The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज कपूरच्या मुलीने भारतीयांच्या स्वयंपाकघराला मॉडर्न बनवलं होतं

by द पोस्टमन टीम
29 April 2025
in मनोरंजन, ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


घर – प्रत्येकाचेच आयुष्यातील एक मोठे वळण, स्वप्न व आपल्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब. प्रत्येक जण आपले घर त्या वस्तूंनी, त्या पद्धतीने सजवतो जितकी त्याची कुवत असते किंवा जसे त्याच्या मनातले भाव असतात. उदाहरणार्थ – घरात भरपूर फुलांची रोपे – वृक्षप्रेमी असणे दर्शवते. घराचा रंग मंद असला, किंवा पांढऱ्या रंगाच्या रांगितला असला तर त्या घरातील माणसांचा एकूण स्वभाव अंदाजे शांत, किंवा अतिशयोक्ति न करणारा असा असू शकतो.

घराचे सुशोभीकरण किंवा सुंदरता हे आपल्याकडे फक्त सुबक बैठक व बेडरूमपर्यंतच सीमित असते. पण हल्ली लोक घराच्या इतर भागांच्या सुंदरतेकडेसुद्धा लक्ष देऊ लागले आहेत.

इतक्यात, घर इंग्लिश रंग वापरून रंगवण्याची, मिनिमलिझममुळे घरात कमी व नाजूक सजावट करण्याची, क्लासी आणि सोफेस्टीकेटेड लूकसाठी घराचे फर्निचर, पडदे, भिंती यांच्या रंग मॅचींग असण्यापासून तर ते वूडन फ्लोअरिंग, इटालियन मर्बल्स याची सगळ्याची फॅशन आली आहे.

हा ट्रेंड अजून वर नेण्यासाठी पेपर फ्राय, फरलेन्कोसारख्या कंपनीचे शोभेल असे फर्निचर भाड्याने देणाऱ्या किंवा विकणाऱ्या कंपनीसुद्धा आल्यात.

आपल्याकडे स्वतःच्या मालकीचे घर असण्याला फार महत्त्व आहे. त्यामुळे घर आजकाल फक्त निवाऱ्यापुरते सीमित राहिलेले नसून, प्रतिष्ठा जपण्याचे एक साधन बनले आहे.



घराच्या या “घर ते लॅविश, लक्झरी होम” पर्यंतच्या प्रवासाने एक सकारात्मक बदल मात्र असा झाला की गृहिणीला काम करताना सोयीस्कर पडू लागलं, व यामुळे उत्साहही वाढला. किचनमध्ये नळ, सिंक, २-३ बर्नर असलेली गॅस शेगडी, ओव्हन, भांडी ठेवायला ट्रॉली, हे सगळे वेस्टर्न किचनचा भाग होते.

पण भारतात किचन असेही असू शकते हे सर्वप्रथम दाखवून दिले ते “Niki Tasha” या होम डेकोर व अपलयान्सेसच्या कंपनीने.

Niki Tasha च्या संस्थापिका रितू नंदा, या एक सेल्फ मेड उद्योजिका व सुप्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक राज कपूर यांच्या कन्या होत्या. व Niki Tasha या कंपनीच्या या क्षेत्रातील आगमनानंतर, भारतीयांचा स्वयंपाकघराकडे बघण्याचा दृष्टिकोनच पालटला. हीच पहिली होम अप्यलान्स कंपनी होती जिने गॅस शेगडी, मिक्सर, जुसर यांसारख्या वस्तूंना लक्झरी वस्तू बनवले.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

हे परिवर्तन सुरू झाले १९५०च्या दशकातील अमेरिकेच्या “पिंक किचन” संकल्पनेवरून. तेथील लोक, दुसऱ्या विश्वयु*द्धानंतर आपल्या घरातील किचन कडे जास्त लक्ष देऊ लागले व त्याला विविध रंगांनी रंगवू व सजवू लागले.

