The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतात जुगारावर बंदी असतानाही या तीन राज्यांमध्ये कसिनो कसे काय..?

by द पोस्टमन टीम
23 March 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब


आपल्याकडे जुगार हा शब्दच बदनाम आहे. काहीजणांसाठी हा निव्वळ टाईमपास आहे तर काहींसाठी उत्पन्नाचे साधन. पण उपजीविकेसाठी वापरलेला हा मार्ग नैतिक आहे का?, हा वादाचा मुद्दा आहे. मुळात जुगार खेळण्यासाठी फारशा कौशल्याची गरज नसते. त्यात यश मिळण्यासाठी ना खूप शिक्षण लागतं ना फार श्रम करावे लागत. यात पैसे मिळवण्यात नशिबाचाच भाग जास्त आहे.

थोडक्यात काय, तर फार कौशल्याचा वापर न करता नशिबावर विसंबून अवास्तव आणि अनपेक्षित आर्थिक उत्पन्न मिळविणे म्हणजे ‘जुगार’. जिथे जुगारासारखे खेळ खेळले जातात ती इमारत म्हणजे कॅसिनो!

भारतात, कायद्यानुसार सार्वजनिक गेमिंग हाऊस किंवा ‘कसिनो’ चालवण्यास किंवा त्याचे प्रभारी म्हणून काम करण्यास प्रतिबंध आहे. हा कायदा मोडल्यास २०० रुपये दंड किंवा ३ महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा अशी तरतूद आहे. तसेच, या कायद्याने द्यूतगृहांना म्हणजे कसिनोला भेट देण्यास सक्त मनाई आहे. तसे केल्यास १०० रुपये दंड किंवा एक महिन्यापर्यंतची कैद अशी शिक्षा असू शकते.

मात्र असे असले तरी, मुळात, कायदा आणि सुव्यवस्था हा भारतात राज्याच्या अखत्यारीत येणारा विषय आहे. जुगाराचा संबंध याच्याशीच येतो, त्यामुळे आपापल्या राज्यात जुगारासंबंधी कायदे करण्याचा अधिकार संबंधित राज्यांना आहे. सध्या तरी केवळ तीन राज्यातील सरकार कॅसिनोला कायदेशीर मान्यता देतात. ते म्हणजे गोवा, दमण व दीव, आणि सिक्कीम.



गोवा

१९९९ पर्यंत, सर्व भारतीय राज्यांमध्ये जमिनीवरच्या कसिनोवर बंदी होती. कसिनो गेमिंगला परवानगी देणारे गोवा हे भारतातले पहिले राज्य! 

गोव्याने पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी कसिनो खुले केले. तिथे १० कसिनो आहेत, त्यापैकी सहा जमिनीवरचे आहेत तर चार मांडवी नदीत फ्लोटिंग कसिनो म्हणून कार्यरत आहेत. गोव्यात, कसिनोवर १०% दराने कर आकारला जातो.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

दमण आणि दीव

दमणमध्ये किनाऱ्यालगत कसिनो सुरू करण्यात आला गेला आहे. संपूर्ण भारतातील सर्वात मोठा कसिनो म्हणून प्रसिद्ध असलेला डेल्टिन कसिनो दमणमध्येच आहे.

१९७६ च्या कायद्यानुसार सरकारच्या पूर्व परवानगीने केवळ पंचतारांकित हॉटेलात किंवा किनाऱ्यालगत उथळ पाण्यात उभ्या असलेल्या जहाजांवर कॅसिनो चालवता येतात.

सिक्किम

सिक्किममध्ये दोन कसिनो आहेत – एक कसिनो सिक्कीम आणि दुसरे कसिनो माहजोंग.

या तीन ठिकाणांव्यतिरिक्त जुगार खेळण्यासाठी ऑनलाइन साईट्सचा पर्यायपण असू शकतो.

 सिक्कीम हे एक राज्य असे आहे, जे घोड्यांची सट्टेबाजी आणि लॉटरी अशा सुविधा ऑनलाइन पुरवते. २०१० मध्ये सिक्कीमने तीन ऑनलाइन जुगाराचे परवाने देण्याची योजना आखली. 

इतर राज्ये सिक्कीमचे अनुकरण करतील अशी अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली. वास्तविक भारत ही ऑनलाइन सट्टेबाजीसाठी खूप मागणी असलेली बाजारपेठ, पण कुठेतरी माशी शिंकली.

