The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी बनवलेल्या या मशीननेच अनेकांचा ब*ळी घेतला होता

by द पोस्टमन टीम
14 October 2024
in विज्ञान तंत्रज्ञान, आरोग्य
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


काळाच्या ओघात मानवानं प्रत्येक क्षेत्रात नेत्रदिपक प्रगती केली आहे. वैद्यकिय क्षेत्र देखील यातून मागे राहिलेलं नाही. अनेक दुर्धर आजारांवर संशोधकांनी विविध उपाय शोधले आहेत.

कुठलाही वैद्यकीय शोध किंवा तंत्रज्ञान प्रत्यक्ष वापरात येण्यापूर्वी त्याच्या असंख्य चाचण्या केल्या जातात. अशा चाचण्यांदरम्यान अनेक अपघातही होतात. ते कधीही जगाच्या समोर आणले जात नाहीत. मात्र, ऐंशीच्या दशकात वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक घटना अशी घडली आहे, ज्यामुळं एक-दोन नाही तर तब्बल सहा रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता. हे प्रकरण नेमकं काय होतं, हे आपण जाणून घेऊया..

‘कॅन्सर’ हा सर्वांत धोकादायक आजार समजला जातो किंबहुना आहे. त्यावर अद्यापही एकदम ठाम उपचार सापडलेले नाहीत. आजपासून तीन-चार दशकांपूर्वी तर लोक कॅन्सरच्या नावालाही घाबरत होते. संशोधक त्यावर उपचार शोधण्यासाठी जोरदार प्रयत्न करत होते. अशातच एक्स-रे किंवा इलेक्ट्रॉनच्या बीमचा वापर करून, रेडिएशन थेरपी मशीन्स कर्करोगाच्या पेशींना मारतात असा शोध लागला होता.

या शोधाच्या आधारावर थेरॅक -२५ या मशीनची निर्मिती करण्यात आली. हे एक रेडिएशन थेरपी मशीन होतं. या मशीनमुळं कॅन्सर रुग्णांच्या उपचारात मदत होईल, हा हेतू मनात ठेवून त्याची निर्मिती करण्यात आली. मात्र, काही दिवसातच हे मशीन न*रभक्ष*क असल्याचं सिद्ध झालं. १९८६ ते १९८७ या एका वर्षाच्या काळात सहा दुर्दैवी रूग्णांचा थेरॅक -२५ ने जीव घेतला.

मशीनमुळं त्यांना मोठ्या प्रमाणात किरणोत्सर्गाचा सामना करावा लागला. यातील चार जण ठार झाले आणि इतर दोघांना आजीवन, कधीही बऱ्या न होणाऱ्या जखमा झाल्या. तपासानंतर मशीन नियंत्रित करणाऱ्या सॉफ्टवेअरमध्ये बग्स असल्याचं सिद्ध झालं. या मशीनचं डिझाइन सुरक्षिततेसाठी एकट्या नियंत्रक संगणकावर अवलंबून होतं.



त्यात कोणतंही हार्डवेअर इंटरलॉक किंवा सुपरवायझर सर्किट नव्हते. थेरॅक – २५ चं प्रकरण इतिहासातील सर्वांत (कु)प्रसिद्ध कि*लर सॉफ्टवेअर बग्जपैकी एक आहे. अनेक विद्यापीठांनी या प्रकरणाचा समावेश आपल्या अभ्यासक्रमांमध्ये केलेला आहे. नॅन्सी लेव्हसन या सॉफ्टवेअर सुरक्षा तज्ञाच्या पुढाकारामुळं या प्रकरणाचं संपूर्ण संशोधन झालं.

ऑटोमिक एनर्जी ऑफ कॅनडा लिमीटेडने (AECL) थेरॅक – २५ ची निर्मिती केली होती. अगोदर थेरॅक-६ आणि थेरॅक-२० ची निर्मिती केलेल्या कंपनीचं हे तिसरं रेडिएशन थेरपी मशीन होत. एईसीएलनं सीजीआर या फ्रेंच कंपनीसोबत भागीदारी करून थेरॅक-६ आणि २०ची निर्मिती केली होती. मात्र, थेरॅक -२५च्या रचनेवेळी ही भागीदारी तुटली. भागीदारी जरी तुटली असली तरी दोन्ही कंपन्यांना पूर्वीच्या मशीनच्या डिझाईन्स आणि सोर्स कोड वापरण्याची परवानगी होती.