भारतात हा बदल का घडत नाही, भारतीय किचन इतके बोरिंग आणि कंटाळवाणे का असतात या समस्येवर पिंक किचनवरून प्रेरित होऊन, समाधान म्हणून रितू नंदांनी ही कंपनी सुरू केली.

या कंपनीचे नाव त्यांच्या दोन्ही मुलांच्या, म्हणजेच “निखिल व नताशा” यांच्या नावांवर आधारित होते.

Niki Tasha या कंपनीने कामाला सुरुवात केली त्यावेळेस बाजारात बजाज, फिलिप्स यांसारखे मोठे खेळाडूही पाय रोवण्याचा तयारीत होते. हे सगळे स्पर्धक असतानाच एन्ट्री झाली नव्या स्पर्धकाची. अभिनेत्री रेखा यांचे पती उद्योगपती मुकेश अग्रवाल यांनी “हॉटलाईन”ची स्थापना केली.

Niki Tasha यांनी “कीचनेट” या ब्रँड अंतर्गत कॉइलचे हीटर्स, सिलेंड्रीकल आकाराचे गॅस स्टोव, हे बाजारात आणले व या ब्रँडला सगळे त्यांच्या सुंदर सुरेख गॅस बर्नरमुळे ओळखायला लागले.

मार्केट एक्स्पर्ट नवरोज डी धोंडी म्हणतात “स्मार्ट आणि स्टायलिश किचनची संकल्पना मांडून, व आपल्या अप्ययन्सेस द्वारे Niki Tashaने स्वयंपाकघराची परिभाषाच बदलली.” ब्रँड एक्स्पर्ट संतोष सूद १९८५ सालचा आपल्या कंपनीतला किस्सा सांगताना म्हणाले होते की त्याकाळी हा ब्रँड आपल्याजवळ असणे म्हणजे मोठ्या प्रतिष्ठेचे मानले जाई.

नाईलाजास्तव ग्राहकांना एल. पी. जी गॅस सिलिंडर सोबत मिळणारी गॅस शेगडीच वापरावी लागत असे व काही घरात हॅण्ड स्टोव्ह वापरला जाई. पण या नवीन आकर्षक व एकापेक्षा जास्त बर्नर असलेल्या गॅस शेगडीने त्यांची जागा घेतली.

या यशानंतर या कंपनीने टी. वी सेटसुद्धा बाजारात आणलेत व बऱ्याच टी वी प्रोग्रॅम्सना स्पॉन्सर सुद्धा केले. ग्रॅमी अवॉर्डचे भारतातील प्रक्षेपणही याच कंपनीने केले होते.

पण कठीण स्पर्धेला Niki Tasha ही कंपनी तोंड देऊ शकली नाही. इतर कंपन्यांनी त्यांच्यापेक्षाही प्रगत उपकरणे बाजारात आणली व रितुंच्या कंपनीचा खप घसरला भरपूर नुकसान होऊ लागले व त्यांना ही कंपनी विकावी लागली. पण ब्रँड तर ब्रँडच असतो, लोकांना कधीकाळी पसंत आलेला असतो. त्यामुळे आजही Niki Tasha हा ब्रँड बाजारात आहे. आणि अजूनही या नावाची उपकरणे तुम्ही विकत घेऊ शकता फक्त आता कंपनीचे मालक कुणीतरी वेगळेच आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

रवींद्रनाथ टागोरांनी जन-गण-मन जॉर्ज पंचमच्या स्वागतासाठी लिहिलं होतं का…?

Next Post

ही जाहिरात लागली की आईवडील पोरांना पाणी घ्यायला पाठवायचे

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

ही जाहिरात लागली की आईवडील पोरांना पाणी घ्यायला पाठवायचे

माणसाची उत्क्रांती माकडापासून झाल्याचा दावा डार्विनने कधीही केला नव्हता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.