भारतात एक कायदा आहे, त्याचे नाव आहे फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ॲक्ट किंवा परकीय चलन व्यवस्थापन कायदा . त्यानुसार ऑनलाइन गॅम्बलिंग साइटशी केले जाणारे आर्थिक व्यवहार रुपये या चलनाच्या स्वरूपातच करणे बंधनकारक आहे.

जुगार असा कितीही बदनाम असला तरी त्याचे काही फायदेही आहेत. अगदी वैयक्तिक स्तरावर आणि शासकीय स्तरावरदेखील! आणि हो, जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत.

वैयक्तिक स्तरावर फायदे

  • कसिनोमध्ये जुगार खेळताना व्यक्तीला वेळेवर किंवा प्रयत्नांवर काही मर्यादा न घालता झटपट हवे तेवढे पैसे कमावता येतात, अर्थात जर ती जिंकली तर.
  • जिंकल्या जाणाऱ्या पैशाची रक्कम इतर व्यवसायाप्रमाणे भांडवलाच्या केवळ काही टक्के राहत नाही. एखादी व्यक्ती गुंतवलेल्या पैशाच्या दुप्पट, तिप्पट किंवा अनेकपट पैसे मिळवू शकते.
  • कसिनोमध्ये खेळणे हे एखाद्या व्यक्तीसाठी विरंगुळा किंवा स्ट्रेसबस्टर असू शकते.
  • नियमित व्यवसाय किंवा रोजीरोटीसाठी करायचे काम कंटाळवाणे असू शकते, परंतु कसिनो जुगारात पोकर, बिंगो, राऊलेट असे अनेक खेळ उपलब्ध आहेत. त्यातून हवा असलेला पर्याय व्यक्ती निवडू शकते.
  • जर एखादी व्यक्ती बर्‍याचदा जिंकली तर ती स्वयंशिस्तीचे तंत्र विकसित करू शकते.
  •  कसिनोमध्ये कुठल्याही विशेष कौशल्याची आवश्यकता नसते, त्यामुळे इथे अकुशल आणि बेरोजगार लोकही पैसे मिळवू शकतात.

शासकीय स्तरावर लाभ

राज्यात कसिनोला कायदेशीर मान्यता असल्यास, सरकारला खालील फायदे होतात

  1.  राज्याकडे जास्त प्रमाणात पर्यटक आकर्षित होऊन पर्यटनाला चालना मिळते.
  2. इतर राज्यांतून येणारे पर्यटक राज्यात जास्त पैसे आणतात आणि इतर देशांतील पर्यटक परकीय चलन आणतात.
  3. परवाना देण्याच्या टप्प्यातून सरकार महसूल गोळा करू शकते.
  4. कसिनो ऑपरेशन्सवर योग्य कर लादल्यास तोही एक उत्पन्नाचा स्रोत बनतो.
  5. यशस्वी आणि लोकप्रिय कसिनो राज्यात थेट आणि अप्रत्यक्षरित्या रोजगार निर्मितीस चालना देतात.
  6. लोकांकडून जास्त पैसा खर्च केला जातो, सरकारला कर स्वरुपात अधिक पैसा मिळतो, अधिकाधिक रोजगारनिर्मितीमुळे सरकारला पायाभूत सुविधांच्या विकासाच्या योजना आखणे शक्य होते.

या सर्व गोष्टी राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या आहेत.

आता, कसिनो जुगारातील मर्यादांवर चर्चा करूया –

वैयक्तिक किंवा सामाजिक दृष्टीकोनातून मर्यादा

  1. जुगार खेळताना व्यक्ती जर पैज हरली तर फार मोठा फटका बसू शकतो. अगदी कर्जबाजारी होण्याची वेळही येऊ शकते.
  2. कसिनोमध्ये खेळणे हा एक विरंगुळा असल्याने अनेकदा व्यक्तीला आपण किती मोठी जोखीम पत्करतोय हे लक्षात येत नाही किंवा कुठे थांबावे याचेही भान राहत नाही.
  3. कोणतीही व्यक्ती कसिनोमध्ये नेहमीच जिंकू शकत नाही, म्हणूनच शेवटी भर दुसऱ्याच कुणाची तरी होते.
  4. पैसा गमावल्याने अनेकदा टोकाचे नैराश्य येते आणि प्रसंगी आत्महत्येचेही विचार मनात येतात, अनेकदा कुटुंबे पूर्णपणे उद्ध्वस्त होतात.
  5. कमावण्यासाठी कौशल्य आवश्यक नसल्यामुळे तरुणांची दिशाभूल होते. शिक्षण आणि कष्टांपासून तरुण दूर जातात.

