The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सायकलच्या उत्क्रांतीचा इतिहास मानवाच्या उत्क्रांतीच्या इतिहासा इतकाच इंटरेस्टिंग आहे

by द पोस्टमन टीम
17 July 2025
in मनोरंजन, ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


जेव्हापासून लहान मूल चालायला सुरुवात करते तेव्हापासून ते सर्वांच्याच कौतुकाचा विषय बनते. लहान बाळाचे पहिले पाऊल पडते आणि घरातील सर्वांना त्या बाळाची चालण्यासाठीची धडपड एक वेगळाच आनंद देते. चालायला सुरुवात केल्यापासूनच त्या बाळाच्या पालकांना कधी त्याला एकदा सायकल आणून देतो असे होते.

त्यांच्या बाळाचा सायकलिंगचा प्रवास सुरु होतो तो तीन चाकी सायकलपासून. मग येते ती छोटी दुचाकी सायकल आणि पुढे मोठी सायकल. आपण सगळ्यांनीच हा प्रवास केला आहे.

सायकल आणि शारीरिक आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध असल्याने सायकलिंग हा विषय सर्वच स्तरांमध्ये चर्चिला जातोच. याच सायकलवर अनेकांची रोजी अवलंबून असल्याचे अजून देखील आपण पाहतो. सकाळी दूध टाकणारा दूधवाला, पेपरवाला, पोस्टमन, अनेक ठिकाणी तर चहावाले, खाद्यपदार्थ विकणारे सायकलच वापरताना दिसतात. भारतातील अनेक शहरांमध्ये आजही सायकल रिक्षा चालते. तर अशी ही सायकल तुमच्या-आमच्या सगळ्यांच्याच खूप जवळची आहे.

भारतात सायकलला काही सिनेमांतही दिसते. पडोसन सिनेमात सायरा बानू आणि तिच्या मैत्रिणींनी ‘मै चली मैं चली देखो प्यार कि गली…’ म्हणत सायकलवर केलेला प्रवास सर्वांच्या मनात घर करून गेला आणि त्या काळात मुलींमध्ये सायकलची क्रेझ वाढली. अमीर खानने स्वतःपेक्षा जास्त प्रेम आपल्या सायकल वर करून ‘जो जिता वहीं सिकंदर’ या चित्रपटाच्या माध्यमातून तरुणांत सायकलबद्दल आपुलकी निर्माण करून दिली होती.



जुन्याच चित्रपटांत नाही तर अगदी आता देखील ‘एलिझाबेथ एकादशी’मध्ये सुद्धा त्या चिमुकल्यांचे सायकल प्रेम दाखवण्यात आले आहे.

सायकल हे दळणवळणाचे साधन आहे, बदलत्या जीवनपद्धतीमध्ये व्यायामाचे एक उत्तम साधन आहे, प्रदूषणाचा वाढत धोका कमी करण्यासाठी वापरू शकतो असा एक उत्तम विकल्प आहे. अनेक स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक सायकल वरून जगप्रवास करून UNच्या सस्टेनेबिलिटी गोलचे जनजागरण करतात. काही जण पर्यावरणाचा संदेश ही सायकल स्वारीने देतात.

जगभरातील अनेक देशांनी आठवड्यातील एक दिवस सायकल वापरण्यासाठी जनतेला आवाहन केलं आहे. नेदरलँड, डेन्मार्क, आणि बेल्जियम येथे सायकल वापरण्याचे प्रमाण लोकसंख्येच्या संख्येनुसार सर्वात जास्त आहे. सर्व प्रमुख देशांच्या राजधानीच्या डाऊन टाऊनच्या (मुख्य बाजारपेठेत) ठिकाणी सार्वजनिक दळणवळणासाठी सायकल वापरण्याचा मार्ग ही उपलब्ध करून दिला जातो.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

जगभरात एवढी लोकप्रिय झालेली ही सायकल आहे तरी काय? या सायकलचा शोध लागला तरी कसा? तिच्या विकासाचा प्रवास काय सांगतो यावर आपण आजच्या लेखात प्रकाश टाकणार आहोत.

सायकलचा शोध कसा लागला?

सायकलचा शोध कधी लागला या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेणे जेव्हा सुरु झाले तेव्हा त्याबद्दल अनेक दावे करण्यात आले.

इसवी सन १५००च्या आसपास जियान जियकोमो कॅप्रोटी या “लिओनार्डो दि कॅप्रिओ”च्या शिष्याने सायकलचे एक चित्र काढले आणि सायकल तेव्हा अस्तित्वात होती असे सांगितले आहे. या चित्रावरून जरी वाद झाले असले तरी कोणीही त्याला पूर्णपणे नाकारले नाही.

फ्रांसमधील पॅलेस रॉयल येथे १७९२ साली कॉमटे डी सिव्हाक यांनी लाकडाच्या भक्कम आधारावर दोन लाकडी चाके असलेली पेडल नसलेली प्रतिकृती केली होती असे मानले जाते. हे वाहन पेडल नसल्यामुळे पायाने जोर देत गतिज स्थितीमध्ये आणले जायचे. वर उल्लेखलेल्या दोन्ही गोष्टींना वैज्ञानिक किंवा पुराव्यांचा आधार नाही हेही तितकेच खरे.

