The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सोव्हिएतच्या इंजिनिअर्सनी एक महाकाय इमारत एका जागेवरून दुसरीकडे नेली होती

by Heramb
26 October 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


दुसऱ्या महायु*द्धानंतर सगळं जगच वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या बदलत होतं. रोमानिया याला काही अपवाद नव्हता. रोमानियामध्ये सोव्हिएत शासन सर्वकाही बदलण्याचा प्रयत्न करीत होतं. अगदी सैन्यापासून ते  शहरांच्या स्थापत्यशैलीपर्यंत रोमानिया हा सोव्हिएत शैलीचा देश बनला होता. यामुळेच आजही अनेक लोक रोमानियाला ‘स्लाव्हिक’देश म्हणून मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न करतात. ‘स्लाव्हिक’देश म्हणजेच रशियन, युक्रेनियन, बेलोरशियन (पूर्व स्लाव्हिक), पोलिश, झेक, स्लोव्हाक, इत्यादी भाषा बोलणारे देश.

रोमानियाच्या शहरांमधील बहुतेक इमारती रेसिडेन्शियल ब्लॉक्स म्हणून बनलेल्या होत्या. त्याचबरोबर अल्बा युलिया शहरात आजही युरोपमधील अनेक सुंदर बुलेवर्ड्स्-पैकी काही बुलेवर्ड्स् आहेत. बुलेवर्ड्स् म्हणजे एक प्रशस्त रस्ता आणि या प्रशस्त रस्त्याच्या बाजूने सुंदर झाडे लावली जातात. रोमानिया आणि युरोपच्या याच भागात अनेक बुलेवर्ड्स् तयार करण्यात आले. हे बुलेवर्ड्स् आपल्याला आजही त्याठिकाणी पाहायला मिळतात. इमारतींच्या गर्दीत वसलेल्या शहरात बुलेवर्ड्स् तयार करणे म्हणजे अतिशय अवघड काम. हे अवघड आणि अशक्यप्राय काम सोव्हिएटच्या इंजिनिअर्स आणि आर्किटेक्टसनी कसं केलं याबद्दलच हा लेख..

मध्ययुगीन अल्बा युलिया शहरात जाण्यासाठी एक भव्य बुलेवर्ड तयार करण्याची योजना होती आणि याच माध्यमातून सोव्हिएट सरकारला हे शहर पर्यटन केंद्र म्हणून विकसित करायचे होते. पण, नियोजित बुलेवर्डच्या शेवटच्या टोकाला एक मोठे आव्हान उभे होते. एक विशाल इमारत. इमारतीमध्ये राहणाऱ्या १२० नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी खूप खर्च आला असता आणि इमारत केवळ दोनच वर्षे जुनी होती. त्यामुळे ती इमारत पाडणे व्यर्थ जाणार होते. 

तेव्हा ही अवाढव्य इमारत एखाद्या “मोकळ्या जागी हलवण्याची” योजना होती. ज्याठिकाणी ही संपूर्ण इमारत कोणत्याही अडचणीशिवाय व्यवस्थित उभी राहू शकेल अशी जागा आवश्यक होती. ही जागा या इमारतीच्या मूळ स्थानापासून केवळ ५५ मीटर अंतरावर होती.



जो आर्किटेक्ट बुलेवर्डचे काम पाहत होता त्यानेच या अवाढव्य इमारतीला एका रेल्वेरुळावरून हलवण्याची कदाचित ‘हास्यास्पद’ वाटणारी कल्पना केली होती. साहजिकच त्याची ही कल्पना ऐकून बऱ्याच लोकांनी त्याचं हसू केलं. पण त्याचा आत्मविश्वास अढळ होता. पण खरंच हे शक्य होतं का?

रोमानियामधील सर्वोत्तम अभियंते आणि आर्किटेक्ट्सना हा ‘अशक्य’ प्रकल्प प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एकत्र आणले गेले. या सर्वांनी एकत्र येऊन या समस्येवर’ न भूतो न भविष्यती’ असा उपाय शोधून काढला. सर्वप्रथम इमारतीचे दोन भाग करायचे आणि दोन्ही अर्ध्या भागांना एकाच वेळी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला बुलेवर्डच्या मार्गातून बाहेर न्यायचे.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

अभियंत्यांनी आणि आर्किटेक्टसनी इमारतीच्या खाली २ मीटरचा खड्डा खणला आणि इमारतीच्या खाली रेल्वे रूळ टाकले. पण ही इमारत हलवण्यामध्ये खरी समस्या सुमारे ८०० टन वजनाची इमारत उचलणे ही होती. आजच्या काळात अशा प्रकारची इमारत हलवण्यासाठी हायड्रॉलिक प्रेस वापरण्यात येतात. या तंत्रज्ञानामुळे इमारत हळू हळू आणि सुरक्षितरित्या उचालली जाते. 

पण त्या काळात अशा प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध नसल्यामुळे अभियंत्यांना नवी कल्पना सुचवावी लागली. त्यांनी ‘जॅकस्क्रू’ नावाच्या बिल्डिंग जॅकचा वापर केला. अखेरीस इमारतीच्या दोन भागांना ३३ अंश झुकलेल्या कोनात हलवण्यात आले आणि ५५ मीटर अंतर पार करून जाण्यासाठी इमारतीला ५ तास ४० मिनिटे लागली. असा प्रकल्प यापूर्वी कधीही झाला नव्हता. या प्रकारच्या अभियांत्रिकीला काळाच्या पुढे असल्याचे मानले जात होते.

रोमानियात तथाकथित सिस्टेमाटीझेरिया (सिस्टेनेटाइझेशन) म्हणजे निकोले सेउसेस्कुच्या कम्युनिस्ट राजवटी अंतर्गत चालवलेला शहरी सुधाराचा कार्यक्रम जोमाने सुरु होता. रोमानियाचे रूपांतर पूर्णतः विकसित साम्यवादी समाजात करण्यासाठी या प्रोजेक्टमध्ये अनेक शहरे आणि गावे उ*द्ध्वस्त करून त्यांची पुनर्रचना करणे हे ध्येय ठरवले गेले होते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

चार्ली चॅप्लिनच्या ‘द ग्रेट डिक्टेटर’ने दुसऱ्या महायु*द्धाचं भाकीत वर्तवलं होतं

Next Post

सोन्यावर आधारित अर्थव्यवस्था संपुष्टात आली असली तरीही सोन्याची झळाळी कायमच आहे

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

सोन्यावर आधारित अर्थव्यवस्था संपुष्टात आली असली तरीही सोन्याची झळाळी कायमच आहे

अवघ्या 9व्या वर्षी मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड प्रोफेशनल बनून हिने बिल गेट्सचं लक्ष वेधून घेतलं होतं, पण..

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.