The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एका पिंजऱ्यात खुर्चीवर बसून एकाचवेळी १३ सिहांना तो आपल्या भोवती खेळवायचा

by द पोस्टमन टीम
17 October 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब 


सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं. त्याचे भेदक डोळे, मजबूत स्नायू, डौलदार आयाळ आणि रुबाबदार चाल कुणाचीही भीतीनं बोबडी वळण्यास पुरेसे आहेत. सिंह समोर दिसला म्हणजे साक्षात मृत्यूच उभा असल्याचं समजल जातं. पण काही लोक आपल्या सामर्थ्याने त्यावरही मात करतात. आपल्याकडे छत्रपती संभाजीराजे सिंहाबरोबर सामना करत असल्याची अनेक वर्णने आढळतात.

अमेरिकेत एक व्यक्ती अशी होती, जी सिंहांना आपल्या तालावर नाचवत होती. कॅप्टन जॅक बोनविटा, असं या धाडसी व्यक्तीचं नाव. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातील अमेरिकेत सर्कसचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला होता. सर्कस पाहण्यासाठी लोक प्रचंड गर्दी करत. अशाच सर्कसमध्ये कॅप्टन जॅक बोनविटा नावाचा धाडसी कलाकार सिंहांना खेळवत असे.

ड्रीमलँड हा ब्रुकलिनच्या कोनी आयलंड येथे असलेला एक अम्युझमेंट पार्क होता. स्टीपलचेज पार्क आणि लुना पार्क नावाच्या दोन मोठ्या उद्यानांच्या शेजारी १९०४ साली त्याची निर्मिती करण्यात आली. रिअल इस्टेट टायकून आणि राजकारणी विल्यम एच. रेनॉल्ड्स हा ड्रीमलँडचा सर्वेसर्वा होता. त्याठिकाणी मनोरंजनासाठी विविध गोष्टींची निर्मिती करण्यात आलेली होती.

या पार्कमध्ये ‘कोस्टिंग थ्रू स्वित्झर्लंड’सारख्या राईड्स होत्या. त्यात लोकांना आल्प्सची सफर केल्याचा अनुभव मिळे. ३०० लहानग्या लोकांचं एक ‘लिलीपुटियन व्हिलेज’ देखील तयार करण्यात आलेलं होतं. कॅप्टन जॅक बोनविटा हा याच ड्रीमलँडमधील अनेक प्रसिद्ध कलाकारांपैकी एक होता.

कॅप्टन जॅक बोनविटा याचं अगोदरचं नाव जोहान फ्रेडरिक जेन्टनर असं होतं. १५ डिसेंबर १८६६ रोजी फिलाडेल्फिया येथे एका डच कुटुंबात त्याचा जन्म झाला. लहानपणापासूनच तो धाडसी होता. त्याला विविध खेळांमध्ये रुची होती. याच आवडीमुळं तो सर्कस अ‍ॅक्रोबॅट झाला. बोनविटाचं अ‍ॅक्रोबॅटपासून ‘अ‍ॅनिमल ट्रेनर’मध्ये अतिशय सहज रुपांतर झालं. सामान्यतः असं मानलं जात होतं की, जर वन्य प्राण्यांना पुरेसं प्रशिक्षण दिलं तर ते कलाकारांप्रमाणं लोकांचं मनोरंजन करतात. बोनविटानं प्राण्यांना प्रशिक्षण देण्याचं काम सुरू केलं.



त्याचं व्यक्तिमत्व अगदी सैन्यातील एखाद्या कॅप्टनप्रमाणं होतं. पाच फूट ११ इंच उंची, पिळदार मिश्या आणि लष्करी शैलीच्या गणवेशात असलेला बोनविटा जेव्हा सिंहासारख्या हिं*स्र श्वापदांना आपल्या तालावर नाचवत असे, तेव्हा लोक भान हरपून त्याला पहायचे. त्याचा ‘द आर्म चेअर’ नावाचा अ‍ॅक्ट नागरिकांमध्ये विशेष प्रसिद्ध होता. एका पिंजऱ्यात तो खुर्चीवर बसून एकाचवेळी १३ सिहांना आपल्या भोवती खेळवत असे. हे सिंह देखील एखाद्या आज्ञाधारक लेकराप्रमाणं त्याच्या भोवती आरामात बसत.

कॅप्टन जॅकच्या या कौशल्यामुळं त्याला लोक ‘लायन व्हिस्परर’ म्हणत. मात्र, एक दिवस सिंहाचा खेळ त्याच्या जीवावर बेतला. ३१ जुलै १९०४ रोजी त्याच्यावर एका सिंहानं जीवघेणा ह*ल्ला केला. 

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार ही घटना कोनी आयलंडवर घडली होती तर, त्यावेळचा प्रसिद्ध हस्तरेखातज्ञ चेरो याच्या सांगण्यानुसार ही घटना पॅरिसमध्ये घडली होती. चेरोच्या मते, कॅप्टन जॅक हा सिटी ऑफ लाइट्समधील (पॅरिस) मॉलिन रूज येथे परफॉर्मन्स देत होता. त्यावेळी बाल्टीमोर नावाच्या सिंहानं अचानक त्याच्यावर ह*ल्ला केला. बेल्जियमच्या ‘मोंटग्लिओन रोझाली एफ. मर्सी डी’अर्जेंटेओ’ची राजकुमारी त्या रात्री हा खेळ पाहण्यासाठी हजर होती. ती अमेरिकन ‘लायन टेमर’ कॅप्टन जॅकवर मोहित झाली होती.