व्यवहारिकरीत्या जगातील पहिली सायकल चालवण्याचा विश्वासनिय दावा जर्मनीतील “ग्रँड ड्यूक ऑफ बाडेन”चा सरकारी कर्मचारी असलेल्या कार्ल व्हॉन ड्रेझचा आहे. ड्रेझने लूफामसीन (रनिंग मशीन)चा शोध १८१७ मध्ये लावला व ड्रॅझीन असे त्याचे नामकरण तत्कालीन प्रसार माध्यमांनी केले. कार्ल व्हॉन ड्रेझ यांनी १८१८ मध्ये या यंत्राचे पेटंट मिळवले. जगातील ही पहिली सायकल होती जी व्यावसायिकरित्या विक्रीला उपलब्ध होती आणि तिला तेव्हा ‘हॉबी हॉर्स’ किंवा ‘डँडी हॉर्स’ म्हणून संबोधले जायचे.

सायकल प्रथमत: जर्मनी आणि फ्रांसमध्ये उत्पादित झाली. हंस एरहार्ड यांनी ड्रेझच्या चरित्रात लिहून ठेवत असताना असे लिहिले आहे की, १८१५ साली जर्मनीमध्ये आलेल्या दुष्काळामुळे अन्न कमी पडून मोठ्या प्रमाणात घोडे मृत्युमुखी पडले त्यामुळे घोड्यांना पर्याय म्हणून ड्रेझ यांनी या सायकलचा शोध लावला ड्रेझ यांनी सर्वप्रथम ही सायकल जर्मनीमधील मानहैम शहरात पहिल्यांदा चालवली तर ते एक तासात १३ किलोमीटर अंतर कापू शकले आणि ही बातमी वाऱ्यासारखी पश्चिमेत पसरली. त्या काळात ब्रिटिशांचा माल वाहण्यासाठी हातगाड्यांचा वापर केला जायचा तेथील काही हमालांना या युक्तीबद्दल समजले आणि त्यातूनच लंडनमधील डेनिस जॉन्सन या लाकडी मालवाहू सांगाडे बनवणाऱ्या कंपनीने १८१८ मध्ये या सायकलचे अद्यतनित रुपडे जगासमोर आणले. व्यावसायिक गोष्टींमध्ये गती यावी म्हणून लंडनने निर्मित केलेले हे यंत्र अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाले आणि शहारात त्याची क्रेझ निर्माण झाली. तर अशाप्रकारे सायकलचा जन्म झाला.

File:Bicycle evolution-eo.svg - Wikimedia Commons

सायकलमधील सकारात्मक बदल

इसवी सन १८२० ते १८५० या कालावधीत सायकलमध्ये अनेक सकारात्मक बदल झाले. आधी सायकल पायाने ढकलून तिला गतिज केले जायचे त्यात आता पेडल आले दुचाकी सायकल आता तीन आणि चार चाकी झाल्या. वाढलेल्या लोकप्रियतेमुळे १८५० साली या चार चाकी सायकल जगभरात निर्यात होऊ लागल्या.

१८३९ मध्ये तयार झालेल्या सायकलमध्ये किर्कपॅट्रीक मॅकमिलन या लोहाराने खूप चांगले बदल करून चालवण्यासाठी अधिक सोपी सायकल निर्माण केली. ही सायकल मध्यभागी बसवलेल्या पेडलच्या आधारावर चालते असा दावा नंतर किर्कपॅट्रीक मॅकमिलनच्या पुतण्याने केला.

ही पद्धती त्याने वाफेवर चालणाऱ्या रेल्वे इंजिनच्या चाकांसारखी केली होती. या सायकलींमध्ये १८६९ पर्यंत विकास होत गेला आणि मध्ये दांडा असलेली सायकल बनली.

सायकलच्या उत्क्रांतीच्या काळातील विविध सायकल्स आणि त्यांचा कालावधी-

  • १८५३ पेडल वाली पहिली सायकल Tretkurbelfahrrad.
  • १८६० बोन  शेकर सायकल. 
  • १८७० हाय व्हील सायकल
  • १८८० ते १८९० सेफ्टी सायकल

उत्क्रांती आणि संशोधनाच्या विविध टप्प्यांमधून विसाव्या शतकात प्रवेश करत असताना रोडस्टर नामक सकळ प्रकाराने जगाचा ठाव घेतला आणि संपूर्ण जगभर ती वापरली जाऊ लागली. अनेक यु*द्धांमध्ये सैनिकांना माहिती पुरवायला, महा यु*द्धांत देखील अन्य सामान पोहोचविण्यासाठी, व्यावसायिकदृष्ट्या काही हमालांना सुकर कार्य करता यावे यासाठी २०व्या शतकात सायकलची लोकप्रियता वैश्विक झाली आणि अजूनही सायकल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे.

रोजच्या आवश्यक गोष्टी घरपोच देणारे मामा असतील किंग व्यायाम म्हणून सायकलिंग करणारे पुरुष स्त्रिया असतील त्यांना सायकलचे महत्व आहेच. “सोने की सायकल चांदी का सीट, आओ चले डार्लिंग चले डबल सीट…” असे म्हणणारे प्रेमी युगुल जरी आता राहिले नसले तरी सायकलचा उपयोग अबाधित आहे. त्याबद्दलचे प्रेम देखील तसेच चिरतरुण आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

‘आयबीएम’ नसतं तर हि*टल*रच्या तावडीतून लाखो ज्यूंचा जीव वाचला असता..!

Next Post

चित्रपट, वेबसिरीज डाउनलोड करायला टोरंट वापरणे गुन्हा आहे का..? जाणून घ्या..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

चित्रपट, वेबसिरीज डाउनलोड करायला टोरंट वापरणे गुन्हा आहे का..? जाणून घ्या..!

अस्तित्वात नसलेल्या देशातून जपानच्या विमानतळावर आलेला 'तो' माणूस कोण होता, अचानक कुठे गायब झाला..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.