The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डोक्याला शॉट देणारे हे पाच साऊथ इंडियन पिच्चर बिलकुल चुकवू नका..!

by सोमेश सहाने
10 September 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


सिरीयल कि*लरचा आधार घेऊन एक छान सायको थ्रिलर प्रकारचा चांगला सिनेमा भारतात बनण्याच्या जवळपास आपण आशाच सोडून दिल्यात. इंग्रजीत सायलेन्स ऑफ द लँब्स, सेव्हन अशी बरीच उदाहरण आहेत. हिंदीत ‘द स्टोन मॅन म*र्डरर’ एक फार प्रसिद्ध नसलेला सिनेमा आहे, शिवाय अनुराग कश्यप, विकी कौशल आणि नवाजभाई असलेला “रमन राघव 2.0” हा ही एक या प्रकारचा दर्जेदार सिनेमा आहे.

पण साऊथ इंडियन सिनेमात असे खूप प्रयोग झाले, त्यापैकी काही दर्जेदार चित्रपटांची ही यादी. यातले सगळे सिनेमे युट्युबवर हिंदी भाषेत उपलब्ध आहेत.

रटसासन

ही यादी रटसासनचं नाव घेतल्याशिवाय सुरूच होऊ शकत नाही. याला भारतातला सर्वात लोकप्रिय थ्रिलर म्हणता येईल. सिरीयल कि*लर वगैरे काही नसतं असं मानणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये सिरीयल कि*लरवर चित्रपट बनवायचं स्वप्न अर्धवट राहिलेला आणि म्हणून पोलिसात भरती झालेला आपला नायक यात अगदीच नवखा वाटतो. पण कथा पुढे जाते तसं सिरीयल कि*लरची द*हश*त वाढते आणि हे नेमकं कोण करतंय याचा शेवटपर्यंत अंदाज लागत नाही.

Is 'Ratsasan' sequel on the cards? Vishnu Vishal's Twitter chat drops hint



प्रत्येक ह*त्या करताना गिफ्ट सोडणे, एका बहुलीला आणि प्रेताला समान जखमा करणं, एक ठराविक म्युजिक वापरणं, हे सगळं एक भयंकर पॅटर्न सेट करतं. हे काहीसं “सायलेन्स ऑफ द लॅब्स”चं भारतीय पण चांगलं व्हर्जन म्हणता येईल.

फॉरेन्सिक

सिरीयल कि*लर्सबद्दल अजूनही काही सिनेमे आहेत, पण सिनेमात चक्क लहान मुलं सिरीयल कि*लर असतात, असं तपासाअंती समजतं. हा सगळा तपास आपला नायक – एक फॉरेन्सिक एक्स्पर्ट करत असतो.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

पोलिसांच्या पारंपरिक पद्धतीला सोडून केलेल्या तपासातून, छोट्या छोट्या गोष्टींतून मोठे निष्कर्ष निघतात.

डोकं भंजाळूण टाकतील अशा खऱ्या तांत्रिक गोष्टी, आजार यांचा वापर करून ही कथा अधिक रंजक केली आहे. मारधड अगदीच नावापुरती पण याचा मुळाधार यातली रंजक तपास प्रक्रियाच आहे.

Forensic Movie Review | Forensic Review | Forensic Review And Rating | Forensic Critics Review - Filmibeat

थिरन

एकानंतर एक द*रोडे टाकणारी आणि अमानुष ह*त्या करणारी करणारी एक चतुर टोळी आणि तमिळनाडूचा एक स्मार्ट पोलीस अधिकारी यांच्यातला हा संघर्ष. द*रोड्यांचा पॅटर्न, पुरावे शोधणे आणि टोळीच्या गावाचा शोध लावणे ही प्रक्रिया जेवढी अवघड असेल तितकीच क्लिष्ट आणि रॉ सिनेमातही दाखवली आहे.

