमी प्रमाणात दारू विकताना पकडले जाईल त्याला १० £ एवढा दंड ठोठावला जाणार होता, आणि २ महिन्याचा तुरुंगवासही. तरीही यावर नियंत्रण येत नव्हते. तुरुंग भरत चालले होते आणि लोक रस्त्यावर दारूच्या शोधात फिरत होते.

अर्थात, हा कायदा करण्यामागे कारणेही तशीच होती. दारूचे सेवन हा लंडनमध्ये त्यावेळी खूप मोठा प्रश्न होता. संपूर्ण लंडनच्या रस्त्यांवर दारुडे लोक २४ तास पडून होते. दारूच्या सेवनाने बेधूंद होऊन कसलेही नियम पाळले जात नव्हते. घराकडे लक्ष नाही. वेश्याव्यवसाय भरभराटीला येत होता. स्वस्त दारू जास्त पिऊन घरी मारहाण करण्याचे प्रकार वाढत चालले होते. थोडक्यात लंडनची वाटचाल ज्या दिशेने चालू होती ते काही फारसे चांगले चित्र नव्हते.

या गोंधळात डडली ब्रेडस्ट्रीट नावाचा २८ वर्षाचा एक आयरीश तरुण लंडनला आला. आयर्लंडमध्ये तो दारू बनवत असे. १७३९च्या भयंकर थंडीचा परिणाम त्याच्या व्यवसायावर झाला आणि तिकडचा व्यवसाय तोट्यात गेला. आपल्या पत्नीला आयर्लंडमध्येच ठेऊन तो एकटाच लंडनला नव्या संधीच्या शोधात आला. सुरुवातीला नातेवाईक थोडीफार मदत करतील अशी त्याची आशाही फोल ठरली.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

आता डडलीला दुसरा काहीतरी मार्ग शोधणे गरजेचे होते. यासाठी त्याला जास्त काही कष्ट घेण्याची गरज पडणार नव्हतीच. डडली आधीपासूनच हुशार असल्याने बाजारात नेमकी मागणी कशाची आहे हे त्याने लगेच हेरले. विक्रीला असणारे निर्बंध कसे हाताळायचे याचाच विचार तो करत होता.

त्याने १७३६ च्या जिन ॲक्टची एक प्रत आणली आणि नीट वाचली. अभ्यास करुन त्याने काही गोष्टी नीट जाणून घेतल्या. त्यातील, सरकारला कुलुप लावलेल्या घरात प्रवेश करता येत नाही, तसेच दारू विकणाऱ्याची तक्रार करण्यासाठी तुम्हाला ज्या घरात दारू विकली जात आहे त्या घराचा मालकाचे नाव माहीत असणे गरजेचे आहे, या दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या. याच दोन गोष्टींचा वापर करूनच पुढे तो दारू विकण्याची एक अजब पद्धत बाजारात आणणार होता.

आपल्या एका मित्राला सांगून त्याने एक घर भाड्याने घ्यायला सांगितले. हे घर मित्राच्या नावे स्वत:कडे घेऊन त्याने स्वत:चे नाव गुपितच राहिल याची खबरदारी घेतली. घरात जाऊन त्याने दाराला मोठे कुलुप लावुन घेतले. फर्निचर घेऊन त्यात खाण्यासाठी भरपुर पदार्थ भरुन ठेवले.

जवळच्या बाजारात त्याने लाकडाचे एक चिन्ह विकत घेतले, ज्यावर मांजरीचे चित्र होते. त्यातुन दारू विकता येइल ही भन्नाट कल्पना फक्त डडलीलाच सुचू शकते असं म्हटलं तर वावगं ठरू नये.

त्याने ते लाकडी चिन्ह खिडकीत लावले आणि त्याला एक शिसेचा नळ जोडला. त्याप्रकारे घरात राहून कोणालाही न दिसता तो आता दारू विकु शकत होता. नरसाळ्याचा वापर करुन तो दारू ओतत असे. मांजरीच्या तोंडात एक छिद्र बनवून त्यात पैसे टाकले की नळातून दारू येत असे. या पद्धतीने कायदाही भंग होत नव्हता आणि दारूही विकली जात होती.

घर तयार झाले, तेव्हा जवळ असणारा सर्वोत्कृष्ट दारू बनवणारा शोधून त्याने १३ £ ची दारू विकत आणली. ही दारू त्याच्या घरात आणण्यासाठीसुद्धा त्याने विशेष तरतुद करुन ठेवली होती.