थेरॅक-२० चा कोडबेस थेरॅक-६ पासून विकसित केला गेला होता. तिसऱ्या मशीनमध्ये मात्र, पीडीपी-११ संगणक वापरण्यात आला. थेरॅक ६ आणि २०ला त्या संगणकाची गरज नव्हती. दोन्ही उपकरणे स्वतंत्र कार्य करण्यासाठी डिझाइन केले गेले होते. मॅन्युअल मोडमध्ये, एक रेडिओथेरपी तंत्रज्ञ मशीनच्या विविध भागांचे नियोजन करू शकत होता.

हे देखील वाचा

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

थेरॅक-२५मध्ये संगणक वापरून त्याचं नियंत्रण तंत्रज्ञाच्या हाती सोपवण्यात आलं होतं. ते थेरॅक -६ आणि २०मधील हार्डवेअर इंटरलॉक्स ऑपरेटरला धोकादायक गोष्ट करण्यापासून रोखू शकत होते. थेरॅक २५मध्ये अशी सुविधा नव्हती. तिच्यामध्ये मॅन्युअल कंट्रोल नव्हता शिवाय हार्डवेअर इंटरलॉक देखील काढण्यात आले होते. मात्र, याचं नियंत्रण संगणकाच्या हाती असल्यानं कार्यक्षमता जास्त वेगवान होती. रुग्णालयांना ही गोष्ट आवडली.

१९८३ साली थेरॅक-२५ सेवेतं आणलं गेलं. सुरुवातीला या मशीनने हजारो रुग्ण हाताळले. त्यात काहीही समस्या नव्हती. मात्र, ३ जून १९८५ रोजी एक भयानक घटना घडली. एका महिलेवर स्तनाच्या कर्करोगासाठी उपचार सुरू होते. तिला १० MeV इलेक्ट्रॉन बीमच्या स्वरूपात २०० रेडिएशन ॲबॉर्स्ड डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. थेरॅक-२५ मध्ये तिला ठेवण्यात आल्यानंतर तिला प्रचंड उष्णता जाणवली. मशीनमध्ये ही महिला मोठ्या प्रमाणात भाजली गेली. तीव्र किरणोत्सर्गामुळं तिचं डावं स्तन आणि डावा हात भाजला होता.

त्याच वर्षी २६ जुलै रोजी कॅनडातील ‘हॅमिल्टन येथील द ओन्टॅरियो कॅन्सर फाउंडेशन’मध्ये दुसऱ्या रुग्णाला अशाच उष्णतेला सामोरे जावे लागले. त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगामुळे या महिला रुग्णाचा मृत्यू झाला. जर ती जगली असती, तर तिला थेरॅक -२५मधील अपघातात झालेली दुखापत बरी करण्यासाठी संपूर्ण हिप रिप्लेसमेंटची आवश्यकता भासली असती.

डिसेंबर १९८५ मध्ये वॉशिंग्टनमधील याकिमामध्ये असलेल्या थेरॅक -२५मशीनमध्ये तिसरा अपघात झाला. मशीनमध्ये घातलेल्या एका महिलेचा कमरेखालील भाग जळाला. या महिलेचा जीव तर वाचला मात्र, किरणोत्सर्गामुळे झालेल्या जखमांसाठी शस्त्रक्रिया करावी लागली.

२१ मार्च १९८६ रोजी टेक्सासच्या टायलर येथील एका रुग्णाला पाठीवर असणाऱ्या गाठीवर उपचार करण्यासाठी मशीनमध्ये घालण्यात आलं. त्याला अचानक मोठ्या प्रमाणात उष्णता आणि वेदना जाणवू लागल्या. रुग्णानं मदतीसाठी मशीनच्या दरवाजावर दणके देण्यास सुरुवात केली. जोपर्यंत त्याला मशीनमधून बाहेर काढण्यात आलं तो पर्यंत तो मोठ्या प्रमाणात भाजला होता. पाच महिन्यांनंतर त्याचा मृत्यू झाला.