सरकारच्या दृष्टीकोनातून मर्यादा

कसिनो जुगारात एकाच ठिकाणी पैशांचे मोठ्या प्रमाणावर व्यवहार होतात, ज्यातून गुन्हेगारी, ब्लॅकमेलिंग, अंडरवर्ल्ड टोळ्यांची निर्मिती, खंडणीखोरी अशा अनेक विघातक गोष्टी जन्माला येतात. यामुळे परिसराच्या कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होतो.

एकंदर कसिनो हा प्रकार फारच महागडा असल्याने यात जास्त करून श्रीमंत लोकच गुंततात. यातून मूठभर लोकच श्रीमंत होतात आणि सामाजिक विषमता निर्माण होते.

कसिनोमुळे वेश्याव्यवसाय, ड्रग्ज आणि अल्कोहोलच्या वापरामध्ये वाढ होते. यामुळे तरुण पिढी वाईट मार्गाकडे वळते. परत सामाजिक सुरक्षिततेसाठी धोका निर्माण होतो तो वेगळाच!

एकीकडे कसिनोने पर्यटनाला चालना दिली तरी त्यामुळे स्थानिक व्यवसायांवर टाच येते. सहज आणि झटपट उपलब्ध होणारा पैसा स्थानिक व्यवसायिकांना नियमितपणे आकर्षित करतो आणि त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम घडवतो.

मग आता सरकारने काय उपाय योजायला हवेत?

सर्वात महत्त्वाचे आहे ते योग्य जागेची निवड. सरकारने कसिनोसाठी अशा जागा निवडल्या पाहिजेत ज्या पर्यटकांच्या दृष्टीने विकसित होऊ शकतात. यामुळे परकीय चलन आणि पर्यटन आधारित रोजगार अधिक आकर्षित होईल.

अंतर्गत स्पर्धा कमी करण्यासाठी आणि लोकांच्या हितासाठी परवाना फी जास्त असणे आवश्यक आहे. समाजातील उत्पन्नातील अंतर कमी करण्यासाठी कसिनोवरील कर देखील जास्त असावा. यामुळे पुन्हा सरकारी महसूल वाढेल.

स्थानिक लोकांना खेळण्यासाठी कसिनोमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देऊ नये ज्यायोगे स्थानिकांना सामान्य सामाजिक-आर्थिक जीवन मिळू शकेल.

इतर राज्यांतील लोकांना कसिनोमध्ये जुगार खेळण्याची परवानगी असू शकते, केवळ खेळण्यासाठी निश्चित मर्यादेसह, विशिष्ट कालावधीत कित्येक वेळेस कमाल मर्यादा खेळण्याची परवानगी दिली जाऊ शकते. त्यांना त्या मर्यादेच्या बाहेर खेळण्याची परवानगी देऊ नये.

जुगारासाठी किमान वय २१ किंवा त्यापेक्षा अधिक असावे, जेणेकरून तरुण त्यांच्या आयुष्यात स्थिर झाल्यानंतर जुगारासंबंधी योग्य निर्णय घेऊ शकतील.

विशिष्ट उत्पन्न गटाखालील लोकांना कसिनोमध्ये परवानगी दिली जाऊ नये, जेणेकरून त्यांचा मौल्यवान पैसा मूलभूत आवश्यकता पूर्ण करण्यासाठी सुरक्षित राहील.

देशात परकीय चलन आकर्षित करण्यासाठी परदेशी आणि अनिवासी भारतीयांसाठी कोणतीही मर्यादा निश्चित केली जाऊ नये.

थोडे तारतम्य दाखवले, विवेक बाळगला तर जुगारातूनही संपत्तीनिर्मिती आणि विकास साधता येऊ शकतात. मात्र त्यासाठी जी नियमांची कठोर अंमलबजावणी लागते, ती व्हायला हवी.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

हा गुप्तहेर होता खऱ्या आयुष्यातील जेम्स बॉण्ड !

Next Post

अमेरिकेने बर्लिन शहराला विमानाने तब्बल १२४४० टन धान्याचा पुरवठा केला होता !

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

अमेरिकेने बर्लिन शहराला विमानाने तब्बल १२४४० टन धान्याचा पुरवठा केला होता !

केवळ २१ शीख सैनिकांनी १० हजार अफगाणांचा सामना केला होता !

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.