धंद्यासाठी डडली तयार होता. कोणाला तरी सांगून त्याने आपली दारू विक्रीची कल्पना बाजारात पसरवली. एक मांजर आता दारू विक्रीस उपलब्ध आहे अशी बातमी त्याने पसरवून दिली. सकाळी लवकर उठून तो ग्राहकांची वाट बघत होता. ३ तास वाट बघुनही कोणीच आलं नाही. निराश झालेला डडली आता बंद करण्याच्या तयारीत असतानाच, “२ पेनी किंमतीची दारू दे” असा आवाज त्याला आला. डडलीने त्याला मांजरीच्या पायाशी दारू येईल असे सांगितले आणि दारू विकली. आता हळूहळू ग्राहक वाढले. पुढच्या दिवशी त्याने ३० पेक्षा जास्त शिलींगची कमाई केली. हळूहळू तो ३£ ते ४£ दररोज कमवायला लागला.

गर्दी एवढी वाढत चालली होती की त्याच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना आपल्या घरात जाता येत नसे. बाहेर पडता येत नसे. पैसे येत होते पण डडली घर सोडून कुठेही जाऊ शकत नव्हता. दारू ओतण्यासाठी आणि पैसे घेण्यासाठी त्याचं घरातच राहणं गरजेचं होतं. तसेच बाहेर पडताना त्याला कोणी बघितलं तर ओळखून पोलिसांकडे देतील ही भीतीही होतीच. त्याला आता एकटेपणा जाणवायला लागला.

एका संध्याकाळी त्याने बाहेर पडण्याचे धाडस केले तेव्हा मेरी नावाची एक स्त्री त्याला भेटली. आपल्या धंद्याबद्दल त्याने मेरीला सांगितले तेव्हा मेरीने आपल्याला तुझी सहकारी व्हायला आवडेल असे सांगितले. पुढे मेरी आणि डडलीने एकत्र भरपुर पैसे कमवले. ते दोघे आळीपाळीने दारू विकण्याचं काम करत राहिले.

डडलीची मांजर ‘मंत्रमुग्ध मांजर’ म्हणून ओळखली जाऊ लागली. ही मांजर बघण्यासाठी न पिणारे लोकही आता गर्दी करु लागले. एक मांजर दारू कशी विकते हे बघणारे कित्येक लोक दररोज घरासमोर गर्दी करत असत.

शेजारी या घरात राहणाऱ्या व्यक्तीला ‘कॅटमॅन’ म्हणून ओळखू लागले. शेजाऱ्यांनी त्याची तक्रारही केली. पण हा नेमका कोण आहे हे सांगण्याची वेळ येई तेव्हा ते सगळे गप्प बसत.

एके दिवशी तर न्यायाधीश, पोलीस सगळे दरवाजा वाजत डडलीच्या घरी आले. डडलीने दरवाजा काही उघडला नाही. त्याने मेरीला वरच्या खिडकीतून या लोकांशी बोलण्यास सांगितले. मेरी सुंदर आणि मितभाषी असल्याने तिने त्यांच्याशी गोड गोड बोलून त्यांना परत जाण्यास भाग पाडले. माझी मांजर आणि मी ‘वॉटर ऑफ लाईफ’ विकत आहोत असे तिने त्यांना सांगितले.

पुढे डडलीच्या मांजरीचे अनुकरण बऱ्याच जणांनी केले. डडलीने या व्यवसायातुन भरपुर पैसे मिळवले. ३ महिन्यात त्याने ८४ £ एवढे पैसे वाचवले होते. आजच्या काळात ही रक्कम होते १०,००० £ ते १३,००० £. प्रसिद्धी वाढत गेली तशी अनेक अशाच प्रकारची दुकाने लंडनमध्ये सर्वत्र सुरु झाली. या बाकीच्या दुकानांनी डडलीचा व्यवसाय कमी केला. आता आपल्याला दुसरे काहीतरी शोधावे लागणार हे ओळखून डडलीने आपला व्यवसाय बंद केला.

अशा प्रकारे मांजरीचे चित्र वापरुन लंडनच्या लोकांचे दारुवरील प्रेम जपण्याचे काम डडलीने १८ व्या शतकात पार पाडले. नियम वाचताना त्यात असणारे लूपहोल्स शोधून काढले तर संकटातही संधी निर्माण होऊ शकते याचं हे एक उत्तम उदाहरण आहे एवढं मात्र नक्की..!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

म्हैसूरच्या राजाने दिले होते ब्राम्हणांना आरक्षण !

Next Post

या कारणांमुळे या तीन देशांमध्ये आढळत नाहीत साप !

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

या कारणांमुळे या तीन देशांमध्ये आढळत नाहीत साप !

हे दशक मानवी इतिहासातील सर्वात वाईट दशक मानलं जातं !

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.