त्यानंतर ११ मार्च रोजी याच रुग्णालयात पुन्हा एक अपघात झाला. यावेळी रुग्णाच्या कानात असलेल्या त्वचेच्या कर्करोगावर उपचार केले जात होते. विशेष म्हणजे यावेळी देखील पूर्वीचाचं ऑपरेटर मशीन चालवत होता. थेरपी सुरू झाल्यानंतर रुग्णाला आपल्या चेहऱ्याला आग लागल्याचा भास झाला. रेडिएशनचा ओव्हरडोस त्याच्या मेंदूपर्यंत पोहचला होता. रेडिएशन बर्न झाल्यामुळे तीन आठवड्यांनंतर या रुग्णाचा मृत्यू झाला. जानेवारी १९८७ मध्ये याकिमा व्हॅली हॉस्पिटलमध्ये थेरॅक २५मशीनमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला.

प्रत्येक घटनेनंतर, संबंधित हॉस्पिटलमधील तज्ज्ञ एईसीएल आणि त्यांच्या देशांमधील वैद्यकीय नियमन ब्युरोला कॉल करून हे प्रकार त्यांच्या कानावर घालत होते. सुरुवातीला एईसीएलनं थेरॅक-२५मध्ये त्रूटी असल्याचं मान्य करण्यास नकार दिला. मात्र, ओन्टारियोतील घटनेनंतर नक्कीच काहीतरी चुकीचं झाल्याचं स्पष्ट झालं होत.

मशीनमध्ये असलेल्या सुरक्षाप्रणाली वारंवार कोड एरर टाकत होत्या. त्यानंतर एईसीएलनं काळजीपूर्वक मशीनच्या अनेक चाचण्या घेतल्या. नंतर कोडमध्ये एरर आले नाहीत. मात्र, टेक्सासमध्ये झालेल्या अपघातांच्या वेळी मायक्रोस्विच सर्किटमध्ये त्रुटी निर्माण झाली आणि पुन्हा रुग्णांचे जीव गेले.

त्यानंतर मात्र, ईस्ट टेक्सास कॅन्सर सेंटरमधील भौतिकशास्त्रज्ञ फ्रिट्झ हेगर यांनी या समस्येच्या तळाशी जाण्याचा निर्धार केला. टेक्सासमध्ये झालेल्या दोन्ही अपघातांच्यावेळी थेरॅक -२५ने ‘Malfunction 54’ असा मेसेज डिस्प्ले केला होता. याचाच अर्थ असा होता की, मशीनचा संगणक रेडिएशनचे प्रमाण निर्धारित करू शकत नाही.

अनेकदा चाचण्या घेऊन हेगरनं स्वत: सर्व अहवाल एईसीएलला सादर केले. त्यानंतर एफडीएनं थेरॅक -२५ सदोष असल्याचं घोषित केलं. एईसीएलने सॉफ्टवेअर पॅच आणि हार्डवेअर अपडेट केले. रुग्णांच्या मृत्यूंची प्रकरणं न्यायालयाबाहेरच निकाली काढण्यात आली. अनेक प्रयत्न केल्यानंतर अखेरीस मशीनला सेवेत परतण्याची परवानगी मिळाली. मात्र, तंत्रज्ञानावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या मानवाला एखाद्या यंत्राच्या बिघाडामुळं मृत्यूला सामोरं जावं लागू शकतं, हे या घटनांमधून सिद्ध झालं.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

‘ब्रुस ली’च्या मास्टर ‘इप मॅन’ने हॉन्गकॉन्गच्या गल्लीबोळातल्या पोरांना मार्शल आर्ट शिकवलं होतं

Next Post

समुद्री अंतर किंवा जहाजाचा वेग ‘नॉटिकल माईल’ किंवा ‘नॉट्स’मध्ये का मोजतात..?

Related Posts

आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
Next Post

समुद्री अंतर किंवा जहाजाचा वेग 'नॉटिकल माईल' किंवा 'नॉट्स'मध्ये का मोजतात..?

१०० वेळा नकार मिळाला, परंतु या महिलेने जगासाठी ग्राफिक डिझायनिंग सोपं केलं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.