Theeran - Disney+ Hotstar

रेबॅन गॉगल घालून स्टाईल मारणाऱ्या पोलिसांना न दाखवता ही सिस्टीम नेमकी कशी हाल सोसत काम करते हे दाखवण्यावर भर दिलाय. अगदी इंग्रजांपासून टोळ्यांचा असणारा इतिहासही या कथेत छान ब्लेंड केलाय. टोळीची अमानुषता, जुन्या लढण्याच्या पद्धती यामुळं हा सगळा चेस अजूनच भयंकर रूप घेतो.

कातिल साया

हॉरर सिनेमात नेहमी हिंदू मायथॉलॉजीमधलं भूत असतं, पण या कथेत मुस्लिम ग्रंथातील “जीन” या भुताच्या अख्यायिकांच्या आधार घेतला आहे. एका हिल स्टेशनवर होणाऱ्या रहस्यमयी ह*त्यांचा तपास करायला एक नवीन पोलीस अधिकारी येतो. अचानक अंधार पडणे, पक्ष्यांचा ह*ल्ला, शेतात निरपराध लोकांच्या ह*त्या आणि यात काहीच मानवी हस्तक्षेपाचा पुरावा न सापडणं. यात त्रस्त झालेलं गाव आणि पोलीस भीतीत असतात.

जीनबद्दलची आख्यायिका सांगायला फ्लॅशबॅकमध्ये वापरलेले दृष्य तर मूळ सिनेमापेक्षाही भीतीदायक वाटतात.

शेवट काहीसा ओव्हर ड्रॅमॅटीक आणि काँजुरीनचा कॉपी वाटत असला तरी मूळ कथा आपल्याला धरून ठेवते. यात कोणी प्रसिद्ध कलाकार नाहीत याची जाणीव देखील आपल्याला होत नाही.

दृश्यम 2

प्रसिद्धी आणि समीक्षा या दोन्ही बाजूंनी आजवर भारतात बनलेला सर्वोत्तम थ्रिलर म्हणजे “दृश्यम 2”. पहिल्याच भागाचा जवळपास सगळ्या भारतीय भाषांमधे रिमेक बनला आहे, एक परफेक्ट सिक्वल म्हणूनही दृश्यम 2 ला गणलं जातं. आपला नायक पहिल्या भागात झालेल्या भयावह गोष्टीतून स्वतः सावरलाय असं दाखवत असतो पण त्याचं कुटुंब अजूनही त्याच धक्क्यात जगत असतं.

Drishyam 2 Review: A Solid Follow-Up Plot With Mohanlal's One-Man Show

मोठी मुलगी अजूनही झोपेतून दचकून उठते, त्याची पत्नी कुठं मन मोकळं करायलाही बोलू शकत नसते, आणि तो मात्र एका कथेवर सिनेमा बनविण्याच्या प्रयत्नात मग्न असतो. कुठल्याच पद्धतीने पोलिसांच्या हाती काही पुरावा लागत नसतो तरी त्यांनी जिद्द सोडलेली नसते. जेव्हा पुन्हा एकदा साशंकतेच्या घेऱ्यात आपल्या नायकाचा परिवार अडकतो तेव्हा तीच जुनी भयंकर हालअपेष्टा त्याच्या नशिबी येते. यापेक्षा जास्त प्लॉटबद्दल सांगितल्यास स्पॉईलर ठरेल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved

ShareTweet
Previous Post

या खटल्यातील आरोपीला माफी द्यावी म्हणून लोकांनी रस्त्यावर मोर्चे काढले होते

Next Post

पॅरालम्पिकमध्ये देशासाठी दहा गोल्ड मेडल मिळवणाऱ्या खेळाडूला उपचारासाठीही पैसे नव्हते

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

पॅरालम्पिकमध्ये देशासाठी दहा गोल्ड मेडल मिळवणाऱ्या खेळाडूला उपचारासाठीही पैसे नव्हते

जर बाबरला समरकंद टिकवता आले असते तर भारतात मुघल राजवट आली नसती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.