जेव्हा सिंहानं जॅकवर ह*ल्ला केला तेव्हा तिनं तत्काळ पिंजऱ्याकडे धाव घेऊन आपल्या रंगबिरंगी पोशाखाच्या मदतीनं सिंहाचं लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न केला. इकडे कॅप्टनला पिंजऱ्यातून बाहेर काढण्यात आलं होतं. पण, तोपर्यंत त्याचा संपूर्ण डावा खांदा आणि हात जखमी झाला. त्याच्या हाताची दोन बोटं पूर्णपणे तुटली होती.

आठ महिने उपचार सुरू असून देखील त्याचा हात बरा झाला नाही. हाताला झालेल्या जंतू संसर्गामुळं कॅप्टनला मृत्यूचा धोका होता म्हणून फेब्रुवारी १९०५ साली त्याचा हात कापण्यात आला. याच काळात राजकुमारी आणि कॅप्टन जॅक एकमेकांच्या प्रेमात पडले आणि २५ एप्रिल १९०५ रोजी त्यांनी लग्न केलं. मात्र, त्याचं नातं जास्त दिवस टिकलं नाही. १९०७ साली दोघे विभक्त झाले.

न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार कॅप्टन जॅकवर सिंहाचा ह*ल्ला होण्याची घटना कोनी आयलंडवरचं घडली होती. एका महिलेनं त्याला त्याच्या आजारपणात मदत केली होती. ही महिला दुसरी तिसरी कोणी नसून ब्रॉडवे अ‍ॅक्ट्रेस मारी ड्रेसलर होती. कॅप्टन जॅक जोपर्यंत बरा होत नाही तोपर्यंत ती दररोज रुग्णालयात येत असे, असं सांगितलं जातं. यापैकी कुठली घटना सत्य आहे याबाबत वाद आहे. मात्र, सिंहाच्या ह*ल्ल्यात जॅकला आपला हात गमवावा लागला होता, हे नक्की.

एवढं होऊनही कॅप्टन जॅक बोनविटा १७ मे १९११ पर्यंत ड्रीमलँडमध्ये काम करत राहिला. १७ मे रोजी एका कामगाराच्या चुकीमुळं मोठी आग लागली आणि संपूर्ण पार्कमध्ये पसरली. दुर्दैवानं, या आगीत ६० प्राण्यांचा मृत्यू झाला. बोनविटानं आगीत उडी घेऊन आपल्या सिंहांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला यश आलं नाही. त्याचा एक सिंह, ‘ब्लॅक प्रिन्स’ घाबरून रस्त्यावर सैरावैरा पळत होता. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्या मानेवर सहा गोळ्या झाडल्या आणि त्याला ठार केलं. या आगीमुळं संपूर्ण ड्रीमलँड खाक झालं.

ड्रीमलँड आगीत जळाल्यानं अनेक कलाकारांचा रोजगार गेला. सुदैवानं, हॉलिवूडमध्ये कॅप्टन जॅकच्या कौशल्यांना जास्त मागणी होती. त्यानं चित्रपटांमध्ये प्राणी प्रशिक्षक, स्टंटमॅन, अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून आपली कारकीर्द घडवली. तो प्रामुख्याने निर्माता डेव्हिड हॉर्सलीसाठी प्राण्यांना प्रशिक्षण देत होता आणि बोस्टॉक सर्कससाठीही काम करत होता. १९ मार्च १९१७ रोजी त्या सर्कसमधील एका पोलर बिअरने (ध्रुवीय अस्वल) त्याच्यावर ह*ल्ला केला. या ह*ल्ल्यात त्याचा चेहरा पूर्णपणे खराब झाला होता. सरतेशेवटी, कॅप्टन जॅक बोनविटा आपली आवडती गोष्ट करत असतानाच मरण पावला.

कॅप्टनला आपल्या कामावर अतिशय प्रेम होतं. आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर आपण हिंस्र प्राण्यांना नियंत्रणात आणू शकतो असा त्याचा विश्वास होता. त्यामुळं अपंगत्व येऊनही त्यानं प्राण्यांना आपल्यापासून दूर केलं नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

एका श्रीलंकन सैनिकाने राजीव गांधींवर ‘गार्ड ऑफ ऑनर’ देतानाच ह*ल्ला केला होता

Next Post

या स्त्रीने अमेरिकेच्या नाकावर टिच्चून अणुप्रकल्पाची माहिती रशियाला पुरवली होती

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

या स्त्रीने अमेरिकेच्या नाकावर टिच्चून अणुप्रकल्पाची माहिती रशियाला पुरवली होती

स्वतःची नोकरी धोक्यात घालून या जपानी अधिकाऱ्याने ६००० ज्यूंची होलोकॉस्टपासून सुटका केली

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.